आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामाची गोष्टमुलाला मिळणार सावत्र वडिलांचे आडनाव:आईला निर्णय घेण्याचा अधिकार, आजी-आजोबा विरोध करू शकत नाहीत

अलिशा सिन्हा8 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक

पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर दुसरे लग्न करणाऱ्या महिलांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

 • अशा महिलेने पुनर्विवाह केल्यास ती आपल्या मुलाला दुसऱ्या पतीचे आडनाव देऊ शकते.
 • कागदपत्रांमध्ये 'सावत्र पिता' म्हणून दुसऱ्या पतीचे नाव समाविष्ट करणे क्रूर आणि मूर्खपणाचे आहे. याचा मुलाच्या मानसिक आरोग्यावर आणि आत्मसन्मानावर परिणाम होवू शकतो.
 • वडिलांच्या मृत्यूनंतर, मुलाची एकमेव नैसर्गिक पालक त्याची आई असते. कुटुंब तयार करण्यासाठी आणि सांभाळण्यासाठी एक आडनाव असणे आवश्यक आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

आंध्र प्रदेशात एका महिलेने पतीच्या निधनानंतर दुसरं लग्न केलं. तिला आपल्या मुलाला दुसऱ्या पतीचे आडनाव द्यायचे होते, परंतु पहिल्या पतीच्या पालकांचा याला विरोध होता. महिलेने नाव बदलण्याचा प्रयत्न केला असता पहिल्या पतीच्या कुटुंबीयांनी गुन्हा दाखल केला. महिलेने आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि न्यायालयाने आदेश दिले की मुलाचे आडनाव बदलू नये आणि जेव्हा रेकॉर्ड दाखवले जाईल तेव्हा मुलाच्या जैविक वडिलांचे नाव दाखवावे. अखेर महिलेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला.

ही बालकांशी संबंधीत समस्या आहे. म्हणूनच आज कामाची गोष्ट मध्ये, सर्वप्रथम भारतातील मुलाशी संबंधित आडनावाच्या कायद्याबद्दल बोलूया-

प्रश्न- आडनाव म्हणजे काय ते समजून घ्या?

उत्तर- नावानंतरचे वंश, जात, गोत्र किंवा उपनामाला आडनाव म्हणतात. भारतीय आडनावांमागे कोणतेही शास्त्र लपलेले नाही. येथे आडनावे बहुतेक 6 प्रकारे लिहिली जातात-

जातीवरून असलेले आडनाव

 • कुळावर आधारित आडनाव
 • ऋषींच्या नावावर असलेले आडनाव
 • एखाद्या उपाधीच्या नावानुसार आडनाव
 • एकाद्या ठिकाणाच्या आधारे असलेले आडनाव
 • व्यवसायाच्या नावावर असलेले आडनाव

मुलाच्या आडनावाशी संबंधित कायदेशीर अधिकार-

प्रश्न- पती-पत्नी एकत्र राहतात आणि मूल जन्माला आले, तर त्याला आईचे आडनाव मिळू शकते का?

उत्तर- होय, त्याला आईचे आडनाव मिळू शकते, परंतु जर दोन्ही पालकांनी संमती दिली तरच मुलाला त्याच्या आईचे आडनाव मिळू शकते.

प्रश्न- जर पती-पत्नीचा घटस्फोट झाला आणि जैविक वडील हयात असतील तर मुलाचे आडनाव कोणते असेल?

उत्तर- घटस्फोटानंतर मुलाचा ताबा आईकडेच राहील असा न्यायालयाचा निर्णय असेल, तर वडिलांची संमती होईपर्यंत आई मुलाला स्वतःचे आडनाव देऊ शकत नाही. म्हणजेच वडिलांनी यावर आक्षेप घेऊ नये.

प्रश्न- लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये जन्मलेल्या मुलाचे आडनाव कोणाचे असेल?

उत्तर- लिव्ह-इन रिलेशनशिपमधून जन्मलेल्या मुलाच्या दोन्ही जैविक पालकांच्या संमतीनेच आडनाव ठरवले जाऊ शकते. सामाजिकदृष्ट्या, मुलाला वडिलांचे आडनाव दिले जाते.

प्रश्न- विधवा पत्नीच्या मुलाला कोणाचे आडनाव लावता येईल?

उत्तर- जर स्त्री विधवा असेल तर ती स्वतःच्या इच्छेने मुलाला आडनाव देऊ शकते. त्यावर आक्षेप घेण्याचा अधिकार कोणालाही नसेल. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात हे स्पष्ट केले आहे की, वडिलांनंतर आई ही जैविक पालक आहे. त्यामुळे विधवा महिला आपल्या मुलाला तिचे आडनाव देऊ शकते आणि त्याच वेळी मुलाचे आडनाव काय असेल, हे देखील ती स्वतः ठरवू शकते.

वरील प्रकरण वाचल्यानंतर हे स्पष्ट होते की आता जैविक वडिलांच्या मृत्यूनंतर आईने दुसरे लग्न केले तर ती तिच्या इच्छेनुसार मुलाला सावत्र वडिलांचे आडनाव देऊ शकते.

आता लग्नानंतर महिलांच्या आडनावाशी संबंधित कायदेशीर अधिकारांबद्दल बोलूया. यासाठी खाली दिलेले ग्राफिक्स वाचा-

प्रश्न- लग्नानंतर महिला आडनाव बदलत नसतील तर त्यांनी काय करावे?

उत्तर- लग्नाची नोंदणी केल्याची खात्री करा. यासाठी भारतात 2 कायदे आहेत. तुम्‍ही तुमच्‍या मताप्रमाणे दोन्ही पैकी एका प्रकारे तुमच्‍या विवाहाची नोंदणी करू शकता.

 • पहिला, हिंदू विवाह कायदा, 1955
 • दुसरा, विशेष विवाह कायदा, 1954

प्रश्न- लग्नानंतर महिलेने तिचे आडनाव बदलले नाही तर तिला परदेशात जाताना काही अडचण येणार नाही का?

उत्तर- 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमादरम्यान घोषणा केली होती की, पासपोर्टसाठी महिलांना लग्नाची किंवा घटस्फोटाची कागदपत्रे दाखवण्याची गरज नाही. ते त्यांच्या पालकांचे नाव वापरण्यास पूर्णपणे मुक्त असतील.

अखेरीस पण महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या

भारतातील विविध राज्यांमधील आडनाव परंपरा-

सहसा कोणत्याही नावाचे दोन भाग असतात. पहिले नाव म्हणजे जन्मावेळी दिलेले नाव (उदा- नरेंद्र), अखेरचे नाव (म्हणजे आडनाव) जे तुमच्या कुटुंबाकडून उपलब्ध हाेते (उदा- मोदी). मुलगा असो की मुलगी, दोघांची नावे अशा प्रकारे ठरवण्यात आली.

असे आवश्यक असायचे की, लग्नानंतर मुलीचे आडनाव वडिलांच्या कुटुंबाऐवजी नवऱ्याच्या कुटुंबात ठेवले जायचे, पण बदलत्या काळानुसार अनेक महिलांनी त्यांच्या करिअर, ओळख आणि विचारसरणीमुळे आडनाव बदलणे बंद केले. अनुष्का शर्मा आणि दीपिका पदुकोणप्रमाणेच अनेकांनी लग्नानंतरही आडनाव बदललेले नाहीत.

अनेक महिलांनी हायब्रीड पद्धतीचा अवलंब केला आहे. ज्यामध्ये ती वडील आणि नवऱ्याच्या कुटुंबाचे दोन्ही आडनाव वापरते. जसे- प्रियांका गांधी वाड्रा, हिलरी रॉधम क्लिंटन, सोनम कपूर आहुजा. आडनावाशिवाय भारतात काही अपवाद आहेत. जसे- प्राण, धर्मेंद्र, श्रीदेवी. दक्षिणेकडील राज्यांमध्ये आणखी एक ट्रेंड आहे. ज्यामध्ये स्त्रिया पहिल्या नावाऐवजी वडिलांच्या नावाचे पहिले अक्षर आणि आडनावाऐवजी मूळ नाव वापरतात. उदाहरणार्थ, जयललिता यांच्या नावातील J हे त्यांचे वडील जयराम यांच्या नावाचे पहिले अक्षर आहे. आणखी एक ट्रेंड आहे. यामध्ये लग्नानंतर महिला आपले आडनाव काढून पतीचे नाव आणि आडनाव दोन्ही लावतात. जसे- स्मृती मल्होत्रा लग्नानंतर स्मृती झुबीन इराणी बनल्या.

पुरुष आडनावाबाबत ट्रेंड

पुरुषांची नावे आणि आडनावे अनेक प्रकारची आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार किंवा केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचे नाव हा याचाच एक भाग आहे. बिहारमध्ये राय, सिन्हा, सिंग अशी आडनावेही एकापेक्षा जास्त जाती वापरतात. काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जेपी आंदोलनाच्या काळात यूपी आणि बिहारमध्ये अशी नावे ठेवण्याची प्रथा सुरू झाली. जातिभेद नष्ट करणे हा त्यामागचा हेतू होता. मात्र, जवळपास 50 वर्षांनंतरही असे भेद नाहीसे झालेले नाहीत.

महाराष्ट्र आणि गुजरातसारख्या राज्यांमध्ये नाव आणि आडनावामध्ये वडिलांचे किंवा पतीचे नाव वापरण्याची प्रथा आहे. उदाहरणार्थ, सचिन रमेश तेंडुलकर. काही ठिकाणी आडनावाच्या जागी गाव, जिल्ह्याचे किंवा शहराचे नाव वापरण्याचीही प्रथा आहे. जसे- अदार पूनावाला, शहजाद पूनावाला, पॅरिस हिल्टन, ब्रुकलिन बेकहॅम, ओम प्रकाश चौटाला. आडनाव त्या व्यक्तीच्या कौटुंबिक व्यवसायाशी संबंधित असलेल्या देशात आणि जगात अशा नावांचा ट्रेंड देखील आहे. उदा- मार्क टेलर, मार्क बुचर.

बातम्या आणखी आहेत...