आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवरात्र विशेष:शक्तिपीठ कांची कामाक्षी मंदिरात यंदा सर्व अनुष्ठाने होणार, डिस्टन्सिंगने दर्शनाचीही सुविधा, पूजा साहित्याचा बाजार तेजीत, विक्री 40 टक्क्यांवर!

रामकुमार । चेन्नई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्वाधिक 18 शक्तिपीठे असलेल्या तामिळनाडूतून ग्राउंड रिपोर्ट
  • राज्यभरात उत्सवी वातावरण, नातेवाइकांनाही निमंत्रण देणार

तामिळनाडू नवरात्रोत्सवासाठी सज्ज झाले आहे. ५१ प्रमुख शक्तिपीठांपैकी १८ शक्तिपीठे असलेल्या राज्यात जल्लाेष नऊ रात्री १० दिवस चालताे. येथील सर्वात माेठा उत्सव शक्तिपीठ कांची कामाक्षी अम्मन मंदिर व कन्याकुमारी येथील भगवती शक्तिपीठ येथे साजरा हाेतो. नवरात्रीची तयारी सुरू झालेल्या कामाक्षी अम्मन मंदिराचे मुख्य पुजारी गाेपी अय्यर म्हणाले, नऊ दिवस कामाक्षी मातेचा विविध प्रकारे शृंगार हाेईल. दरराेज पाचवेळा विशेष पूजा हाेईल. पहिल्या तीन दिवशी दुर्गा पूजा हाेते. त्यातून लाेकांच्या मनात वीरता तसेच धाडस निर्माण हाेते. त्यानंतरचे तीन दिवस जीवनात समृद्धीसाठी लक्ष्मीची पूजा केली जाते. शेवटच्या तीन दिवसांत सरस्वती उपासना केली जाते. याद्वारे आपल्यात नवनवीन शिकण्याची क्षमता निर्माण व्हावी, असा संकल्प केला जाताे. विजयादशमीच्या दिवशी उत्सवाचा समाराेप हाेताे. या दिवशीपासून लाेक आपली नवी प्रतिष्ठाने व कामास सुरुवात करतात. नवरात्रीत या शक्तिपीठांच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखाे भाविक येतात. मंदिर समितीचे सदस्य शंकर आनंद म्हणाले, काेविड-१९ चा धाेका लक्षात घेऊन यंदा उत्सवाला लहान स्तरावर साजरे केले जाईल. परंतु, सर्व विधिवत हाेईल. अनुष्ठाने पूर्ण केली जातील. पुजाऱ्यांनी परंपरागत पंथकाल वैभव (मंदिराच्या चारही काेपऱ्यांवर पवित्र खांब स्थापित करण्याची परंपरा) स्थापन केले जातात. फिजिकल डिस्टन्सिंगसह लाेकांना दर्शन करता येईल. मात्र, यंदा नवरात्रोत्सवाचे आकर्षण असलेले भरतनाट्यम नृत्य उत्सव रद्द झाला आहे. दुसरीकडे सर्वत्र घरांची सजावट सुरू झाली आहे. नवरात्रीची सुरुवात गणेश पूजेने हाेते. घरातील थाेरला सदस्य कलश स्थापनेची परंपरा निभावताे. येथे बहुतांश कुटुंबे घराबाहेर जिन्यावर बाहुल्या ठेवतात. ही गाेष्ट येथील सर्वात माेठे आकर्षण मानले जाते. हा जिना ३,५,७,९ व ११ असा क्रमबद्ध असताे. त्यासाठी लाकडापासून विशेष फाेल्डिंगचा िजना असताे. त्याला गाेलू पडी असे संबाेधले जाते. अाध्यात्मिक उन्नतीसाठी बाहुल्यांना शिडीवर ठेवण्याची परंपरा आहे. लाेक सामाजिक संदेश देतानाच पर्यावरण, अंतराळाच्या संकल्पनेवरही बाहुल्यांना सजवतात. मित्र-परिवार परस्परांच्या घरी जातात. घरातच बनलेल्या मिठाईचा आस्वाद घेतला जाताे. चेन्नईत राहणाऱ्या ५९ वर्षीय सुब्बालक्ष्मी म्हणाल्या, यंदा नवरात्रोत्सवात काहीही बदल झालेला नाही. काेराेनाबाबत आम्ही सतर्क आहाेत. पण, आम्ही परिचित व नातेवाइकांना निमंत्रित केले आहे. सुरक्षेसह मातेची पूजा चांगल्या प्रकारे हाेईल, असा मला विश्वास आहे.

बाजार गेल्यावर्षीसारखा सजला, सुरक्षेची सर्व दक्षता

नवरात्रोत्सवाला बाहुली महाेत्सवासारखे साजरे केले जाते. येथे विविध रंग-आकारातील बाहुल्यांची दुकाने सजली आहेत. मदुराईत बाहुल्यांचे विक्रेता ५४ वर्षीय मुरुगंधम म्हणाले, यंदा काेराेनामुळे कमी साठा ठेवला आहे. परंतु, लाेकांमध्ये उत्साह दिसताे. ४० टक्के माल विकला आहे. दुकानदाराशी माेलभाव करणाऱ्या ४५ वर्षीय कृष्णावेनी म्हणाल्या, मला तर गेल्या वर्षीसारखाच उत्साह वाटताे. फरक एवढाच की यंदा लाेक मास्क घालून आहेत. त्याचबराेबर डिस्टन्सिंग पाळत आहेत. नवरात्री वाईटावरील चांगल्याचा विजयाचे पर्व आहे. अशाच प्रकारे आम्ही काेराेनावरही विजय प्राप्त करू.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser