आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी अचानक लेह पोहोचले. त्यांचा हा दौरा येथे तैनात असलेल्या आयटीबीपी जवान आणि अधिकाऱ्यांसाठी हा दौरा अतिशय महत्वाचा आहे. लष्कर आणि हवाई दलासाठी सुद्धा हा दौरा खास मानला जात आहे.
ऑन स्पॉट असेसमेंटचा प्रभाव वेगळाच - रिटायर्ड लेफ्टनेंट जनरल सतीश दुआ
पंतप्रधान नरेंद्र मोदी लेह पोहोचल्याने केवळ लष्करच नव्हे, तर समस्त देशासाठी प्रेरणादायी आहे. एखादा नेता जेव्हा स्वतः फ्रंटलाइनवर जाउन पाहणी करतो तेव्हा तो परिस्थिताचे वैयक्तिकरित्या आकलन करत असतो. अन्यथा विविध टप्प्यांमध्ये माहिती विभाजित होऊन पोहोचत असते. यातून वेळ जातो आणि जी माहिती मिळते ती देखील विश्लेषण करून आणि अतिरिक्त माहितीचा समाविष्ट करून मिळत असते. त्यामुळे, स्वतः ऑन द स्पॉट जाउन आढावा करण्यात फरक आहे. यातून थेट प्रत्यक्ष परिस्थिती लक्षात येते.
रिटायर्ड लेफ्टनेंट जनरल सतीश दुआ लष्कराच्या काश्मीर येथील कमांडचे प्रमुख होते. त्यांच्या निरीक्षणातच लष्कराने सर्जिकल स्ट्राइक केले होते.
सैनिकांकडे जाऊन स्वतः ऐकून घेणे महत्वाचे ठरते. यातून बारकावे काळतात आणि त्वरीत निर्णय घेतला जाऊ शकतो. काय केल्यास चांगले होईल आणि कोणता निर्णय झाल्यास काय परिणाम होईल याची माहिती त्यांना मिळत असते. यात मंत्रालय किंवा फायलींचा अडथळा येत नाही आणि थेट निर्णय होऊ शकतो.
जेव्हा मी काश्मीरात कमांडर होतो तेव्हा उरी येथे हल्ला झाला होता. त्या दिवशी संरक्षण मंत्री (दिवंगत) मनोहर पर्रिकर काश्मीरला आले होते. ते उरीला जाऊ इच्छित होते. सॅनिटायजेशन आणि जागा सुरक्षित करण्याचे काम पूर्ण झाले नसल्याने त्यांना तेथे जाता आले नाही. तरीही पर्रिकरांच्या येण्याचा फायदा असा झाला की आम्हाला त्वरीत परवानगी मिळाली. आम्ही सर्जिकल स्ट्राकच्या प्लॅनवर 10 दिवसांत अॅक्शन घेऊ शकलो.
सरकार लष्करासोबत असून कमांडर निर्णय घेण्यास स्वतंत्र असल्याचा संदेश - रिटायर्ड एअर मार्शल अनिल चोप्रा
पीएम मोदींच्या दौऱ्यातून हे स्पष्ट होत आहे की प्रत्येक निर्णय आणि अॅक्शनमध्ये ते आणि देश सैनिकांसोबत आहेत. आर्मीचे कमांडर निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहेत असा संदेश देखील यातून मिळतो. जमीनी स्तरावर काहीही झाल्यास भारत सरकार आणि मोदी त्यांच्यासोबत आहेत. ऑनग्राउंड काय कारवाया केल्या जात आहेत आणि कमांडरकडून का आदेश येत आहेत याची कल्पना सैनिकांना नसते. अनेकदा कमांडर जे सांगत आहेत तेच सरकारलाही वाटते का याची देखील सैनिकांना माहिती नसते. मोदींच्या दौऱ्यातून त्या सर्व सैनिकांना कळेल की सरकार आणि मोदी त्यांच्या पाठीशी आहेत. सैनिकांनी देशासाठी जीव देणे आणि त्यांच्या आहुतीची दखल घेणे या दोन वेग-वेगळ्या गोष्टी आहेत.
त्यांना आत्मविश्वास असायला हवा की जेव्हा माझे पार्थिव येईल तेव्हा त्यावर गर्व केला जाईल. मोदींचा दौरा गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या जवानांना सन्मान देण्यासारखे आहे. यामुळेच आपण सैनिकांच्या अंत्यविधीला महत्व देत असतो. त्यातून जिवंत लोकांनाही कळते की ते आपल्यासाठी काय आहेत. मोदींचा हा निर्णय अतिशय समजुतदार निर्णय आहे. जॉर्ज फर्नांडिस (माजी संरक्षण मंत्री) सियाचीनला जात होते. ते सियाचीनला सर्वाधिक वेळा जाणारे नेते होते. फर्नांडिस यांनी 2 ते 3 महिन्यांत एकदा तरी सैनिकांसाठी फळ आणि केक घेऊन सियाचीन दौरा केला.
ब्युरोक्रॅट कधी फ्रंटलाइनवर जात नाहीत. केवळ फायली चघळत बसतात. पंतप्रधानांना जेव्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून माहिती मिळते तेव्हा ती माहिती अनेक प्रक्रियांमधून जाऊन बदलून येत असते. पीएम मोदी दोनदा दिवळी निमीत्त काश्मीर-लडाख सीमेवर गेले होते. यातून त्यांचा जमीनीशी संबंध दिसून येतो. नेता जेव्हा कमांडरला भेटतो तेव्हा त्याला बारकावे कळतात आणि यातून कारवाई केली जाऊ शकते.
हा सैनिकांसाठी धाडसाचा हायडोस - रिटायर्ड लेफ्टनेंट जनरल सय्यद अता हसनैन
मोदींचा सरप्राइज दौरा जबरदस्त आहे. त्यांनी हा निर्णय ज्या पद्धतीने घेततला तो राजकीय आणि सैनिकांसाठी गेम चेंजर ठरेल. नीमू हा लेहचा बाह्य परिसर आहे. येथे लष्कराचे मोठे गॅरिसन आहे. कोरोनानंतर मोदींचा दिल्लीबाहेरचा हा दुसरा दौरा आहे. यापूर्वी ते पश्चिम बंगालमध्ये चक्रीवादळाची पाहणी करण्यासाठी गेले होते. हा दौरा त्यांच्या व्यूहरचनात्मक संदेशाचा एक भाग आहे. मजबूत संदेश देण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. पंतप्रधान फ्रंटलाइनवर जातात तेव्हा हा दौरा सैनिकांसाठी धाडसाचा हायडोज ठरतो.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.