आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Mathematical Formulas At The Bus Stop In The Village; Fifty Bus Stops Will Be Painted Under 'Mission Mathematical' Educational Initiative

दिव्य मराठी विशेष:गावात बसस्टाॅपवर गणिताची सूत्रे; ‘मिशन मॅथेमॅटिक’ शैक्षणिक उपक्रमांतर्गत पन्नास बस थांबे रंगवणार

अतुल पेठकर । नागपूर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चंद्रपूर जिल्ह्यातील घोसरी या गावातील बस थांबे पूर्णपणे रंगवले

कोणत्याही गावातील बसथांब्याच्या भिंती पान व तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी रंगलेल्या दिसतात. दुपारच्या वेळी गावकऱ्यांची हक्काची आरामाची जागा म्हणजे बस थांबा असते. पण, चंद्रपूर जिल्ह्यातील घोसरी या गावातील बस थांबा गणिताच्या सूत्रांनी रंगलेला आहे. घाेसरीसह चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे पन्नास बस थांबे अशा प्रकारे गणिताच्या सूत्रांनी रंगवणार असल्याचे “मिशन मॅथेमॅटिक’ उपक्रमाचा प्रणेता अक्षय वाकुडकर याने दिली.

अक्षय एका सामान्य शेतकरी कुटुंबातील आहे. त्याचे वडील हरिदास वाकुडकर यांची गावात शेती आहे. उत्पन्न जेमतेमच. मुलांच्या शिक्षणाची आबाळ होऊ नये म्हणून दोन्ही मुलांना त्यांनी पोटाला चिमटा घेऊन शहरात शिकवले. अक्षयने नागपुरात इलेक्ट्राॅनिक इंजिनिअरिंग केले. दरम्यान, वडील आजारी पडले. उपचार सुरू असताना एक दिवस अक्षयला जवळ बोलावून सांगितले की, गावात शिक्षणासाठी काहीतरी कर. त्यानंतर ते गेले. गावात शिक्षणासाठी नेमके काय करावे याविषयी विचार करीत असताना मुलांना गणीत हा विषय सर्वाधिक भेडसावत असल्याचे लक्षात आले. म्हणून मुलांची गणीताची भीती घालवण्यासाठी गावातील घरांच्या भिंतीच गणिताच्या सूत्रांनी रंगवायचे ठरवले.

असे आहे “मिशन मॅथमॅटिक’

चंद्रपूर जिल्ह्यातील घोसरी या गावामध्ये या उपक्रमाचा प्रयाेग यशस्वीपणे साकारला गेला अाहे. त्यामुळे गावातील मुलांना चालता-बाेलता शिक्षणाचे धडे गिरवता येत अाहेत. या गावातील ३० भिंतींसह सुमारे २० गावांतील भिंती पहिली ते दहावीच्या गणिताच्या सूत्रांनी रंगलेल्या आहे. त्यामुळे मुले चालता चालता येता जाता हसत खेळत गणित शिकतात. अक्षय वाकुडकर या युवकाने मुलांची गणिताची भीती घालवण्यासाठी हा उपक्रम सुरू केला. त्याच्या या वेगळ्या उपक्रमाने मुलांमधील गणित विषयाची भीती पूर्णपणे दूर केली आहे. आम्ही पहिले भिंती रंगवल्या. त्याचा पुढचा भाग म्हणून आता बस थांबे रंगवणार असल्याचे अक्षयने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...