आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिव्य मराठी विशेष:लॉकडाऊनमध्ये गावी परतला फुटबॉलपटू, मुले व्यसनाधीन असल्याचे पाहून त्यांना फुटबॉल शिकवणे सुरू केले, आता क्लब ड्रेस-बूट देताहेत

मनीषा भल्ला | गुवाहाटी25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोथा यांनी मुलांकरिता कपडे, बूट व दुसरे साहित्य दिले.
  • नागालँडचे फुटबॉलपटू लिरोंथंग लोथा यांचे प्रत्येक मुलाला फुटबॉलपटू बनवण्याचे ध्येय

नागालँडचा व्यावसायिक फुटबॉलपटू लिरोंथंग लोथा २२ वर्षांचा आहे आणि पंजबच्या फुटबॉल क्लबसाठी खेळतो. लॉकडाऊनच्या आधी क्लबमधून सुटी घेऊन तो नागालँड सीमेवरील आपल्या गावी मेरापानी आला होता. मात्र, लॉकडाऊन जाहीर झाल्याने येथेच थांबला. आता ड्रग्ज व दारूच्या व्यसनात सापडलेल्या मुलांचे भविष्य घडवत आहे. लिरोंथंुग सांगतात, त्यांना व्यसनात बघून मी ठरवले की जेव्हाही मोठ्या सुटीत घरी येईल तेव्हा त्यांना फुटबॉल शिकवायचे. त्यांच्या पायांना फुटबॉलची सवय झाली तर त्यांचे व्यसन सुटेल. लोथा यांनी गावातील मुलांना फुटबॉल शिकवणे याच वर्षी जूनमध्ये सुरू केले. ते सांगतात, आधी एकटाच फुटबॉल घेऊन मैदानात जायचो व खेळायचो. फुटबॉल लांब गेल्यावर मुलांना आणायला सांगायचो. लोथाने कोणालाच फुटबॉल खेळायला सांगितले नाही. मात्र, त्यांना मैदानात फुटबॉलसोबत नाचताना बघून मुलांनाही मजा येऊ लागली. दोनचे तीन, तीनचे पाच, रोज मैदानात मुले जमू लागली आणि त्यांनाही खेळायचे असल्याचे म्हणू लागली. येथूनच प्रशिक्षण देण्याचे काम सुरू झाले. ते सांगतात, आज ७ ते १७ वर्षांचे २१ मुले त्यांच्याकडून शिकत आहेत. आधी त्यांच्याकडे साधने नव्हती. नंतर लोथा यांना मदत मिळू लागली. काही अकादमी व क्लबकडून मदत मिळाली. कंपन्यांनी न्यूट्रिशनल डायटही उपलब्ध करून दिले.

पहिल्याच चाचणीत लोथाची झाली निवड, असे झाले फुटबॉलपटू

२०१० मध्ये लोथाच्या गावात मेरापानीत फुटबॉल सामना झाला. तो बघायला मोठे खेळाडू आले होते. त्यांनी लोथाला मैदानात वेगाने पळताना बघून गोलघाट (अासाम) येथे होणाऱ्या चाचणीसाठी बाेलावले. लोथाची निवड झाली. २०१३ मध्ये साईच्या चाचणीतही निवड झाली. २०१५ मध्ये कोलकाताच्या मोहन बागान क्लबमध्ये सहभागी झाले. २०१८ मध्ये गोव्यात चर्चिल ब्रदर्स एफसीकडून खेळले व २०२० मध्ये राउंडग्लास पंजाब एफसी जॉइन केले.