आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Dvm originals
 • Even If The House Is Flooded In The Rain Or The Tree Falls On The Car, You Will Get The Money, Take Care Of Some Things Before Taking Out Insurance

कामाची बातमी:पावसात घर बुडाले किंवा गाडीवर झाड पडले, तरी मिळतील पैसे, विमा काढण्यापूर्वी घ्या काही गोष्टींची काळजी

अलिशा सिन्हाएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक

देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये मान्सूनने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी तुरळक, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. ही अशी वेळ आहे जेव्हा…

 • पावसाचे पाणी किंवा पुरामुळे घराचा काही भाग खराब होतो.
 • घराबाहेर पार्क केलेली वाहने पाण्यामुळे खराब होतात.
 • पावसात भिजल्यावर अनेकदा लोक आजारी पडतात.

अशा परिस्थितीत, तुम्हाला विमा कंपन्यांकडे जावे लागेल हे उघड आहे. जर एखाद्या व्यक्तीने विमा घेतला असेल तर विमा कंपनी त्या व्यक्तीचे आर्थिक नुकसान भरून काढते. म्हणजेच कंपनी समोरच्या व्यक्तीला काहीही नुकसान झाल्यास भरपाई देईल.

चला तर मग कामाच्या बातमीमध्ये, विम्याशी संबंधित काही महत्त्वाच्या प्रश्नांबद्दल जाणून घेऊया-

प्रश्न- विम्याचे किती प्रकार आहेत?
उत्तर- विमा 2 प्रकारचे आहेत.

 1. जीवन विमा ( Life Insurance)
 2. सामान्य विमा (General Insurance)

प्रश्न- जीवन विमा आणि सामान्य विमा मध्ये काय फरक आहे?
उत्तर-
जीवन विमा: जीवन विमा खरेदी करणाऱ्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबाला विमा कंपनीकडून नुकसान भरपाई (पैसे) मिळते. जेणेकरून कुटुंबाला आर्थिक मदत मिळू शकेल.

सामान्य विमा: यामध्ये कार, घर, प्राणी, शेती आणि आरोग्याच्या विम्याचा समावेश आहे. समजा तुम्ही घराचा सामान्य विमा घेतला आहे. आता तुमच्या घराचे काही नुकसान झाले तर विमा कंपनी त्याची नुकसान भरपाई देते.

सर्व प्रथम आपण गृह विम्याबद्दल बोलूया....

प्रश्न- घराचा विमा काढल्यास कोण-कोणत्या परिस्थितीत पैसे मिळतील?
उत्तर-

नैसर्गिक आपत्तीमुळे घराचे कोणतेही नुकसान. जसे की आग, भूकंप, वीज आणि पूर. दंगली, चोरी दरम्यान घराचे नुकसान झाल्यास.

बहुतेक लोकांना असे वाटते की गृह विमा मिळवणे सोपे नाही. त्याची प्रक्रिया लांबलचक आहे, परंतु तसे नाही. असा विमा ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही प्रकारे काढला जाऊ शकतो. जर तुम्ही घराचा विमा ऑनलाईन घेतला तर तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात.

खालील क्रिएटिव्हमध्ये त्याचे फायदे वाचा...

प्रश्न- पैशासाठी दावा करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
उत्तर-

 • सर्व कागदपत्रे, महत्त्वाच्या नोंदी आणि पावत्या सांभाळून ठेवा.
 • सर्व नोंदी, पावत्या आणि कागदपत्रांच्या हार्ड आणि सॉफ्ट कॉपी ठेवा.
 • पावसामुळे झालेले सर्व नुकसान लिहा.
 • तुम्ही फोटो आणि व्हिडिओ देखील बनवू शकता.
 • घरातील सर्व वस्तूंची यादी तयार करा.
 • दावा दाखल करताना, घरातील सामग्रीची संपूर्ण माहिती असली पाहिजे.
 • हे देखील लक्षात ठेवा की दावा ठरलेल्या मुदतीत करणे आवश्यक आहे.
 • विम्याशी संबंधित सर्व नियम आणि अपडेट्स नियमितपणे तपासा

घरानंतर, आता कार विम्याबद्दल बोलूया
तुमची कार असो, मुलाची बाईक असो किंवा वडिलांची स्कूटर असो, प्रत्येकाचा विमा उतरवणे आवश्यक आहे. जर तुम्ही विम्याशिवाय रस्त्यावर गाडी चालवली तर वाहतूक पोलिस दंड आकारू शकतात.

प्रश्न- कार विमा काढल्यास कोणत्या परिस्थितीत पैसे मिळतात?
उत्तर-

 1. चोरी झाल्यास
 2. अपघात झाल्यास
 3. पूर, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानावर

आरोग्य विम्याची खालील माहिती तुम्हाला उपयोगी पडू शकते.......

प्रश्न- आरोग्य विमा घेताना काय काळजी घ्यावी?
उत्तर-

 • स्वस्त प्रीमियम पाहून कोणतीही विमा खरेदी करू नका.
 • पॉलिसी ऑनलाइन खरेदी करणे चांगले.
 • ऑनलाइन मोडमध्ये वेगवेगळ्या योजनांची तुलना करा
 • चांगले फीचर्स आणि किमती बघूनच योग्य विमा योजना निवडा.
 • तुमच्या आरोग्याशी संबंधित सर्व आवश्यक माहिती विमा कंपनीला द्या.