आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • 140 Years Ago, The World Got The Formula For Cancer Surgery, World War I Came Up With The Idea Of Chemotherapy

राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस:140 वर्षांपूर्वी जगाला मिळाला कर्करोगावरील शस्त्रक्रियेचा फॉर्मुला, विश्व युद्धामुळे सुचली केमोथेरपी

संचित श्रीवास्तव21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्करोग….म्हणजे एक प्राणघातक आजार. कॅन्सरच नाही तर कॅन्सरचा उपचारही वेदनादायी असतो. जगभरात दरवर्षी सुमारे 1 कोटी लोक कर्करोगामुळे आपला जीव गमावतात. 2019 मध्ये एक कोटी लोकांचा कर्करोगाने मृत्यू झाला. येथे सर्वात धक्कादायक बाब म्हणजे 2010 च्या तुलनेत 21 टक्के जास्त मृत्यू कर्करोगामुळे झाले. मात्र, आता कॅन्सरबाबतचे चित्र हळूहळू बदलत आहे. आता कॅन्सरवर उपचार शक्य आहे.... मात्र, कॅन्सरला वेळेवर ओळखले गेले तरच.

गेल्या अनेक वर्षात वैद्यकीय क्षेत्राने अशा अनेक कामगिरी केल्या आहेत, ज्यामुळे कर्करोगावर विजय मिळवणे शक्य झाले आहे. आज राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस आहे. आज जाणून घ्या कॅन्सरशी निगडीत मिळालेले यश, ज्यांनी कॅन्सरविरुद्धच्या लढाईत रुग्णांना आयुष्याची भेट दिली.

1882: ज्या वर्षी जगाला स्तनाच्या कर्करोगावरील शस्त्रक्रिया फॉर्म्युला मिळाला

स्तनाचा कर्करोग हा सर्वात प्राणघातक आहे. 1882 मध्ये, विल्यम हॉलस्टेडने स्तनाच्या कर्करोगावर एक इलाज शोधून काढला, त्याने रॅडिकल मास्टेक्टॉमी नावाच्या शस्त्रक्रियेचा शोध लावला, स्तनाचा कर्करोग दूर करण्यासाठी या शस्त्रक्रियेच्या मदतीने सर्व स्तनाच्या ऊती काढून टाकण्याची कल्पना या शोधातून जगाला सुचली. मास्टेक्टॉमी शस्त्रक्रियेच्या मदतीने महिलांमध्ये कर्करोगाचा धोका 95 टक्क्यांनी कमी झाला आहे.

1899: एक्स-रे शोधाच्या मदतीने कर्करोगाच्या रुग्णांवर रेडिएशन थेरपी

विल्हेल्म रोटझेन यांनी 1895 मध्ये क्ष-किरणांचा शोध लावला, त्यानंतर केवळ 4 वर्षांनंतर, क्ष-किरणांचा वापर करून कर्करोगाचा नवीन उपचार सापडला. स्वीडिश डॉक्टर टोर स्टीनबेक आणि टेज स्जोग्रेन यांनी रेडिएशन थेरपी आणि त्वचेचा कर्करोग यांच्यातील संबंध शोधून काढला, जो नंतर एक प्रमुख कर्करोग उपचार बनला. रेडिएशन थेरपीच्या मदतीने आज सुमारे 35 लाख रूग्णांचा कर्करोग बरा झाला आहे आणि त्याच्या यशाचा दर 90 टक्क्यांहून अधिक आहे.

1941: प्रोस्टेट कर्करोगाच्या रुग्णांसाठी हार्मोन थेरपी

1941 मध्ये चार्ल्स हगिन्स यांनी हार्मोन्स आणि कर्करोग यांच्यातील संबंध शोधून काढले. त्यांनी शोधले की, टेस्टोस्टेरोनलच्या लेव्हला कमी करुन किंवा एस्ट्रोजेन उत्पादन करुन प्रोस्टेट कँसरचा सामना केला जाऊ शकतो. या या पद्धतीला हार्मोनल थेरपी असे नाव देण्यात आले. 85 ते 90 टक्के अ‍ॅडव्हान्स स्टेज प्रोस्टेट कॅन्सरच्या रुग्णांमध्ये या थेरपीमुळे ट्यूमर शरीरात पसरत नाही, ज्यामुळे रुग्णाचे आयुर्मान वाढते.

1950: 'सिगारेट ओढणे आरोग्यासाठी हानिकारक '

अर्न्स्ट वाइंडर, एव्हर्ट्स ग्रॅहम आणि रिचर्ड डॉल या तीन शास्त्रज्ञांनी 1950 मध्ये सिगारेटचा वापर आणि फुफ्फुसाचा कर्करोग यांच्यातील संबंध शोधला. सिगारेटच्या धुरात असलेल्या रसायनांमुळे कर्करोग होऊ शकतो हे अनेक प्रयोगांनी पुष्टी केली आहे. आज, सुमारे 80 टक्के फुफ्फुसाचा कर्करोग धूम्रपानामुळे होतो.

1958: केमोथेरपीची कल्पना महायुद्धाच्या शस्त्रातून आली

दुसऱ्या महायुद्धादरम्यान, अमेरिकन शास्त्रज्ञांनी शोधून काढले की नायट्रोजन मस्‍टर्ड लिम्फोमावर प्रभावी ठरू शकते. ते युद्धात वापरले गेले, नंतर त्याची चाचणी घेण्यासाठी क्लिनिकल चाचणी सुरू झाली. लास्ट-स्टेज लिम्फोसारकोमा (एक प्रकारचा जीवघेणा कर्करोग) असलेल्या 48 वर्षीय पुरुषाला या मिश्रणाचे 10 डोस दिले गेले, जे प्रमाणापेक्षा 2.5 पट, कारण कोणाला किती द्यावे हे माहित नव्हते. दोन दिवसांत, डॉक्टरांच्या लक्षात आले की त्या व्यक्तीच्या शरीरातील गाठी लहान झाल्या आहेत आणि उपचाराअंती त्या अदृश्य झाल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारे केमोथेरपी सुरू झाली. तथापि, केमोथेरपी उपचार अधिकृतपणे 1958 च्या सुमारास सुरू झाले. आज जगभरातील लाखो लोक केमोथेरपीच्या मदतीने कर्करोगापासून मुक्त होतात.

1997: शरीराच्या रोगप्रतिकारक प्रणालीतूनच कर्करोग उपचार सापडला

1997 मध्ये, इम्युनोथेरपी प्रथम कर्करोगाच्या उपचारांसाठी प्रमाणित करण्यात आली. त्याच वर्षी, लिम्फोमा कर्करोगाच्या उपचारांसाठी इम्युनोथेरपी अंतर्गत पहिले मोनोक्लोनल अँटीबॉडी मंजूर करण्यात आले. तथापि, प्रथम 1891 मध्ये, विल्यम बी. कोलीने यांनी इम्युनोथेरपी शोधून काढली आणि जगाला दाखवून दिले की शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीच्या मदतीने कर्करोगाचा उपचार कसा केला जाऊ शकतो. इम्युनोथेरपीच्या मदतीने, कर्करोगाच्या सुमारे 15 टक्के रुग्णांचे आयुष्य 5 वर्षांनी वाढवता येते.

2009: गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविरूद्ध लस

2009 मध्ये, अन्न आणि औषध प्रशासनाने गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या उपचारासाठी सर्वारिक्स नावाची लस मंजूर केली. ही एक लस आहे जी शरीराला HPV प्रकारच्या संसर्गापासून संरक्षण करते. HPV मुळे जगभरात 70 टक्के गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होतो.

2010 - प्रोस्टेट कर्करोगाच्या उपचारासाठी पहिली प्रमाणित लस

2010 मध्ये FDA ने प्रोस्टेट कर्करोगाच्या उपचारासाठी आजपर्यंतची पहिली आणि एकमेव लस सिपुलेसेल-टी Sipuleucel-T मंजूर केली. ही लस मानवी रोगप्रतिकारक प्रणालीच्या पेशींपासून तयार केली होती. ज्या लोकांमध्ये हार्मोनल थेरपी प्रभावी नव्हती अशा लोकांमध्ये या लसीचा वापर प्रभावी होता.

बातम्या आणखी आहेत...