आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Dvm originals
 • Men's Are More Than Women In Committing Suicide For Marriage Linked To Sex Ratio Before Thirty Years

दिव्य मराठी रिसर्चलग्न होत नाही! हे तर पूर्वजांचेच कर्म:40 वर्षांपूर्वी बिघडले लिंग गुणोत्तर; आज लग्न होत नसल्याने आत्महत्या करणाऱ्यांत 61% पुरुष

13 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक

लग्नाची गाठ स्वर्गातच बांधली जाते की नाही हे सांगता येत नाही... पण पूर्वजांचे कर्म मात्र लग्नाच्या आड येते. हे आम्ही आकडेवारीच्या भक्कम आधारावर म्हणू शकतो.

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) दरवर्षी देशातील आत्महत्यांची आकडेवारी जाहीर करते. 2021 च्या आकडेवारीनुसार देशात 2647 लोकांनी लग्न होत नसल्याने आत्महत्या केली आहेत आणि त्यापैकी 61% पुरुष आहेत.

2016 ते 2021 या कालावधीतील आकडेवारीच्या तपासणीत असे दिसून आले आहे की, लग्न न झाल्याने होणाऱ्या आत्महत्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण सातत्याने वाढले आहे. यामध्ये 25 ते 40 वयोगटातील पुरुषांची संख्या सर्वाधिक आहे.

याचे कारण जाणून घेण्यासाठी 30-40 वर्षांपूर्वीची आकडेवारी पाहावी लागेल. हा 1980 ते 2010 दरम्यानचा काळ होता जेव्हा भारतातील लिंग गुणोत्तर सर्वाधिक खालावले होते. 1970 मध्ये जिथे 1000 मुलांमागे 965 मुली होत्या, 2010 मध्ये ते 918 मुलींवर आले.

या खालावत चाललेल्या लिंग गुणोत्तरामुळे त्या काळात जन्मलेल्या पुरुषांचे लग्न होण्याची शक्यताही कमी झाली. यासोबतच 1990 च्या दशकात सुरू झालेल्या ‘बेटी बचाओ’ मोहिमेमुळे त्या काळात जन्मलेल्या मुलींनी लग्नापेक्षा करिअरला प्राधान्य दिले.

आकडेवारीच्या भाषेत समजून घ्या, आज लग्नासाठी येणाऱ्या अडचणींवर 30 ते 40 वर्षांपूर्वीच्या सामाजिक विचारसरणीचा कसा परिणाम पडला आहे.

आधी समजून घ्या, भारतात नैसर्गिक लिंग गुणोत्तर काय मानले जाते

1960 मध्ये 1000 मुलांमागे 976 मुली होत्या… हे नैसर्गिक लिंग गुणोत्तर मानले जाते.

एकूण लोकसंख्येत महिला आणि पुरुषांच्या संख्येतील फरक भलेही कमी असेल, पण जन्माच्या वेळचे लिंग गुणोत्तर बिघडल्याचा परिणाम भविष्यावर दिसतो.
एकूण लोकसंख्येत महिला आणि पुरुषांच्या संख्येतील फरक भलेही कमी असेल, पण जन्माच्या वेळचे लिंग गुणोत्तर बिघडल्याचा परिणाम भविष्यावर दिसतो.

PEW रिसर्चच्या ताज्या अहवालानुसार, भारतातील एकूण लिंग गुणोत्तर आता नैसर्गिक पातळीवर परतत आहे.

वास्तविक, लिंग गुणोत्तर दोन प्रकारे मोजले जाते. पहिली पद्धत म्हणजे जन्म लिंग गुणोत्तर, म्हणजेच 6 वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये 1000 मुलांमागे किती मुली आहेत.

दुसरी पद्धत म्हणजे एकूण लिंग गुणोत्तर म्हणजे देशाच्या लोकसंख्येमध्ये 1000 पुरुषांमागे किती स्त्रिया आहेत.

1960 च्या दशकात बाल लिंग गुणोत्तर खूप चांगले होते. 1000 मुलांमागे 976 मुली होत्या.

त्या काळात समाजात फक्त मुलांनाच प्राधान्य दिले जायचे आणि मुलींचा जन्म चांगला मानला जात नव्हता. पण जन्माला आलेल्या मुलींना मारण्याच्या घटना कमी होत्या.

त्यामुळे मुलांपेक्षा मुलींची संख्या फारशी कमी नव्हती.

1970 मध्ये गर्भपात कायदेशीर झाला…आणि स्त्री भ्रूणहत्या सुरू झाल्या

भारतात 1970 च्या दशकात प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान चाचण्या सुरु झाल्या होत्या. पण या चाचण्या अवैध ठरवणारा कायदा सुमारे 25 वर्षानंतर 1994 मध्ये लागू झाला.
भारतात 1970 च्या दशकात प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान चाचण्या सुरु झाल्या होत्या. पण या चाचण्या अवैध ठरवणारा कायदा सुमारे 25 वर्षानंतर 1994 मध्ये लागू झाला.

1970 च्या दशकात देशात प्रसूतीपूर्व चाचण्या सुरू झाल्या. म्हणजेच, लोकांना जन्मापूर्वी बाळाचे लिंग जाणून घेण्याची सुविधा मिळाली.

यासोबतच 1971 मध्ये वैद्यकीय कारणास्तव डॉक्टरांच्या सांगण्यावरून केलेला गर्भपात कायदेशीर करण्यात आला.

या दोन पावलांमुळे आधीच मुलांना कुटुंबप्रमुख मानणारा भारतीय समाज स्त्रीभ्रूणहत्येकडे वळला.

आता वर्ष-दर-वर्षाच्या आकडेवारीवरून समजून घ्या की आजची समस्या कशा प्रकारे पूर्वजांची देण आहे.

2021: लग्न न झाल्याने 1616 पुरुषांनी आत्महत्या केली

 • NCRB नुसार, 2021 मध्ये एकूण 2647 लोकांनी लग्न होत नसल्याने आत्महत्या केली. यामध्ये 61.1% म्हणजेच 1616 पुरुष होते. तर 1031 महिला होत्या.
 • या 1,616 पुरुषांपैकी 1,507 जण हे 18 ते 45 वयोगटातील होते. तर आत्महत्या करणाऱ्यांमध्ये 18 ते 45 वयोगटातील महिलांची संख्या केवळ 958 होती.
 • मुलांसाठी लग्नाचे कायदेशीर वय 21 वर्षे आहे, परंतु भारतातील मुलांचे लग्न सरासरी 20 ते 24 व्या वर्षी होते.
 • लग्न होत नसल्याने आत्महत्या केलेल्या या वयोगटातील पुरुषांचा जन्म 1997 ते 2001 दरम्यान झाला होता. या कालावधीत, भारतातील बाल लिंग गुणोत्तर सर्वात कमी पातळीवर 918 च्या जवळपास होते.

2020: लग्न होत नसल्याने 1372 मुलांनी आत्महत्या केली... त्यापैकी 92.5% 18 ते 45 वयोगटातील

 • 2020 मधील परिस्थिती 2021 पेक्षा फार वेगळी नव्हती. NCRB नुसार, 2020 मध्ये एकूण 2237 जणांनी लग्न होत नसल्याने आत्महत्या केली.
 • यामध्ये 1372 पुरुष आणि 865 महिला होत्या. म्हणजेच आत्महत्या करणाऱ्यांमध्ये पुरुषांची संख्या 61.4% होती.
 • या पुरुषांमध्येही 1270 म्हणजेच 92.5% हे 18 ते 45 वयोगटातील होते. 18 ते 30 वयोगटातील 716 पुरुषांनी आत्महत्या केली होती.
 • आत्महत्या करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक संख्या 18 ते 30 वर्षे वयोगटातील पुरुषांची होती. त्यांचा जन्म 1990 ते 2002 दरम्यान झाला होता.
 • या काळात बालकांचे लिंग गुणोत्तर 930 ते 914 दरम्यान होते.

2019: विवाह होत नसल्याने आत्महत्या करणाऱ्यांमध्ये पुरुषांचा प्रमाण 60% पेक्षा कमी होता.

 • 2019 च्या NCRB अहवालानुसार, एकूण 2331 लोकांनी लग्न होत नसल्याने आत्महत्या केली होती.
 • यामध्ये 1294 पुरुष आणि 1037 महिला होत्या. पुरुषांचे प्रमाण 55% पेक्षा जास्त होते, परंतु तरीही 2020 आणि 2021 च्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण कमी होते.
 • आत्महत्या करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक पुरुष 30 ते 45 वर्षे वयोगटातील होते. विशेष म्हणजे या वयोगटात आत्महत्या करणाऱ्या पुरुषांची संख्या महिलांच्या तुलनेत जवळपास दुप्पट होती.
 • आत्महत्या केलेल्या पुरुषांपैकी 577 पुरुष हे 18 ते 30 वयोगटातील होते. म्हणजेच त्यांचा जन्म 1989 ते 2001 दरम्यान झाला होता.
 • या कालावधीत, बाल लिंग गुणोत्तर आपल्या सर्वात वाईट काळाच्या आधीच्या स्थितीत होते. NFHS-1 नुसार, 6 वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये 1000 मुलांमागे सुमारे 932 मुली होत्या. पण 2001 पर्यंत ते 927 पर्यंत घटले होते.

2018: लग्न होत नसल्याने आत्महत्या करणाऱ्यांची संख्या 31% वाढली होती.

 • NCRB च्या अहवालानुसार, 2018 मध्ये एकूण 2585 लोकांनी लग्न होत नसल्याने आत्महत्या केली होती.
 • ही संख्या 2017 च्या तुलनेत 31% अधिक होती. त्यातही पुरुषांचे प्रमाण 59.8% आणि महिलांचे प्रमाण 40.2% होते.
 • 2018 च्या आकडेवारीत आत्महत्यांचे वयानुसार विभाजन उपलब्ध नाही. परंतु ट्रेंडनुसार, 40 ते 50% संख्या 25 ते 35 वयोगटातील असण्याचा अंदाज आहे.
 • त्यांचा जन्म 1983 ते 1995 दरम्यान झाला होता. या काळात बालकांचे लिंग गुणोत्तर 2001 इतके कमी नव्हते. परंतु 1981 ते 1991 दरम्यान झालेली घसरण सर्वात जास्त होती.

2017: लग्न होत नसल्याने आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत सर्वात मोठी उसळी

 • NCRB नुसार, 2017 मध्ये लग्न होत नसल्याने आत्महत्या करणाऱ्यांची एकूण संख्या 1972 होती.
 • 2016 च्या तुलनेत ही संख्या 35.2% अधिक होती. आत्महत्यांची वयानुसार आकडेवारी नाही.
 • तथापि, ट्रेंडनुसार, यात 30 ते 35 वर्षे वयोगटातील लोकांची संख्या सर्वाधिक मानली गेली तर ते 1982 ते 1987 दरम्यान जन्मलेले होते.
 • 1981 च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार, तेव्हा बाल लिंग गुणोत्तर 1000 मुलांमागे 962 मुली असे होते. पण हा तो काळ होता जेव्हा देशात स्त्री भ्रूण हत्येच्या घटनांमध्येही सर्वाधिक वेगाने वाढ झाली होती.

2016: विवाह होत नसल्याने आत्महत्या करणाऱ्यांमध्ये महिला आणि पुरुष जवळपास समान

 • NCRB नुसार, 2016 मध्ये लग्न होत नसल्याने आत्महत्या करणाऱ्यांची एकूण संख्या 1459 होती.
 • त्यात 750 पुरुष आणि 709 महिला होत्या. म्हणजेच पुरुषांचे प्रमाण 51.5% आणि स्त्रियांचे प्रमाण 48.5% होते.
 • 2016 च्या आकडेवारीतही आत्महत्यांचे वयानुसार विभाजन उपलब्ध नाही. परंतु ट्रेंडनुसार, जर त्यापैकी बहुसंख्य 30 वर्षे वयाचे मानले जातात, तर त्यांचा जन्म 1981 किंवा त्यापूर्वी झाला होता.
 • 1971 च्या जनगणनेत, 1000 मुलांमागे मुलींची संख्या 964 होती. 1981 पर्यंत ते 962 पर्यंत खाली आले. म्हणजेच तेव्हा परिस्थिती इतकी वाईट नव्हती.

आता आणखी दोन पिढ्यांना लग्नासाठी अडचणींचा सामना करावा लागेल

NFHS-4 नुसार, 2015-16 मध्येही बाल लिंग गुणोत्तर चांगले नव्हते. 1000 मुलांमागे फक्त 919 मुली होत्या.

NFHS-5 नुसार, 2019-21 मध्ये देखील 1000 मुलांमागे फक्त 929 मुली होत्या. म्हणजेच, आजपर्यंत आपण पुन्हा 1960 किंवा 1970 च्या दशकातील बाल लिंग गुणोत्तर गाठू शकलो नाही.

तथापि, NFHS-5 नुसार, लोकसंख्येतील एकूण लिंग गुणोत्तर लक्षणीयरीत्या सुधारले आहे. प्रत्येक 1000 पुरुषांमागे 1020 स्त्रिया आहेत. परंतु बालकांचे लिंग गुणोत्तर कमी असल्याने भविष्यात हे प्रमाणही बिघडू शकते.

2015 मध्ये जन्मलेला मुलगा 2045 मध्ये 30 वर्षांचा होईल. 2015-16 मधील खराब लिंग गुणोत्तर म्हणजे तोपर्यंत विवाहयोग्य वयाच्या मुलींची संख्या या वयाच्या एकूण मुलांच्या संख्येपेक्षा कमी असेल.

बातम्या आणखी आहेत...