आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायूपीमध्ये पुन्हा एकदा शहरांची नावे बदलण्याची तयारी सुरू आहे. यात जवळजवळ 12 जिल्ह्यांचा समावेश आहे. पण सध्या 6 जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे. ज्या जिल्ह्यांची नावे बदलण्याची मागणी करण्यात आली आहे, त्यात अलीगडला हरिगड वा आर्यगड, फर्रुखाबादला पांचाल नगर, सुल्तानपूरला कुशभवनपूर, बदायूंला वेद मऊ, फिरोजाबाद चंद्र नगर आणि शाहजहांपूरला शाजीपुर करण्याचा समावेश आहे.
चला जाणून घेऊया की, कोणत्या शहरांची नावे बदलण्याची तयारी सुरू आहे...
योगी आदित्यनाथ हे यूपीचे मुख्यमंत्री असण्यासोबतच गोरखपूरच्या प्रसिद्ध गोरखनाथ मंदिराचे 'मठाधीश' देखील आहेत. गोरखपूरचे खासदार असताना त्यांनी अनेक भागांची नावे बदलली होती. यामध्ये उर्दू बाजारला हिंदी बाजार, हुमायूंपूरला हनुमान नगर, मीना बाजारला माया बाजार आणि अलीनगरला आर्य नगर केले होते.
योगींच्या मागील कार्यकाळात मुघलसराय रेल्वे स्थानकाचे नाव पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावावर ठेवण्यात आले होते, त्यानंतर अलाहाबादचे प्रयागराज आणि फैजाबादचे नाव बदलून अयोध्या करण्यात आले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास असे 6 जिल्हे आहेत की, ज्यांवर अंतर्गत सहमती होऊन त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच, अधिक ठोस ऐतिहासिक पुराव्यांसह प्रस्ताव आगामी विधानसभा अधिवेशनात मांडण्याची तयारी आहे.
अलीगड प्रशासनातील एका सूत्राने सांगितले की, “राजकारण आणि इतिहासाच्या प्राध्यापकासह अनेक विचारवंतांना गेल्या वर्षी जिल्ह्याच्या इतिहासावर आणि राजकारणावर संशोधन केल्यानंतर नवीन नावे सुचवण्यास सांगितले होते. सहा महिन्यांपूर्वी वस्तुस्थितीसह नवीन नावांचा प्रस्तावही सरकारला दिला होता. यावेळी विधानसभेच्या अधिवेशनात हा प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता आहे.
या 6 जिल्ह्यांनी शासनाकडे पाठवले प्रस्ताव
अलीगड- योगी आदित्यनाथ यांचे सरकार आल्यापासून ते निशाण्यावर आहेत. 2015 मध्ये विश्व हिंदू परिषदेने ही मागणी करण्यास सुरुवात केली. भाजप आणि समर्थक संघटनाही अलीगडला हरिगड म्हणू लागल्या आहेत.
6 ऑगस्ट 2021 रोजी, अलीगढच्या नव्या पंचायत समितीने नवीन अध्यक्ष विजय सिंह यांच्या नेतृत्वाखाली विकास भवन सभागृहात केवळ नाव बदलण्याचाच नव्हे, तर नवीन नावाचाही ठराव मंजूर केला. त्याला हरिगड किंवा आर्यगड असे नाव देण्याची तयारी सुरू आहे.
फर्रुखाबाद- जिल्ह्यातून मुकेश राजपूत सलग दुसऱ्यांदा खासदार झाले आहेत. अलीकडेच त्यांनी फर्रुखाबादचे नाव बदलून पांचाल नगर करण्याची मागणी केली आहे. त्यांनी योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून हा जिल्हा द्रौपदीचे वडील द्रुपद पांचाल राज्याची राजधानी होती असे म्हटले आहे.
त्यामुळे त्याचे नाव पांचाल नगर असावे. महिला सक्षमीकरणाचे प्रतीक असलेल्या पांचालीच्या माहेरच्या नावावरून या जिल्ह्याला नाव दिल्याने स्त्रीशक्तीचा आदर वाढेल, असे त्यांचे म्हणणे आहे.
सुल्तानपूर- येथील लंभुआ मतदारसंघातून भाजपच्या आमदार असलेल्या देवमणी द्विवेदी यांनीही जिल्ह्याचे नाव बदलून 'कुशभवनपूर' करण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. ते म्हणतात, इतिहासाच्या तज्ज्ञांची आणि सर्वसामान्यांची मते अगदी सारखीच आहेत. सुलतानपूर हे कोणत्याही मुघल राजवटीच्या सुलतानाने नाही, तर श्रीरामाचा पुत्र कुश याने वसवले होते.
बदायूं- जिल्ह्यातून अद्याप एकही प्रस्ताव आलेला नाही. पण, योगींच्या यादीत या जिल्ह्याचे नाव आहे. 9 नोव्हेंबर 2021 रोजी बदायूं येथील एका कार्यक्रमातही त्यांनी हे संकेत दिले होते. ते म्हणाले होते, बदायूं हे वेदांच्या अभ्यासाचे केंद्र होते, त्यामुळे प्राचीन काळी याला वेद मऊ असे नाव होते.
फिरोजाबाद- येथील जिल्हा पंचायतीचीही 2 ऑगस्ट 2021 रोजी बैठक झाली आणि जिल्ह्याचे नाव बदलून चंद्र नगर असा ठराव मंजूर केला. येथील प्रस्तावही शासनाकडे गेला आहे.
शाहजहांपूर- येथील आमदार असलेले मानवेंद्र सिंह यांनीही सरकारला प्रस्ताव पाठवला आहे. त्यांनी शाहजहांपूरचे नाव महाराणा प्रतापांच्या जवळचे भामाशाह आणि आणखी एक नाव शाजीच्या नावावरून 'शाजीपूर' करण्याचे सुचवले आहे.
या जिल्ह्यांतही तयार होताहेत प्रस्ताव
मैनपुरी- मैनपुरीमध्येच 16 ऑगस्ट रोजी जिल्हा पंचायत स्तरावरील बैठकीनंतर नाव बदलून माया पुरी करण्याची मागणी करण्यात आली.
संभल- जिल्ह्याचे नाव बदलून कल्की नगर किंवा पृथ्वीराज नगर करण्याची मागणी होत आहे.
देवबंद- भाजप आमदार ब्रजेश सिंह रावत यांनीही देवबंदचे नाव देववृंदपूर ठेवण्याची मागणी केली आहे.
गाझीपूर- येथील ज्येष्ठ नेते कृष्णानंद राय यांच्या पत्नी अलका राय वर्षभरापूर्वी गाझीपूरचे नाव बदलून गाधीपुरी करण्याची मागणी करत आहेत.
कानपूर - कानपूर ग्रामीण भागातील रसुलाबाद आणि सिकंदराबाद आणि अकबरपूर राणी येथील नावांबाबत प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
आग्रा- आंबेडकर विद्यापीठात आग्राच्या जागी अग्रवण जिल्ह्याचे नवे नाव करण्याच्या बाजूने पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.
तज्ज्ञांचा सवाल- यातून जनतेला काय मिळणार?
आग्रा कॉलेजचे असोसिएट प्रोफेसर अरुणोदय बाजपेयी म्हणतात, “सरकारची पहिली चिंता अन्न आणि रोजगार पुरवणे ही असली पाहिजे. ताजमहाल पाहण्यासाठी लोक आग्रा येथे येतात, परंतु खराब व्यवस्थेमुळे ते जयपूरमध्येच थांबले आहेत. योगींनी प्रथम पर्यटन आणि येथील पाण्याच्या टंचाईकडे लक्ष दिले असते, तरुणांना रोजगार दिला असता आणि नंतर इतिहासातील चुका सुधारल्या असत्या तर ते अधिक तर्कसंगत ठरले असते.
येथील एका विद्यापीठाचे नाव आंबेडकर होते, पण ते राज्यातील, देशातील किंवा जगातील सर्वोत्तम विद्यापीठ ठरले का? परिस्थिती जशास तशी आहे. सध्याचे सरकारच नाही तर मायावती, अखिलेश यादव या सगळ्यांनी तेच केले. भाजप त्यांचीच री ओढत राहिला, तर काय फरक पडणार? सिंबॉलिझम आणि आयडेंटिटीच्या राजकारणामुळे पक्षांना मते मिळतात, पण जनतेला काहीच मिळत नाही."
बीएचयूचे सहायक प्राध्यापक डॉ. अमरनाथ पासवान सांगतात की, 'नाव बदलण्याचे काम पूर्वीच्या सरकारांनी केले आहे, परंतु सध्याच्या सरकारने सर्व मर्यादा झुगारून हे काम केले आहे. एक प्रकारे खोट्या इतिहासाचे लिखाण सुरूच आहे.
मुघलसराय स्थानकाचे नामकरण पं. दीनदयाळ उपाध्याय असे करण्यात आले, त्यांचे योगदान काय आहे? प्रत्येक सरकार आपले नवे नायक पुढे करते, पण खरे नायक इतिहासाच्या पानांत धूळखात पडलेले असतात. सरळ साधी बाब आहे, यूपीचे मुख्यमंत्री 'संघा'चा अजेंडा पूर्ण करत आहेत."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.