आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्सप्लेनर:मॉस्किरिक्समुळे मलेरियामुळे होणारे मृत्यू कमी होतील; केवळ 30% प्रभावीपणा असूनही का महत्त्वाची ठरतेय ही लस, जाणून घ्या

18 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • जाणून घ्या सविस्तर...

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) बुधवारी प्राणघातक मलेरियाविरुद्ध लसीला मंजूरी दिली आहे. ही लस पी. फाल्सिपेरम विरूद्ध प्रभावी आहे, जे जगातील सर्वात घातक मलेरिया पॅरासाइट मानले जाते. ही जगातील पहिली मलेरियावरील लस आहे, ज्याची क्लिनिकल डेव्हलपमेंट प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि युरोपियन मेडिसिन एजन्सी (EMA) कडून सकारात्मक वैज्ञानिक मत देखील प्राप्त झाले आहे.

सध्या, संपूर्ण जग कोविड -19 साथीच्या आजाराशी लढत आहे. त्याच्याविरुद्ध लसीची प्रभावीता 95%पर्यंत नोंदवली गेली आहे. या प्रकरणात, मलेरिया लस केवळ 30% प्रभावी आहे. तरीदेखील याला गेम चेंजर म्हटले जात आहे. असे का? ही लस काय आहे? कोणी बनवली? मलेरियाविरोधातील युद्धात हे शस्त्र कसे सिद्ध होईल? चला जाणून घेऊया...

मॉस्किरिक्स म्हणजे काय?

 • मॉस्किरिक्स (Mosquirix किंवा RTS, S/ASO1 किंवा RTS.S) ही जगातील पहिली आणि एकमेव मलेरियावरील लस आहे. यामुळे आफ्रिकेतील मुलांवरील चाचण्यांमध्ये प्राणघातक गंभीर मलेरियाला कमकुवत करण्यात मोठे यश मिळाले आहे.
 • युरोपियन मेडिसिन एजन्सी (EMA) नुसार, मॉस्किरिक्स लस 6 ते 17 महिन्यांच्या मुलांना चार डोसमध्ये दिली जाते. हे मलेरियापासून संरक्षण देते. सोबत हिपॅटायटीस बी विषाणूचा संसर्ग यकृतापर्यंत पोहोचण्यापासून प्रतिबंधित करते. ईएमएने चेतावनी दिली आहे की, लस फक्त या हेतूसाठी वापरली पाहिजे.
 • ही लस ग्लॅक्सोस्मिथक्लाइन (GSK) ने 1987 मध्ये विकसित केली होती. त्यानंतर त्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. मॉस्किरिक्सचे चार डोस द्यावे लागतात आणि काही महिन्यांनी संरक्षण निरुपयोगी होते. तरीदेखील शास्त्रज्ञांच्या मते, ही लस आफ्रिकेतील मलेरियाविरुद्ध प्रभावी ठरू शकते.
 • 2019 नंतर, घाना, केनिया, मालावी येथील मुलांना मॉस्किरिक्सचे 23 लाख डोस देण्यात आले. हा पायलट प्रोग्राम डब्ल्यूएचओने समन्वित केला होता. या भागांमध्ये मलेरियामुळे 5 वर्षांखालील मृत्यूचे प्रमाण खूप जास्त आहे.

मॉस्किरिक्स कसे वापरले जाईल?

 • मॉस्किरिक्स लसीचे 0.5 मिली इंजेक्शन मांडी किंवा खांद्याच्या स्नायूमध्ये दिले जाते. एका महिन्याच्या अंतराने मुलांना तीन इंजेक्शन्स दिली जातात. चौथे इंजेक्शन तिसऱ्या डोसनंतर 18 महिन्यांनी दिले जाते. मॉस्किरिक्स फक्त डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनेच दिले जाऊ शकते.

मॉस्किरिक्स कसे कार्य करते?

 • ईएमए शास्त्रज्ञांच्या मते, मॉस्किरिक्सचा सक्रिय पदार्थ प्लास्मोडियम फाल्सीपेरम परजीवीच्या पृष्ठभागावर आढळणाऱ्या प्रथिनांपासून बनवला आहे. जेव्हा मुलांना ही लस दिली जाईल, तेव्हा त्यांची रोगप्रतिकारक शक्ती पॅरासाइटचे 'फॉरेन' प्रोटीन ओळखून त्याविरुद्ध अँटीबॉडी बनवते.

मॉस्किरिक्स किती प्रभावी आहे?

 • मलेरियाची गंभीर प्रकरणे रोखण्यासाठी लसीची प्रभावीता केवळ 30% आहे. हे लक्षात घ्यावे लागेल की, ही मलेरिया विरुद्ध एकमेव मंजूर झालेली लस आहे.
 • युरोपियन युनियनच्या औषध नियामकाने 2015 मध्ये त्याला मान्यता दिली होती. असेही म्हटले गेले की, फायदे जोखमींपेक्षा जास्त आहेत. डब्ल्यूएचओने असेही म्हटले आहे की लसीचे दुष्परिणाम अत्यंत दुर्मिळ आहेत, परंतु कधीकधी तापासह सौम्य झटके देखील येऊ शकतात.

मॉस्किरिक्स मलेरियाचा प्रसार कसा थांबवेल?

 • लंडनच्या इम्पीरियल कॉलेजच्या संसर्गजन्य रोगांचे प्रमुख अजरा घनी म्हणाले की, जर आपण परिणामकारकता पाहिली आणि जरी ही मलेरियाची लस आफ्रिकेत 30% प्रभाव दाखवत असली तर 80 लाख कमी प्रकरणे येतील आणि 40 हजार मुलांचे जीव वाचू शकतील. ते महत्वाचे आहे.
 • घनी म्हणाले की जे लोक मलेरियामुळे प्रभावित देशांमध्ये राहत नाहीत त्यांच्यासाठी 30 टक्के कमी प्रभावी वाटू शकते, परंतु जे त्या भागात राहतात त्यांच्यासाठी मलेरिया ही सर्वात मोठी समस्या आहे. त्यांच्या मते 30% हा एक मोठा आकडा आहे आणि यामुळे अनेक मुलांचे जीव वाचतील.

अद्याप मलेरियाची लस का नव्हती?

 • कोविड -19 महामारीशी लढण्यासाठी सर्वात वेगाने लस तयार केली गेली आहे. अनेक लसी एका वर्षापेक्षा कमी कालावधीत प्रभावी सिद्ध झाल्या आहेत. तसेच साथीच्या​​​​​​​ रोगाचा सामना करण्यास मदत केली आहे. अशा परिस्थितीत मलेरियाच्या लसीला इतकी वर्षे का लागली असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो.
 • खरं तर, एक मोठं कारण म्हणजे डब्ल्यूएचओसह जगभरातील औषध नियामकांनी कोविड -19 साठी अनेक नियम बदलले. कोविड -19 च्या आधी, 1970 च्या दशकात​​​​​​​ मम्सची लस सर्वात वेगाने बनली होती, जी विकसित होण्यास सुमारे 4 वर्षे लागली. अन्यथा, इतर लसींच्या निर्मितीसाठी 10-15 वर्षे सामान्यपणे लागत असतात.​​​​​​​
 • मलेरियाच्या लसीबद्दल सांगायचे म्हणजे, 80 वर्षांपासून त्यासाठी प्रयत्न चालू होते. डब्ल्यूएचओने नुकतीच मंजूर केलेली लस देखील 1987 मध्ये बनवली गेली होती.
 • अडचण म्हणजे हा पॅरासाइटमुळे होणारा रोग आहे. ते पॅरासाइटच्या पुनरुत्पादनासाठी आवश्यक गमीसाइट देखील रक्तात सोडतात.
 • पॅरासाइटच्या पृष्ठभागावरील प्रथिने जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर बदलतात. यामुळे ते शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीपासून दूर राहते. या प्रथिनांना लक्ष्य करून लस तयार केली जाते आणि म्हणूनच आतापर्यंत यश मिळाले नाही.

लस यायला 30 वर्षांपेक्षा जास्त काळ का लागला?

 • GSK ची लस बराच काळ चाचण्यांमध्ये अडकली होती. द लॅन्सेट मध्ये प्रकाशित 2004 चा अभ्यासानुसार, जेव्हा मोझाम्बिकमध्ये 1-4 वर्षे वयोगटातील 2000 मुलांमध्ये चाचणी घेण्यात आली तेव्हा लसीकरणाच्या सहा महिन्यानंतर 57% कमी झाले होते. हळूहळू लसीची प्रभाविता कमी होऊ लागली.
 • 2009-2011 दरम्यान 7 आफ्रिकन देशांमध्ये चाचणी घेण्यात आली होती, त्यावेळी 6-12 आठवड्यांच्या मुलांमध्ये पहिल्या डोसनंतर कोणतीही सुरक्षा दिसली नाही. तर 17-25 महिन्यांच्या मुलांमध्ये पहिला डोसनंतर संक्रमण 40% आणि गंभीर संक्रमण 30% कमी झाले होते.
 • संशोधन चालू राहिले आणि 2019 मध्ये WHO ने घाना, केनिया आणि मलावी येथे एक पायलट प्रोग्राम सुरू केला, ज्यामध्ये 8 लाखांहून अधिक मुलांना ही लस देण्यात आली. त्याच्या परिणामांवर आधारित, WHO ने लस वापरण्यास मान्यता दिली आहे. 23 लाखांपेक्षा जास्त डोस दिल्यानंतर मृत्यूंमध्ये 30% घट दिसून आली आहे.

आफ्रिकन देशात मलेरिया कोरोनापेक्षा अधिक धोकादायक आहे का?

 • होय. मलेरिया कोविड - 19 पेक्षा आफ्रिकेसाठी अधिक धोकादायक असल्याचे सिद्ध झाले आहे. विशेष म्हणजे मलेरियाचे सर्वाधिक बळी आफ्रिकन देशांमध्ये जातात.
 • सामान्यपणे दर मिनिटाला एका लहान मुलाचा मलेरियामुळे जीव जातो. जगातील एकूण मृत्यूंपैकी अर्धे मृत्यू केवळ 6 आफ्रिकन देशांमध्ये होतात. यातील एक​​​​​​​ तृतीयांश मृत्यू एकट्या नायजेरियात होतात.
 • डब्ल्यूएचओचा अंदाज आहे की, 2019 मध्ये 3.86 लाख लोक या पॅरासाइट इन्फेक्शनमुळे मृत्यू पावले. त्या तुलनेत​​​​​​​ कोविड -19 मुळे 18 महिन्यांत 2.12 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. डब्ल्यूएच्या म्हणण्यानुसार, 94% मलेरियाची प्रकरणे आणि मृत्यू आफ्रिकन देशात आढळली, ज्या खंडात 1.3 अब्ज लोक राहतात.

आतापर्यंत किती देश मलेरिया मुक्त झाले आहेत?

 • जगभरात अशा देशांची संख्या वाढत आहे जे मलेरिया मुक्त झाले आहेत किंवा मुक्त होण्याच्या मार्गावर आहेत. 2000 मध्ये केवळ सहा देश मलेरियामुक्त होते, जे 2019 मध्ये वाढून 27 झाले आहेत. येथे 100 पेक्षा कमी स्थानिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
 • सलग तीन वर्षे शून्य मलेरियाची नोंद करणाऱ्या देशांना WHO कडून मलेरिया निर्मूलन प्रमाणपत्र मिळते. गेल्या दोन दशकांत 11 देशांनी WHO कडून हे प्रमाणपत्र मिळवले आहे. यूएई (2007), मोरोक्को (2010), तुर्कमेनिस्तान (2010), आर्मेनिया (2011), श्रीलंका (2016), किर्गिस्तान (2016), पॅराग्वे (2018), उझबेकिस्तान​​​​​​​ (2018), अल्जेरिया (2019), अर्जेंटिना (2019) आणि अल साल्वाडोर (2021) या देशांचा यात समावेश आहे.
बातम्या आणखी आहेत...