आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Even Such A Building, In Which People From All Over The Country Are Waiting For Death, Suffocates In 15 Days

ब्लॅकबोर्ड:अशीही एक इमारत, जेथे देशभरातून आलेले लोक मृत्यूची पाहतात वाट, 15 दिवसांत बंद होतात श्वास

मृदुलिका झाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

लहान होतो, तेव्हापासून आजपर्यंत हजारो मृत्यू जवळून पाहिले आहेत. लोकांच्या अंगणात पक्षी किलबिलाट करतात, पण इथे मात्र मृत्यू आपल्याला घेऊन जातो. अनेकवेळा असेही घडले की घराच्या आवारातच कोणीतरी मृतदेह सोडून गेले. इथे प्रत्येक खोलीच्या पांढऱ्या भिंतीमागे मृत्यूची छाया दडली आहे.

गल्ल्यांचा चक्रव्यूह आणि पान-थंडईचा सुगंध असणाऱ्या वाराणसीच्या कॅथेड्रल क्रॉसरोडवर पोहोचताच, एक खास वास तुमचे लक्ष वेधून घेईल. हा वास मृत्यूचा आहे. काही मीटरचे अंतर पार केल्यानंतर काशी लाभ मुक्तीभवन आहे. ती दुमजली इमारत, जिथे 10 खोल्यांनी आजपर्यंत 14 हजारांहून अधिक मृत्यू पाहिले आहेत.

या इमारतीची देखरेख करणारे अनुराग शुक्ला सांगतात- शेवटचा श्वास घेणाऱ्या व्यक्तीला पैसे देऊनही पंचतारांकित हॉटेलमध्ये रहायचे असेल तरी त्याला खोली मिळणार नाही. मरणाच्या दारात असणाऱ्या माणसाला कोणीही आपल्यासोबत ठेवायला तय़ार नसते. काशीत मोक्षाच्या शोधात आलेल्या लोकांचे मुक्तिभवन हे ठिकाण आहे. इथे आतापर्यंत 14 हजार 878 लोकं मृत्यूला भेटायला आले आहेत.

1908 साली बांधलेली हि हिरवीगार लाकडी दारे आणि पांढऱ्या भिंतींनी वेढलेली इमारत म्हणजे एक कथा आहे. इथली प्रत्येक खोली मृत्यूची वाट पाहत असते.

हे वाराणसीचे काशी लाभ मुक्ती भवन आहे. ही इमारत 1908 मध्ये बांधण्यात आली होती. आतापर्यंत 14878 लोक मृत्यूला भेटायला आले आहेत.
हे वाराणसीचे काशी लाभ मुक्ती भवन आहे. ही इमारत 1908 मध्ये बांधण्यात आली होती. आतापर्यंत 14878 लोक मृत्यूला भेटायला आले आहेत.

अशाच कथांच्या शोधात आम्ही मुक्तिभवन येथे पोहोचलो तेव्हा काही तासांपूर्वीच एका व्यक्तीला मोक्ष मिळाला होता. खोली स्वच्छ करण्यात आली होती आणि दुसऱ्या व्यक्तीची वाट पाहत होती. तिथे दोन लाकडी फळ्या पडल्या होत्या. एक रुग्णासाठी, दूसरी कुटुंबासाठी. भिंती रिकाम्या आणि पांढऱ्या होत्या, होते ते फक्त एक फडफडणारे कॅलेंडर.

जुन्या पध्दतीने बांधलेल्या या खोलीला लाकडी खिडक्या आहेत, ज्या बहुतेक बंद आहेत, जेणेकरून मृत्यूला संधी मिळताच पळून जाऊ नये.

यावर मुक्तीभवनचे प्रशासक अनुराग शुक्ला म्हणतात – असे घडते! काही वेळा रुग्णवाहिका किंवा वाहन इमारतीत शिरले की रुग्णाला मोक्ष मिळतो. त्याच वेळी, अनेक लोक आहेत ज्यांच्या चेहऱ्यावर मृत्यूचा पांढरेपणा असतो. रात्रभर त्यांना वेदना होतात, अंथरुणावर पडल्याने अंगावर जखमा होतात, पण त्यांचा मृत्यू होत नाही. मग त्यांना माघारी परतावे लागते.

खरं तर, इमारतीचा असा नियम आहे की इथे फक्त 15 दिवसांसाठी खोली मिळते. या काऴात जर मोक्ष मिळू शकत नसेल तर त्याला परत जावे लागते. कधीकधी असे देखील होते की परिस्थिती पाहून 15 दिवसांचा कालावधी वाढविला जातो. हे ते लोकं असतात ज्यांना डॉक्टरांनी सांगून टाकलेले असते. ज्यांचे शरीर हळूहळू काम करणे थांबवत असते. ज्यांनी खाणेपिणे जवळजवळ सोडले असून ज्यांच्या डोऴ्यात मृत्यूची प्रतीक्षा असते.

इथे आयुष्य कमी, मरणाचा आवाज जास्त आहे.दर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी अर्थी उठते. मोक्षाच्या इच्छेने येथे येणाऱ्या लोकांना १५ दिवसांसाठीच खोली मिळते.
इथे आयुष्य कमी, मरणाचा आवाज जास्त आहे.दर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी अर्थी उठते. मोक्षाच्या इच्छेने येथे येणाऱ्या लोकांना १५ दिवसांसाठीच खोली मिळते.

यावर अनुराग म्हणतात- अभ्यासाच्या दिवसात खूप कठीण होते. मित्रांना भीती वाटायची की अनुराग ज्या ठिकाणी राहतो, तिथे दर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी अर्थी उठते. मी सगळ्यांच्या घरी जायचो, पण माझ्या घरी कोणी येत नसे. वाढदिवस पण एकटाच साजरा करत होतो.. तेव्हा खूप वेदना होत होत्या. कालांतराने समजले की ही इमारत म्हणजे इतक्या लोकांचे शेवटचे निवासस्थान आहे. मग त्रास कमी झाला.

त्रास कमी झाला, पण तरीही मुक्तिभवनाशी पूर्णपणे जोडू शकलो नाही. कधी कार, कधी अॅम्ब्युलन्सचा आवाज ऐकू यायचा, लोकं सारखी रडत पडत राहायची, पण कुठेतरी काही अंतर होते. मला फौजदारी वकील व्हायचे होते. तसाच अभ्यास आणि सराव सुरू केला. त्यानंतर अचानक 2018 साली माझ्या वडिलांचे निधन झाले आणि इमारतीच्या देखरेखेची जबाबदारी माझ्यावर आली.

मी माझा काळा कोट उतरवला आणि मुक्तिभवनाची व्यवस्था पाहू लागलो. तेव्हापासून मी सतत मृत्यूचा साक्षीदार आहे.

मणिकर्णिका घाटाकडे जाणार्‍या अरुंद गल्ल्या भिंतींच्या दोन्ही बाजूंना चमकदार रंगीत चित्रांनी सुशोभित केलेल्या आहेत, ज्यात जीवन आणि मृत्यूचा खेळ दिसतो.
मणिकर्णिका घाटाकडे जाणार्‍या अरुंद गल्ल्या भिंतींच्या दोन्ही बाजूंना चमकदार रंगीत चित्रांनी सुशोभित केलेल्या आहेत, ज्यात जीवन आणि मृत्यूचा खेळ दिसतो.

संपूर्ण संभाषणात अनुराग मृत्यूऐवजी मोक्ष हा शब्द वापरतात आणि तोही अगदी सहजतेने, जणू काही जेवणाच्या मेनूबद्दल बोलत आहेत.

मी विचारते रोज आपल्याच कंपाऊंडमधून अर्थी निघताना त्रास नाही होत का? त्यावर उत्तर येते दुःख होते, आपल्याच नातेवाईकांना पाहून ते स्वत: त्यांच्या घरच्यांना घेऊन येतात. स्वत: त्यांच्या सहज मृत्यूसाठी प्रार्थना करतात, परंतु मृत्यूनंतर सर्वात दुःखी देखील होतात. कितीही तयारी केली तरी मृत्यू सर्वांना हादरवूनच टाकतो.

अनुराग नंतर इथे काम करणाऱ्या कालीशी भेट होते. त्वरीत चालणे आणि तितकेच वेगाने बोलणे, काली मोक्षाच्या गरजा देखील पूर्ण करतात आणि सकाऴ संध्याकाळ मोकळ्या आवाजात भवन गातात.

आम्ही पोहचलो तेव्हा ते बागेत खुरपणी करत होते. बोलणे थांबवून बोलू लागल्यावर ते सांगत गेले ते म्हणतात की, काशी हे एकमेव ठिकाण आहे जिथे आपण एखाद्या मित्राला भेटतो त्याच प्रमाणे मृत्यूला भेटतो. गोंगाट होईल, काही गप्पाटप्पा होतील आणि मग तो तुमचा हात धरून तुम्हाला घेऊन जाईल.

येथे ज्यांना मोक्ष मिळतो त्यांच्या नोंदीही ठेवल्या जातात. त्यांच्या नोंदी या अलमिरात ठेवण्यात आल्या आहेत.
येथे ज्यांना मोक्ष मिळतो त्यांच्या नोंदीही ठेवल्या जातात. त्यांच्या नोंदी या अलमिरात ठेवण्यात आल्या आहेत.

मी वर्षानुवर्षे येथे आहे. अॅम्ब्युलन्सचा आवाज येताच मी दाराकडे धाव घेतो.. तिथे मोक्षार्थींची स्थिती बघूनच प्रवेश मिळतो. जर कोणी निरोगी असेल तर तो येथे खोली मिऴवू शकत नाही. कोणी एकटा असला तरी त्याला इथे राहायला मिळणार नाही. काही दिवसांपूर्वी एक व्यक्ती आली, ज्याला शेवटचे दिवस इथे घालवायचे होते. त्याला एकटे पाहून आम्हाला त्याला जायला सांगावे लागले. जाताना त्याचे म्हातारे डोळे भरून आले. त्याला पाहून खूप वाईट वाटले, पण हा नियम आहे.

मुक्तिभवनात चर्चा झाल्यावर मी बाहेर निघाले. लोखंडी मुख्य दरवाजा 45 डिग्रीच्या उष्णतेतही खूप थंड होता, जणू त्याला स्पर्श करून मृत्यूही बाहेर आला होता.

गिरीजाघर चौकापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर मणिकर्णिका घाट आहे. असे म्हणतात की, येथे चोवीस तास चिता जळत राहतात. कदाचित ते खरे असेल कारण मी तिथे पोहोचले तेव्हा माझ्यासमोर आठ चिता जळत होत्या. घाटावर इकडे तिकडे विखुरलेली कुटुंबे रडत होती. सांत्वन करताना कुणीतरी स्वत:च रडत होते. जवळच चितेसाठी लाकूड देण्याची जागा होती.

हा आहे मणिकर्णिका घाट. येथे 24 तास चिता जळत असते. दिव्य मराठी रिर्पोटर तिथे पोहोचल्या तेव्हा 8 चिता जळत होत्या.
हा आहे मणिकर्णिका घाट. येथे 24 तास चिता जळत असते. दिव्य मराठी रिर्पोटर तिथे पोहोचल्या तेव्हा 8 चिता जळत होत्या.

काठ्या वेचणारे राहुल चौधरी माझ्या भीतीच्या किंवा दु:खाच्या प्रश्नावर म्हणतात- लहानपणापासून स्मशानभुमीतच राहिलो चिता जाळल्यानंतर उरलेले लाकूड चुलीत ठेवतो. दानधर्माच्या धान्याने अन्न शिजवतो, अंत्यसंस्काराचे कपडे देखील परिधान करतो. आम्ही मृत्यूला घाबरत नाही, होय, वेदना नक्कीच होतात.

तरूणांचा मृतदेह जाऴण्यासाठी येतो तेव्हा तळहात ओले होतात. लहान मुलाला जळतांना पाहून घाम पुसण्याच्या बाहाण्याने आम्हीही अश्रू पुसतो.

तुम्हाला कधी भीती वाटली आहे का? प्रश्नाची पुनरावृत्ती केल्यावर उत्तर येते - होय, कोरोनाच्या वेळी खूप भीती होती. मृतदेह पॉलिथिनमध्ये यायचे. कुटुंबातील अनेक सदस्य अनाथांसारखे एकटेच स्मशानभुमीत पोहोचत होते. मुले त्यांच्या मृत पालकांपासून दूर पळत होती. इतके मृतदेह जाळले गेले की त्याचा हिशोब नाही. प्रत्येक वेळी पुढचा नंबर आपलाच असेल असं वाटत होतं, पण थोडी माणुसकी, आणि सवयीने हे सगळं करता आले.