आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Mumbai Corona Peak | Third Wave Peak In February In India, Mumbai Delhi A A Few Days Away IIT Expert Warns

कळस गाठणार कोरोना:मुंबई-दिल्लीत 5 दिवसांत येणार रुग्णांचा पीक! फेब्रुवारीत रोज 8 लाख नवे रुग्ण सापडतील, मार्चमध्ये ओसरणार तिसरी लाट -IIT एक्सपर्टचा दावा

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने खळबळ माजवली आहे. 9 जानेवारी रोजी कोरोनाचे 1.79 लाख नवीन रुग्ण सापडले. एक्सपर्टच्या मते, फेब्रुवारीमध्ये कोरोनाची तिसरी लाट नवीन रुग्णांच्या आकडेवारीचा कळस गाठणार आहे. या दरम्यान रोज सरासरी 4 लाख ते 8 लाख नवीन रुग्ण सापडतील. तर मुंबई आणि नवी दिल्लीत 15 जानेवारीलाच आकडेवारीचा पीक (उच्चांक) येणार अशी भीती वर्तवण्यात आली आहे.

IIT कानपूरच्या गणित आणि संगणक शास्त्राचे प्राध्यापक मनिंद्र अग्रवाल यांनी हा दावा केला आहे. संगणकीय मॉडेलच्या माध्यमातून त्यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णांचे प्रमाण कसे असेल याची माहिती दिली. त्यांच्या मते, 15 मार्च पर्यंत कोरोनाची तिसरी लाट ओसरण्यास सुरुवात होईल.

मुंबई-दिल्लीत 5 दिवसांत 'पीक' येणार

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, प्राध्यापक अग्रवाल यांनी सांगितले की मुंबईत तिसऱ्या लाटेचा पीक 15 जानेवारीपासून जाणायला लागेल. दिल्लीत सुद्धा या दरम्यान अशीच परिस्थिती राहील. आमच्याकडे संपूर्ण देशाची आकडेवारी सध्या उपलब्ध नाही. तरीही प्राथमिक आकलनानुसार फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा उच्चांक राहील. या दरम्यान, देशात रोज 4 ते 8 लाख नवे रुग्ण सापडतील.

मुंबई आणि नवी दिल्लीत ज्या वेगाने कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचा आलेख वाढतोय, ते पाहता हा आलेख लवकर खाली येईल अशी शक्यता कमीच आहे. पूर्ण देशातच कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. एकूणच एका महिन्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा पीक येणार आणि मार्चमध्ये ही लाट ओसरणार अशी शक्यता आहे.

कॅलकुलेशन मॉडेल काम कसे करते?

प्राध्यापक अग्राल यांच्या मते, महामारी नियंत्रित नसतात हे मान्य आहे. तरीही यात काही मापदंड ठरलेले असतात. एखादी संक्रमित व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यास संक्रमण वाढणार असे गणित आहे. पुढे हे संक्रमण वाढत राहणारे असते. अर्थातच जितके लोक संक्रमित होतील, तितका या व्हायरसचा फैलाव होत जाईल. याच संक्रमणाच्या आधारे आमचे मॉडेल तयार करण्यात आले आहे.

भारतीय डेटा क्वालिटी इतर देशांपेक्षा सरस

प्राध्यापक अग्रवाल यांनी सांगितल्याप्रमाणे, या मॉडेलवर काम करताना आमच्या निदर्शनास आले की भारतीय आकडेवारीचा दर्जा इतर देशांच्या आकडेवारीच्या तुलनेत चांगला आहे. आपण स्वतःचे कौतुक करतोय असे नाही. परंतु, आरोग्य मंत्रालयाचे कौतुक करावे लागेल अशी ही क्वालिटी आहे. त्यांनी चांगल्या पद्धतीने आम्हाला डेटा उपलब्ध करून दिला.

पहिल्या लाटेत देशभर कठोर लॉकडाउन लावण्यात आले होते. त्यामुळे, संक्रमणाचा वेग मंदावला होता. दुसऱ्या लाटेत वेग-वेगळ्या राज्यांनी वेग-वेगळ्या प्रकारचे धोरण अवलंबले होते. ज्या राज्यांनी अंशतः आणि पूर्णपणे बंदी लावली त्या दोन्ही प्रकारच्या राज्यांमध्ये आकडेवारी वाढण्याचे प्रमाण कमी झाले. अर्थात लॉकडाउनमुळे संक्रमणाचा वेग कमी करता येऊ शकतो.

मृतांची आकडेवारीमध्ये घोळ

प्राध्यापक मनिंद्र अग्रवाल यांनी सांगिते, की देशात 40 लाख ते 50 लाख जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे अनेक अहवालांमध्ये नमूद आहे. तरीही इतक्या मोठ्या मृत्यूचा आकडा गायब कसा होऊ शकतो. रेकॉर्ड नसायला आपण काही अश्मयुगात नाही. अनेक राज्यांमध्ये स्मशानभूमीत रांगा लागल्या होत्या. दुसरी लाट पीकवर असताना केवळ 10 दिवसांमध्ये हे सर्व काही घडले होते. एकूणच महामारीमध्ये झालेल्या मृतांचा आकडा मोजला जाईल तेव्हा सरासरी आकडेवारी जास्त वाटणार नाही. कुणाला त्याचे गांभीर्य पण राहणार नाही. माझ्या मते, जितक्या मृत्यूंची नोंद झाली आहे, प्रत्यक्षात ती आकडेवारी 10 पटीने अधिक असावी.

बातम्या आणखी आहेत...