आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सप्लेनरकाँग्रेस अध्यक्ष निवडणुकीत हेराफेरीची भीती:मनीष तिवारी का करताहेत, सदस्य यादी जाहीर करण्याची मागणी?

नीरज सिंहएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

28 ऑगस्ट 2022

काँग्रेस अध्यक्षपदासाठी कोणीही अर्ज दाखल करू शकतो. ही लोकशाही फक्त आमच्या पक्षात आहे.

- जयराम रमेश, काँग्रेस नेते

31 ऑगस्ट 2022

'मतदार यादी जाहीर केल्याशिवाय निष्पक्ष निवडणूक कशी होणार? क्लबच्या निवडणुकीतही असे होत नाही!'

- मनीष तिवारी, काँग्रेस नेते

पहिले वक्तव्य 17 ऑक्टोबर रोजी काँग्रेसस अध्यक्षपदासाठीच्या मतदानाची घोषणा करतांना जयराम रमेश यांनी केले होते. मात्र, त्याच्या 3 दिवसांनंतर म्हणजेच 31 ऑगस्ट रोजी काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी निवडणुकीच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित केले. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करणाऱ्या पीसीसी सदस्यांची यादी जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

अशा परिस्थितीत, आज आम्ही एक्सप्लेनरमध्ये सांगत आहोत की, काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक कोण लढवू शकते आणि कोणते सदस्य त्यांची निवड करतात, मनीष तिवारी निवडणुकीच्या निष्पक्षतेवर प्रश्न का उपस्थित करत आहेत...

काँग्रेस अध्यक्षपदाची निवड समजून घेण्यापूर्वी संघटनेविषयी जाणून घ्या..

1. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी म्हणजेच AICC

2. काँग्रेस कार्यकारिणी अर्थात CWC

3. प्रदेश काँग्रेस कमिटी म्हणजेच PCC

4. जिल्हा/शहर काँग्रेस कमिटी

5. ब्लॉक कमिटी

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत केवळ पीसीसीचे सदस्यच प्रस्तावक आणि उमेदवार असू शकतात. म्हणजेच उमेदवार होण्यासाठी PCC च्या फक्त 10 प्रस्तावकांची गरज असते. ब्लॉक आणि जिल्हा समिती पीसीसी सदस्यांची निवड करते. सध्या पीसीसीमध्ये सुमारे 9 ते 10 हजार सदस्य आहेत.

AICC सदस्य प्रत्येक 8 PCC सदस्यांमधून निवडले जातात. सध्या AICC चे सुमारे 1500 सदस्य आहेत.

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक कोण घेते?

CWC ही काँग्रेसची सर्वोच्च कार्यकारी संस्था आहे. CWC स्वतः काँग्रेस अध्यक्षांच्या निवडीची घोषणा करते. सर्व प्रथम, ते निवडणूक आयोगासारख्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाच्या सदस्यांची नियुक्ती करते. त्यात 3 ते 5 सदस्य असतात. सध्या काँग्रेस नेते मधुसूदन मिस्त्री त्याचे अध्यक्ष आहेत.

त्यानंतर, पीसीसीचे 10 सदस्य निर्धारित तारखेच्या आत अध्यक्षपदासाठी एका सदस्याचे नाव रिटर्निंग ऑफिसरकडे सादर करतात.

कोणत्याही सार्वत्रिक निवडणुकीप्रमाणेच काँग्रेस अध्यक्षपदासाठी सर्व उमेदवारांची नावे दिल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 7 दिवसांचा अवधी दिला जातो.

माघारीनंतर, उर्वरित उमेदवारांची नावे स्टेट युनिटकडे म्हणजे राज्याच्या कमेटीकडे पाठवली जातात. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर एकच उमेदवार राहिला तर त्याला अध्यक्ष म्हणून घोषित केले जाते.

दुसऱ्या परिस्थितीत, CWC उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर 7 दिवसांनी मतदान घेते. 2 पेक्षा जास्त उमेदवार असल्यास मतदारांना पसंतीक्रमानुसार दोन नावे बॅलेट पेपरमध्ये टाकावी लागतात. यानंतर राज्य ही मतपेटी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडे म्हणजेच एआयसीसीकडे पाठवते.

जर एखाद्या उमेदवाराला पहिल्या पसंतीच्या आधारावर 50% पेक्षा जास्त मते मिळाली तर त्याला विजयी घोषित केले जाते.

त्याच वेळी, विद्यमान अध्यक्षांचे निधन किंवा राजीनामा दिल्यास, सर्वात ज्येष्ठ सरचिटणीस यांना अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाते. ही नियुक्ती CWC तात्पुरत्या अध्यक्षाची निवड करेपर्यंत कालावधीसाठी असते.

अखेर मनीष तिवारी निवडणुकीच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह का उपस्थित करत आहेत?

काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी 9,000 पीसीसी सदस्यांची नावे सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रस्तावक सदस्य नसल्याचे कारण सांगून उमेदवाराचा अर्ज रद्द होऊ शकतो, अशी भीती तिवारी यांनी व्यक्त केली आहे.

मनीष तिवारी देखील CWC च्या निवडणुकीची मागणी करत आहेत. CWC मध्ये पक्षाध्यक्ष, संसदेतील नेता आणि इतर 23 सदस्य असतात. यापैकी 12 AICC द्वारे निवडले जातात. तर उर्वरित सदस्यांना पक्षाध्यक्ष नामनिर्देशित करतात.

गेल्या 50 वर्षांत केवळ 2 CWC निवडणुका झाल्या आहेत. या दोन्ही निवडणुकीत नेहरू-गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती सत्तेवर होती.

म्हणजेच AICC चे सदस्य जे CWC मध्ये देखील आहेत, त्यांची अध्यक्षांनी निवड केली आहे. म्हणजेच सर्व सदस्य अध्यक्षांच्या जवळचे आहेत.

मनीष तिवारी यांचीही तीच चिंता आहे. म्हणजेच, निवडणूक लढवण्याच्या स्थितीत, पीसीसी सदस्यांना विशिष्ट व्यक्तीला मतदान करण्यास सांगितले जाऊ शकते.

40 वर्षांत केवळ 2 वेळा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली

काँग्रेसच्या 70 वर्षांच्या इतिहासात अध्यक्षपदावर फक्त गांधी-नेहरू घराण्याचे वर्चस्व राहिले आहे. गेल्या 40 वर्षांत अध्यक्षपदासाठी दोनच निवडणुका झाल्या आहेत.

शेवटची निवडणूक 2000 साली झाली होती, जेव्हा जितेंद्र प्रसाद सोनिया गांधींविरुद्ध निवडणूक लढवली होती. यादरम्यान सोनियांनी जितेंद्र यांचा 7,448 मतांनी पराभव केला. जितेंद्र यांना निवडणुकीत केवळ 94 मते मिळाली होती.

2000 मध्ये सोनिया गांधींविरोधात काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढणारे जितेंद्र प्रसाद प्रचारासाठी भोपाळला पोहोचले तेव्हा काँग्रेसचे कार्यालय बंद दिसले. अनेक ठिकाणी त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले.
2000 मध्ये सोनिया गांधींविरोधात काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढणारे जितेंद्र प्रसाद प्रचारासाठी भोपाळला पोहोचले तेव्हा काँग्रेसचे कार्यालय बंद दिसले. अनेक ठिकाणी त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले.

1997 मध्ये सीताराम केसरी यांनी शरद पवार आणि राजेश पायलट यांचा सहज पराभव केला. यावेळी सीताराम केसरी यांना 6,224 पवार यांना 882 आणि पायलट यांना 354 मते मिळाली होती.

सोनिया आणि राहुल यांनी 2000 सालापासून कधीही निवडणुकीतील आव्हानाचा सामना केला नाही.

यावरून संघटनेवर गांधी घराण्याची पकड कशी टिकून आहे, हे समजू शकते. त्यामुळे संघटनेत नव्याने निवडणुका घेण्याची मागणी मनीष तिवारी करत आहेत. जेणेकरून गांधी घराण्याच्या जवळच्या सदस्यांव्यतिरीक्तही इतर सदस्य यामध्ये सहभागी होतील.

बातम्या आणखी आहेत...