आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराते वर्ष होते 1997. डिसेंबर महिना होता. पश्चिम बंगालमधील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्या आणि त्यांचे समर्थक अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. त्यांची पत्रकार परिषद सुरुच असताना त्यांची काँग्रेसमधून 6 वर्षांसाठी हकालपट्टी झाल्याची बातमी आली. कदाचित पक्षाचा हा निर्णय ममतांना आधीच कळला असावा.
राजीव गांधींपर्यंत पोहोच असलेल्या ममता यांना हटवण्याचा निर्णय लगेच घेण्यात आला नाही, पण त्यांच्यात आणि काँग्रेसमध्ये अनेक वर्षांपासून वैचारिक मतभेद सुरू होते. पक्षात त्यांचे सर्वात मोठे विरोधक होते तत्कालीन बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष सोमेंद्र नाथ मित्रा. ममता मित्रा यांना टरबूज म्हणायची, कारण टरबूज आतून लाल असतो आणि डाव्यांचा रंगही लाल असतो.
ममतांना मित्रा हे डाव्यांचे समर्थक असल्याचे वाटत होते आणि ममता या डाव्यांच्या सर्वात मोठ्या शत्रू होत्या. नंतर ममता यांचे सोनियांशी अनेक मुद्द्यांवर मतभेद झाले आणि त्यांनी 1 जानेवारी 1998 रोजी नवीन पक्ष स्थापन केला. तेव्हापासून TMC ला 25 वर्ष झाले आहेत. मात्र, पक्ष पश्चिम बंगालच्या बाहेर कुठेही सरकार बनवू शकला नाही.
दीदी बंगालबाहेर अपयशी ठरल्या
बंगालबाहेरील कोणत्याही राज्यात टीएमसीला स्वतःहून दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही, तर सरकार स्थापन करण्याचा प्रश्नच येत नाही. 2021 मध्ये, मेघालयमध्ये टीएमसीचे 12 आमदार होते, परंतु ते सर्व काँग्रेसमधून टीएमसीमध्ये आले होते. टीएमसीच्या तिकिटावर विजयी झालेले एकही आमदार नव्हते.
TMC 2001 मध्ये आसाममध्ये, 2005 मध्ये यूपी, 2009 मध्ये अरुणाचल प्रदेश, 2009 मध्ये केरळ, 2012 मध्ये मेघालय-मणिपूर, 2014 मध्ये तामिळनाडू, 2017 मध्ये पंजाब, 2018 मध्ये त्रिपुरा, 2021 मध्ये हरियाणा, 2021 मध्ये बिहार, 2022 मध्ये गोवा अशा निवडणुका लढवल्या. कधी निवडणुकीच्या माध्यमातून तर कधी कार्यक्रमाच्या माध्यमातून पक्षाने आपले कार्य सुरुच ठेवले होते. पण यापैकी एकाही राज्यात पक्षाला सरकार स्थापन करता आले नाही.
मेघालयात काही काळ सोडला तर प्रमुख विरोधी पक्षही होऊ शकला नाही. ममता यांनी केवळ बंगालमध्ये सलग तीन वेळा विजय मिळवला आहे.
बंगालच्या सागरदिघी जागेच्या पोटनिवडणुकीत नुकत्याच झालेल्या पराभवानंतर बंगालमध्येही टीएमसीसाठी लोकसभा निवडणुकीत एकतर्फी होईल असे वाटत नाही. 2019 मध्येच भाजपने बंगालमध्ये लोकसभेच्या 42 पैकी 18 जागा जिंकल्या आहेत.
देवेगौडा 46 जागांसह पंतप्रधान होऊ शकतात तर ममता का नाही?
ममता बॅनर्जी यांनी 2024 ची निवडणूक एकट्याने लढण्याची घोषणा केली आहे. सागरदिघी येथे 23 हजार मतांनी पराभव झाल्याबद्दल त्या म्हणल्या की, भाजप, सीपीएम आणि काँग्रेसच्या एकजुटीमुळे हे घडले. टीएमसीच्या ताकदीचे वर्णन करताना, त्यांचे राज्य उपाध्यक्ष जयप्रकाश मजुमदार म्हणतात की, 'टीएमसी लोकसभेतील चौथा सर्वात मोठा पक्ष आहे. राज्यसभेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष आहे. भारतातील सर्वाधिक आमदार असलेला हा तिसरा पक्ष आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रानंतर पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक (42) खासदार आहेत.
अशा परिस्थितीत बंगालमध्ये क्लीन स्वीप केल्यानंतर विरोधी पक्षांमध्ये त्यांचा पक्ष मोठी भूमिका बजावू शकेल, अशी पक्षाला आशा आहे. मजुमदार यांच्या मते, पक्षाने लोकसभेच्या 40 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. बंगालबाहेर ज्या जागांवर पक्षाचा चांगला जनाधार आहे, त्या जागांवरच उमेदवार उभे केले जातील. 1996 मध्ये जनता दलाचे देवेगौडा 46 जागांसह पंतप्रधान होऊ शकतात, तर ममता 2024 मध्ये ते का करू शकत नाहीत, असे तृणमूल नेत्यांना वाटते.
त्रिपुराची 60% लोकसंख्या बंगाली भाषिक, पण TMC ला 1% मते
त्रिपुरामध्ये ममता बॅनर्जी यांनी सर्व शक्ती लावण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे राज्यातील 60% लोक बांगला भाषा बोलतात. मेघालय आणि गोव्यातही पक्ष गेला कारण ही छोटी राज्ये आहेत आणि इथली संस्कृती बंगालसारखी आहे. अशा परिस्थितीत त्यांना यश मिळण्याची शक्यता वाटत होती. पण तिन्ही राज्यांच्या निकालांनी टीएमसीची निराशा केली आहे.
टीएमसीने त्रिपुरामध्ये 60 पैकी 28 जागा लढवल्या, पण एकही जागा जिंकता आली नाही. मतदानाची टक्केवारी 1% पेक्षा कमी राहिली. TMC ने 2021 मध्ये मेघालयमध्ये कॉंग्रेस पक्षात धुमाकूळ घातला आणि दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले मुकुल संगमा त्यांच्या 11 सहकारी आमदारांसह TMC मध्ये सामील झाले. यानंतर टीएमसी प्रमुख विरोधी पक्ष बनला. अशा परिस्थितीत 2023 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पक्ष सत्तेवर येईल, अशी त्यांना पूर्ण आशा होती, मात्र मेघालयमध्ये पक्षाला केवळ 5 जागा मिळाल्या. म्हणजे तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झालेल्या काँग्रेसच्या 12 आमदारांच्या संख्येइतकीही टीएमसी पोहोचू शकली नाही.
मी टीएमसीचे प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश मजुमदार यांना विचारले की, बंगालच्या बाहेर तुम्ही सर्वत्र पराभव पचवत आहात आणि भाजपला सत्तेवरून हटवण्याचा दावा करताय? त्यावर ते म्हणाले, 'दुसऱ्या राज्यात जाऊन पक्षाचा विस्तार करणे म्हणजे दुकान उघडून धंदा सुरू करण्यासारखे नाही. निवडणूक यंत्रणा असते यामध्ये लोकांपर्यंत पोहोचण्यास आणि प्रवेश करण्यास वेळ लागतो.
ते पुढे म्हणाले की, ‘मेघालयमध्ये आम्ही भाजपपेक्षा तीन जागा जास्त जिंकल्या आणि काँग्रेसच्या बरोबरीत जागा आम्हाला मिळाल्या आहेत. तेही पहिल्यांदाच निवडणूक लढवत असताना. त्रिपुरातील स्थानिक निवडणुकीत आम्हाला विजय मिळाला. 20% मते मिळाली, पण विधानसभा निवडणूक भाजप विरुद्ध काँग्रेस-सीपीएम अशी झाली. त्रिपुराच्या डोंगराळ भागातही भाजपला यश मिळाले नाही. ते फक्त मैदानी भागातच जिंकू शकले. आगामी काळात त्रिपुरा-मेघालयातील निवडणुका आम्ही नक्कीच जिंकू.
बंगालचे मुस्लिमही ममता बॅनर्जींवर नाराज आहेत का?
2021 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत, TMC चे सुब्रत साहा यांनी सागरदिघी जागेवर 50,000 मतांनी विजय मिळवला, परंतु 22 महिन्यांनंतर ही जागा काँग्रेसच्या खात्यात गेली. काँग्रेस उमेदवाराच्या विजयाचे अंतरही 23 हजार मतांचे आहे. सागरदिघी येथे 64% मुस्लिम लोकसंख्या आहे. अशा परिस्थितीत बंगालचा मुस्लिमही दीदींवर नाराज आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पश्चिम बंगालमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या 27% आहे आणि निवडणुका जिंकण्यात या समाजाचा मोठा वाटा आहे. आतापर्यंत मुस्लिम ममता बॅनर्जींना एकतर्फी विजय मिळवून देत होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी ममता यांना जे संकेत मिळत आहेत ते चांगले दिसत नाहीत. पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आली आहेत.
शिक्षक भरतीत हजारो शिक्षक रस्त्यावर बसले आहेत. उच्च न्यायालयाने नोकरभरती प्रक्रियेतील वरीष्ट पातळीवरील भ्रष्टाचाराबाबतही मत व्यक्त केले आहे. बीरभूममध्ये झालेल्या हिंसाचारात अल्पसंख्याक समाजातील लोक मारले गेले. ममता सरकारमधील नंबर दोनच्या मंत्र्यापासून ते त्यांच्या खास अनुब्रता मंडल यांच्यापर्यंत बरेच लोक तुरुंगात आहे. अशा परिस्थितीत बंगाल वाचवणे हे ममता यांच्यासाठी आव्हान बनल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेस कधी डाव्यांसोबत, कधी विरोधात, विश्वास कसा ठेवणार
मजुमदार म्हणतात की, सध्याच्या भारतीय राजकारणात शरद पवार सोडले तर ममता बॅनर्जींइतका ज्येष्ठ आणि अनुभवी नेता नाही. पीएम मोदीही त्यांच्यापेक्षा कनिष्ठ आहेत, कारण ममता इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या काळापासून राजकारण करत आहेत आणि नरसिंह राव सरकारमध्ये मंत्रीही होत्या.
ते पुढे म्हणतात की, 'सध्याच्या काळात काँग्रेस कोणत्याही धोरणाशिवाय राजकारण करत आहे. तो केरळमध्ये डाव्यांविरुद्ध लढतात. त्यांचे नेते राहुल गांधी डाव्यांचा पराभव करून तिथून निवडणूक जिंकतात, पण बंगालमध्ये डाव्यांशी युती करून टीएमसीविरुद्ध लढतात. अशा स्थितीत काँग्रेसवर विश्वास कसा ठेवायचा? काँग्रेसने स्वबळावर 140 जागा आणल्या तर आपोआपच त्यांचे स्थान मोठे होईल. 40-50 जागा जिंकून स्वत:ला मोठा पक्ष समजलात तर चालेल कसे?
लोकसभा निवडणुकीत 40 जागांचे लक्ष्य
TMC ने लोकसभेच्या 40 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. नव्या रणनीतीने कामाला सुरुवात केली आहे. भाजप आज एवढी मजबूत बनली आहे ती केवळ काँग्रेसमुळेच, असे मुझुमदार सांगतात. काँग्रेसने आपले काम नीट केले असते तर लोकसभेची स्थिती वेगळी असती. आता मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि कर्नाटकात काँग्रेस कशी निवडणूक लढवते ते पाहत आहोत. यामुळे बरेच काही स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले.
RSSS 2024 ची तयारी करत असले, तरी राज्यांमध्ये भाजप अडचणीत आहे. विशेषतः मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि कर्नाटकमध्ये पक्ष अडचणीत आहे. वाचा हा रिपोर्ट...
मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि कर्नाटक ही तीन राज्ये अशी आहेत, जिथे निवडणुका तोंडावर आल्या आहेत आणि इथे भाजप अडचणीत दिसत आहे. या ठिकाणी सरकार स्थापन होणार, असा दावा पक्षाला करता येत नाही. कारणही दिसत आहे, पण पक्ष नेतृत्वाकडे उपाय नाही. मध्य प्रदेशात पक्षाच्या सर्वेक्षणात जागा 100 पेक्षा कमी राहतील असे दिसून आले आहे. आणि इतक्याने सरकार स्थापन होऊ शकत नाही. छत्तीसगडमध्ये पक्षाकडे मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा नाही. कर्नाटकात अँटी इन्कम्बन्सीचे तोड नाही. पूर्ण बातमी वाचा...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.