आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Native Cow Halves, Hybrid Double; In The Last 5 Livestock Census, The Number Of Domestic Cattle Has Decreased From 1,56 Crore To 93,85 Lakh

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी एक्स्पोज- भाग 2:देशी गाई निम्म्यावर, संकरित दुप्पट; गेल्या 5 पशुगणनांत देशी गाय-बैलांची संख्या 1.56 कोटींवरून 93.85 लाखांवर

महेश जोशी, फेरोज सय्यद | औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • संकरित गाईंची संख्या 18.79 लाखांवरून 43.53 लाखांवर; देशी बैलांच्या प्रमाणात 29% घट

कठोर कायदे असतानाही गेल्या पाच पशुगणनांत देशी गाईंची संख्या घटत असताना संकरित गाई मात्र दुपटीने वाढल्या आहेत. विशेष म्हणजे २०१५ च्या गोवंश हत्याबंदी कायद्यानंतर देशी बैल २९ टक्के, तर संकरित ५७ टक्क्यांनी घटले आहेत. अधिक फायदा देणाऱ्या संकरित गाई जगवायच्या आणि कमी फायद्याच्या देशी मारून टाकायच्या, असा प्रकार राज्याच्या पशुसंवर्धन खात्याच्या आकडेवारीच्या विश्लेषणातून समोर आले आहे.

मुंबईतील अभ्यासक, संशोधक प्रा. डॉ. अब्दुल समद यांनी देशभरातील ७० वर्षांच्या गोवंश हत्याबंदीचा स्वतंत्र अभ्यास केला आहे. त्यांच्या अहवालानुसार गेल्या ५ पशू गणनेत देशी गाय-बैलांची संख्या १.५६ कोटींपासून ९३.८५ लाख झाली आहे. म्हणजेच २२ वर्षांत देशी जनावरांंची संख्या ४० टक्क्यांनी घटली. या काळात देेशी गाई ६८.३३ लाखांहून ४६.१४ लाख, तर देशी बैल ८७.८३ लाखांहून ४७.७१ लाखांवर आले. या २२ वर्षांत संकरित बैलांची संख्याही घटून ५.७८ लाखांहून १.८८ लाख झाली. संकरित गाई मात्र १८.७९ लाखांवरून वाढत ४३.५३ लाख झाल्या. २०१५ ला बंदी कायदा लागू झाल्यावरही देशी गाय, बैल आणि संकरित बैल घटले हे विशेष. संकरित बैलांची संख्या तर ५७ टक्क्यांनी घटली.

प्रत्येक राज्यात वेगळे वय

गाईचे सरासरी वय २० वर्षे, तर दूध देण्याचे वय १० वर्षे आहे. त्याचा विचार करून गाय-बैलाच्या कत्तलीची परवानगी द्यायला हवी. पण, प्रत्येक राज्यात यासाठी वेगवेगळे वय आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेशात २०१५ पूर्वी १६ वर्षांवरील गोवंशाच्या कत्तलीला परवानगी होती. आता यावर पूर्णत: बंदी आहे. कर्नाटकात १२ वर्षांवरील, तर बिहारमध्ये २५ वर्षांवरील गोवंशाची कत्तल कायदेशीर आहे, असे डाॅ. समद यांनी सांगितले.

अर्थकारण येते तिथे भावना फिक्या

२०१२-२०१९ दरम्यान बंदी असतानाही देशी बैल २९.६ %, गाई ८.७ %, तर संकरित बैल ५७.७% घटले. जवळपास ४२ लाख बैलांची कत्तल झाली. याचाच अर्थ बंदी असली तरी उत्पादकता संपताच शेतकरी पशुधन विकून टाकतात. जेथे पैसा, अर्थकारण येते तिथे भावना फिक्या पडतात. ही विक्री कायद्याच्या चौकटीत झाली तर शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळू शकेल. -प्रा. डॉ. अब्दुल समद, अभ्यासक, मुंबई

देशी बैल अधिक, संकरित कमी

देशी बैलाला शेतात मागणी असते. राज्यात देशी बैलांची संख्या गाईंपेक्षा जास्त आहे. १९९७ मध्ये देशी बैल व गाईंचे प्रमाण १२९:१०० व २०१९ मध्ये १०३:१०० आहे. पशुसंवर्धन खात्याने संकरीकरणाची मोहीम राबविल्याने देशी गोवंश वेगाने घटून संकरित गोवंश वाढले आहे. संकरित बैलाला खांदा नसतो, त्यास जास्त उष्णता सोसत नसल्याने शेतात कामासाठी उपयोगी ठरत नाही. देशीच्या तुलनेत संकरित गाय अधिक दूध देते. म्हणून संकरित बैलाला मागणी कमी, तर गाईला अधिक असते. १९९७ मध्ये संकरित बैल व गाईचे प्रमाण ३१:१००, तर २०१९ मध्ये ४:१०० आहे.