आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामाची गोष्टकेरळमध्ये मंकीपॉक्समुळे मृत्यू:विदेशातून आला होता रुग्ण, केवळ समलैंगिक संबंधाने नव्हे तर संपर्कातही धोका

13 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक

भारतात आतापर्यंत मंकीपॉक्सची 5 प्रकरणे आढळून आली आहेत. कर्नाटकच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी केरळमध्ये मंकीपॉक्समुळे एकाचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे.ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्याचे वय 22 वर्षे असून, तो यूएईहून आपल्या घरी परतला होता. यूएई सोडण्याच्या एक दिवस आधी त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

लोक अजूनही मंकीपॉक्सला गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे. मंकीपॉक्समुळे मृत्यूचा धोका किती आहे याबद्दल डॉ. प्रभाकर तिवारी, माहिती तज्ञ, CMHO भोपाळ आणि डॉ. आर व्ही एस भल्ला, फोर्टिस हॉस्पिटलचे संचालक यांच्याकडून जाणून घेऊया..

प्रश्न 1- मंकीपॉक्सचे पहिले प्रकरण UAE मधून आलेल्या व्यक्तीमध्ये आढळून आले होते त्याच व्यक्तीचा मृत्यू झाला का?

उत्तर- नाही, हे प्रकरण नवीन आहे. केरळमध्ये यापूर्वी आढळलेल्या तीन प्रकरणांपेक्षा हे वेगळे आहे.त्या तीन रुग्णांपैकी एका व्यक्तीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून इतर दोन रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.

प्रश्न 2- गेल्या काही दिवसात दिल्लीतही एक प्रकरण समोर आले होते? ती व्यक्तीही परदेशातून आली होती का?

उत्तर- दिल्लीचे प्रकरण केरळच्या सर्व प्रकरणांपेक्षा वेगळे होते. दिल्लीत मंकीपॉक्स झालेला रुग्ण कधीच परदेशात गेला नव्हता.

प्रश्न- मंकीपॉक्सची लक्षणे काय आहेत?

उत्तर- मंकीपॉक्सची लक्षणे ही आहेत

 • ताप
 • शरीरात वेदना
 • थंडी वाजणे
 • थकवा आणि आळस येणे
 • स्नायूंमध्ये वेदना
 • ताप येतो आणि खाज सुटणारी पुरळ दिसू शकतात
 • चेहरा, हात आणि उर्वरित शरीरावर पुरळ येतात

सोर्स - डॉ. प्रभाकर तिवारी, माहिती तज्ञ, CMHO भोपाळ

प्रश्न 3 - केरळमध्ये मृत्यू झालेला रुग्ण कोण होता? त्याचा वैद्यकीय इतिहास काय होता?

उत्तर- रुग्ण त्रिशूरमधील पुन्नियूरचा रहिवासी होता. 22 वर्षीय तरुणाला यूएईहून परतल्यानंतर त्रिशूरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जिथे त्याचा मृत्यू झाला. 22 जुलै रोजी तो केरळला पोहोचला होता आणि ताप आल्याने 26 जुलै रोजी रुग्णालयात दाखल झाला होता. नंतर त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आणि लाईफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आले. केरळच्या आरोग्य विभागाने त्याचे नमुने अलप्पुझा येथे स्थित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV), यांच्या केरळ शाखेकडे पाठवले होते.

मंकीपॉक्स स्ट्रेनवर एक नजर टाका

त्याचे दोन स्ट्रेन आहेत...

 • काँगो स्ट्रेन
 • वेस्ट आफ्रिकन स्ट्रेन

काँगोचा स्ट्रेन वेस्ट आफ्रिकेच्या स्ट्रेनपेक्षा जास्त प्राणघातक आहे. यामध्ये मृत्यूचे प्रमाण 10% आहे.वेस्ट आफ्रिकेतील स्ट्रेनचा मृत्यू दर काँगोच्या तुलनेत 1% कमी आहे.

प्रश्न 4 - मंकीपॉक्स मृत्यूचे कारण आहे का?

उत्तर- मृत्यूचे कारण काय होते हे आधी स्पष्ट नव्हते. मात्र तपासानंतर या तरुणाच्या मृत्यूचे खरे कारण मांकीपॉक्स असल्याचे निष्पन्न झाले. रुग्णामध्ये एन्सेफलायटीस आणि थकवा असणे ही लक्षणे देखील होती.

प्रश्न 5: मंकीपॉक्समुळे आतापर्यंत किती मृत्यू झाले आहेत?

उत्तर- मे नंतर जगभरात 78 देशांमध्ये मंकीपॉक्सचे 20,000 हून अधिक प्रकरणे आढळून आली आहेत. सर्वाधिक मृत्यू आफ्रिकेत झाले असून 75 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये एक आणि स्पेनमध्ये दोघांचा मंकीपॉक्सने मृत्यू झाला आहे.

मंकीपॉक्स टाळण्यासाठी आरोग्य मंत्रालयाच्या या 8 मार्गदर्शक सूचना आहेत

 • सर्व आरोग्य केंद्रांनी अशा लोकांवर बारीक लक्ष ठेवले पाहिजे ज्यांच्या शरीरावर पुरळ उठत आहे.
 • तसेच ज्यांनी गेल्या 21 दिवसात मंकीपॉक्सचा प्रसार झालेल्या देशांमध्ये प्रवास केला असेल त्यांच्यावर लक्ष ठेवावे
 • संशयित रुग्णाला आरोग्य सुविधा केंद्रात आयसोलेशनमध्ये ठेवले जाईल.
 • संशयित रुग्णांचे ब्लड सॅम्पल्स एनआयव्ही पुणे येथे तपासणीसाठी पाठवले जातील.
 • पॉझिटिव्ह केस आढळल्यास, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग त्वरित सुरू करावे.
 • परदेशातून येणाऱ्या प्रवाशांनी त्वचेच्या आजाराचा संसर्ग असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा
 • प्रवाशांनी उंदीर,खार, माकडांसह मृत किंवा जिवंत वन्य प्राण्यांच्या संपर्कात येऊ नये.
 • आफ्रिकन जंगली प्राण्यांपासून बनवलेली उत्पादने क्रीम, लोशन किंवा पावडर याचा वापर टाळावा.

डब्ल्यूएचओने यापूर्वी सांगितले की, समलिंगी पुरुषांना मंकीपॉक्सची लागण होण्याची शक्यता जास्त असते.दुसर्‍या पुरुषाशी संबंध असलेल्या पुरुषाला मंकीपॉक्स होण्याचा धोका जास्त असतो. याबाबत LGBTQ समुदायात खळबळ उडाली होती. आता डब्ल्यूएचओने एक नवीन आरोग्य सल्ला जारी केला आहे, मंकीपॉक्सचा धोका केवळ पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या पुरुषांपुरता मर्यादित नसून जो कोणी संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येतो त्याला मंकीपॉक्स होण्याचा धोका जास्त असतो.

बातम्या आणखी आहेत...