आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईहून पश्चिम बंगालच्या दुर्गापूरकडे जाणारे स्पाइसजेटचे 737-800 विमान लँडिंगपूर्वी वादळात अडकले. वैमानिकाने ते सुरक्षित उतरविले. पण, यावेळी निर्माण झालेल्या टर्ब्युलन्समुळे विमानातील 188 पैकी 17 प्रवाशी जखमी झाले. DGCA अर्थात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिलेत.
चला तर मग आपण जाणून घेऊया स्पाइसजेटचे विमान टर्ब्युलन्समध्ये का अडकले? टर्ब्युलेन्स काय असते? व ते किती धोकादायक असते? विमान टर्ब्युलन्समध्ये अडकल्यानंतर प्रवाशांनी काय केले पाहिजे? या प्रश्नांची उत्तरे.
लँडिंगपूर्वी विमान टर्ब्युलन्समध्ये कसे अडकले
स्पाइसजेटच्या एसजी-945 विमानाने रविवारी सायंकाळी 5 वा. मुंबईहून दुर्गापूरच्या काझी नजरुल इस्लाम विमानाच्या दिशेने उड्डाण केले. उड्डाणानंतर जवळपास 2 तासांनी दुर्गापूरमध्ये उतरण्यापूर्वी विमानाला खराब हवामानामुळे टर्ब्युलन्समध्ये अडकले. तथापि, वैमानिकाच्या हुशारीमुळे विमान सायंकाळी 7.15 च्या सुमारास सुरक्षित उतरले.
फ्लाइटच्या टर्ब्युलन्सचे अनेक व्हिडिओ उजेडात आलेत. त्यात कप, बॉटल, लगेज आदी वस्तू कॅबिनमधून कोसळताना दिसून येत आहेत. यात 3 क्रू सदस्यांसह 17 जण जखमी झाले. या प्रकरणी अनेक प्रवाशांचे डोके व मणक्याला इजा झाली आहे.
काय असते टर्ब्युलन्स?
विमानाला उडण्यास मदत करणाऱ्या हवेत अडथळा निर्माण झाल्यामुळे टर्ब्युलन्स निर्माण होते. यामुळे विमान अधांतरी हलते व अनियमित व्हर्टिकल मोशनमध्ये डाचेय म्हणजे आपल्या ठराविक मार्गावरुन दूर जाते. याला टर्ब्युलन्स असे म्हणतात. अनेकदा टर्ब्युलन्समुळे विमान आपल्या ठराविक उंचीवरुन खाली कोसळते.
यामुळे प्रवाशांच्या मनात विमान कोसळते की काय? अशी भावना निर्माण होते. खराब रस्त्यावरुन जाताना कार चालवताना जो अनुभव येतो तसाच अनुभव टर्ब्युलन्स दरम्यान विमानातील प्रवाशांना येतो. काही टर्ब्युलन्स सौम्य तर काही गंभीर प्रकारचे असतात.
अखेर का होते टर्ब्युलन्स?
हवामुळे वातावरण तयार होते व ती नेहमीच गतीशील असते. विमान उडण्यासाठी हवेच्या याच वेगाचा वापर केला जातो. एखादे विमान स्थिरपणे उडण्यासाठी त्याच्या पंखांवरुन व खालून वाहणारी हवा नियमित असणे आवश्यक आहे. अनेकदा हवामान व अन्य कारणांमुळे हवेच्या वेगात अनियमितता येते. यामुळे एअर पॉकेट्स तयार होऊन टर्ब्युलन्स उद्भवते. टर्ब्युलन्स अनेक कारणांनी होते. त्यामुळे त्याची क्लिअर एअर टर्ब्युलन्स, मॅकेनिकल टर्ब्युलन्स आदी वेगवेगळ्या श्रेणींत विभागणी करण्यात आली आहे.
टर्ब्युलन्स तीव्रतेच्या दृष्टिकोनातून 3 प्रकारचे असतात.
सौम्य टर्ब्युलन्स -यात विमान 1 मीटरपर्यंत वर-खाली होते. हे प्रवाशांच्या लक्ष्यात येत नाही.
मध्यम टर्ब्युलन्स -यात विमान 3-6 मीटरपर्यंत वर-खाली होते. त्यात पेल्यातील ड्रिंक खाली पडू शकते.
गंभीर टर्ब्युलन्स -यात विमा 30 मीटरपर्यंत वर-खाली होते. सीट बेल्ट लावलेले नसल्यास प्रवाशी उसळून पडू शकतात.
किती प्रकारचे असते टर्ब्युलन्स?
टर्ब्युलन्स वेगवेगळ्या कारणांनी होते -त्याची 7 प्रकारच्या श्रेणीत विभागणी करण्यात आली आहे;
थंडरस्टॉर्म टर्ब्युलन्स -खराब हवामान व वादळाशी संबंधित टर्ब्युलन्स अत्यंत धोकादायक असते. यामुळे विमानावर दाब पडून नियंत्रण गमावण्याची भीती असते. थंडरस्टॉर्ममुळे तयार झालेले टर्ब्युलन्स एवढे ताकदवान असते की, ते एखाद्या विमानाला 2 ते 6 हजार फूट व्हर्टिकली वर किंवा खाली नेऊ शकते. मुंबई-दुर्गापूर विमान थंडरस्टॉर्म टर्ब्युलेन्समध्येच अडकले होते.
क्लिअर एअर टर्ब्युलन्स अर्थात CAT -विमानाला हे टर्ब्युलेन्सही जाणवते. ते जेट स्ट्रीम क्षेत्रात उद्भवते. जेट स्ट्रीम अत्यंत शक्तिशाली वायू धारा असतात. त्यांचा वेग ताशी 250 ते 400 किमी एवढा प्रचंड असतो. हे वेगवान वारे संथ गतीने वाहणाऱ्या हवेला धडकल्यानंतर टर्ब्युलन्स तयार होते. त्याचा अंदाज बांधणे अवघड असते.
वेक टर्ब्युलन्स -हे टर्ब्युलन्स विमान हवेतून गेल्यानंतर त्याच्या मागे तयार होते. विमान हवेतून जाते तेव्हा त्याचे विंगटिप म्हणजे त्याच्या पंखाचा वळलेल्या भागाचे भोवऱ्यात रुपांतर होते. तसेच ते जेट वॉश म्हणजे जेट इंजिनातून वेगाने निघणाऱ्या मुव्हिंग वायूंपासूनही तयार होते. हे अत्यंत गंभीर टर्ब्युलन्स असते. पण, त्याची तीव्रता 3 मिनिटांचीच असते.
माउंटेन व्हेव टर्ब्युलन्स -हे टर्ब्युलन्सही मॅकेनिकल टर्ब्युलन्ससारखेच असते. त्यात इमारती ऐवजी डोंगर असतात. जेव्हा हवा डोंगर माथ्यावरुन व खालून अचानक वाहते तेव्हा एक स्टँडिंग वेव्ह तयार होते. हवा अधांतरी झुलते. त्यामुळे ती शेकडो मैल वर-खाली वाहण्यास सुरूवात होते.
मॅकेनिकल टर्ब्युलन्स -हे टर्ब्युलन्स पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळील हवेतील अडथळ्यांमुळे म्हणजे डोंगर किंवा इमारतींवरुन वाहणाऱ्या वाऱ्यामुळे तयार होते. यामुळे सामान्य हॉरिझोंटल एअर फ्लो डिस्टर्ब होऊन भोवरा किंवा हवेच्या अनियमित मोशन सारखा पॅटर्न तयार होतो. टेक-ऑफ किंवा लँडिंगवेळी हवा डोंगर किंवा शहरातील इमारतींना धडकते. त्यातून छोटे चक्रिवादळ तयार होतो. यामुळे विमानात टर्ब्युलन्स तयार होतात.
थर्मल टर्ब्युलन्स -गरम हवा वरच्या दिशेने तर वरचे वारे खालच्या दिशेने वाहताना हे टर्ब्युलन्स तयार होते. यामुळे हवेच्या वेगात अनियमितता तयार होते.
फ्रंटल टर्ब्युलन्स -हे टर्ब्युलन्स नेहमीच थंडीच्या मोसमात होते. त्यावेळी थंड हवा उष्ण हवेच्या जवळ पोहोचते. तेव्हा दोन परस्परविरोधी हवेत फ्रिक्शन तयार होते. हे प्रवाशी विमानात जाणवणारे सर्वसामान्य टर्ब्युलन्स आहे.
टर्ब्युलन्समुळे विमान क्रॅश होऊ शकते?
प्रवासांसाठी किती धोकादायक टर्ब्युलन्स
टर्ब्युलन्स अत्यंत भीतीदायक असते. यामुळे प्रवाशी भयभीत होतात. अनेकदा त्यांना गंभीर इजाही पोहोचते. गंभीर टर्ब्युलन्स वगळता फ्लाइटमधील सामान्य टर्ब्युलन्समुळे प्रवाशी जखमी होण्याची शक्यता अत्यंत कमी असते. अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन म्हणजे एफएएच्या माहितीनुसार, मागील 2 दशकांत दरवर्षी सरासरी 33 प्रवाशी टर्ब्युलन्समुळे जखमी झाले.
टर्ब्युलन्सच्या स्थितीत तुम्ही काय कराल?
तज्ज्ञांच्या मते, टर्ब्युलन्सच्या वेळी सीट बेल्ट घालणे सर्वात महत्वाचे असते. या प्रकरणी सर्वात जास्त धोका सीट बेल्ट न घातल्यामुळे निर्माण होतो.
स्पाइसजेट प्रकरणी काय होणार चौकशी ?
DGCA ने स्पाइसजेटच्या मुंबई-दुर्गापूर विमानात टर्ब्युलन्समुळे उद्भवलेल्या स्थितीची चौकशी करण्याचे आदेश दिलेत. स्टँडर्ड प्रॅक्टिसनुसार, या घटनेत प्रवाशी जखमी कसे झाले याचा तपास केला जाईल. या प्रकरणी वैमानिक टर्ब्युलन्ससाठी तयार नव्हते काय याचा तपास केला जाईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.