आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Mohan Bhagwat Speech Analysis | Marathi Analysis | RRS Chief Mohan Bhagwat Speeches And Political Impact On BJP Politics And Election In India

सरसंघचालकांचे विधान निवडणुकीत चर्चेचा मुद्दा:सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानांचा भाजपला फायदा की नुकसान? उत्तर प्रदेशच्या निवडणुकीवर काय परिणाम होईल? येथे वाचा

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

"मतांतर नेमके कसे होते? आपल्या देशातील मुले, मुली दुसऱ्या मतांमध्ये कसे वळतात? छोटे-छोटे स्वार्थ याची कारणे आहेत. विवाह करण्यासाठी! असे करणे चुकीचेच आहे यात शंका नाही. पण, आम्ही आमच्या मुलांना घडवत नाही. आपल्याला असे संस्कार घरातच द्यावे लागतील." राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन यांनी नुकतेच हे विधान केले. उत्तराखंडच्या हल्द्वाणी येथे स्वयंसेवकांशी आणि त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधताना ते बोलत होते.

मोहन भागवत यांचे विधान लव जिहादशी जोडले जात आहे. त्यातच लव जिहाद हा मुद्दा उत्तर प्रदेशात खूप चर्चित विषय आहे. त्यातही महत्वाचे म्हणजे, या ठिकाणी पुढच्या वर्षी निवडणूक होत आहे. तसेच भाजप शासित राज्य सरकारने लव जिहादच्या विरोधात कायदा आणला आहे.

लव जिहादच्या माध्यमातून हिंदू समुदायाच्या जवळ राहता येईल असे भाजपला वाटते. अशात सरसंघचालकांचे हे विधान भाजपसाठी फायद्याचेच आहे. संघाचा जसा विचार आहे तसेच विचार भाजप सरकारचे देखील असतात.

अनेकदा निवडणुका येत असल्याचे पाहता सरसंघचालकांचे एखादे विधान चर्चेत येत असते. याची केवळ देशभर चर्चाच होत नाही तर राजकीय प्रभाव सुद्धा पडत असतो. पण, सरसंघचालकांच्या विधानांमुळे भाजपला नेहमीच फायदा होतो असे नाही. काही वेळा भाजपसाठी ते विधान डोकेदुखी सुद्धा ठरू शकतात. त्याचे सर्वात ताजे उदाहरण बिहार आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपला सर्व काही आपल्या नियंत्रणात असल्याचे वाटत होते. त्याचवेळी मोहन भागवत यांनी आरक्षणावर समीक्षा करण्याचे विधान केले. तेव्हा निवडणुकीची पूर्ण दिशाच बदलली. लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाने हा विषय इतका लावून धरला की त्यावरच सत्ता मिळवण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले.

मग, प्रश्न असा निर्माण होतो की सरसंघचालक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुद्दाम वक्तव्ये करतात का की जेणेकरून राजकीय प्रभाव पडेल? त्याचे उत्तर ‘संघम शरणम गच्छामि’ पुस्तकाचे लेखक आणि RSS ला कित्येक वर्षांपासून कव्हर करणारे ज्येष्ठ पत्रकार विजय त्रिवेदी यांनी दिले.

त्यांनी सांगितले, स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत नेहमीच प्रवासात असतात. ते विविध सभांमध्ये स्वयंसेवकांना संबोधित करत असतात. निवडणुकीच्या वेळी त्यांनी केलेल्या विधानांचा उल्लेख केला जातो. परंतु, त्यांनी केलेले प्रत्येक विधान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेले आहे हे सत्य नाही.

सरसंघचालकांचे प्रत्येक वाक्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला फायदा पोहोचवण्याठी करण्यात आले असेल तर बिहारमध्ये उलट का झाले. मोहन भागवत यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या वेळी आरक्षणाची समीक्षा करण्यावर भर दिला होता. मात्र, भाजपला त्यातून मोठे नुकसान झाले.

त्रिवेदी यांच्या मते, 2018 पासून भागवत हिंदू-मुस्लिमांच्या एका एजंड्यावर विधाने करत आहेत. मुस्लिमांना एकजूट ठेवण्याचे त्यांचे विधान धाडसी आहे, पण अडचण अशी आहे की संघाने ते स्वीकारलेले नाही. अनेकदा भाजप त्यांच्या विधानांमुळे दुविधा स्थितीत सापडले आहे.

सरसंघचालकांनी आता केलेले विधान लव जिहादशी संबंधित असू शकते. परंतु, त्यावरून भाजप आणि संघात मत-मतांतरे सुरू आहेत. उत्तर प्रदेशातील भाजप सरकार लव जिहादविरोधात सक्रीय आहे, त्यांनी कायदा सुद्धा केला. त्यामुळे, हा मुद्दा आगामी विधानसभा निवडणुकीशी जोडला जात आहे. योगी सरकार तेथील हिंदूंना आपल्या हातात ठेवूनच काम करू इच्छिते. अशात भागवतांच्या विधानाचे राजकीय आणि मते यावर परिणाम होण्याची शक्यता अधिक आहे.

‘मिशन बंगाल : अ सॅफ्रॉन एक्सपेरिमेंट’ चे लेख स्निग्धेंदु भट्टाचार्य यांच्या मते, "RSS आपला एजंडा लोटत असते. आपला एजंडा आणि विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावे असे संघाला वाटते. सरसंघचालकांच्या विधानांचा राजकीय इम्पॅक्ट होतो ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे अनेकदा निवडणुका लक्षात घेऊनच अशी विधाने केली जातात."

हिंदी भाषिक प्रांतांमध्ये धर्म हा नेहमीच सर्वात मोठा विषय असतो. धर्मापुढे सुशासन आणि कायदा व सुव्यवस्था मागे राहून जाते. त्यामुळे सरसंघचालकांच्या विधानाचा राजकीय प्रभाव पडणार हे निश्चित आहे. पण, सरसंघचालक निवडणुकीत मुद्दा करण्यासाठी मुद्दाम विधाने करत नाहीत, तर अनेकवेळा त्यांनी केलेली विधाने आपो-आप निवडणुकीतील मुद्दे होऊन जातात.

काँग्रेस प्रवक्ते गौरव वल्लभ सांगतात, "संघ भारतीय जनता पक्षाची एक होल्डिंग कंपनी आहे. या होल्डिंग कंपनीचे मोहन भागवत चेअरमन आहेत. लवकरच 5 राज्यांमध्ये निवडणुकांची घोषणा होणार हे निश्चित आहे. अशात या होल्डिंग कंपनीचे चेअरमन यांना मी 5 प्रश्न विचारू इच्छितो."

  1. कोरोना हा विषय कसा हाताळण्यात आला असा प्रश्न त्यांनी कधी सरकारला केला का?
  2. गंगेत तरंगत्या मृतदेहांवर काही विधान केले आहे का?
  3. 45 वर्षांतील सर्वात वाइट बेरोजगारीवर काही बोलले आहेत का?
  4. हाथरसच्या मुलीला रात्री जाळून टाकण्यात आले त्यावर ते बोलले का?
  5. गृह राज्यमंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडले त्यावर काही विधान केले का?

गौरव वल्लभ पुढे म्हणाले, की "ते फक्त डिव्हाइड, डिस्ट्रॅक्ट आणि डिस्टॉर्ट यावर काम करतात. सध्या त्यांनी केलेले विधान लोकांची दिशाभूल करण्याचा एक प्रयत्न आहे."

सरसंघचालकांनी केलेली 10 सर्वात चर्चित विधाने...

जुलाई 2021 : 7 राज्यांमध्ये (यूपी, उत्तराखंड, पंजाब, गोवा, मणीपूर, गुजरात, हिमाचल प्रदेश) निवडणूक होती.

"भारतीयांचा DNA एक आहे आणि मुस्लिमांनी इस्लाम धोक्यात आहे या भीतीच्या च्रकात पडू नये. जे मुस्लिमांना देश सोडण्याच्या गोष्टी करतात ते स्वतःला हिंदू म्हणूच शकत नाहीत." (राष्ट्रीय मुस्लिम मंचच्या कार्यक्रमातील विधान)

"40 हजार वर्षांपासून आपण एकाच पूर्वजाचे वंशज आहोत हे सिद्ध झाले आहे. सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे, मग ते कोणत्याही धर्माचे असोत. यात हिंदू-मुस्लिम एकता ही गोष्ट नाही तर ते आधीच एक आहेत."

(गाझियाबाद येथे दिवंगत माजी पंतप्रधान पीव्ही नरसिम्हा राव यांचे सल्लागार राहिलेले डॉ. ख्वाजा इफ्तिखार यांच्या पुस्तक प्रकाशनात बोलत होते.)

2019 चे विधान: लोकसभेसह आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, हरियाणा, झारखंड, महाराष्ट्र आणि ओडिशात एकाचवेळी निवडणूक होती.

"RSS आपल्या भूमिकेवर ठाम आहे. अयोध्येत राम मंदिर निर्माण करण्यासाठी कायदा मंजूर व्हावा. माझे मत या मुद्द्यावर स्पष्ट आहे. अयोध्येत केवळ राम मंदिर होईल. भगवान राम मध्ये आमची आस्था आहे. ते वेळ बदलण्यात वेळ घेत नाहीत."

2018 चे विधान: कनार्टक, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोरममध्ये निवडणूक होती.

"आम्ही जेव्हा म्हणतो की आमचा हिंदू राष्ट्र आहे त्याचा अर्थ असा नाही की यात मुस्लिम नको. ज्या दिवशी मुस्लिम नको असे म्हटले जाईल त्या दिवशी हिंदुत्व देखील राहणार नाही."

"हिंदू समुदाय विभाजित केला जात आहे. हे देश आणि समाजासाठी घातक ठरू शकते."

2017 चे विधान: यूपी, पंजाब, उत्तराखंड, मणीपूर, गोवा, गुजरात आणि हिमाचल प्रदेशात निवडणूक होती.

"आपण सगळे कोण आहोत. इतक्या भाषा... एवढे पंथ... जाती-उपजाती... खाणपाण रुढी-परमपरांच्या पद्धती आणि प्रांतांना जोडण्याचे काय तर ते सूत्र हिंद आहे. हिंदुत्व. हिंदुवाद नाही तर हिंदुत्व!"

"मुस्लिमांच्या उपासनेची पद्धत वेगळी असू शकते, पण त्यांचे राष्ट्रीयत्व हिंदू आहे. भारतीय समाजाला जग हिंदू म्हणतो. सर्व भारतीय हिंदू आहेत आणि आम्ही सगळे एक आहोत."

2015 चे विधान जेव्हा बिहार, दिल्लीत निवडणुका होत्या.

"लोकशाहीत आमच्या काही अकांक्षा असतात. त्यामुळे काही समूह तयार होतात. परंतु, ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी की आपल्या अकांक्षांची किंमत दुसऱ्यांना मोजावी लागू नये. सिव्हिल सोसायट्यांनी ठरवावे की आरक्षण कुणाला आणि कधी मिळेल."

24 फेब्रुवारी 2015 रोजी म्हणाले होते, की मदर टेरेसा यांच्यासारखी सेवा येथे नाही. ही सेवा खूप चांगली असते. तेथे काही हेतू होता लोक कृतज्ञतेने ख्रिश्चन व्हावेत.

ऑगस्ट 2014 मध्ये महाराष्ट्र, झारखंड, ओडिशा, सिक्किम, हरियाणा, अरुणाचल प्रदेश, आंध्रप्रदेश, जम्मू-कश्मीरात निवडणुका असताना...

"इंग्लंडमध्ये राहणारी व्यक्ती इंग्रज असेल, जर्मनीत राहणारे जर्मन असतील आणि अमेरिकेत राहणारे अमेरिकन तर मग हिंदुस्थानात राहणारे लोक हिंदू का होऊ शकत नाहीत."

बातम्या आणखी आहेत...