आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Dvm originals
 • Question Mark As NASA's Artemis Launch Is Suspended... SpaceX Reaches The Moon At 42 Times Less Cost

अंतराळ प्रवासात मस्क यांची मक्तेदारी:नासाचे आर्टेिमिस स्थगित झाल्याने प्रश्नचिन्ह… 42 पट कमी खर्चात SpaceX पोहोचणार चंद्रावर

एका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक

13 डिसेंबर 1972 रोजी, अमेरिकन अपोलो-17 मिशनचे सदस्य जीन सेरनान हे चंद्रावर पाऊल ठेवणारे अखेरचे मानव होते. मात्र, आता नासा पुन्हा एकदा मानवाला चंद्रावर उतरवण्याच्या तयारीत आहे. पण आर्टेिमिस मिशनचे पहिले प्रक्षेपण पुढे ढकलल्यानंतर या प्रकल्पाला विरोध वाढला आहे. नासाचे माजी प्रशासक जिम ब्राइडनस्टाइन यांनी देखील आर्टेमिस मिशनचे प्रक्षेपण वाहन स्पेस लाँच सिस्टम (SLS) च्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विशेष म्हणजे नासाचे प्रमुख असतानाही त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.

या प्रकल्पाला विरोधाचे सर्वात मोठे कारण म्हणजे या प्रकल्पाचा वाढता खर्च. 2025 पर्यंत या प्रकल्पासाठी 7 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे. एका वेळेच्या प्रक्षेपणाची किंमत सुमारे 32 हजार कोटी असेल. नासाला या प्रक्षेपण वाहनाद्वारे मानवाला प्रथम चंद्रावर आणि भविष्यात मंगळावर घेऊन जायचे आहे.

विरोधकांचा असा युक्तिवाद आहे की, एलन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सच्या स्टारशिप प्रकल्पाचे उद्दिष्ट हेच आहे आणि पुन्हा वापरता येण्याजोग्या रॉकेटमुळे त्याची प्रति-प्रक्षेपण किंमत SLS पेक्षा निम्म्यापेक्षा कमी असेल. स्पेस लाँच सारख्या प्रकरणांमध्ये खासगी क्षेत्रावर अवलंबून राहण्याचे विरोधक SLS आवश्यक मानतात. पण सत्य हे आहे की नासा स्वतः स्पेसएक्सचे फाल्कन हेवी प्रक्षेपण वाहन आर्टेमिस मिशनमध्ये वापरणार आहे.

हा वाद भारतासाठीही महत्त्वाचा आहे, कारण सध्या इस्रो मानवाला अवकाशात पाठवण्याच्या गगनयान मोहिमेवर काम करत आहे. त्याची पहिला चाचणी किंवा डेमो 2022 च्या अखेरीस शक्य आहे. सरकारने या मिशनवर 9 हजार कोटी खर्च अपेक्षीत धरला आहे, तर तज्ज्ञांच्या मते हा खर्च 10 हजार कोटींच्या वर असेल. अंतराळ प्रक्षेपणात खासगी क्षेत्राचा वाढता हस्तक्षेप आणि कमी होणारा खर्च यामुळे अवकाश संशोधनाचे चित्र कसे बदलू शकते हे समजून घ्या.

चंद्रावर परत पाठवण्याची मोहीम अमेरिकेने केली रद्द

 • अंतराळ प्रवासासाठी वापरण्यात येणारा नासाचा स्पेस शटल कार्यक्रम 2004 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी रद्द केला होता.
 • पुढच्याच वर्षी, नासाने Space Shuttle चा उत्तराधिकारी Constellation प्रकल्पाची घोषणा केली. या प्रकल्पाचा उद्देश मानवाला अंतराळात घेऊन जाणे आणि त्यांना परत आणणे हा होता.
 • 2010 पर्यंत Constellation प्रकल्पाचा खर्च इतका वाढला होता की, अध्यक्ष बराक ओबामा यांनी तो रद्द केला.

अमेरिकन संसदेच्या हस्तक्षेपाने प्रकल्प पुन्हा सुरू झाला

 • ज्या वेळी Constellation प्रकल्प रद्द करण्यात आला, त्या आधीच नासाने त्यासाठी अनेक कार्यादेश जारी केले होते.
 • प्रकल्प रद्द झाल्यामुळे हे कार्यादेशही रद्द होतील. अमेरिकेच्या अलाबामा राज्यात यामुळे रोजगाराचे संकट निर्माण होणार होते.
 • 2010 मध्ये Constellation च्या जागी स्पेस लाँच सिस्टीम (SLS) ची घोषिणा करण्यात आली. या माध्यमातून हे कार्यआदेश चालू ठेवण्यात आले.

गगनयान मोहिमेतही मस्क यांची मदत घेता येईल का?

 • अलीकडेच संसदेत एका प्रश्नाच्या उत्तरात केंद्र सरकारने गगनयान मोहिमेचा खर्च 9023 कोटी रुपये असल्याचे सांगितले आहे.
 • सरकारने असेही म्हटले आहे की, या मिशनची पहिली चाचणी 2022 च्या अखेरीस अपेक्षित आहे.
 • हा प्रकल्प 2007 मध्ये सुरू झाला आणि कोविडमुळे विलंब झाला ज्यात सातत्याने वाढ होत आहे.
 • शास्त्रज्ञांच्या एका गटाचे असे मत आहे की, आता खासगी क्षेत्राने अवकाश प्रक्षेपणासाठी ज्या प्रकारची स्पर्धात्मक बाजारपेठ निर्माण केली आहे, त्यात सरकारी अवकाश संस्थांनी शर्यतीत येऊ नये.
 • नासाचे माजी प्रमुख जिम ब्राइडनस्टाइन यांनीही अवकाश संशोधनावर अधिक भर द्यावा आणि जिथे अंतराळ प्रवासाची गरज असेल तिथे खासगी क्षेत्राची मदत घेतली जाऊ शकते, असे मत व्यक्त केले.
 • अंतराळ तंत्रज्ञानामध्ये खासगी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने नवीन अवकाश धोरणही लागू केले आहे. याअंतर्गत खासगी क्षेत्राला आर्थिक मदतीसोबतच इस्रोच्या तज्ज्ञांचीही मदत घेतली जात आहे.
 • 2010 च्या दशकात नासानेही असा पुढाकार घेतला होता. याचा परिणाम झाल्याने, स्पेसएक्स सारख्या कंपन्यांनी अंतराळ प्रक्षेपणात प्रभुत्व मिळवले.
बातम्या आणखी आहेत...