आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Dvm originals
 • Mother's Day Special | In Times Of Trouble, The Mother Is Like A Mountain, Showing The Way Like A River

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मदर्स डे:अडचणीच्या काळात आई पहाडासारखी असते, नदीप्रमाणे मार्गही दाखवते

औरंगाबादएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • आई म्हणजे आशीर्वाद व तिचे काम एक उदाहरण ठरते, कसे ते वाचा...

आई आहे तर आपले जग सुरक्षित आहे. ती कठीण परिस्थितीत आपली ढाल होते. कोरोना संसर्गाच्या काळात आई कोठेही असो खूप काम करते. समाजात आपुलकी, प्रेम व कर्तव्याचे उदाहरण ठरते. दिव्य मराठीने देशातील मातांच्या अनोख्या कथा एकत्र केल्या आहेत. आई म्हणजे आशीर्वाद व तिचे काम एक उदाहरण ठरते. कसे ते वाचा -

 • आईला कर्तव्याची जाण असते...

डॉ. अंकिता यांनी कोरोनाचा प्रसार वाढताच आपली रजा रद्द केली आणि आपल्या ८ महिन्यांच्या तान्ह्या बाळाला घरी ठेवून टिहरी येथे कर्तव्यावर निघाल्या. मुलाची देखभाल आजी करेल, रुग्णांवर उपचार कोण करणार? अशी त्यांची विचारसरणी होती.

शिकवण : कर्तव्य श्रेष्ठ ... ते पार पाडा

 • दु:ख सावरून काम करते आई

ओडिशाच्या गौरी बहर होमगार्ड आहेत. कोरोनात कामावर असताना घरी मुलीची प्रकृती बिघडली घरी गेल्या तेव्हा १२ वर्षांच्या मुलीचे निधन झाले. दोन दिवसानंतर त्या पुन्हा कामावर आल्या.

शिकवण : दु:खाचा डोंगर कोसळला तरी स्वत:ला सावरून कामाला लागा

 • आई कधीच थकत नसते...

मिझोरमच्या पाई नग्हकलियनी ९५ वर्षाच्या आहेत. १० रुपयाचा मास्क १०० रुपयात विकला जात होता. तिने स्वत: मास्क तयार करण्यास सुरूवात केली. रोज २० मास्क तयार करून मुलामार्फत रुग्णालयात पाठवत होती.

शिकवण : बदल घडवायचा तर स्वत:पासून

 • आईचे हृदय विशाल असते...

उत्तराखंडातील चमौली येथील देवकी भंडारी यांनी (६०) आयुष्यभर पैसे बचत करून १० लाख रुपये कोरोनाच्या प्रतिकारासाठी पीएम मदतनिधीस दिले. त्यांनी आयुष्यभर समाजसेवा केली.

शिकवण : संकटकाळात रुपया-पैशाचा मोह टाळा

 • आई सर्व शक्तिमान आहे...

रामचंद्रम्माला (६०)मुलाला भेटण्याची इच्छा झाली. ती नागरकुल्लूरपासून (तेलंगणा) पायी निघाली. १३० किमी पायी चालत हैदराबादला आली. आई येथे आली मुलाला विश्वास बसेना.

शिकवण : भिऊ नका, चालत राहा.. मार्ग आपाेआप सापडतो.

 • आईचा संकल्प दृढ असतो...

११ वर्षाच्या मुलीला कोरोना झाला. नागपूरच्या सरिताने मुलीसोबत राहण्याचा हट्ट केला. सर्वांनी हात टेकले. तिचा निर्णय मानला १४ दिवस वार्डात थांबली. तिला कोरोनामुक्त करूनच बाहेर आली.

शिकवण : साथ सोडू नका... अडचणीत तेच गरजेचे असते.

 • ममता आईचा दागिना...

लॉकडाऊनमध्ये लोक उपाशी आहेत, असे उत्तर प्रदेशातील देवबंदच्या सइदा नरगिस परवीन यांना तिच्या मुलाने सांगितले. त्यांनी पहिल्या दिवशी ४० मुलांसाठी जेवण तयार केले. आता ४०० जणाचे जेवण तयार करते.

शिकवण : सगळे आपले, त्यांना मदत करा

 • आई म्हणजे कुटुंबसंस्था...

बंगळुरूच्या माहिता (३८) यांनी कोरोनाचा प्रसार वाढताच एक गट तयार केला. यात ३२ हजार लोक आले. जे मुलांपासून दूर आहेत, त्यांना जेवण आणि औषधे पुरवतात. स्वत:च्या १२ वर्षांच्या मुलासही त्या दुरूनच भेटतात.

शिकवण: कल्पकता शोधा, लोक सोबत येणारच.

बातम्या आणखी आहेत...