आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंटरव्ह्यू:माझ्या आयुष्यात भारतीय संगोपनाची मोठी भूमिका; एक उपलब्धी म्हणजे यश नव्हे, अपयशाने खचू नका : स्वाती

वॉशिंग्टन / रोहित शर्मा13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नासाच्या पर्सिव्हरन्स रोव्हरच्या मंगळावर लँडिंगमध्ये भारतवंशीय स्वाती मोहन यांचे मोलाचे योगदान

अमेरिकी अंतराळ संस्था नासाचे अत्याधुनिक रोव्हर पर्सिव्हरन्स गुरुवारी रात्री मंगळ ग्रहावर यशस्वीपणे उतरले. या यशाने भारताचीही मान उंचावली आहे. ‘टचडाऊन कन्फर्म्ड!’ म्हणत रोव्हरच्या यशस्वी लँडिंगची सूचना देणाऱ्या फ्लाइट कंट्रोलर स्वाती मोहन भारतवंशीय आहेत. कपाळावर टिकलीसह पर्सिव्हरन्सच्या प्रत्येक टप्प्याची घोषणा करणाऱ्या स्वाती नासात गायडन्स, नेव्हिगेशन व कंट्रोल्स ऑपरेशनच्या प्रमुख आहेत. स्वाती एक वर्षाच्या असताना त्यांचे कुटुंब अमेरिकेत गेले होते. दैनिक भास्करसोबत त्यांची एक्सक्लुझिव्ह चर्चा...

रोव्हरच्या लँडिंगवेळी मनात काय सुरू होते?
मी इतकी एकाग्रचित्त होऊन काम करत होते की, आजूबाजूला काय होतंय याकडे लक्षही नव्हते. मी माझे काम करण्यात इतकी तल्लीन झाले की उभे राहून जल्लोष करायलाही उशिरा उठले.

मिशन फेल होण्याची भीती होती?
हो. पर्सिव्हरन्सची लँडिंग यशस्वी करण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली होती. प्रचंड नियोजन केले. त्यात अनपेक्षितपणे उद्भवणाऱ्या परिस्थितीचा अंदाजही बांधलेला होता. मी त्या सर्व योजनांच्या शीट्स (याद्या) तयार केल्या होत्या. माझ्या मॉनिटरखालीच फ्लोचार्ट ठेवले होते. लँडिंग अचूक झाली नाही तर काय करायचे व काय सांगायचे याची माहिती त्यात होती. आम्ही अनेकदा अशी परिस्थिती अनुभवलेली आहे. लँडिंग होताच मी सर्व भीती कचऱ्याच्या डब्यात फेकून दिली!

लँडिंगच्या आदल्या रात्री झोप आली होती का?
मी झोपी जाण्याचा प्रयत्न केला, पण पहाटे ४.३० ला जाग आली. लँडिंगच्या कामामुळे गेल्या दोन आठवड्यांपासून पहाटे उठण्याची तयारी करत होते. गुरुवारी रात्री आम्ही सेलिब्रेशन केले. मला जगभरातून फोन आले.

पालणपोषण, यशात भारताची नाळ आहे?
मी पेनिसिल्व्हेनियात राहत होते. नंतर वाॅशिंग्टन डीसीला आले. भारतीय पद्धतीच्या संगोपनाची माझ्या आयुष्यात मोठी भूमिका आहे. माझ्या कुटुंबात भारतीय मूल्यांचा वारसा आहे. यात सर्वात महत्त्वाचे शिक्षण आहे.

सक्सेस स्टाेरीतून मुलांना काय शिकता येईल?
आपले पॅशन पूर्ण करा व जिद्द सोडू नका. एखादी उपलब्धी वा अनुभव तुम्हा यशस्वी किंवा अपयशी बनवत नाही. यश असो की अपयश, त्यातून तुम्ही काय शिकलात आणि तो अनुभव आपण स्वीकारतो, यावर सर्व अवलंबून असते. हे अनुभव पुढील मार्गक्रमणासाठी अत्यंत मोलाचे ठरतात.

बातम्या आणखी आहेत...