आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा16 नोव्हेंबरला कॅनेडी स्पेस सेंटरवरून लॉन्च झाल्याच्या 25 दिवसांनंतर 11 डिसेंबर रोजी ओरियन अवकाश यान म्हणजेच कॅप्सूल चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीवर परतण्यास सज्ज आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार रविवारी रात्री 11.09 वाजता ते मेक्सिकोच्या बाजा कॅलिफोर्नियात उतरेल. ओरियन अवकाश यान नासाच्या आर्टेमिस-1 मोहिमेचा भाग आहे. हा नासाच्या मानवी चांद्र मोहिमेचा पहिला टप्पा आहे.
तसे पाहिल्यास, एखाद्या अवकाश यानाच्या प्रक्षेपणानंतरचा सर्वात मोठा टप्पा हा तो परतण्याचा असतो. कारण आहे परततानाचा सर्वाधिक धोका. तथापि, यावेळी ओरियनमध्ये कोणताही अंतराळवीर नाही. त्याऐवजी 3 मानवी पुतळे यात आहेत. या पुतळ्यांत अनेक सेन्सर्स लावलेले आहेत. जे कंपन, झटके, रेडिएशनसह अनेक बाबींविषयीची आकडेवारी गोळा करतील. मात्र 2024 मध्ये मानव याच ओरियन अवकाश यानातून पृथ्वीवर परततील.
दिव्य मराठी एक्सप्लेनरमधून आम्ही टप्प्या-टप्प्याने सांगू की, ओरियन अवकाश यान चंद्रावरून पृथ्वीवर कसे परतेल? ते परतण्यातील सर्वात मोठा धोका काय असतो?
पृथ्वीच्या वातावरणात येण्यापूर्वी ओरियन अवकाश यान 3 भागात विभागले जाईल.
ओरियन अवकाश यान चंद्रावरून पृथ्वीवर येताना 3 भागात विभागले जाईल. हे असतील - लॉन्च अबॉर्ट सिस्टिम, क्रू मॉड्युल आणि सर्व्हिस मॉड्युल.
अवकाश यान चंद्राच्या कक्षेतून अंतराळात दाखल होईल. सर्वात आधी नाकासारखे दिसणारे लॉन्च अबॉर्ट सिस्टिम त्यापासून वेगळे होईल.
यानंतर ओरियन पृथ्वीच्या कक्षेजवळ पोहोचेल. तेव्हा क्रू मॉड्युलपासून सर्व्हिस मॉड्युल वेगळे वेगळे होईल. सर्व्हिस मॉड्युल हेच अवकाश यानाचे मुख्य इंजिन असते.
ताशी 40 हजार किमी वेगाने पृथ्वीकडे येईल
ओरियन क्रू मॉड्युल पृथ्वीच्या वातावरणाच्या दिशेने येईल तेव्हा त्याचा वेग ताशी 40 हजार किमी इतका असेल. म्हणजेच ध्वनीच्या वेगापेक्षा 32 पट जास्त.
पृथ्वीच्या वातावरणात तापमान 2760 अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल
आता ओरियन क्रू मॉड्युल पृथ्वीच्या वातावरणात येईल. इथे घर्षणामुळे क्रू मॉड्युलची गती कमी होईल, मात्र तापमान वाढून 2760 अंश सेल्सिअस होईल. इतक्या तापमानावर लोखंड वितळायला लागते. क्रू मॉड्युलला एक हीट शील्ड लावलेली असते. ती या तापमानापासून त्याचे संरक्षण करेल. नासाच्या संशोधकांना याचीच जास्त चिंता आहे की, ओरियन पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करेल तेव्हा याचे हीट शील्ड हे तापमान सहन करू शकेल की नाही.
ताशी 483 किमी वेग असेल तेव्हा 3 पॅराशूट उघडतील
पृथ्वीच्या वातावरणात येताच क्रू मॉड्युलचा वेग कमी होऊन ताशी 483 किमी इतका होईल. पृथ्वीपासून 8 किलोमीटर उंचीवर याला लावलेले 3 पॅराशूट उघडतील. जेणेकरून समुद्रात सहजतेने लँडिंग शक्य होईल.
ताशी 32 किमीच्या वेगाने महासागरात पडेल
पॅराशूट उघडल्याने क्रू मॉड्युलचा वेग आणखी कमी होईल. अखेरीस ताशी 32 किमीच्या वेगाने क्रू मॉड्युल मेक्सिकोच्या बाजा कॅलिफोर्नियात प्रशांत महासागरात पडेल. अवकाश यान पृथ्वीवर परत आणण्याच्या तंत्रज्ञानालाच स्प्लॅश डाऊन म्हटले जाते.
तिथे आधीपासूनच अमेरिकेचे ट्रान्सपोर्ट डॉक युएसएस पोर्टलँड ते वेल डेकवर आणतील. यानंतर ते सॅन दिएगोतील नौदल तळावर नेले जाईल.
आता आर्टेमिस मिशनविषयी जाणून घ्या
आर्टेमिस-1 मिशन एक टेस्ट फ्लाईट आहे. यात कोणत्याही अंतराळवीराला पाठवले जाणार नाही. चंद्रावर अंतराळवीरांसाठी योग्य परिस्थितीविषयी खात्री पटवणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. या मोहिमेनुसार एसएलएस मेगा रॉकेटच्या माध्यमातून ओरियन क्रू कॅप्सूल चंद्राचा खूप जवळ जाईल. मात्र तिथे उतरणार नाही.
सामान्यपणे क्रू कॅप्सूलमध्ये अंतराळवीर असतात. मात्र यावेळी ते रिकामे आहे. ही मोहीम 25 दिवस 11 तास आणि 36 मिनिटांची आहे. यानंतर ते पृथ्वीवर परत आणले जाईल. अवकाश यान एकूण 20 लाख 92 हजार 147 किमीचा प्रवास करेल.
आर्टेमिस मोहिमेच्या माध्यमातून अमेरिका 53 वर्षांनंतर मानवाला चंद्रावर पाठवण्याची तयारी करत आहे. हे तीन टप्प्यात विभागले आहे. आर्टेमिस-1, 2 आणि 3. आर्टेमिस-1 चे रॉकेट चंद्राच्या कक्षेपर्यंत जाईल. त्यानंतर काही लहान अंतराळयान तिथे सोडेल आणि नंतर स्वतः कक्षेत स्थिर होईल.
2024 च्या आसपास आर्टेमिस-2 प्रक्षेपणाची तयारी आहे. यात काही अंतराळवीरही जातील. मात्र ते चंद्रावर उतरणार नाही. ते केवळ चंद्राच्या कक्षेभोवती फिरून परत येतील. ही मोहीम जास्त कालावधीची असेल.
यानंतर शेवटची मोहीम आर्टेमिस-3 रवाना केली जाईल. यात जाणारे अंतराळवीर चंद्रावर उतरतील. ही मोहीम 2025 किंवा 2026 पर्यंत प्रक्षेपित केली जाऊ शकते. पहिल्यांदाच महिलाही मानवी चांद्र मोहिमेचा भाग असतील. यात पर्सन ऑफ कलर म्हणजेच श्वेत वर्णीयांशिवाय दुसऱ्या वर्णाचाही क्रू सदस्य असेल. अंतराळवीर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पाणी आणि बर्फावर संशोधन करतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.