आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:वर्षभर बंद चित्रपटगृहांचे ‘क्वॉरंटाइन’ आता संपले; चित्रपट प्रदर्शनाने फक्त ताेटाच भरून निघणार नाही, तर संपूर्ण उद्याेगाला मिळेल प्राणवायू

मनीषा भल्ला | मुंबई20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 100% क्षमतेसह चित्रपटगृहे उघडण्याच्या परवानगीनंतर अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर
  • दक्षिण आणि बाॅलीवूडसह अनेक प्रादेशिक चित्रपटही येणार माेठ्या पडद्यावर

कोरोनामुळे वर्षभर ‘क्वॉरंटाइन’ असलेल्या चित्रपटगृहांमध्ये पुन्हा लगबग वाढू लागली आहे. केंद्र सरकारच्या १०० टक्के क्षमतेने चित्रपटगृह सुरू करण्याच्या परवानगीनंतर सात राज्यांत त्याची सुरुवात झाली आहे. परंतु उत्तर भारतात वितरक व चित्रपटगृह मालकांना चित्रपट सिनेमागृहापर्यंत आणण्यासाठी खूप मेहनत करावी लागत आहे. तरीही या वर्षात इतके चित्रपट प्रदर्शित हाेणार आहेत की त्यामुळे केवळ चित्रपटगृहांचा १० हजार काेटींचा ताेटा भरून तर निघेलच, पण यामुळे पूर्ण चित्रपट उद्याेगालाच प्राणवायू मिळणार आहे. पुढच्या आठवड्यात पूनम ढिल्लनचा मुलगा अनमाेल याचा ‘ट्युजडे अँड फ्रायडे’ प्रदर्शित हाेईल. बच्चे कंपनीचा ‘टाॅम अँड जेरी’ तर मार्चमध्ये ‘गाॅडझिला व्हर्सेस काँग’ व राणा दागुबातीचा ‘हाथी मेरे सा‌थी’ प्रदर्शित हाेईल. मेमध्ये ‘फास्ट अँड फ्युरियस’ येत आहे. अनेक प्रादेशिक चित्रपटही प्रदर्शनाच्या रांगेत आहेत. कार्निव्हल चित्रपटगृहांच्या साखळीचे वरिष्ठ उपाध्यक्ष कुणाल साहनी म्हणाले, आतापर्यंत दाेन बंगाली, एक तेलगू, एक तामिळ, बाॅलीवूडचा ‘राधे’ चित्रपटगृहात प्रदर्शित हाेण्याची घाेषणा झाली आहे.

दसऱ्याला ‘मैदान’ आणि दिवाळीला ‘रक्षाबंधन’

दसऱ्याला अजय देवगणचा फुटबाॅलवरचा ‘मैदान’ चित्रपट व ज्युनियर एनटीआरच्या ‘आरआरआर’ची घाेषणा झाली असून ताे एकाच वेळी अनेक भाषांत प्रदर्शित हाेईल. दिवाळीला अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’,शाहिद कपूरचा ‘जर्सी’ येत आहे. चित्रपट वितरक अक्षय राठी म्हणालेे जुलैमध्ये ‘केजीएफ - २’, सप्टेंबरमध्ये ‘लायगर’, ‘अपने - २’, गांधी जयंतीला फरहान अख्तरचा ‘तुफान’ चित्रपट येतील. ‘पृथ्वीराज’, ‘सूर्यवंशी’ व‘83’ च्या प्रदर्शनाची घाेषणा लवकरच हाेईल.

१० हजार काेटींचा ताेटा, अर्थसंकल्पातून निराशाच

चित्रपटगृह संचालकांनी सरकारकडे अर्थसंकल्पात कर व वार्षिक परवाना शुल्कात सवलत मागितली हाेती. त्यांना दिलासा मिळाला नाही. मुंबई झी-७ मल्टिप्लेक्स व मराठा मंदिर चित्रपटगृहाचे कार्यकारी संचालक मनाेज देसाईंच्या मते, एक चित्रपटगृह वा मल्टिप्लेक्स चालवण्यासाठी महिना २५ लाख ते एक काेटी रुपये खर्च येताे. लाॅकडाऊनमध्ये सर्वात आधी चित्रपटगृहे बंद झाली व आताही पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत. नवीन चित्रपटांच्या प्रदर्शनाने चित्रपटगृहांची पुन्हा रुळावर येण्याची अपेक्षा आहे.

बातम्या आणखी आहेत...