आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Moderna (HIV Vaccine Human Trials); Which India State Has Highest AIDS Patient? Maharashtra | Andhra Pradesh

एक्सप्लेनर:असाध्य अशा HIV वर आता होणार उपचार शक्य, लसीच्या मानवी चाचण्या लवकरच सुरु होणार; जाणून घ्या ही लस आल्यानंतर काय बदलेल

जयदेव सिंह2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मॉडर्नाच्या लसीमध्ये वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानामुळे त्याला यश मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी कंपनी मॉडर्नाला एचआयव्ही लसीच्या मानवी चाचण्यांसाठी मंजुरी मिळाली आहे. कंपनी लवकरच चाचणी सुरू करू शकते. हा 40 वर्षे जुना आजार आजही असाध्य समजला जातो. आतापर्यंत या रोगावर 30 पेक्षा जास्त लसी तयार करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु एकही लस या आजारावर यशस्वी ठरु शकलेली नाही. मात्र मॉडर्नाच्या लसीमध्ये वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानामुळे त्याला यश मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

ही लस काय आहे, त्यात कोणते तंत्रज्ञान वापरले गेले? याचे ह्युमन ट्रायल कसे असेल? ही लस कशी कार्य करेल? लस बाजारात आल्यास काय आव्हाने असतील? एड्सचा इतिहास काय सांगतो? जाणून घेऊया ...

ही लस काय आहे आणि त्यात कोणते तंत्रज्ञान वापरले जात आहे?
ही एचआयव्ही लस तयार करण्यासाठी mRNA तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. कोरोना लस तयार करण्यासाठी मॉडर्नाने देखील याच प्लॅटफॉर्मचा वापर केला आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीला मानवी चाचण्या सुरू होऊ शकतात.

आतापर्यंत एचआयव्ही लस बनवण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले आहेत किंवा केले जात आहेत. यापैकी अनेक क्लिनिकल चाचण्यांच्या वेगवेगळ्या टप्प्यात आहेत, परंतु आतापर्यंत कोणतीही लस प्रभावी झालेली नाही.

मानवी चाचणी कशी होईल?
मॉडर्नाची लस mRNA-1644 चे 56 लोकांवर ट्रायल होईल. हे लोक पूर्णपणे निरोगी असतील, त्यांना एचआयव्ही नसेल. या चाचणीद्वारे लसीची सुरक्षितता आणि रोगप्रतिकारक प्रतिसादातील बदल तपासले जातील. या लसीच्या विकासासाठी फंडिंग बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनद्वारे केले जात आहे.

लस कशी कार्य करेल?
औपचारिकपणे त्याला mRNA-1644 म्हणतात. हे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीच्या बी पेशींना उत्तेजित करण्यासाठी बनवले आहे. हे पांढऱ्या रक्तपेशींचा एक प्रकार आहे. जे अँडीबॉडी तयार करतात. या अँटीबॉडी आक्रमण करणारे जीवाणू आणि व्हायरस अवरोधित करतात. या बी पेशी तटस्थ अँटीबॉडी बनवतात. जे एक प्रकारचे स्पेशलाइज्ड ब्लड प्रोटीन आहेत, जे एचआयव्हीच्या पृष्ठभागावरील प्रोटीन्स निष्क्रिय करतात. यामुळे व्हायरसचा प्रभाव कमी होतो.

ही लस महत्त्वाची का आहे?
एड्सचा आजार आपल्या समाजात मागील 40 वर्षांपासून आहे. आत्तापर्यंत, त्याच्या उपचारात वापरल्या गेलेल्या ART उपचारात मोठी प्रगती झाली आहे. यामुळे, एड्स ग्रस्त लोक दीर्घकाळ जगू शकतात, परंतु हा आयुष्यभराचा उपचार आहे. डब्ल्यूएचओच्या मते, 2020 मध्ये जगभरात 3.77 कोटी लोकांना एचआयव्हीची लागण झाली होती.

सामान्य लसीप्रमाणे एचआयव्ही लस बनवता येत नाही. RNA- बेस्ड इम्युनाइजेशकडे लसीचा एक चांगला पर्याय म्हणून पाहिले जात आहे, कारण या तंत्रात थेट व्हायरसचा वापर केला जात नाही. उर्वरित लसीच्या तुलनेत ते सहज बनवता येते. ते वेगाने विकसित देखील होऊ शकते. फायझर आणि मॉडर्ना यांनी कोरोना लस तयार करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. कोरोना लसीच्या यशानंतर एचआयव्ही लसीच्या यशाची आशा वाढली आहे.

ही चाचणी किती महत्त्वाची आहे?
1987 पासून 30 पेक्षा जास्त एचआयव्ही लस चाचण्या घेण्यात आल्या आहेत. सुमारे 60 फेज -1 आणि 2 चाचण्या झाल्या आहेत. या दरम्यान, 10 हजारांहून अधिक व्हॉलिंटियर्स या ट्रायल्समध्ये सहभागी झाले होते. यातील बहुतेक चाचण्या अमेरिका आणि युरोपमध्ये घेण्यात आल्या. ब्राझील, चीन, क्युबा, हैती, केनिया, पेरू, थायलंड, त्रिनिदाद आणि युगांडा यासारख्या देशांमध्येही अनेक चाचण्या झाल्या आहेत.

यापूर्वी, आतापर्यंत केवळ दोन लसी फेज -3 च्या चाचण्यांपर्यंत पोहोचल्या आहेत. पहिली चाचणी अमेरिकेत 1998 मध्ये सुरू झाली. यासाठी 5 हजार 400 व्हॉलिंटियर्सची नावनोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी बहुतेक समलिंगी होते. दुसऱ्या लसीच्या फेज -3 चा प्रयोग 1999 मध्ये थायलंडमध्ये सुरू झाला. दोन्ही चाचण्यांचे निकाल 2003 मध्ये आले, पण दोघांचे निकाल उत्साहवर्धक नव्हते. आतापर्यंत एचआयव्हीची एकही लस तयार झालेली नाही.

जर अशी एचआयव्ही लस तयार झाली जी सुरक्षित आणि प्रभावी असेल आणि लोकांना सहज उपलब्ध होऊ शकेल, तेव्हाच या विषाणूचा प्रसार थांबवण्यात मोठे यश मिळू शकते. जर या चाचण्या यशस्वी झाल्या तर ते एचआयव्ही रोखण्यात मोठी मदत मिळेल. सध्या, एचआयव्ही संसर्गावर उपचार करण्यासाठी अँटीरेट्रोव्हायरल थेरपी (ART) वापरली जाते. लस आल्यानंतर त्याच्या उपचाराचा खर्चही कमी होईल. लसीसोबत ART चा वापर केल्यास दीर्घकालीन परिणामकारकता देखील वाढेल.

ART म्हणजे काय?
एचआयव्हीच्या उपचारादरम्यान, औषधाद्वारे शरीरात एचआयव्ही विषाणूचे प्रमाण कमी केले जाते. यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांना ART म्हणतात. आत्तापर्यंत एचआयव्हीवर कोणतेही प्रभावी उपचार नाहीत, परंतु योग्य प्रकारच्या वैद्यकीय सेवेद्वारे एचआयव्ही नियंत्रित केला जाऊ शकतो. बहुतांश रुग्णांमध्ये एचआयव्ही विषाणू सहा महिन्यांच्या उपचारानंतर नियंत्रणात येतो. यानंतर, हे रुग्ण औषधाच्या मदतीने दीर्घकाळ जगू शकतात. मात्र ही एचआयव्ही औषधे संक्रमित लोकांकडून एचआयव्हीचा प्रसार थांबवत नाहीत.

आव्हाने काय आहेत?
जगातील दोन तृतीयांश एचआयव्ही बाधित लोक आफ्रिकेत राहतात. एचआयव्ही साथीच्या प्रतिबंधात कोणतेही यश तेव्हाच मिळेल जेव्हा या भागात संक्रमित लोकांची संख्या कमी असेल. फायझर आणि मॉडर्ना यांच्या लसींसाठी या भागात लसीकरण करणे हे मोठे आव्हान असेल.

अशा लसीचा साठा करणे हे देखील एक मोठे आव्हान आहे. mRNA बेस्ड व्हॅक्सिन एका विशिष्ट तापमानावर ठेवाव्या लागतात. यामुळे, विकसनशील देशांमध्ये या लसींची देखभाल करणे हे देखील मोठे आव्हान असू शकते.

एचआयव्ही विषाणू जगात अनेक वर्षांपासून आहे. आतापर्यंत तो म्युटेड होऊन त्याचे अनेक व्हेरिएंट बनले आहे. अशा परिस्थितीत, mRNA- बेस्ड लसीद्वारे हा विषाणू निष्क्रिय करण्यासाठी अनेक वर्षे लागू शकतात.

HIV आणि एड्सचा इतिहास किती जुना आहे
5 जून 1981 रोजी रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने (CDC) एक लेख प्रकाशित केला होता. हा लेख मोर्बिडिटी अँड मोर्टालिटी विकलीमध्ये प्रकाशित झाला होता. यामध्ये न्यूमोसिस्टिस न्यूमोनियाचा नवीन प्रकार सांगितला गेला. हे 5 समलिंगी लोकांमध्ये आढळले होते. या रुग्णांची प्रतिकारशक्ती अचानक कमी झाली. काही महिन्यांनी पाचही जणांचा मृत्यू झाला. पुढे शास्त्रज्ञांनी या आजाराला एड्स असे नाव दिले. हा आजार एचआयव्ही विषाणूमुळे होतो.

सुरुवातीला हा रोग फक्त समलिंगी लोकांमध्ये झाला होता, ज्यामुळे त्याला गे-संबंधित इम्यून डेफिशियन्सी, गे कॅन्सर किंवा गे मेन न्यूमोनिया असे नाव देण्यात आले. ऑगस्ट 1981 पर्यंत, संपूर्ण अमेरिकेत या आजाराची 108 प्रकरणे नोंदवली गेली, त्यापैकी फक्त एक महिला होती. या 108 रुग्णांपैकी 94% समलैंगिक होते आणि काही महिन्यांत 40% रुग्णांचा मृत्यू झाला होता.

10 डिसेंबर 1981 रोजी बॉबी कॅम्पबेलने स्वतःला या आजाराची लागण झाल्याची जाहीरपणे पुष्टी केली. असे करणारा तो पहिला माणूस होता. यासह, तो या रोगाशी लढण्यासाठी पोस्टर बॉय बनला होता.

भारतात एड्सची परिस्थिती कशी आहे?
भारतात HIV संक्रमितांची 2019 पर्यंतची माहिती उपलब्ध आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माहितीनुसार, 2019 मध्ये देशात एकूण 23.49 लाख लोक एचआयव्ही संक्रमित झाले होते. गेल्या 19 वर्षांपासून संसर्ग झालेल्यांची संख्या सातत्याने कमी होत आहे. 2010 च्या तुलनेत 2019 मध्ये संक्रमितांची संख्या 37% कमी झाली होती. देशात एचआयव्ही होण्याचे मुख्य कारण हाय रिस्क बिहेविअर आहे. यामध्ये असुरक्षित होमोसेक्शुअल आणि हेट्रोसेक्शुअल वर्तन, सीरिंजद्वारे ड्रग्ज घेणे इत्यादींचा समावेश आहे.

1986 मध्ये देशात पहिला एड्स रुग्ण आढळला होता. हा आजार देशात येऊन 35 वर्षे झाली आहेत, पण त्यानंतरही फक्त एड्सवर उपचार होतील असे एकही रुग्णालय देशात नाही. सरकारच्या राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत (एनएसीपी) जुलै 2020 पर्यंत देशात 570 अँटी-रेट्रोव्हायरल ट्रीटमेंट (एआरटी) सेंटर आणि 1264 लिंक्ड एआरटी सेंटर सुरु होते.

बातम्या आणखी आहेत...