आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॅक्सचे काय आहेत नियम:ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर मिळालेल्या बक्षिसांवर नीरज चोप्राला द्यावा लागेल 30% कर, जाणून घ्या बक्षिसांसंबधित कराविषयीचे काय आहेत नियम

4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ आणि आशियाई खेळामध्ये पदक विजेत्या भारतीय खेळाडूंना सरकारमार्फत दिल्या गेलेल्या रोख रक्कम किंवा त्या स्वरूपात दिल्या गेलेल्या बक्षिसांवर इन्कम टॅक्स भरण्याची आवश्यकता नसते.

ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्रावर बक्षिसांचा वर्षाव होत आहे. कुणी त्याला रोख रक्कम भेट देत आहेत तर कुणी त्याला कार भेटवस्तू म्हणून देत आहेत. अशा स्थितीत बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न आला असेल की, खेळाडूंना मिळालेल्या बक्षिसांवर त्यांना कर भरावा लागेल का? चला तर मग जाणून घेऊया, खेळाडूंना मिळालेल्या बक्षिसांवर त्यांना किती कर भरावा लागेल.

केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळालेली बक्षीसे करमुक्त असतात

 • चार्टर्ड अकाउंटंट आनंद जैन सांगतात की, आयकर कायद्याच्या कलम 10 (17A) अंतर्गत, जर केंद्र आणि राज्य सरकार विजेत्या खेळाडूला कोणत्याही प्रकारचे बक्षीस देत असेल तर ते पूर्णपणे करमुक्त असेल. 2014 मध्ये सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने ऑलिम्पिक गेम्स, कॉमन वेल्थ गेम्स आणि एशियन गेम्समध्ये पदक विजेत्यांना केंद्र किंवा राज्य सरकारकडून बक्षीस म्हणून देण्यात येणारी रोख रक्कम किंवा त्या स्वरुपात दिल्या गेलेल्या इतर वस्तू करमुक्त करण्याचा आदेश पारित केला होता.

इतर बक्षिसांवर मात्र कर भरावा लागेल

 • आनंद जैन म्हणतात की, केवळ केंद्र किंवा राज्य सरकारकडून मिळालेल्या बक्षिसावर कर लावला जात नाही. याशिवाय, जर विजेत्याला इतर कुठून बक्षीसे मिळाली, तर त्यावर कर भरावा लागेल. उदाहरणार्थ आनंद महिंद्रा यांनी नीरज चोप्राला कार भेट म्हणून देणार असल्याची घोषणा केली आहे. नीरज चोप्राला या कारवर 30% कर भरावा लागेल.

फक्त विजेत्या खेळाडूंना मिळणारे बक्षीस करमुक्त असते

 • आयकरच्या तरतुदीनुसार, केवळ विजेत्या खेळाडूंना मिळालेली बक्षीसे करमुक्त असतात. इतर खेळाडू, प्रशिक्षक इत्यादींना मिळालेल्या बक्षिसांवर कराची तरतूद आहे. उदाहरणार्थ, हरियाणा सरकारने महिला संघाच्या नऊ सदस्यांना दिलेल्या बक्षीसाच्या रकमेवर कर भरावा लागेल.

नीरजवर कोठून-कोठून झाला बक्षीसांचा वर्षाव?

 • ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल, हरियाणा सरकारने 6 कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले.
 • पंजाब सरकारने नीरज चोप्राला 2 कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.
 • रेल्वेने 3 कोटी आणि मणिपूर सरकारने 1 कोटी रुपयांची घोषणा केली आहे.
 • बीसीसीआयने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल नीरज चोप्राला एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
 • आयपीएल फ्रेंचायझी चेन्नई सुपर किंग्सनेही नीरज चोप्राला एक कोटी रुपये देणार असल्याचे जाहीर केले आहे.
 • महिंद्रा आणि महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी एक्सयूव्ही 700 ही गाडी भेट देणार असल्याची घोषणा केली आहे.
 • भारतीय ऑलिम्पिक संघटनेने नीरज चोप्राला 75 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

भेटवस्तू किंवा 50 हजारांपेक्षाच्या जास्त बक्षिसावर कर भरावा लागतो

 • सध्याच्या नियमानुसार, जर तुम्हाला 50,000 रुपयांपेक्षा जास्त किंमतीची भेट मिळाली तर तुम्हाला त्यावर कर भरावा लागेल. कधीकधी आपल्याला एका वर्षात अनेक प्रसंगी भेटवस्तू मिळतात आणि त्याची एकूण किंमत 50 हजार रुपयांपेक्षा जास्त असू शकते. अशा परिस्थितीत आयकर विवरणपत्र भरताना तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे. तुम्हाला आयकरात 50,000 रुपयांपेक्षा वरच्या भेटवस्तूंची माहिती द्यावी लागेल. जर तुम्ही ही माहिती आयकर विभागापासून लपवली तर तुम्हाला नंतर अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
बातम्या आणखी आहेत...