आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Narayan Rane Vs Maharashtra CM Uddhav Thackeray; Cabinet Minister Arrest Procedure In India, Everything Else You Need

एक्सप्लेनर:राज्य सरकार कॅबिनेट मंत्र्यांना अटक करू शकते? खासदारांना अटक करताना काय आहेत नियम? येथे जाणून घ्या सर्वच...

लेखक : आबिद खान2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाराष्ट्र पोलिसांनी मंगळवारी अटक करण्यात आली होती. काही तासांच्या गोंधळानंतर त्यांना रात्री उशिरा जामीनही मिळाला. 23 ऑगस्ट रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'कानाखाली लगावण्याचे' विधान केले होते. यानंतर शिवसैनिकांनी संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार निदर्शने केली. राणे यांच्याविरोधात अनेक जिल्ह्यांमध्ये एफआयआरही नोंदवण्यात आला. नाशिकमधील भाजप कार्यालयावर दगडफेक करण्यात आली, मुंबईतील राणे यांच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांवर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

नारायण राणे यांना नुकतेच कॅबिनेट मंत्री बनवण्यात आले आणि त्यांच्याकडे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय आहे. यामुळे, प्रश्न उद्भावत आहे की एखाद्या राज्याचे पोलिस सामान्य लोकांप्रमाणे कॅबिनेट मंत्र्यांना कशी अटक करू शकतात? संसद सदस्यांना विशेषाधिकार नाहीत का?

दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये समजावून घेऊ, अशाच सर्व प्रश्नांची उत्तरे...

संसद सदस्यांना कसे आणि केव्हा-केव्हा अटक करता येईल?

जेव्हा संसदेचे अधिवेशन होत नाही, तेव्हा संसद सदस्यांना कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात अटक केली जाऊ शकते. मात्र, पोलिसांनी राज्यसभेच्या अध्यक्षांना अटकेचे कारण, नजरकैदेत असल्यास अटकेची जागा आणि जर त्याला तुरुंगात पाठवले असेल तर तुरुंग याविषयी माहिती द्यावी लागते. तथापि, नागरी बाबींमध्ये कोणत्याही संसद सदस्याला अटक करता येत नाही.​​​​​​​

मग खासदारांना विशेषाधिकार नाहीत का?
अगदी आहे, संसदेच्या सदस्यांना संविधानाअंतर्गत अनेक विशेषाधिकार आहेत. संसदेचे अधिवेशन सुरू असताना, कोणत्याही सदस्याला नागरी बाबींमध्ये अटक करता येत नाही. संसद अधिवेशन सुरू होण्यापूर्वी आणि ते संपल्यानंतर 40 दिवस आधी सदस्यांना हा विशेषाधिकार आहे. तसेच, हे गुन्हेगारी आणि अटकेच्या प्रकरणांमध्ये लागू होत नाही.

संसदेतून किंवा संसदेजवळून कुणाला अटक होऊ शकते का?
नाही, संसदेच्या हद्दीतून कोणत्याही खासदाराला अटक करता येत नाही. मात्र, लोकसभा अध्यक्ष किंवा राज्यसभा अध्यक्ष यांच्या परवानगीने अटक शक्य आहे. संसद अधिवेशनात असो किंवा नसो, ही अट दोन्ही प्रकरणांमध्ये लागू आहे. अटकेच्या वेळी, पोलिस किंवा कोणत्याही कायदेशीर एजन्सीला अटकेबाबत गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागेल.

यापूर्वी कधी-कधी असे घडले आहे?

यापूर्वी 2001 मध्ये तामिळनाडूमध्ये कॅबिनेट मंत्र्यांची अटक झाली होती. केंद्रीय मंत्री मुरासोली मारन आणि टीआर बाळू यांना त्यावेळी अटक करण्यात आली होती. मारन तेव्हा केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री होते आणि बाळू केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री होते.

प्रत्यक्षात, तामिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री एम करुणानिधी यांच्यावर उड्डाणपूल घोटाळ्यात अडकल्याचा आरोप होता. पोलिस करुणानिधींना अटक करण्यासाठी पोहोचले तेव्हा टीआर बाळू आणि मुरासोली मारनही तेथे होते. करुणानिधी यांच्या अटकेला त्यांनी विरोध केला. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. केंद्रीय मंत्र्यांना पदावर असताना अटक केल्याची भारताच्या इतिहासातील ही पहिलीच घटना होती.

नारायण राणे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल म्हणाले होते?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषण देत होते. भाषणादरम्यान उद्धव ठाकरे अमृत महोत्सव आणि हीरक महोत्सवाबाबत गोंधळलेले दिसले. त्यांनी मागे उभ्या असलेल्या व्यक्तीला विचारले की हीरक महोत्सव आहे की अमृत महोत्सव. मागच्या व्यक्तीने उत्तर दिले - अमृत महोत्सव. भारताने स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात प्रवेश केला आहे. भारत सरकार या निमित्ताने अमृत महोत्सव साजरा करत आहे.

आता येणाऱ्या सोमवारी 23 ऑगस्टला नारायण राणे महाराष्ट्रात जन आशीर्वाद यात्रा काढत होते. महाडमध्ये पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला की स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी दिलेल्या भाषणात उद्धव ठाकरे अमृत महोत्सव किंवा हीरक महोत्सवाबद्दल गोंधळलेले दिसले.

यावर प्रतिक्रिया देताना राणे म्हणाले की "त्या दिवशी ते मागे वळून विचारत होते की आपल्याला स्वतंत्र होऊन किती वर्षे झालेत... त्यांना असे कसे माहिती नाही. मी तिथे असतो तर तीथेच मी त्यांच्या कानाखाली लगावली असती ... देशाला स्वातंत्र्य मिळून किती काळ झाला हे त्यांना माहिती असावे.

राणेंच्या वक्तव्यावर भाजप काय म्हणाले?
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल नारायण राणे यांनी काहीही टिप्पणी केली असली तरी भारतीय जनता पक्ष त्यांच्या वक्तव्याचे समर्थन करत नाही. यानंतरही आम्ही वैयक्तिकरित्या त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि आमच्या सर्व शक्तीने पक्ष त्यांच्या पाठीशी उभा राहील."

भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा सोशल मीडियावर म्हणाले, "केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाराष्ट्र सरकारने अटक करणे हे घटनात्मक मूल्यांचे उल्लंघन आहे. अशा कृतीमुळे आम्ही ना घाबरणार आहोत आणि ना दडपणार आहोत. हे लोक जन-आशीर्वाद यात्रेला मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे नाराज आहेत. आम्ही लोकशाही पद्धतीने लढत राहू आणि यात्राही सुरूच राहील. "

बातम्या आणखी आहेत...