आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2041 पर्यंत जीवघेणी होईल उष्णता:दिल्लीमध्ये 50 डिग्रीपर्यंत पोहोचेल पारा,चेन्नईत 17 हजारपेक्षा जास्त लोकांचा जीव जाईल : द इकॉनॉमिस्ट रिपोर्ट

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

युरोपच्या मीडिया ग्रुप द इकॉनॉमिस्टने एका अहवालात म्हटले आहे की, 2041 मधील उन्हाळ्याचे चित्र भयानक असेल. दिल्लीत तापमान 49.3 अंशांपर्यंत पोहोचेल आणि चेन्नईमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे 17,642 लोक मरणार.

द इकॉनॉमिस्ट दरवर्षी काही संभाव्य परिस्थितीचे काल्पनिक चित्र उभे करतो. हा अहवाल ऐतिहासिक तथ्ये, वर्तमान अंदाज आणि विज्ञानावर आधारित असतो. यातील एका अहवालात भारतातील हैदराबाद व चेन्नई या दोन शहरांमधील २०४१ च्या प्रचंड तापमानाच्या परिस्थितीचा अभ्यास केला आहे.

भारताच्या इतिहासातील सर्वात भयंकर उष्णतेच्या लाटेला तीन आठवडे उलटून गेले आहेत. चेन्नई शहरात सर्वाधिक संकट आहे. उन्हामुळे आजारी पडलेल्या लोकांची रुग्णालयांत गर्दी आहे. चेन्नईची खरी समस्या आर्द्रता आहे. उष्णता आणि हवेतील आर्द्रतेला वेट बल्ब टेम्परेचर म्हटले जाते. हे असे किमान तापमान आहे, ज्यात कोणतीही वस्तू पृष्ठभागावरील बाष्पीभवनामुळे थंड होते.

चेन्नईत गेल्या 10 वर्षांपासून वेट बल्बचे तापमान 32 अंशांपेक्षा जास्त आहे
कोरड्या हवेतही मानवी शरीराचे तापमान ३७ अंशांवर घाम निघाल्याने थंड होऊ शकते. टेनेसीच्या ओक रिज नॅशनल लॅबोरेटरीचे भौतिकशास्त्रज्ञ मोतसिम अश्फाक यांच्या मते, ३२ अंशांच्या वेट बल्ब टेम्परेचरमधील शारीरिक श्रम धोक्याचे असतात.

अधिकृत आकडेवारीनुसार, चेन्नईमध्ये उष्णतेमुळे १७ हजार ६४२ लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, जवळच्या हैदराबादशी तुलना करता हा आकडा स्तंभित करणारा आहे. दोन्ही शहरांची लोकसंख्या जवळपास एक कोटी आहे. त्यांच्या आसपासच्या भागांचे तापमान एकसारखे आहे. पण, दक्षिण भारताच्या इतर शहरांपैकी सर्वात कमी २६ मृत्यू हैदराबादमध्ये झाले आहेत. उष्णतेचा प्रकोप शमवण्याच्या बाबतीत हैदराबाद केवळ भारतातच नव्हे, तर जगात सर्वात अग्रगण्य शहरांपैकी एक आहे.

कूल रूफ प्रोग्राम
२०१९ मध्ये तेलंगण सरकारने राज्यात कूल रूफ प्रोग्राम सुरू केला. २०१७ पर्यंत हैदराबादमधील आठ हजारांपेक्षा अधिक इमारतींवर कूल रूफ लावले गेले. २०२० मध्ये शहरांमध्ये राबवण्यात आलेल्या नरेगा या ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत झोपडपट्ट्या व तात्पुरत्या बांधकामांवर पांढरा चुना लावला गेला. शहरात २५ लाख वृक्षारोपण करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...