आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिद्दीची गोष्टबंदुकीच्या गोळीने बनवले पेंटिंग, किंमत अडीच कोटी:5 वी नापास आहे, 10 वर्षे मजूरी केली; आज 37 विश्वविक्रम

वाजिद खानएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मी बंदुकीच्या गोळ्यांपासून महात्मा गांधींचे चित्र बनवले आहे. कारच्या इंजिनच्या पार्ट्सपासून घोडा बनवला. भ्रूणहत्येत वापरल्या जाणाऱ्या वैद्यकीय उपकरणाच्या सहाय्याने रडणाऱ्या मुलाचे चित्र तयार केले. धीरूभाई अंबानी, नेल्सन मंडेला, जीझस क्राइस्ट, मदर मेरी अशी डझनभर चित्रे खिळ्यांनी बनवली आहेत.

माझ्या स्टुडिओमध्ये पेंटऐवजी ब्रश, पेन्सिल, कॅनव्हास, हॅमर, खिळे, वायर, लोखंडी रॉड, लोखंडी कटिंग मशीन, गॅरेजच्या वस्तू, वापरलेल्या गोळ्यांची काडतुसे सापडतील.

मी 5वी फेल वाजिद खान आहे, मी मध्य प्रदेशमधील मंदसौर येथील रहिवासी आहे. सध्या मी इंदूरमध्ये राहतोय. मी देशातील पहिला नेल आर्टिस्ट आहे म्हणजेच खिळ्यांनी चित्रे बनवणारा कारागीर आहे. जगातील कोणतीही गोष्ट माझ्यासाठी व्यर्थ नाही. लोकांसाठी जे वेस्ट आहे, ते माझ्यासाठी चांगले आहे.

माझ्या एका हातात हातोडा आणि टेबलावर खिळ्यांनी बनवलेले प्रसिद्ध श्रीलंकन कलाकार जाफरी बाबा यांचे चित्र आहे.
माझ्या एका हातात हातोडा आणि टेबलावर खिळ्यांनी बनवलेले प्रसिद्ध श्रीलंकन कलाकार जाफरी बाबा यांचे चित्र आहे.

माझ्या कथेला पुढे जाण्यापूर्वी मला तुम्हाला दोन घटना सांगायच्या आहेत-

  • काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. केरळमध्ये माझ्या कलेवर माझी 15 मिनिटांची कार्यशाळा होती, ती तासभर चालली. शेवटी, जेव्हा मी विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले, तेव्हा एकजण उठला आणि म्हणाला, मला हिंदी येत नाही. मला धक्का बसला. नंतर कळले की त्या सभागृहात कोणालाच हिंदी येत नाही. विद्यार्थ्यांना वाटले की मी काही जादू सांगणार आहे.
  • अशातच मला एका सेमिनारला बोलावलं होतं. मी समोरच्या हॉलमध्ये बसलो होतो, स्टेजवर इंग्रजीत संबोधित करताना दुसऱ्याला बोलावलं जात होतं. मला वाटले की, मला बोलावले आहे. मी स्टेजवर जाताच सगळे हसायला लागले. मग मी माईक घेतला आणि म्हणालो की, ‘कमी शिकलेला असण्याचा तोटा असा आहे की, मी स्टेजवर आलो आहे. आणि कमी शिकलेला असण्याचा फायदा आहे की, मी आज स्टेजवर आहे.’

यावरून तुम्हाला माझे शिक्षण आणि यश या दोन्ही गोष्टींची कल्पना येऊ शकते. मी जमीनदार कुटुंबातील आहे, पण मला स्वतःचे काहीतरी करायचे होते, मी स्वतःला शोधत होतो.

त्यावेळी पाचवीच्या बोर्डाच्या परीक्षा होत्या, मी नापास झालो. मी अडखळत बोलायचो, त्यामुळे देखील शिक्षण सोडले. माझ्या बोलण्यामुळे शाळेतली मुलं माझी चेष्टा करायची.

जेव्हा मी शाळेत जाणे बंद केले तेव्हा माझे वडील म्हणाले – तू शिकला नाहीस तर काय करशील, पण मला शिक्षित नव्हे तर साक्षर व्हायचे होते. वयाच्या 13 व्या वर्षी मी वेड्यासारखे घर सोडले.

सुमारे 10 वर्षे मंदसौरच्या अनेक दुकानात मजूर म्हणून काम केले, वेल्डिंगच्या दुकानात ट्रॅक्टरच्या ट्रॉली बनवायचो. बार गरम करून जाड हातोडीने मारायचो. हे काम मी 4 वर्षे केले. कामासाठी 11 किलोमीटर चालत जायचो.

सुरुवातीच्या दीड वर्षात तर पैसेच नव्हते. नंतर मला दरमहा 30 रुपये मिळू लागले, ज्यातून ऑटोचे भाडे निघायचे.

हे दसौदा येथील अनिल परमार आहे, ज्यांच्या वेल्डिंगच्या दुकानात मी 4 वर्षे काम केले.
हे दसौदा येथील अनिल परमार आहे, ज्यांच्या वेल्डिंगच्या दुकानात मी 4 वर्षे काम केले.

1995 ची गोष्ट आहे. स्मशानभूमीत लोखंडी शेड बनवायचे होते. त्याकाळी खेड्यापाड्यात व शहरात वीज नसायची, त्यामुळे रात्रभर शेड तयार करावे लागत होते. एका बाजूला मृतदेह जळत होता, तर दुसरीकडे मी माझ्या साहेबांसोबत जळत्या चितेच्या उजेडात शेड बांधत होतो. रात्री तिथेच जेवण करून झोपलो.

एके दिवशी माझ्या काकांना वाटले की, मी शिक्षण पूर्ण करू शकत नाही आणि मी कोणतेही काम करत नाही. त्यांनी मला खूप मारले, मला त्यांच्या मित्राच्या घरी आणले आणि तेथून निघून गेले. ते त्यांच्या मित्राला म्हणाले की, हा आयुष्यात काहीच करू शकत नाही. त्याचे हात पाय तोडा, पण त्याला माणूस बनवा.

काकांच्या मित्राचे मोटार वाइंडिंगचे दुकान होते, मी येथे 3 वर्षे काम केले. दिवसाचे 14-14 तास काम करायचो, पण पैसे मिळत नव्हते.

त्यानंतर ऑटो चालवायला लागलो. त्यावेळी मर्सिडीज कंपनी ऑटो टाईप टेम्पो बनवत असे. 17-18 किलोमीटरची राईड घेऊन जाण्यासाठी 2 रुपये मिळायचे. मग जुने कपडे खरेदी करून फूटपाथवर विकायला सुरुवात केली. यातूनच काही स्वत:ला घालण्यासाठी कपडे ठेवत असे.

तोतरेपणामुळे मी अनेक वेळा डिमोटिव्ह झालो, पण मी अनेक व्यायाम करून माझे व्यक्तिमत्त्व सुधारले.
तोतरेपणामुळे मी अनेक वेळा डिमोटिव्ह झालो, पण मी अनेक व्यायाम करून माझे व्यक्तिमत्त्व सुधारले.

मी 1300 रुपये घेऊन इंदूरला आलो, आजच्या सारखे इंदूर त्याकाळी इतके विकसित नव्हते. जेवणासाठी पैसे नव्हते, बरेच दिवस शिळ्या पोळ्या खाव्या लागल्या. हॉटेलवाले फुकट सुद्धा देत होते. मग एका हॉटेल मालकाच्या शेळ्यांवर लक्ष ठेवायचे आणि त्याच हॉटेलमध्ये जेवणही मिळायचे.

दरम्यान, एके दिवशी मी विचार करू लागलो की मी स्वतःशी काय करत आहे. मी कोणती ओळख निर्माण करत आहे? या कामासाठीच मी बंड करून घर सोडले होते का?

2001 साल संपत आले होते. शहरातील शाळेत गॅजेट्स बनवण्याचे काम सुरु केले. आयआयएमचे एक प्राध्यापक शाळेत आले होते, मला पाहून ते म्हणाले – तू कलाकार व्हायला पाहिजे.

त्यानंतर मी अनेक कलादालनांमध्ये जाऊन चित्रकला पाहिली. वडोदरा म्युझियममधली संगमरवरी कला पाहिली, मग वाटले की शेकडो लोक या क्षेत्रात काम करत आहेत. मी नवीन काय करू? माझ्या मनात एक गोष्ट आली की, जे जवळ आहे त्यावरच काम करावे. मी गावी आलो होतो, घरी फर्निचरचे काम चालू होते. मी तिथून खिळे चोरले आणि त्यांच्यापासून चित्र बनवायला सुरूवात केली.

हे चित्र बनवण्यासाठी 4 वर्षे लागली. मी स्वत: नेल आर्ट बनवायला शिकलो, ही मला देवाने दिलेली भेट आहे, असेही म्ही म्हणू शकतो. कला बाजारात उतरवायला 3 वर्षे लागली. म्हणजेच पहिली कला बाजारात आणण्यासाठी 7 वर्षे लागली.

गाडी इंजिनच्या भागांपासून मी हा घोडा तयार केला आहे.
गाडी इंजिनच्या भागांपासून मी हा घोडा तयार केला आहे.

कला प्रदर्शनात लोकांनी माझी चित्रे पाहिली तेव्हा सगळेच थक्क झाले. त्यांचा 20 लाख रुपयांना लिलाव झाला, तेव्हा मला वाटले की, आता मी काहीतरी नवीन करू शकतो. बाजारात नवी ओळख मिळाली. याच कलेने मला वाजिद खान कलाकार बनवले, पण तरीही घरच्यांना आनंद नव्हता.

माझ्या वडिलांना खिळ्यांनी बनवलेली कला दाखवल्याचे मला आठवते. कला पाहून ते म्हणाले होते की, हा खूप मूर्खपणा आहे. मी खूप रडलो, काही महिन्यांनी माझे वडील म्हणाले, जर मी त्या दिवशी तुझी स्तुती केली असती तर आज तू कलाकार नसून वाजिद खान झाला असतास, वाजिद खान खिळे वाला असतो.

मी अनेक महान व्यक्तींची चित्रे दगडाच्या छोट्या तुकड्यांपासून बनवली आहेत. भ्रूणहत्येसाठी वापरल्या जाणाऱ्या वैद्यकीय उपकरणांपासून रडणाऱ्या चिमुरडीचे चित्र तयार केले आहे. मी वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये इतकं काम केलं आहे की, मला जगातली कोणतीही गोष्ट व्यर्थ वाटत नाही.

भ्रूणहत्येमध्ये वापरल्या जाणाऱ्या वैद्यकीय उपकरणांच्या साहाय्याने मी रडणाऱ्या मुलीचे हे चित्र बनवले आहे.
भ्रूणहत्येमध्ये वापरल्या जाणाऱ्या वैद्यकीय उपकरणांच्या साहाय्याने मी रडणाऱ्या मुलीचे हे चित्र बनवले आहे.
बंदुकीच्या गोळ्यांनी बनवलेले हे महात्मा गांधींचे चित्र आहे.
बंदुकीच्या गोळ्यांनी बनवलेले हे महात्मा गांधींचे चित्र आहे.

मी स्केचिंग किंवा मार्किंग करत नाही, मी थेट चित्र तयार करतो. चुकीच्या ठिकाणी एक खिळा मारला तर संपूर्ण चित्र बिघडते.

लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसह 37 जागतिक विक्रमांमध्ये माझे नाव नोंदवले गेले आहे. मी स्वित्झर्लंड, स्कॉटलंड, नेदरलँड, तुर्की, उझबेकिस्तान, कझाकस्तान, फ्रान्स अशा 40 हून अधिक देशांमध्ये व्याख्याने घेतली आहेत, कार्यशाळा आयोजित केल्या आहेत.

मी मेल्यानंतरही माझी कला जगावी असे मला वाटते. म्हणूनच आज एक वाजिद खान शंभर वाजिद खानांना जन्म देत आहे. मी गरीब मुलांची मोफत कार्यशाळा घेतो, तर ज्या संस्था मुलांकडून पैसे घेतात त्यांच्याकडून मी देखील पैसे घेतो. कार्यशाळेची फी एक लाख रुपये आहे.

देशाच्या राष्ट्रपती भवनात सायकलची साखळी आणि रद्दी पासून बनवलेल्या राष्ट्रपती भवनाचे चित्र आहे. मी सलमान खान, धीरूभाई अंबानी यांच्यासह शेकडो सेलिब्रिटींचे चित्र खिळ्यांनी काढले आहे. माझ्या कला वेगवेगळ्या देशांमध्ये पोहचल्या आहेत. एका कलेची किंमत अडीच कोटी रुपयांपर्यंत आहे. आता मी कायनेटिक आर्टवर काम करत आहे, जे कटोऱ्यांपासून बनवले जाते.

सायकल चेन आणि हातोड्याने बनवलेल्या राष्ट्रपती भवनाचे हे चित्र आहे.
सायकल चेन आणि हातोड्याने बनवलेल्या राष्ट्रपती भवनाचे हे चित्र आहे.

आज, मला महिन्याला डझनभर भेटवस्तू मिळतात, मला राहण्यासाठी मोफत हॉटेल मिळते. कपडे वगैरे सर्व प्रायोजित आहेत, पण कधी कधी फुटपाथवर, जुने कपडे विकत घेऊन ते परिधान करण्यात माझे आयुष्य गेले आहे. हॉटेलचे शिळे जेवण खाल्ले आहे. मला तो काळ वाईट वाटत नाही. कारण ज्यांना दोन्ही हात-पाय नाहीत, तेही इतिहास घडवतात, मग मी अजूनही निरोगी माणूस आहे.

मला पुढच्या पिढीसाठी एक पुस्तक लिहायचे आहे, जेणेकरून त्यांना कळेल की माझ्यात काय आहे, ज्याच्यामुळे मी इतक्या अडचणींना तोंड देत इथपर्यंत पोहोचलो.

आजही माझ्या गावातील लोक मला वेडे म्हणतात, पण मला माहित आहे की, वेडे लोकच इतिहास घडवतात.

या सर्व गोष्टी वाजिद खान यांनी दिव्य मराठी नेटवर्कचे रिपोर्टर नीरज झासोबत शेअर केल्या आहेत.

आणखी अशा बातम्या वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

कुत्र्याच्या तोंडातून भाकरी हिसकावून खाल्ली:बहिणीला निर्वासित छावणीत मरताना पाहिले, नंतर नक्षलवादी बनले; आता आमदार

पूर्व पाकिस्तानात (आताचा बांगलादेश) जन्मलो. अडीच वर्षांचा असताना कुटुंबासोबत भारतात परतावे लागले. त्यावेळी भारताला स्वतंत्र होऊन केवळ 6 वर्षे झाली होती. पश्चिम बंगालमधील बांकुडा येथील निर्वासित छावणीत अनेक वर्षे वास्तव्य केले. अन्नाची कमतरता इतकी की, कुत्र्याच्या तोंडातून भाकरी हिसकावून खाल्ली. गरिबीमुळे आई इतरांच्या घरी भांडी धुण्यासाठी जायची, वडील मजुरीचे काम करायचे आणि मी चहाच्या टपरीवर कपे, बशी धुण्याचे काम करायचो, पण तरीही पोट भरत नव्हते. 8 वर्षे जादवपूर रेल्वे स्थानकावर टॉवेल टाकून झोपलो, रिक्षा चालवून पोट भरले. वयाच्या 24 व्या वर्षापर्यंत कसे लिहायचे आणि वाचायचे हे माहित नव्हते. नक्षलवादी असल्याच्या गुन्ह्यात जवळपास दोन वर्षे तुरुंगात होतो, तेव्हा वाचन शिकलो, पुढे पुस्तकं वाचण्याच्या सवयीनं लेखक बनवले आणि मग जनतेने आमदार केले. मी मनोरंजन ब्यापारी, पश्चिम बंगालच्या बालागड विधानसभेचा आमदार आहे. पूर्ण बातमी वाचा...

अडीच वर्षांचा असताना आईचे निधन झाले:10 रुपयांसांठी गोल्फ किट उचलायचो; आता IAS-IPS ला प्रशिक्षण देतो

आईने मला कधी थापडून झोपवले नाही, मला तिची अंगाई देखील आठवत नाही. आई कशी दिसत होती माहीत नाही. मी अडीच वर्षांचा असताना आई वारली आणि माझी बहीण अडीच महिन्यांची होती, असे आजी सांगते. मध्य प्रदेशातील झोपडपट्टी भागात माझा जन्म झाला. त्या ठिकाणी तेव्हा वीजही नव्हती आणि आताही नाही, कारण ती बेकायदेशीर वसाहत आहे. तेथे सुमारे 50 कुटुंबे राहतात. पावसाळ्याच्या दिवसात घराबाहेर पडणाऱ्या पावसाचे प्रमाण कमी आणि घराच्या आत जास्त असते.

मी अमन सिंह राजपूत, गोल्फ प्रशिक्षक. कधी काळी गोल्फ क्लबमध्ये गोल्फ किट पोहोचवण्याचे काम करायचो. आज मी आयएएस-आयपीएस, डॉक्टर, इंजिनिअर, अधिकारी, राजकारणी यांना गोल्फ खेळायला शिकवतो. मी फक्त 22 वर्षांचा आहे. पूर्ण बातमी वाचा...

बातम्या आणखी आहेत...