आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारविवारी सकाळी गानकाेकिळा भारतरत्न लता मंगेशकर गेल्याचे वृत्त कळले आणि भावनांचा कल्लाेळ उठला. भावना व्यक्त करताना शब्द थिटे वाटू लागले.
वृत्त कळले आणि पुन्हा एकदा या हिरव्या ऋतूमध्ये आघात झाला. मी एकदम निष्पर्ण झाल्यासारखा बसलाे आहे. वय झाले हाेते, आजारपण हाेते, हे सगळं खरं असलं तरी त्यांनी वयाचे शतक पूर्ण करावे, अशी अपेक्षा हाेती. अशा माणसांचं प्रत्यक्ष असणं, मार्गदर्शन करणं सुखद असतं.
लताबाईंच्या खडतर प्रवासाचे प्रतीक म्हणून उद्यानाला नाव... माझी डाेंगराच्या पायथ्याशी खडकाळ शेतजमीन आहे. या ठिकाणी पाणी नाही, काही उगवत नाही. त्या ठिकाणी मी सीताफळं लावली. सीताफळाचं झाड ऊन, वारा, पाणी नसताना प्रतिकूल परिस्थितीत जगतं. त्याचं लताबाईंच्या खडतर जीवन प्रवासाशी साधर्म्य असल्याने सीताफळाच्या उद्यानाला लता मंगेशकर उद्यान नाव दिले. माझ्यासारख्या दूरस्थ मुलाला ‘जैत रे जैत’ या मंगेशकर कुटुंबीयांच्या पहिल्या चित्रपटासाठी १९७७ ला लताबाईंनी गीत लिहिण्यासाठी सांगितले. त्या म्हणाल्या, तुमच्यासारखाच गीतकार पाहिजे. आदिवासी जीवनावर आधारित या दाेन तासांच्या चित्रपटात १ तासाची १० माेठी व ६ छोटी गाणी आहेत. गीतांना शब्द माझे असले तरी त्याला साेन्याचा मुलामा देण्याचे काम संगीताच्या माध्यमातून हृदयनाथ व गायनाच्या माध्यमातून लताबाईंनी केले.
आॅपरेशनला कुटुंबाप्रमाणे विचारपूस...
माझी दाेन माेठी आॅपरेशन्स दीनानाथ मंगेशकर हाॅस्पिटलमध्ये झाली. त्या वेळी दीदींनी स्वत: येऊन विचारपूस केली. उपचारानंतर स्वत:च्या घरी ठेवून घेतले.
मागील वर्षी १७ जुलैला अनपेक्षित फाेन...
गेल्या वर्षी १७ जुलैला मला लता दीदींचा अचानक फाेन आला. म्हणाल्या, माझ्या कपाटात तुमच्या कवितेचा एक कागद सापडला. मी खेड्यात चांगला जगताे, कविता करताे, यांचे त्यांना नेहमीच काैतुक वाटायचे. त्यांनी मला सांगितले. मला दाेनच माणसं आणि त्यांच्या कविता अत्यंत आवडतात. ज्या माझ्या हृदयस्थानी आहेत. एक म्हणजे कुसुमाग्रज व त्यांच्या कविता आणि दुसरे म्हणजे तुम्ही. तुम्ही माणूस म्हणून तर चांगले आहातच, त्यासाेबत तुमच्या कविता या जमिनींशी नातं सांगतात.
शनिवारी माझ्या आजाेळच्या गाेष्टींचे पुस्तक पाठवले....
शुक्रवारीच हृदयनाथ मंगेशकर, भारती आणि राधा यांच्याशी दीदींच्या तब्येतीबद्दल बाेललाे. या वेळी त्यांना मी माझ्या पत्नीसाठी ६० वर्षांपूर्वी लिहिलेल्या कवितांचे माझ्या आजाेळच्या गाेष्टी’ या पुस्तकाच्या प्रती पाठवल्याचे सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.