आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डीबी ओरिजिनल:किराणा, आगाऊ वेतन, सुविधा मिळाली तरच परप्रांतीय कामगार परतण्यास तयार

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रहित छायाचित्र - Divya Marathi
संग्रहित छायाचित्र
  • 43.6 % परतण्याची तयारी, 31.3 % चा थेट नकार
  • बांधकाम क्षेत्र तग धरणे कठीण, कोरोना लस निघाल्यानंतरच चित्र बदलण्याची शक्यता

लॉकडाऊनमध्ये हाताला काम नसल्याने परप्रांतीय कामगार आपापल्या राज्यात गेले असले तरी ते परतू शकतात. मात्र, मागणी वाढल्याने त्यांच्या मालक वर्गासाठी काही अटी आहेत. लगेच परतलो तर किमान ३-४ महिन्यांचा किराणा आणि काम सुरू नसतानाही वेतन तर भविष्यात कामाच्या ठिकाणी आरोग्य सुविधा आणि कर्जमाफी मिळावी, अशी त्यांची मागणी आहे.

भारतात कृषीनंतर सर्वाधिक ५ कोटी रोजगार बांधकाम क्षेत्रात आहेत. यात ६०% हून अधिक परप्रांतीय आणि बहुतांशी अकुशल कामगार आहेत. त्यांना दिवसाकाठी ५७१ ते ६९२ रुपये मिळतात. लॉकडाऊनमुळे यापैकी ९२ % कामगारांच्या हाताला काम उरले नाही. ८० % कामगारांना लॉकडाऊन संपल्यावरही काम मिळण्याची शक्यता वाटत नाही. ८२% कामगारांची सरकारकडे बांधकाम मजूर म्हणून नोंद नाही. यामुळे सरकारी लाभ मिळण्यासाठी पात्र नसल्याची त्यांची भावना आहे. अनेकांनी विवाह, शिक्षण, उपचार, वाहन, मोबाइल यासाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेतले आहे. ते फेडण्याची चिंता सतावत आहे. अशा कारणांसाठी गावी परतण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे जेएलएलच्या “पोस्ट कोविड १९ सिच्युएशन - लेबर अव्हेलिबिलिटी ऑन कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट्स’ या सर्वेक्षणातून समोर आले आहे. यात त्यांनी गावी परतलेल्या कामगारांशी संवाद साधला. जेएलएल या क्षेत्राला व्यावसायिक सेवा आणि कन्सल्टन्सी देणारी सर्वात मोठी कंपनी आहे.

प्रकल्पाचा खर्च वाढणार

कामगार नसल्याचा मोठा फटका बांधकाम व्यावसायिकांना बसणार आहे. काम सुरू झाल्यावर साइटवर फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागतील. यामुळे आधीपेक्षा अधिक कामगार लागतील. प्रकल्प खोेळंबतील, किंमत वाढेल, उशीर झाल्यास ग्राहक-व्यावसायिकांचे वाद वाढतील.

सणवारानंतर परतणार

परप्रांतीय कामगार प्रामुख्याने फरशी काम, रंगकाम, स्लॅब, फर्निचर, इलेक्ट्रिकल आणि सीसीटीव्हीच्या क्षेत्रात काम करतात. ज्या कारणासाठी गावाहून दुसऱ्या राज्यात आले होते, ती कारणे अजूनही तशीच आहेत. यामुळे हे कामगार महाराष्ट्रात परतू शकतात, असे हा अभ्यास सांगतो. प्रश्न विचारण्यात आलेल्या ४३.६% कामगारांनी परतण्याची तयारी दर्शवली. ३१.३ % कामगारांनी परतण्यास थेट नकार दिला. तर २५.१ % कामगार नंतर विचार करू, असे म्हणाले. कामावर परतण्यासाठी त्यांनी मालक वर्गावर अटी घातल्या आहेत. लगेच परतलो तर ३-४ महिन्यांचा किराणा आणि काम सुरू होईपर्यंत वेतन मिळावे. भविष्यात आरोग्य सुविधा आणि कर्जमाफी मिळावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. श्रावणानंतर येणारे सणवार तर काहींचा लग्न करूनच कामावर परतण्याचा विचार आहे.

बातम्या आणखी आहेत...