आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटक विधानसभा निवडणुकीची भाजपने तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक दावणगेरीला भेट देणार आहेत. तेथे ते पक्षाच्या विजय संकल्प यात्रेचा समारोप करतील. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते शनिवारी रोड शोही करू शकतात. यानंतर ते निवडणूक सभेला संबोधित करणार आहेत.
दोन महिन्यांतील त्यांचा हा सातवा कर्नाटक दौरा आहे. यापूर्वी 12 मार्च रोजी पीएम मोदी मांड्या आणि हुबळी-धारवाडला गेले होते. पंतप्रधानांनी आधी काँग्रेस-जेडीएसचा बालेकिल्ला असलेल्या मांड्यामधध्ये रोड शो केला आणि त्यानंतर जाहीर सभेला संबोधित केले.
मोदी मांड्यामध्ये म्हणाले- काँग्रेस माझी कबर खोदण्यात व्यस्त, मी एक्सप्रेस वे बनवण्यात व्यस्त
दोन आठवड्यांपूर्वी पंतप्रधान मोदींनी मांड्यामध्ये काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर जोरदार निशाणा साधला होता. ते म्हणाले की, 'काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष मोदींची कबर खोदण्याची स्वप्ने पाहत आहेत, पण मोदी एक्सप्रेस वे बांधण्यात मग्न आहेत. मोदी गरिबांचे जीवन सुसह्य करण्यात व्यस्त आहेत.
देशातील कोट्यवधी माता-भगिनींचे आशीर्वाद हेच मोदींचे सर्वात मोठे सुरक्षा कवच असल्याचे काँग्रेसला माहीत नाही, असेही ते म्हणाले. हुबळी धारवाडमध्येही पंतप्रधानांनी अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले.
कर्नाटकात भाजपची योजना 5B
कर्नाटक विधानसभा निवडणुकीबाबत भाजप प्लॅन 5बीच्या भूमिकेत असेल. त्याअंतर्गत कर्नाटकात 5 जिल्हे येतात. यामध्ये एकूण 72 जागा आहेत. या पाच जिल्ह्यांमध्ये बेंगळुरू, बेळगाव, बागलकोट, बिदर आणि बेल्लारी यांचा समावेश आहे. 2018 मध्ये या जिल्ह्यांतून केवळ 30 जागा जिंकल्या होत्या. मात्र यावेळी भाजपला येथे कोणतीही चूक करायची नसून त्यासाठी आतापासूनच रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
भाजपचे लक्ष दीडशेहून अधिक जागांवर
यावेळी राज्यात 150 हून अधिक जागा जिंकण्याच्या उद्देशाने भाजप निवडणूक रणनीती तयार करत आहे. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 104 जागा जिंकल्या, परंतु कर्नाटकमध्ये 224 विधानसभा जागांसह 113 च्या बहुमताच्या आकड्यापेक्षा नऊ कमी पडल्या. तर काँग्रेसला 78 आणि जेडीएसला 37 जागा मिळाल्या आहेत.
दुसरीकडे, माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बीएस येडियुरप्पा यांनीही कर्नाटकात भाजपला सत्तेत येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असा दावा केला. आम्ही किमान 130-140 जागा जिंकू, असे ते म्हणाले.
100 विधानसभा जागांवर लिंगायतांचा प्रभाव
कर्नाटकात लिंगायत समाज सुमारे 17% आहे. राज्यातील जवळपास निम्म्या लोकसंख्येवर लिंगायत समाजाचा प्रभाव आहे. अशा स्थितीत येडियुरप्पा यांच्याकडे दुर्लक्ष करणे भाजपला सोपे जाणार नाही. असे करणे म्हणजे या समाजाची मते गमावणे होय.
कर्नाटक निवडणुकीबाबत आणखी अशाच बातम्या वाचा...
मोदींनी येडियुरप्पांचा हात असाच पकडला नाही:80 वर्षांच्या येडिंची 500 मठांवर पकड, कर्नाटकात तेच BJP ची स्ट्रॅटेजी ठरवणार
27 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकात होते. हे निवडणुकीचे वर्ष आहे, म्हणून एक मोठी रॅली देखील आयोजित करण्यात आली होती. विशेष गोष्ट अशी आहे की या मेळाव्यात पंतप्रधानांनी स्टेजवर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई किंवा राज्याच्या अध्यक्षांचे नाव घेतले नाही. त्यांनी फक्त एका नेत्याचा उल्लेख केला आणि ते बीएस येडियुरप्पा. पंतप्रधान येडियुरप्पांसमोर दोनदा वाकले आणि त्यांना अभिवादन केले. जेव्हा शिवमोगा विमानतळाचे उद्घाटन करण्यासाठी गेले, तेव्हाही ते येडियुरप्पांसोबतच राहिले. पूर्ण बातमी वाचा...
विद्यमान आमदारांमध्ये जवळपास सर्वांना तिकिटे:कर्नाटकमध्ये भाजप जुन्या चेहऱ्यांना संधी देण्याचे धोरण अवलंबणार
कर्नाटकमध्ये सत्तारुढ भाजप आगामी विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदारांतील बहुतांश जणांना उमेदवार देणार आहे. पक्षाचे हे धोरण बहुतांश आमदारांचे तिकीट कापण्याच्या फॉर्म्युल्याविरुद्ध आहे. भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने या बाबतचे संकेत बंगळुरूतील आमदारांच्या एका बैठकीत दिले. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, राज्याच्या पक्ष संघटनेला जो फिडबॅक मिळाला आहे, त्या दृष्टीने संघटनेत बऱ्याच विरोधाभास आहे. पूर्ण बातमी वाचा..
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.