आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Mumbai Lockdown; Bihar Uttar Pradesh Migrant Workers Special Trains List 2021 | Dainik Bhaskar Ground Report On Railway Arrangement

मुंबईहून घरी परतणा-यांच्या 4 अस्वस्थ करणा-या कहाण्या:UP-बिहारमध्ये जाण्यासाठी जागा न मिळाल्याने दुप्पट दंड भरत आहेत लोक, म्हणाले -  या शहरात आता मन रमत नाही

राजेश गाबा9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आता पाऊले चालली घराच्या दिशेने...

अवघे एक वर्ष लोटले, जेव्हा रेल्वेपासून ते रस्त्यापर्यंत लोकांचे जथ्थेच्या जथ्थे त्यांच्या गावी परतताना दिसले होते. पायी, ट्रक, टॅक्सी, ऑटो, दुचाकी, सायकल मिळेल त्या मार्गाने स्थलांतरित मजुर आपल्या गावी परतत होते. आता वर्षभरानंतर पुन्हा एकदा तिच परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या दुस या लाटेत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात 15 दिवसांची संचार बंदी लागली आहे. रोजीरोटी नसल्याने मजुर पुन्हा एकदा मुंबईहून आपल्या गावी परतत आहेत. यापैकी अनेक जण यूपी-बिहारच्या आपापल्या गावातून-घरातून कर्ज घेऊन मुंबईत आले होते. दिव्य मराठीने त्यांना भेटून त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आम्ही दोन भागात या स्थलांतरीत मजुरांची व्यथा तुमच्यापर्यंत आणत आहोत. पहिल्या भागात - जेथून लोक निघाले आहेत, म्हणजेच मुंबई आणि दुसरा - जिथे हे पोहोचत आहे. म्हणजेच लखनऊ, बनारस आणि पटना... चला यांच्यासोबतच्या प्रवासाला...

आता पाऊले चालली घराच्या दिशेने...
काम शोधण्यासाठी मुंबईत आलो होतो, पण काम मिळाले नाही. लॉकडाउन लागल्याने परत जातोय. पाच दिवस झाले नीट झोप येत नाहीये. ट्रेनची वाट पाहत असताना झोप लागली, तर कुणीतरी मोबाईल चोरला. पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी गेलो असता त्यांनी मारुन पळवून लावले. आता तिकीटासाठी गेलो, पण तिकीट मिळाले नाही. तिकीट मिळाल्यास बिहारमध्ये सुरक्षितपणे आपल्या घरी पोहोचेल. हे सांगत आहेत बिहारचे अरुण...

सुनील कानपूरचे आहेत. मुंबईस्थित एका कंपनीत चप्पल जोडण्याचे काम करत होते. लॉकडाउनमुळे काम थांबले. आता त्यांनीही त्यांच्या शहरात परत जाऊन नवीन नोकरी शोधण्याचा निर्णय घेतला आहे.

आझमगडचे जय प्रकाश सांगतात की, ते एका फिल्म स्टुडिओमध्ये गार्ड म्हणून काम करत होते. पण स्टुडिओ लॉकडाउनमध्ये बंद झाला, मुंबईत रोजीरोटीची अडचण निर्माण झाली आहे. आता घरी जाण्याची चिंता लागली आहे.

या फक्त तीन कथा आहेत. अशा हजारो कथा मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस म्हणजेच एलटीटीच्या प्लॅटफॉर्मवर, बाहेर आणि रस्त्याच्या कडेला, डिवाइडर आणि त्याच्या आजुबाजुला बघायला मिळत आहेत. हे सर्व लोक ज्यांचे लक्ष्य एकच आहे ते म्हणजे त्यांचे घर... यापैकी बर्‍याच जणांची एकच तक्रार आहे आणि ती म्हणजे त्यांना रेल्वेचे तिकिट मिळत नाहीये. रेल्वे प्रशासन मदत करत नाही आणि पोलिसांना एकच गोष्ट कळते - त्रास देणे. आणि ते हेच करत आहे.

तिकिट मिळाले नाही म्हणून दंड भरुन चढलो

बरेच लोक एवढे त्रासले आहेत की, ते विना तिकिट रेल्वेत चढून दंड भरुन घरी जाण्यास तयार आहेत. बिहारचा रहिवाशी असलेला अमित कुमारला एलटीटीहून बिहारमधील जयनगरकडे जाणारी 01061 विशेष ट्रेनचे तिकिट मिळाले नाही, तर तो दोन हजार रुपये दंड भरून आपल्या घराच्या दिशेने निघाला. मुंबईत ते एका कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करत होता. लॉकडाउनमुळे काम बंद पडले.

आता या शहरात मन रमत नाही...
गाझीपूरचा रहिवासी गोकुळ शर्मा हा मुंबईत सुतार काम करायचा. काम थांबल्यावर त्याने गावी परत जाण्याची तयारी केली. मोठ्या अडचणीतून तत्काल तिकिटाची व्यवस्थाझाली.. गोकुळ सांगतो की, मालकाने फक्त गावी जाण्यासाठी तिकिटाचे पैसे दिले. आता या शहरात मन रमत नाही. 25 तासांच्या प्रवासासाठी तत्काल तिकिट 1500 रुपयांना मिळाले. इतर वेळेला ते 800 रुपयांचे असते.

रेल्वे स्थानकवरचे दृश्य आणि रेल्वेची तयारी
मुंबईहून उत्तर प्रदेश आणि बिहारकडे जाणा-या बहुतांश गाड्या एलटीटी, कल्याण, ठाणे, दादर, पनवेल आणि छत्रपती शाहू जी महाराज टर्मिनस (सीएसटी) मार्गे धावतात. ट्रेन सुटण्याच्या काही तास आधी एलटीटी आणि सीएसटी सारख्या स्थानकांवर प्रचंड गर्दी जमली आहे. या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी योग्य व्यवस्था नाही. लोकांना तिकिट मिळविण्यात अडचण येत होती. तसेच, स्क्रीनिंगसाठी योग्य व्यवस्था नव्हती.

या गोंधळावर रेल्वेचे उत्तर
साधारणपणे 1800 लोक ट्रेनमध्ये प्रवास करतात. परंतु सध्याच्या गाड्या भरल्या असून त्यामध्ये 2000 हून अधिक लोक प्रवास करत आहेत. तथापि, मध्य रेल्वेचे सीपीआरओ शिवाजी सुतार म्हणतात की, मागील वर्षीची आणि यंदाची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. म्हणून आम्ही कोणतीही श्रमिक ट्रेन चालवणार नाही. 13 आणि 14 एप्रिलला गर्दी होती, पण आता परिस्थिती सामान्य आहे.'

स्टेशनबाहेरील गर्दीच्या छायाचित्रांवर सुतार सांगतात की, 'एलटीटीकडून विशेष गाड्या धावत आहेत. एका ट्रेनमध्ये आरक्षणाच्या तिकिटावर 1500 लोक प्रवास करतात. एलटीटी स्थानकात एकूण 5 प्लॅटफॉर्म आहेत आणि अशा स्थितीत तीन गाड्या एकाच वेळी सुटल्या तर 4500 प्रवासी स्थानकात आणि बाहेर असतात. म्हणूनच गर्दी दिसून येते आणि ही गर्दी काही काळापूरतीच असते.'

श्रमिक ट्रेन धावणार नाही
शिवाजी सुतार म्हणाले, 'मागील वर्षी आणि यंदाची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही कामगारांसाठी विशेष ट्रेन चालवणार नाही.' मागील वर्षी 25 मे 2020 पर्यंत सरकारने देशभरात 3274 श्रमिक ट्रेन गाड्या चालवल्या. त्यांच्यामार्फत सुमारे 44 लाख लोक त्यांच्या घरी पोहोचले होते. हे आकडे रेल्वेने जाहीर केले होते.

काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वेकडून असे निवेदन आले होते की, उन्हाळ्यात प्रवाशांच्या सोयीसाठी 7 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान 76 विशेष गाड्या चालविण्यात येतील. या गाड्या मुंबई आणि पुणे ते उत्तर व पूर्वेकडील मार्गावर धावतील. रेल्वेचे म्हणणे आहे की ,मेच्या अखेरीस विशेष गाड्यांची संख्या वाढवून 154 केली जाऊ शकते.

हा फोटो 15 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजेचा आहे. लोक घरी जाण्यासाठी त्यांच्या ट्रेनची वाट पहात होते.
हा फोटो 15 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजेचा आहे. लोक घरी जाण्यासाठी त्यांच्या ट्रेनची वाट पहात होते.

विशेष गाड्यांचा तपशील

1. एलटीटी-छपरा स्पेशल (ट्रेन क्रमांक -01197) एलटीटीहून 21 एप्रिल रोजी दुपारी 02.30 वाजता सुटेल आणि तिसर्‍या दिवशी सकाळी 10.50 वाजता छपरा स्थानकात पोहोचेल. हॉल्ट: भिवंडी रोड, वसई रोड, सूरत, वडोदरा, रतलाम, कोटा, सवाई माधोपूर, बयाना, आग्रा किल्ला, टुंडला, कानपूर, ऐशबाग गोंडा, बस्ती, गोरखपूर, भटनी, सीवान

2. एलटीटी-भागलपूर स्पेशल (ट्रेन क्रमांक -01203)
ही गाडी एलटीटी वरून 23 आणि 30 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 वाजता सुटेल आणि तिसर्‍या दिवशी सकाळी 6.30 वाजता भागलपूरला पोहोचेल.
हॉल्ट: कल्याण, नाशिकरोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छिवकी, पी. दीन दयाल उपाध्याय जंक्शन, सासाराम, गया, जमालपूर

3. सोलापूर-प्रयागराज स्पेशल (ट्रेन क्रमांक - 01315)
सोलापूरहून ही ट्रेन 30 एप्रिल पर्यंत सोमवारी आणि शुक्रवार रात्री 9 वाजता सुटेल. ही गाडी सुटण्याच्या तिसर्‍या दिवशी सकाळी 04.25 वाजता प्रयागराज येथे पोहोचेल. म्हणजेच 19, 23, 27 आणि 30
एप्रिल रोजी ही गाडी धावेल.
हॉल्ट: पुणे, पनवेल, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपूर

4. पुणे-गोरखपूर स्पेशल (ट्रेन क्रमांक - 01453)
ही गाडी 23 आणि 30 एप्रिल रोजी पुण्याहून रात्री 8.20 वाजता सुटेल आणि तिसर्‍या दिवशी सकाळी 9.40 वाजता गोरखपूरला पोहोचेल.
हॉल्ट: डीसीएल, अहमदाबाद, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, बांदा, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा, बस्ती

(या सर्व रेल्वेचे आरक्षण प्रवासाच्या तारखेच्या एक दिवस आधी सुरु होते.)

बातम्या आणखी आहेत...