आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकरी आंदोलन:‘भीती आणि अपेक्षे’ची भाषाअन् सूक्ष्म नियोजनाची युती

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सर्व संघटनांच्या दृष्टीने , मग ते सरकार असो, एखादा खासगी व्यवसाय किंवा लहान व्यावसायिक, सर्वांना आपली स्वप्नं प्रत्यक्षात आणण्यासाठी नियोजन गरजेचे असते. त्यामुळे ते जेव्हा नियोजन करतात तेव्हा काय करायचे, कसे करायचे आणि केव्हा करायचे हे ठरवतात. हीच पद्धत आंदोलन करणाऱ्या संघटनांसाठीही लागू होते, त्यांना मोठ्या संख्येत समर्थकांसह दीर्घकाळ आंदोलन सुरू ठेवायचे असेल तर. दिल्लीजवळील सिंघू सीमेवर गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाप्रमाणे.

जर एवढ्या मोठ्या आंदोलनात प्रत्येक जण एकाच स्वरात एकाच गोष्टीचा पुनरुच्चार करत आहे, तेही एकही शब्द न बदलता, तर वरपासून खालपर्यंत संवाद आहे हे अगदी स्पष्ट आहे. त्यात १२ वर्षीय मुलापासून गृहिणींचाही समावेश आहे. आणि या संवादात निश्चितपणे दोन भावना होत्या-‘भीती आणि अपेक्षा.’ आपली शेतजमीन नेहमीसाठी हिरावण्याची भीती आणि ती आगामी पिढ्यांसाठी वाचवण्याची अपेक्षा.

‘दैनिक भास्कर’ने एका उच्चस्तरीय व्यक्तीकडून पंजाबच्या सर्व १२,६०० गावांत राहणाऱ्या हजारो लोकांपर्यंत पोहोचणाऱ्या या संवादाच्या प्रवाहाचे आलेख आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी लागलेली वेळ जाणून घेण्याचा निर्णय घेतला.

आंदोलनाची सुरुवात ९० दिवसांपूर्वी झाली, तेव्हा हरियाणाच्या पीपली येथे नव्या कायद्यांना विरोध करत असलेल्या शेतकऱ्यांवर लाठीमार झाला होता. सरकार आपले म्हणणे ऐकून घेण्यास तयार नाही अशी भावना या घटनेमुळे सामान्य शेतकऱ्याच्या मनात निर्माण झाली. हा अंत:प्रवाह प्रामुख्याने मध्यम आणि ब्लॉक स्तरावरील नेत्यांना जाणवला. कारण, प्रत्येक कुटुंबातील किमान एक सदस्य कुठल्या ना कुठल्या प्रकारे शेतीशी जोडलेला आहे. मग या लोकांनी एक जागरूकता कार्यक्रम हाती घेऊन प्रत्येक ग्रामस्थाचा पाठिंबा मिळवण्याचा निर्णय घेतला. आणि येथूनच काय बोलायचे, कसे बोलायचे आणि केव्हा बोलायचे याचे खरे नियोजन सुरू झाले. समाजाच्या विविध वर्गांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जवळपास सर्व ३१ संघटना युनायटेड फार्मर्स फ्रंट म्हणजे संयुक्त किसान मोर्चाच्या एका झेंड्याखाली जमा झाल्या. थोड्याच काळात पेट्रोल पंप मालक संघटना, बार असोसिएशन, शिक्षक संघटना, डेअरी असोसिएशन आणि माजी-सैनिक संघटना यांसारख्या शेकडो लहान-मोठ्या संघटना त्यांच्या समर्थनार्थ आल्या.

प्रत्येक पाच ब्लॉकसाठी जिल्हाध्यक्ष पद बनवले. प्रत्येक ब्लॉकमध्ये अनेक समित्या होत्या. प्रत्येक समितीत पाच सदस्य होते आणि प्रत्येक समितीला १५० ग्रामस्थांची जबाबदारी देण्यात आली. प्रत्येक गावातून कुशल वक्त्यांची निवड झाली आणि त्यांना सहकार्य करण्यासाठी आणखी काही सदस्य जोडण्यात आले. या लोकांना घरोघर जाऊन संदेश देण्यास सांगितले गेले. या संवादवाहकांनी प्रत्येक घरातून एका व्यक्तीची निवड केली आणि त्याच्यात ‘भीती आणि अपेक्षे’च्या भाषेचा संचार केला. इतर राज्यांतून येणारे अनियमित स्थलांतरित कामगार, जमीन मालक, लहान व्यावसायिक आणि विशेषत: पुरवठा साखळीतील भूमिहीन शेतमजुरांना हे

सांगण्यात आले की, कशा प्रकारे नव्या कायद्यांमुळे अर्थव्यवस्था ठप्प होईल आणि त्यांची रोजंदारी संपेल. त्याशिवाय या सामूहिक उद्देशासाठी प्रत्येक घरातून किमान एका व्यक्तीला पाठवण्यास आणि प्रत्येक गावातून किमान एक ट्रॅक्टर देण्यास सांगण्यात आले. त्यानंतर वेगवेगळ्या स्तरांवर व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आले, त्याद्वारे रोज व्हिडिओसह माहितीची देवाणघेवाण करण्यात आली. अशा प्रकारे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राशी संबंधित व्यक्ती एकच भाषा बोलू लागली.

जेव्हा पंजाबमध्ये आंदोलनाची सुरुवात झाली, तेव्हा संवादाची ही रणनीती पूर्ण भरात होती. आपली ‘भाषा’ शेवटच्या माणसापर्यंत पोहोचली हे नेत्यांना जाणवले. राज्यस्तरीय आंदोलन दोन महिन्यांतही केंद्र सरकारचे लक्ष वेधून घेऊ शकले नाही, तो हा काळ होता. केंद्र सरकारचे लक्ष आपल्या मागण्यांकडे वेधून घेण्यासाठी आपल्याला दिल्लीकडे कूच करावे लागेल यावर तेव्हा सर्व संघटनांच्या नेत्यांचे एकमत झाले आणि त्याची तारीखही निश्चित झाली.

त्यामुळे, जेव्हा गुरुवारी आंदोलनाचा १५ वा दिवस उजाडला तेव्हा आंदोलकांची संख्या तर वाढलीच, शिवाय हे सर्वात मोठे हायवे आंदोलन करण्यासाठी येणारे लोकही एकसारखी भाषा बोलत आहेत.

तरुणांना संगीताद्वारे केले आकर्षित : सामान्य भाषेत किंवा व्यंगात्मक शैलीत पंजाबी युवकांना अशा समूहाच्या रूपात संदर्भित केले जात आहे, ज्यांना फक्त दोन गोष्टी येतात-खाणे आणि नाचणे. ही त्यांची सांस्कृतिक ओळख आहे. मग ही त्यांची कमकुवत बाजू म्हणा की जगण्याची पद्धत. तुम्ही त्यांच्या हृदयापासून संगीत वेगळे करू शकत नाही. आणि त्यामुळेच आंदोलकांनी युवकांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेले हिंमत संधू, कंवर गरेवाल, जस भाजवा आणि मनमोहन वारिस यांच्यासारख्या संगीत उद्योगाशी संबंधित गायकांशी संपर्क साधला. क्रांतिकारी गाणी लिहिण्यासाठी खास गीतकारांची नियुक्ती करण्यात आली. पंजाबने १८ पेक्षा जास्त वेळा दिल्ली जिंकली आहे, असा इतिहासातील दावा आहे, त्यामुळे प्रत्येक गाण्यात ‘दिल्ली’ शब्द होता. हा शब्द युवकांच्या भावना जागृत करेल, असे शेतकरी नेत्यांना वाटत होते. त्यामुळे जेव्हा ‘किते कही वाले मोडे ते बंदूक ना आ जे, एन्ना दिल्लीए तू खयाल कर लईं (नांगर असलेल्या खांद्यावर बंदूक येऊ नये याकडे दिल्ली तू लक्ष ठेव) यांसारखी गाणी जेव्हा लाऊडस्पीकरवर वाजतात तेव्हा एनएच-४४ वर उभे युवक त्याच्या सुरात सूर मिसळतात. आणि जेव्हा ‘लैके मुड़ांगे पंजाब असीं हक दिल्लीए’ (हे दिल्ली, आम्ही आमचा हक्क घेऊनच पंजाबला परत जाऊ) यांसारखी गाणी वाजतात तेव्हा प्रत्येक युवक छाती ठोकायला लागतो.

युवकांना सातत्याने प्रेरित करण्यासाठी नवी-नवी गाणी तयार करणे आणि ती मोठ्या आवाजात वाजवणे आंदोलकांनी सुरू ठेवले आहे. त्या गाण्यांद्वारे आंदोलनाच्या रोजच्या घटनाक्रमाचीही माहिती दिली जात आहे.
(मनीषा भल्ला यांच्या इनपुटसह)

मॅनेजमेंट गुरू
एन. रघुरामन
raghu@dbcorp.in

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser