आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंथ, धर्म, श्रद्धा, विश्वास आणि उपासना…
या लोकजीवनाच्या वारसाने मिळालेल्या समजुती आहेत. तेही ज्यांच्या भोवती शेकडो रूढी-परंपरा गुंफलेल्या आहेत. किती पूर्वजांपासून आणि वर्षांपासून तेही माहीत नाही. जर तुम्ही त्यावर थर उचलण्याचा प्रयत्न कराल तर, तर तुमचे डोळे आश्चर्याने मोठे होत जातील.
काही दिवसांपूर्वीच ऑफिसमध्ये बसून आम्ही अशा प्रथा समोर आणण्याचा विचार करत होतो. त्यानंतर अचानक देशातील मोठे उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे एका रस्ते अपघातात निधन झाल्याची बातमी आली.
सायरस मिस्त्री यांच्यावर पारशी परंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. म्हणजेच, मृतदेह कोणत्याही कपड्यांशिवाय उघड्यावर सोडला जाईल. गिधाडांसारख्या पक्ष्यांना खाण्यासाठी. मात्र, नंतर काही वेळाने असे होणार नाही अशी बातमी आली. त्यांना दफन केले जाणार असल्याचे समजले.
पारशी समाजातील मृत्यूच्या प्रथेपासूनच ‘पंथ’ची सुरूवात करण्याचे तेथेच ठरवले होते. माझे नाव मनीषा आहे. तर आता आजचा पंथ…
मी दक्षिण मुंबईतील चर्चगेट स्टेशनवर आहे. इथून बाहेर पडल्यावर मी मरीन ड्राइव्हला पोहोचते. तिथून समुद्राच्या पलीकडे कोपऱ्यात घनदाट जंगल दिसते. गाडीने तिथे पोहोचायला 20 मिनिटे लागली. मलबार हिल्सवर 55 एकरांवर पसरलेले हे जंगल कित्तेक वर्ष जुने आहे. ही डुंगरवाडी आहे. म्हणजे पारशी व्यक्तीच्या मृत्यूनंतरचे शेवटचे सांसारिक पद.
मी आधी गाडीने आणि नंतर दगडी वाटेने पायी इथे पोहोचलो. सर्व ठिकाणी शांतता पसरलेली होती. झाडांमधले तुरळक काही लोक दिसत होते. भोवतालची हिरवळ पावसाच्या थेंबात न्हाऊन निघाली होती. लहान घरे होती, त्यांना बंगली या फ्यूनेरल पार्लर या नावाने ओळखले जाते.
पारशी व्यक्तीच्या अंत्यसंस्काराच्या आधी त्याचा मृतदेह येथे ठेवला जातो. येथून अरुंद रस्त्यावरून सुमारे 10 किलोमीटर चालत गेल्यावर भेटते - दखमा म्हणजेच टॉवर्स ऑफ सायलेन्स.
जाळण्याऐवजी, गाडून टाकण्याऐवजी किंवा पाण्यात टाकण्याऐवजी, पारशी लोक मृतदेह गिधाडांना खाण्यासाठी टॉवर्स ऑफ सायलेन्समध्ये ठेवतात. दोन-तीन महिन्यांत गिधाडे शरीराचे मांस खातात आणि उरलेली हाडे खड्ड्यात टाकून पुरली जातात.
आता तुमच्या मनात प्रश्न असेल की पारशी असे का करतात, ते समजून घेऊ
पारसी धर्मात मृत्यूनंतरचा अखेरचा विधी चार दिवस चालतो. पहिल्या दिवशी मृतदेह तयार करून बंगलीवर आणला जातो. त्यानंतर मृत शरीर टॉवर्स ऑफ सायलेन्समध्ये गिधाडांना खाण्यासाठी सोडले जाते. चौथा दिवस आत्म्याच्या न्यायाचा दिवस आहे.
महाराष्ट्रातील कुलाबा येथे असलेल्या झोरोस्ट्रियन (पारसी धर्माला माननारे) स्टडीज सेंटरचे व्यवस्थापकीय विश्वस्त खोजेस्टी पी मिस्त्री सांगतात की, अहुरमाजदा म्हणजेच पारशींचा देव सर्व काही जाणतो, परंतु तो सर्वशक्तिमान नाही. म्हणूनच मृत्यू अहुरमाजदा देत नाही. मृत्यू देणे हे सैतानाचे काम आहे.
आत्मा शरीरातून निघून गेल्यावर त्यामध्ये नसो म्हणजेच सैतान वास करतो. त्यामुळे मृतदेह अशुद्ध होतो.
पारशी लोक अग्नीला देवाचा पुत्र मानतात. त्याची पूजा करतात. पाणी आणि मातीही त्यांच्यासाठी पवित्र आहे. म्हणूनच पारशी लोक कोणाच्या मृत्यूनंतर मृतदेह जाळत नाहीत किंवा दफन करत नाहीत. त्यांचा असा विश्वास आहे की, असे केल्याने नसो आग, पाणी आणि मातीमध्ये प्रवेश करतो आणि ते प्रदूषित करतो.
मृत शरीरात शैतान कसा येतो?
मिस्त्री यांनी सांगितले की, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर लगेच कुटुंबीय मृतदेहाला स्पर्श करू शकतात, चुंबन घेऊ शकतात. त्यानंतर नसासलारला मृत्यूची माहिती दिली जाते. नसासलार आपल्या वाहनात मृतदेह नेण्यासाठी येतात. हे लोक बंगलीमध्ये राहतात. पासरी व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे सर्व विधी हेच लोक करतात. असे मानले जाते की, नसासलार आपल्या प्रार्थनेने नसो म्हणजेच शैतानाला नियंत्रणात ठेवतात.
त्यांनी आधी मृतदेहाचे कपडे कापले जातात. नंतर थंड पाण्याने आंघोळ घातली जाते. असे मानले जाते की यानंतर सैतान त्या मृतदेहात प्रवेश करतो. म्हणजेच आता या शरीराला नसासलादर यांच्या शिवाय कोणीही स्पर्श करू शकत नाही. मृताच्या कुटुंबियांना आणि नातेवाईकांनाही 9 फूट अंतरावर राहावे लागते.
यानंतर गोमूत्र अंगावर लावले जाते. नंतर मृतदेहाला पांढऱ्या रंगाचा सदरा आणि पायजमा परिधान केला जातो. सदरा हा मलमलच्या कापडाचा आतील पोशाख आहे, जो शुद्धतेचे प्रतीक आहे. याच्या वर एक सैल कस्ती (एक प्रकारचा धागा) जानव्या प्रमाणे बांधले जाते, जी शेळीच्या लोकरीपासून 72 तंद म्हणजे धाग्यांच्या माध्यमातून बनलेली असते. त्यातून जीवनाला योग्य दिशा मिळते. त्याला डायरेक्शन फाइंडर म्हणतात.
72 तंद असतात कारण झोरास्ट्रियन लोकांचे जीवनाचे तत्वज्ञान काय असावे, हे त्यांच्या धार्मिक ग्रंथ गाथा 72 यस्ना (वेगवेगळ्या प्रसंगी केल्या जाणार्या प्रथा) मध्ये सांगितले आहे. त्यानंतर त्याला टोपी घातली जाते. शेवटी, पांढऱ्या चादरीने गुंडाळले जाते. त्यानंतर मृतदेह बंगली मध्ये नेण्यात येतो.
मान्यता - कुत्र्याला पाहून कळते की, शैतानाने शरीर सोडले की नाही
बंगली मध्ये नेल्यानंतर मृतदेह तीन संगमरवरी स्लॅबवर ठेवण्यात येतो. यानंतर, नसासलादर हातात खिळे घेऊन मृतदेहाच्या शरीराभोवती लॉक लावल्याप्रमाणे तीन वेळा मंत्र म्हणता-म्हणता चकरा मारतात.
त्यानंतर मृतदेह स्लॅबवरून उचलून स्ट्रेचरवर ठेवला जातो. यादरम्यान, नसासलादर हातात खिळे घेऊन अनलॉक केल्या प्रमाणे विरुद्ध दिशेने फिरतात. त्यामुळे सैतान खिळ्याच्या मर्यादेत राहतो. यानंतर कुत्र्याला तेथे आणले जाते. जे मृत माणूस जिवंत आहे की नाही, त्याने आपला जीव गमावला आहे की नाही याची साक्ष देतो.
कुत्रा भुंकला तर त्याचा अर्थ संबंधित माणूस जिवंत असल्याचे धरले जाते.
अशा वेळी, दोन पारशी पुजारी म्हणजेच अथोरनान प्रार्थना करत असतात. दोघेही पांढऱ्या कपड्याने एकमेकांना बांधून घेतात, जेणेकरून भूत दोन लोकांची शक्ती पाहून घाबरतो आणि बाहेर पडू शकत नाही.
मिस्त्री यांच्या म्हणण्यानुसार, 50 च्या दशकात एक वेळ अशी होती, जेव्हा मृतदेह पाहून कुत्रा भुंकायला लागला होता. ती व्यक्ती कोमात गेल्याचे नंतर कळले.
दादर पूर्वेला अथोरनान संस्था आहे, जी झोरोस्ट्रियन धार्मिक शिक्षणाचे केंद्र आहे. जगात फक्त मुंबईतच आहे. येथील प्राचार्य डॉ. रमियर पी करनजिया सांगतात की, मृत्यू संध्याकाळी झाला असेल तर मृतदेह रात्रभर बंगली मध्ये ठेवला जातो. या दरम्यान, फर्जीआत (पारशी प्रार्थना) होत राहते.
मृतदेहाजवळ फुले, चंदन आणि अग्नि प्रज्वलित केला जातो. असे मानले जाते की सैतान चंदनाच्या सुगंधाने नियंत्रित होतो आणि अग्नीपासून दूर पळतो.
पारशी लोकांसाठी सूर्यप्रकाशाचे खूप महत्त्व आहे. म्हणून, सूर्य उगवल्यानंतरच, दुसऱ्या दिवशी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी टॉवर्स ऑफ सायलेन्स म्हणजेच दखमा येथे नेला जातो. दखमा उंची 21 फूट आहे.
ते गोलाकार असून त्याचे तीन भाग असतात. पहिला स्लॉट म्हणजे भाग पुरुषांसाठी, मधला स्लॉट महिलांसाठी आणि तिसरा स्लॉट मुलांसाठी आहे. अगदी मध्यभागी खोल खड्डा आहे. खड्ड्याच्या 16 दिशेने 301 खिळे टाकून ते मजबूत केले जाते.
याला केवळ एकच गेट असते आणि जे वरून उघडे असते. ज्यामुळे गिधाडे मृत शरीराचे मांस खाऊ शकतात आणि सूर्याची किरणे त्यावर पडू शकतात.
टॉवर्स ऑफ सायलेन्समध्ये मृतदेह आणल्यानंतर, मृताच्या कुटुंबीयांना शेवटचे पाहण्याची संधी मिळते, परंतु 9 फूट अंतरावरून. येथे मृतदेहाचे कपडे काढून ते एका खड्ड्यात जाळले जातात. शरीर कपड्यांशिवाय ठेवले जाते, मग ते शरीर महिलेचे असो वा पुरुषाचे. या दरम्यान मृताचे कुटुंबीय दिवस मांसाहारही करत नाही.
पारशी लोक मानतात की पहिले तीन दिवस आत्मा शरीराबाहेर त्याच ठिकाणी राहतो. त्यानंतर तो लहान मुलासारखा होतो. घाबरतो. चौथा दिवस न्यायाचा दिवस आहे. म्हणजेच आत्म्याच्या न्यायाचा दिवस असतो. या दिवशी मृत व्यक्तीच्य कुटुंबियांनी तेथे उपस्थित राहावेच अशी मान्यता आहे.
या दिवशी आहूरमाजदाराचे चार न्यायाधीश ठरवतात की तो आत्मा चांगला आहे की वाईट. या न्यायाधीशांना यज्द म्हणतात. मृत व्यक्तीच्या चांगल्या आणि वाईट कृत्यांवर आणि बोललेल्या चांगल्या आणि वाईट शब्दांवर निर्णय आधारित असतो.
जर आत्म्याने चांगली कृत्ये केली असेल तर त्याला सूर्याच्या किरणांसह हाउस ऑफ सॉन्ग म्हणजे स्वर्गात पाठवले जाते. जर तुम्ही वाईट कृत्ये केली असतील तर त्या आत्म्याला स्वतःच नरकात म्हणजेच हाउस ऑफ डिसीट मध्ये जावे लागेल. त्यानंतर मृतदेह तेथेच टाकून दिला जातो.
आता गिधाडांचे काम सुरू होते. येथे मृतदेह पाहताच ते खाली उतरून ते खाऊ लागतात. वेळेचा विचार केला तर तो शरीराच्या आकारावर अवलंबून असतो. पूर्वी गिधाडे दहा ते पंधरा दिवसांत मृत शरीराचे मांस खात असत, परंतु आता गिधाडांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे, त्यामुळे दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो.
गिधाडे मांस खाल्ल्यानंतर उरलेली हाडे उन्हात आणि पावसात कुजण्यासाठी सोडली जातात. सरतेशेवटी, शरीराचा जो काही भाग शिल्लक असेल, तो नसासलादर टॉवर ऑफ सायलेन्सच्या मध्ये बांधलेल्या कोरड्या विहिरीत टाकतात, ज्यामध्ये चुना आणि काळे मीठ असते. आठ ते दहा महिन्यांत विहिरीत त्याची पावडर तयार होते.
तरीसुद्धा, उरलेल्या मोठ्या हाडांना नॅसल्लर टॉवर ऑफ सायलेन्सजवळील खड्ड्यात चुना आणि मीठसोबत पुरले जाते. अशा प्रकारे पारशी लोक अंत्ययात्रा पूर्ण करतात.
पूर्वी पारशी सैतानाची पूजा करायचे, जरथुस्त्रा यांनी केले स्पष्ट
मिस्त्री यांनी सांगितले की, पारसी पैंगबर जरथुस्त्र (झोरोस्ट्रियनचे संस्थापक) पृथ्वीवर येण्यापूर्वी इराणी लोक 'देवा यसना' ची पूजा करत होते. येथे देवा म्हणजे देवता नसून भूत किंवा शैतान आहे. त्यांचा असा विश्वास होता की सैतानाची उपासना केल्याने कोणत्याही संकटातून त्वरित आराम मिळतो.
जरथुस्त्राने लोकांना समजावून सांगितले की आपण यास्ना देवाची पूजा करू नये, तो भूत आहे. आपण बुद्धीची म्हणजेच विजडमची उपासना केली पाहिजे. त्याने आहूरमाजदा (पारशींचा देव) पूजण्यास सांगितले. ज्याला बुद्धीचा स्वामी म्हणतात. जरथुस्त्राने कोणताही धर्मग्रंथ लिहिला नाही, तर पाच गाथा (गुनगुन) गाऊन लोकांना योग्य-अयोग्य बद्दल सांगितले.
जरथुस्त्राने पहिल्या कथेचे वर्णन मय्यतसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले आहे. पहिल्या गाथेची अहूनावाइती (एक प्रकारची प्रार्थना) मृत्यूच्या वेळी आणि मृत शरीराला स्नान केल्यानंतर केली जाते.
सातव्या शतकात पारशी तीन बोटीतून भारतात पोहोचले होते
सातव्या शतकात इराणला पर्शिया म्हणून ओळखले जात असे. तेव्हा तेथे ससानि साम्राज्याचे राज्य होते आणि झोरोस्ट्रियन धर्म हा तिथला अधिकृत राज धर्म होता. भारतातील पारशी लोकांच्या आगमनाची कथा आपल्याला किस्सा-ए-संजान नावाच्या झोरोस्ट्रियन गाथेतून मिळते. हे दस्तूर बहमन यांनी 1600 मध्ये लिहिले होते.
खरे तर इराणचा शेवटचा सम्राट याजदेगार्द याचा अरबांनी 641 मध्ये नेहावंदच्या युद्धात पराभव केला होता. यानंतरच पारशी अरबांच्या जुलमी राजवटीतून सुटण्यासाठी पळू लागले.
खुरासानच्या टेकड्यांवर काही लोक स्थायिक झाले. 8 व्या शतकापर्यंत, खुरासानच्या डोंगरावर स्थायिक झालेल्या पारशी राजांचा पराभव होऊ लागला. यानंतर बहुतेक लोक होर्मुझ बंदरावर पोहोचले आणि सुमारे 30 वर्षे तेथे राहिले.
त्यांच्यावरचे अत्याचार इथेही थांबले नाहीत तेव्हा ते तीन बोटीतून गुजरातमधील काठियावाडमधील दीव बेटावर पोहोचले. येथून त्यांनी वलसाड गाठले. त्यानंतर गुजरातच्या या भागातील राजा जाधव राणा यांनी काही अटींसह पारशींना येथे राहण्याची परवानगी दिली. जिथे पारशी लोकांनी संजन नावाचे छोटेसे गाव वसवले.
जगातील 40% पारशी लोक मुंबईत राहतात, त्यांची एकूण लोकसंख्या 1.25 दशलक्षांपेक्षा कमी
मुंबईच्या झोरोस्ट्रिअन स्टडीज सेंटरनुसार जगभरात पारशी लोकांची एकूण संख्या 1 लाख 15 हजार आहे. त्यापैकी 40 टक्के पारशी लोक फक्त मुंबईत राहतात. दक्षिण मुंबईतील दादर पूर्व, कुलाबा, भाई कलान, परळ आणि मलबार हिल्स हे पारसी लोकांचे ठिकाणे आहेत. येथे पारशींचे मोठे बंगले आहेत आणि त्यांच्या घरांचे खास ब्रिटिश वास्तुविशारदांनी केलेली रचना पाहता लक्ष्यात येते की येथे पारशी कुटुंब राहतात.
एक तृतीयांश पारशी लग्न करत नाहीत, लोकसंख्येत घट
पारशी लोकांमध्ये, 30% पुरुष आणि 28% स्त्रिया लग्न करत नाहीत, कारण त्यांना त्यांच्या लहान समुदायामुळे म्हणजे कमी लोकसंख्येमुळे परिपूर्ण जोडीदार भेटत नाही.
पारशी लोकसंख्येच्या घटत्या लोकसंख्येमुळे दिल्लीतील पारस्यांची संस्था पारजोर भारत सरकारच्या सहकार्याने प्रजनन कार्यक्रम चालवते. ज्यामध्ये ते पारशी जोडप्यांवर उपचार करतात, ज्यांना मुले होऊ शकत नाहीत. हा उपचार मोफत आहे. त्यामुळे गेल्या 6 वर्षात 261 पारशी मुलांचा जन्म झाला आहे.
पंथाची पहिली सिरीज वाचल्यानंतर तुम्ही खालील कथाही वाचू शकता...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.