आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लूझिव्हमुंबईत D कंपनी पुन्हा सक्रिय:दाऊदचे ISI सोबत दहशतीचे नवे मॉडेल, तरुणांना पाकिस्तानात पाठवताहेत हस्तक

आशीष रायएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) ला मुंबईत ड्रग्ज आणि बेकायदेशीर मालमत्तेद्वारे दहशतवाद्यांना फंडिंग केल्याचे पुरावे सापडले आहेत. यामागे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची टोळी कार्यरत आहे. ISIच्या मदतीने दहशतीचे नवे मॉडेल तयार केले जात आहे.

एनआयएच्या गुप्तचर अहवालानुसार दाऊद टोळीचे लोक पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या दहशतवादी संघटनांना निधी पुरवत आहेत. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि परिसरात खंडणी, सट्टा, बिल्डरांना धमक्या आणि ड्रग्जचा धंदा वाढला आहे.

अंडरवर्ल्डला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न

महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश एटीएस, दिल्ली पोलिस, एनआयए आणि ईडीच्या पथकांनी टेरर फंडिंगमध्ये गुंतलेल्या नागरिकांना पकडले आहे. आरोपींचे D कंपनीचे परदेशातील नेटवर्क, दाऊदचा भाऊ अनीस इब्राहिम, छोटा शकील आणि टायगर मेमन यांच्याशी संबंध आहेत.

मुंबईतून पैसे उभे करून यूपी-बिहारमध्ये स्लीपर सेलसाठी निधी

अंडरवर्ल्डच्या विरोधात काम करणाऱ्या महाराष्ट्र पोलिसाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दाऊदची टोळी पुन्हा मुंबई आणि आसपासच्या परिसराला लक्ष्य करत आहे. येथून जमा झालेल्या निधीतून यूपी-बिहारसह उत्तर भारतातील राज्यांमध्ये स्लीपर सेलचे पुनरुज्जीवन केले जात आहे.

दाऊदचा भाऊ इक्बाल पाहतो काम

तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, दाऊदचे भारतातील संपूर्ण काम त्याचा भाऊ इक्बाल कासकर पाहत आहे. तो दाऊदचा उजवा हात छोटा शकीलच्या संपर्कात होता. ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सुरेश देवीचंद मेहता यांच्या तक्रारीवरून इक्बाल सध्या तुरुंगात आहे. त्याने मेहता यांच्याकडे तीन कोटींची खंडणी मागितली होती.

बांधकाम व्यावसायिकांकडून निधी वसुलीचा मोठा स्रोत

एनआयएच्या तपासात दाऊद टोळीचे हस्तक छोटा शकील आणि दाऊद इब्राहिमच्या नावाने बिल्डरांकडून पैसे उकळत असल्याचे आढळून आले. या टोळीशी संबंधित लोक वादग्रस्त मालमत्तेवरही कब्जा करत आहेत. मुंबईतून अटक करण्यात आलेल्या सलीम फ्रुटजवळ 10 हजार पानांची मालमत्तेची कागदपत्रे सापडली. यापैकी बहुतेकांना सलीम फ्रुटच्या नावावरच आहेत. सलीम हा अनीस इब्राहिमचा नातेवाईक आहे.

त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांकडून ही वसुली डी गँगसाठी होत असल्याचा संशय एनआयएला आहे. मात्र, सलीम हा रिअल इस्टेट एजंट असल्याचा दावा कुरेशीचे वकील विकार राजगुरू यांनी केला आहे.

ड्रग्जमधून सर्वाधिक कमाई

दाऊद टोळी MDMA, LSD आणि केटामाइन ड्रग्जची तस्करी करत आहे. यातूनच सर्वाधिक उत्पन्न मिळते. दोन वर्षांत NCB आणि नार्कोटिक्स सेलने मुंबई आणि परिसरातून सुमारे दोन हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत.

जुबेर वैद मेमन याला 4 ऑगस्टला तर अबू बकर अब्दुल गफूर शेख याला 4 फेब्रुवारीला अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी अटक करण्यात आली होती. गेल्या वर्षीही 3 जणांना अटक करण्यात आली होती.

लष्कर, जैश आणि अल कायदाला पाठवले पैसे

अंडरवर्ल्ड 2.0 स्थापन करण्यासाठी दाऊद इब्राहिम अल कायदा, लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदची मदत घेत आहे. एनआयएच्या चौकशीदरम्यान सलीम फ्रूटने याची कबुली दिली आहे. मुंबई सेंट्रल येथील मीर अपार्टमेंटमधून त्याला अटक करण्यात आली होती.

सलीमने सांगितले की, मालमत्तांचे व्यवहार आणि बड्या उद्योगपतींचे वाद मिटवण्यासाठी मिळालेले पैसे लष्कर, जैश आणि अल कायदाला पाठवले गेले. ड्रग्ज आणि सोन्याच्या तस्करीतून मिळालेला पैसाही दहशतवादी संघटनांकडे वळवण्यात आला आहे.

पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI चा देखील पाठिंबा आहे. छोट्या शहरातील मुलांना आमिष दाखवून पाकिस्तानातील प्रशिक्षण केंद्रात पाठवले जात आहे. ही तीच प्रशिक्षण केंद्रे आहेत जिथे मुंबई हल्ल्याचा दोषी कसाबला प्रशिक्षण देण्यात आले होते. दिल्ली पोलिसांनी पकडलेल्या 7 दहशतवाद्यांपैकी काहींनी पाकिस्तानात प्रशिक्षण घेतल्याची कबुली दिली आहे. अनीस इब्राहिम हे संपूर्ण ऑपरेशन पाहत आहेत.

पैसे आणि प्रशिक्षणाची जबाबदारी अनीस इब्राहिमकडे

NIA च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धारावीमधून अटक करण्यात आलेल्या समीर कालियाने चौकशीदरम्यान सांगितले की, अनीस इब्राहिम आयएसआयच्या कर्नल गाझीच्या सांगण्यावरून मुंबई आणि देशाच्या इतर भागात स्लीपर सेल पुन्हा सक्रिय करत आहे. प्रशिक्षित दहशतवाद्यांना पैसा, शस्त्रे आणि दारूगोळा पुरवणे ही अनीसची जबाबदारी होती. अनीसने समीर कालिया यांच्याकडे हे काम सोपवले होते.

क्रिप्टो चलनाच्या वापराची ED कडून चौकशी

NIA च्या म्हणण्यानुसार, यावेळी D गँग अंडरवर्ल्ड नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी डार्कनेट आणि क्रिप्टो करन्सी वापरत आहे. या दृष्टीनेही ईडीने तपास सुरू केला आहे. हवाला व्यवहारातून पैसे पाकिटात पाठवले जातात. ते पाकीट नंतर मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरले जातात. संयुक्त अरब अमिराती (UAE) हे त्याचे सर्वात मोठे केंद्र आहे. हा दाऊदचा बालेकिल्लाही आहे. UAE मध्ये पैसे पाठवण्यासाठी दाऊदचे हवालाचे मजबूत नेटवर्क आहे.

ऑपरेटर्सशी गप्पा मारण्यासाठी खास अ‍ॅप

आरिफ आणि शब्बीरच्या अटकेनंतर, एनआयएला पुरावे मिळाले आहेत की, छोटा शकील आणि दाऊद एका खास अ‍ॅपद्वारे त्यांच्या साथीदारांशी संवाद साधतात. यामध्ये न्यूमेरो, बोटिम, व्हायबर आणि टँगो यांचा समावेश आहे.

यूपी एटीएसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, न्यूमेरो अ‍ॅप्लिकेशन साठी आंतरराष्ट्रीय सिम खरेदी करावे लागेल. डी गँगचे गुंड सिम खरेदी करण्यासाठी युनिव्हर्सल क्रेडिट कार्ड वापरतात. हे वेगवेगळ्या नावांनी घेतले जातात. त्यामुळे संख्या आणि लोक शोधणे कठीण आहे.

दाऊद इब्राहिम 2015 पासून हळूहळू सक्रिय

ईडीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 1993 च्या बॉम्बस्फोटानंतर देश सोडून पळून गेलेला दाऊद इब्राहिम 2015 मध्ये पुन्हा सक्रिय होऊ लागला. तपास यंत्रणांना याची माहिती मिळाली आणि ईडीने मोरोक्को, स्पेन, यूएई, सिंगापूर, थायलंड, सायप्रस, तुर्कस्तान आणि यूकेसह भारतातील त्याच्या जवळचे नातेवाईक, जवळचे हस्तक यांच्या मालमत्तेचा मागोवा घेण्यास सुरुवात केली आहे.

बातम्या आणखी आहेत...