आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
डॉ. अजय प्रताप, माजी कुलसचिव, आर्यभट्ट ज्ञान विद्यापीठ, पाटणा
श्रीनिवास रामानुजन अय्यंगार एक महान भारतीय गणितज्ञ होते. त्यांचा जन्म २२ डिसेंबर १८८७ रोजी झाला होता. त्यांनी गणिताचे कुठलेही विशेष प्रशिक्षण घेतले नव्हते. मात्र तरीही त्यांनी गणितीय विश्लेषण आणि संख्या पद्धतीच्या क्षेत्रात अतुलनीय योगदान दिले. त्यांनी प्रतिभा व जिद्दीच्या जोरावर गणितीय सिद्धांताचा शोध लावत भारताची मान जगभरात उंचावली. आजारपणातही त्यांनी मॉक थीटा फंक्शनचा शोध लावला होता. याचा उपयोग केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात आरोग्य क्षेत्रात कॅन्सरवरील उपचारासाठी केला जातो. आध्यात्मिक विचार न मिळणाऱ्या गणिताच्या सूत्रांना काही अर्थ नसतो, असे रामानुजन मानत होते. या महान व्यक्तिमत्त्वाचा जन्मदिवस गणित दिन म्हणून साजरा केला जातो.
विलक्षण प्रतिभेच्या आधारे रामानुजन यांनी आपल्या अल्प जीवनात ३८८४ गणितातील प्रमेये आणि सिद्धांतांचा संग्रह केला. त्यांनी सहज ज्ञान व बीजगणितावरील अद्वितीय प्रभुत्वाच्या आधारे या क्षेत्रात मोठे योगदान दिले. तसेच गणित क्षेत्रात होणाऱ्या संशोधन कार्यासाठी रामानुजन जर्नलची स्थापना करण्यात आली आहे.
केम्ब्रिज विद्यापीठात जगविख्यात प्राध्यापक जी.एच.हार्डी यांच्या संपर्कात आल्यानंतर रामानुजन यांना मोठी संधी मिळाली. त्यांनी प्रा. शेषू अय्यर यांच्या माध्यमातून आपले सिद्धांत आणि सूत्रांची काही शोधपत्रे प्रा.जी.एच.हार्डींना पाठवली. याने प्रभावित होऊन हार्डी यांनी त्यांचे काही अनुत्तरित प्रश्न रामानुजन यांच्याकडे पाठवले. विशेष म्हणजे, रामानुजन यांनी अत्यंत सहजरीत्या या प्रश्नांची उत्तरे दिली. हार्डींनी रामानुजन यांच्यातील प्रतिभा ओळखून त्यांना केम्ब्रिज विद्यापीठात येण्याचे निमंत्रण दिले. रामानुजन यांनी तेथे हार्डींसोबत अनेक शोध लावले. फेलो ऑफ रॉयल सोसायटीचे सदस्यत्व मिळणारे ते पहिले कृष्णवर्णीय होते. तसेच ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळवणारे ते प्रथम भारतीय ठरले. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना भारतात परतावे लागले. भारतात परतल्यानंतर ते मद्रास विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू झाले.
वयाच्या 33 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
२६ एप्रिल १९२० रोजी वयाच्या ३३ व्या वर्षी या महान गणितज्ञाचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने गणित क्षेत्राची मोठी हानी झाली. रामानुजन यांनी मॅथेमॅटिकल अॅनालिसिस इन्फिनाइट सिरीज, नंबर थिअरी व कॉन्टिन्यूड फ्रेक्सन्समध्ये अतुलनीय योगदान दिले. त्यामुळे या चारही विषयांना नवीन दिशा मिळाली. त्यांच्या योगदानासाठी त्यांना नेहमी स्मरणात ठेवले जाईल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.