आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझ्या रेस्टॉरंटमधून सुरू झाली नेतन्याहूंची LOVE STORY:PM मोदींनाही आवडते चव, इस्रायलमध्ये सुरु केले ‘ईचकदाना’

लेखक: दीक्षा प्रियादर्शी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छंद म्हणून शिकलेल्या गोष्टीच्या जोरावर एवढा मोठा उद्योग उभा करू शकेन असं कधी वाटलं नव्हतं. हो, संघर्ष तर होताच, पण मला माझ्या स्वयंपाकाच्या कौशल्यावर आणि माझ्या देशाच्या चवीवर विश्वास होता की एक दिवस भारतीय चवीची इस्रायलच्या लोकांना नक्कीच सवय होईल.

हे शब्द आहेत सेलिब्रेटी शेफ रिना पुष्करना यांचे, ज्या इस्रायलमध्ये 'तंदूरी' नावाने रेस्टॉरंट चेन चालवतात. हे तेच रेस्टॉरंट आहे जिथले भारतीय जेवण इस्रायलचे माजी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना इतके आवडते की त्यांनी पत्नी सारासोबतच्या पहिल्या भेटीसाठी याचीच निवड केली. आजही आठवड्यातून एकदा नेतान्याहू इथून जेवणाची ऑर्डर नक्कीच मागवतात. रतन टाटांपासून ते नितीन गडकरींपर्यंत अनेक बड्या व्यक्तींनाही रिनांनी बनवलेले पदार्थ आवडतात. सेलिब्रेटी सेफ रिना पुष्करना यांची कहाणी त्यांच्याच शब्दात ऐका.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रायल दौऱ्यादरम्यान रिना यांच्या जेवणाचे खूप कौतुक केले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रायल दौऱ्यादरम्यान रिना यांच्या जेवणाचे खूप कौतुक केले होते.

कठीण काम आव्हान म्हणून स्वीकारायला पप्पांनी शिकवलं

माझा जन्म 1958 मध्ये दिल्लीतील धौलाकुआं आर्मी हॉस्पिटलमध्ये झाला. माझे वडील शीख आणि आई ज्यू होती. यामुळेच आम्हाला दोन्ही संस्कृतीची जाण होती. पप्पा मिलिट्रीत होते, त्यामुळे लहानपणापासूनच सगळं पद्धतशीरपणे शिस्तीत करायची सवय लागली. कोणतेही अवघड काम आव्हान म्हणून स्वीकारून ते पूर्ण करण्याची कला आम्ही माझ्या वडिलांकडून शिकलो. माझे संपूर्ण बालपण दक्षिण मुंबईत गेले. आम्ही तीन बहिणी आणि एक भाऊ. मी आणि माझी जुळी बहीण घरात सगळ्यांचे लाडके होतो. सर्वात लहान आणि जुळे असल्याने आई-वडील आमच्याकडे जास्त लक्ष द्यायचे.

लग्नानंतर जग फिरण्याची संधी मिळाली

मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन म्हणून कार्यरत असलेल्या विनोद पुष्करनांशी माझे लग्न झाले. ते माझ्या भावाचे मित्र होते, त्यामुळे त्यांचे घरात येणे-जाणे होते. माझ्या आई-वडिलांचे विनोदवर प्रेम होते म्हणून त्यांना वाटले की ते माझ्यासाठी परफेक्ट मॅच आहे.

माझे पती मर्चंट नेव्हीत होते, त्यामुळे मलाही जग फिरण्याची संधी मिळाली. यादरम्यान मोकळ्या वेळेत मी जहाजावर काम करणाऱ्या जगातील विविध देशांतील सर्वोत्तम शेफकडून स्वयंपाक करायला शिकले. मात्र, मी माझ्या सासूबाईंकडून स्वयंपाकाचे प्राथमिक प्रशिक्षण घेतले.

रिना त्यांच्या यशाचे संपूर्ण श्रेय आपले पती आणि मुलांना देतात.
रिना त्यांच्या यशाचे संपूर्ण श्रेय आपले पती आणि मुलांना देतात.

अज्ञात देशात स्थायिक होणे कठीण होते

मुलगा आणि मुलीच्या जन्मानंतर विनोद आणि मी एकाच ठिकाणी स्थायिक होण्याचा विचार केला. माझी आई इस्रायलची होती. तिचा तिथे कापडाचा व्यवसाय होता आणि आम्ही चार भावंडांपैकी एकाने तरी इस्रायलमध्ये राहावे अशी तिची नेहमी इच्छा होती. त्यामुळे आम्ही इस्रायलमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.

इस्रायलमध्ये राज कपूर यांना सर्वजण ओळखतात

मी आणि माझी जुळी बहीण माझ्या आईसोबत अनेकदा इस्रायलला आलो होतो, त्यामुळे तिथल्या राहणीमानाची मला कल्पना होती. असे असूनही, मला नवीन देशात जुळवून घेण्यास वेळ लागला. उत्तम इंग्रजी बोलूनही तिथल्या लोकांना आम्हाला समजायला वेळ लागत असे. मात्र, त्या काळात राज कपूर इस्रायलच्या लोकांमध्ये खूप प्रसिद्ध होते. राज कपूर यांचे नाव घेताना तिथले लोक एक गोष्ट सांगायचे की त्यांनी भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासाठी 'ईचकदना' हे गाणे गायले होते.

इस्रायलमध्ये व्हेज रेस्टॉरंट सुरू केले, नाव दिले 'ईचकदाना'

मी तेल अवीव्ह, इस्रायलमध्ये माझे पहिले व्हेज रेस्टॉरंट उघडण्याचे ठरवले आणि लोक त्याच्याशी जोडले जावेत म्हणून त्याचे नाव 'ईचकदाना' ठेवले. मात्र, शाकाहारी असल्याने त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. जवळपास वर्षभर संघर्ष केल्यानंतर मी तंदूरमध्ये बनवलेल्या मांसाहारी पाककृती बनवायला सुरुवात केली आणि रेस्टॉरंटचे नाव 'ईचकदाना' वरून बदलून 'तंदूरी' केले. हळूहळू देशी मसाल्यांनी बनवलेला चिकन टिक्का आणि मटण समोसा यांची चव झपाट्याने इस्रायलींच्या जिभेवर चढू लागली.

अशा प्रकारे रेस्टॉरंटची साखळी सुरू झाली

लोकांना आमचे पदार्थ इतके आवडले की काही वर्षांतच 'तंदूरी' ही रेस्टॉरंट चेन बनली. भारतातील मोठ्या हॉटेलमधील डझनभर शेफ दररोज सुमारे 2,000 लोकांसाठी अन्न शिजवतात. याशिवाय, मी आणि मुलांनी मिळून इस्रायल-लेबनॉन सीमेवर अन्न उत्पादनाचा कारखानाही विकत घेतला, जिथून 20 टक्के उत्पादने अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, इटली, बेल्जियम आणि कॅरिबियन बेटांवर निर्यात केली जातात.

नरेंद्र मोदींना जेवणाची चव आवडली

2018 मध्ये, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा इस्रायलला गेले होते, तेव्हा इस्रायलचे तत्कालीन पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी त्यांच्या मेजवानीच्या सर्व तयारीची जबाबदारी माझ्यावर आणि माझ्या टीमवर सोपवली होती. इस्रायलमध्ये आल्यानंतरही नरेंद्र मोदींना भारतीय खाद्यपदार्थांची चव चाखायला मिळाली तर ते त्यांच्यासाठी आश्चर्यचकित करण्यासारखे असेल, असे नेतान्याहू म्हणाले.

कदाचित माझ्या जेवणाची चव पीएम मोदींना इतकी आवडली असेल की त्यांनी मला त्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी भारतात बोलावले. सेलिब्रिटी शेफ असण्याव्यतिरिक्त, मी OFBJP (ओवरसीज फ्रेंड ऑफ BJP) इस्रायलची अध्यक्ष देखील आहे. तंदूरी फूड चेन इस्रायलप्रमाणे जगभर पसरवण्याचे माझे स्वप्न आहे.

बातम्या आणखी आहेत...