आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानुकत्याच स्पेन आणि बेल्जियममध्ये दोन रेव्ह पार्ट्या झाल्या. ज्यामध्ये ड्रग्ज, दारू, म्युझिक, डान्स आणि सेक्स सगळं काही होतं. येथील 'रिस्की सेक्शुअल बिहेविअर'मुळे विकसित देशांमध्ये मंकीपॉक्सचा प्रसार झाल्याचे मानले जाते. WHOच्या आपत्कालीन विभागाचे प्रमुख असलेले डॉक्टर डेव्हिड हेमन यांनी याला दुजोरा दिला आहे.
डॉ. हेमन यांनी AFPला एका मुलाखतीत सांगितले, "आम्हाला माहिती आहे की मंकीपॉक्स तेव्हाच होतो जेव्हा संक्रमित लोकांशी जवळचा संपर्क असतो. असे दिसते की लैंगिक संभोगामुळे संसर्ग वेगाने वाढला आहे."
मंकीपॉक्सचा नवीन पॅटर्न काय आहे?
मंकीपॉक्स पहिल्यांदा 1958 मध्ये आढळला होता. त्यानंतर संशोधनासाठी ठेवलेल्या दोन माकडांमध्ये देवीसदृश आजाराची लक्षणे समोर आली. मानवांमध्ये त्याची पहिली केस 1970 मध्ये काँगोमधील 9 वर्षांच्या मुलामध्ये आढळली. साधारणपणे हा रोग ऱ्होडंट्स म्हणजेच उंदीर, खार इत्यादी आणि नर माकडांद्वारे पसरतो.
एवढ्या वर्षांत हा रोग आफ्रिकेबाहेर कधीच मोठ्या प्रमाणावर गेला नाही, परंतु यावेळी आफ्रिकेच्या प्रवासाचा इतिहास नसलेल्या विकसित देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण सतत वाढत आहेत. या नव्या पॅटर्नमुळे जग घाबरले आहे.
विकसित देशांमध्ये मंकीपॉक्सचा प्रसार कसा झाला?
ज्येष्ठ स्पॅनिश अधिकारी एनरिक रुईझ एस्कुदेरो यांनी 23 मे रोजी सांगितले की राजधानी माद्रिदमध्ये आतापर्यंत 30 रुग्ण नोंदवले गेले आहेत. एस्कुदेरोंच्या मते, कॅनरी बेटांवर नुकत्याच झालेल्या समलिंगी परेडमध्ये 80,000 हून अधिक लोक उपस्थित होते. आम्ही या समलिंगी परेड आणि मंकीपॉक्सचा उद्रेक यांच्यातील दुवा तपासत आहोत.
पोर्तुगाल आणि स्पेनच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, समलैंगिक संबंध ठेवणाऱ्यांपैकी बहुतेकांमध्ये संसर्गाची नोंद झाली आहे. हे लोक सेक्स क्लिनिकमध्ये जखमांवर उपचारासाठी गेले होते. तेथील तपासणीत त्यांना मंकीपॉक्सची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.
यूकेचे आरोग्य अधिकारी म्हणतात की, ब्रिटन आणि युरोपमधील बहुतेक तरुण लोक यापूर्वी कधीही आफ्रिकेत गेले नव्हते. मात्र, या लोकांनी गे सेक्स केला होता.
WHO सल्लागार अँडी सील यांनी CNBCला सांगितले की, मंकीपॉक्स हा लैंगिक संक्रमित रोग (STD) नाही. याचा अर्थ वीर्य किंवा योनिमार्गातून तो पसरत नाही. मात्र, सेक्स करताना संक्रमित व्यक्तीच्या जवळ राहिल्याने हा आजार पसरण्याची शक्यता वाढते.
मंकीपॉक्सचा सामना करण्यासाठी काय आहे तयारी?
पहिले केव्हा-केव्हा झाला आहे मंकीपॉक्सचा उद्रेक?
याचे रुपांतर महामारीमध्ये होऊ शकते का?
युरोपमधील WHO च्या पॅथागन थ्रेट टीमचे प्रमुख रिचर्ड पीबॉडी यांच्या मते, मंकीपॉक्स सहज पसरत नाही आणि सध्या कोणताही जीवघेणा गंभीर आजार होत नाहीये. त्याच्या प्रादुर्भावाबाबत कोविड-19 सारख्या मोठ्या लसीकरणाची गरज नाही. संसर्ग टाळण्यासाठी लोकांनी सुरक्षित लैंगिक संबंध ठेवावे, स्वच्छतेची काळजी घ्यावी आणि नियमितपणे हात धुवावेत.
नॉटिंगहॅम युनिव्हर्सिटीचे विषाणूशास्त्रज्ञ जोनाथन बाल यांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीच्या मंकीपॉक्सच्या रुग्णाने त्याच्या संपर्कात आलेल्या ५० पैकी फक्त एकालाच संसर्ग केला होता. याचा अर्थ तो फारसा संसर्गजन्य नाही. यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सीचा असा विश्वास आहे की त्याचा देशभरात प्रसार होण्याचा धोका खूप कमी आहे.
डॉ. हेमन म्हणतात की मंकीपॉक्सचा व्हायरस म्यूटेट होऊन आणखी धोकादायक व्हेरियंट विकसित करत आहे असे कोणतेही संकेत नाहीत. हे कोविड नाही. हा व्हायरस हवेतून पसरत नाही आणि ते थांबवण्यासाठी आपल्याकडे लस आहे.
भारताने किती काळजी करावी?
भारतात आतापर्यंत मंकीपॉक्सचे एकही प्रकरण समोर आलेले नाही, परंतु खबरदारी घेतली जात आहे. 20 मे पासून, सरकारने सर्व आंतरराष्ट्रीय एंट्री पॉईंटवर पाळत ठेवली आहे.
आरोग्य मंत्रालयाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत...
1.सर्व आरोग्य केंद्रांनी अशा लोकांवर बारीक लक्ष ठेवले पाहिजे ज्यांच्या शरीरावर पुरळ दिसत आहे, गेल्या 21 दिवसांतील मंकीपॉक्स संशयित देशांच्या प्रवासाचा इतिहास आहे.
2.सर्व संशयित प्रकरणे आरोग्य सेवा केंद्रात आयसोलेट केली जातील.
3.मंकीपॉक्सच्या संशयित रुग्णांचे फ्लुएड किंवा रक्ताचे नमुने NIV पुणे येथे तपासणीसाठी पाठवले जातील.
4.पॉझिटिव्ह केस आढळल्यास, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग त्वरित सुरू होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.