आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या...आनंदाचे सूत्र:सर्वात आनंदी भूमीकडून शिका सुखाचे हे 10 मंत्र, खरा आनंद कशात आहे ते ओळखा

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फिनलंड- गेल्या ४ वर्षांपासून वर्ल्ड हॅपिनेस रँकिंगमध्ये अव्वल आहे. जगात आनंदाचे मापदंड तयार करणाऱ्या विश्लेषकांकडून आम्ही फिनलंडसह संपूर्ण युरोपच्या नॉर्डिक क्षेत्रातील देश सुखाचा पहिला मापदंड- आत्मिक समाधानात कसे परिपूर्ण ठरतात ते जाणून घेतले. कारण- या सर्व देशांची संस्कृती काही अलिखित नियमांवर चालते. ती पहिल्यांदाच नॉर्वेचे लेखक अक्सेल सँडेमाेस यांनी आपले पुस्तक १९३३ मध्ये ‘यांतेची संहिता’ नावाने १० नियमांत बसवली. आता ही संहिता संपूर्ण नॉर्डिक क्षेत्रातील शाळांत शिकवली जाते. फिनलंडमध्ये ती कशी लागू होते, तुम्ही ती अंगीकारू शकता-

1. शिक्षणावर तुमचाच विशेषाधिकार, असा विचार नको... हा सर्वांचा हक्क
म्हणजे, शिक्षणावर सर्वांचा समान हक्क आहे. फिनलंडमध्ये शिक्षण मोफत आहे. केवळ शालेय शिक्षण नव्हे तर विद्यापीठापर्यंतचे शिक्षण पूर्ण नि:शुल्क आहे. बाहेरून येऊन शिकणाऱ्यांनाही तेच. स्थानिक विद्यार्थ्यांना सरकार शिक्षणादरम्यान भत्ताही देते. येथे कुणालाही आपल्या उच्च शिक्षणाचा दंभ नसतो.

2. तुम्ही खूप महत्त्वाचे आहात, असा समज नको... सर्वांशी समान वागणूक
म्हणजे, प्रत्येक नागरिकाशी समान वागणूक व्हावी.फिनलंडमध्ये नुकतेच तीन कॅबिनेट मंत्र्यांनी सरकारी रुग्णालयात मुलांना जन्म दिला. त्यांना सामान्य नागरिकांप्रमाणेच सुविधा मिळाली. कुणालाही विशेष सुविधा दिली जाऊ नये याची येथे विशेष काळजी घेतली जाते. सर्वांशी समान वागणूक व्हावी. सरकारी प्रणालीशी संबंधित लोक याची जास्त काळजी घेतात.

3. तुम्हाला स्वत:लाच ओळखायचे आहे... हे निसर्गाच्या कुशीत शक्य आहे
म्हणजे, आपला आनंद निसर्गात शोधला जावा. िफनलंडचा ७०% भाग वनक्षेत्र आहे. देशात १.८८ लाख तलाव आहेत. लोकांचे सर्वात आवडीचे काम निसर्गात वेळ घालवणे आहे. शहरांतील जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे ग्रामीण भागात समर कॉटेजही आहे. येथे येणारे पर्यटक म्हणतात, फिनलंडमध्ये नागरिकांचे जीवन एखाद्या रिसॉर्टच्या पाहुण्याप्रमाणे आहे.

4. तुम्ही आपल्या यशाची प्रशंसा करायची नाही... श्रेय न घेता काम करा
म्हणजे, श्रेय घेण्याऐवजी निमूटपणे काम केले जावे. कोरोना काळात फिनलंडच्या पंतप्रधान सना मरीन यांनी स्वत: लोकांसाठी आवश्यक वस्तू जमवल्या, प्रत्यक्ष व्यवस्थापन पाहिले. मात्र, कधी याचा प्रचार केला नाही. देशातील श्रीमंतांनी बक्कळ दान केले, मात्र कुणीही समोर आले नाही. येथे कुणीही कामाचे श्रेय घेण्यास चांगले मानत नाही.

5. तुमची संपत्ती कुणापेक्षा जास्त आहे, हा विचार करायचा नाही... देखावा नको
म्हणजे, तुमच्या संपत्तीचे प्रदर्शन केले जाऊ नये. फिनलंडच्या कोणत्याही शहरात महागड्या गाड्या दिसणार नाहीत. देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एंट्टी हर्लिनही सामान्य गाडीनेच जातात. येथे खासगी संपत्तीचा देखावा करण्याकडे पूर्ण समाज वाईट दृष्टिकोनातून पाहतो. येथे सामान्य लोकांमध्ये चर्चाही होत नाही की, फिनलंडमध्ये सर्वात श्रीमंत कोण आहे.

6. तुमचे ज्ञान इतरांपेक्षा जास्त आहे, असा विचारही करू नका... शिकत राहा
म्हणजे, ज्ञानाचे प्रदर्शन करायचे नाही. फिनलंडमध्ये शिक्षक होण्यासाठी सर्वात कठोर परीक्षेतून जावे लागते. शिक्षकी पेशा सर्वात महत्त्वाचा आहे, अशी मान्यता आहे. सर्वात पात्र व्यक्तीच शिक्षकाची नोकरी मिळवू शकते. पात्रतेसोबत नम्रता शिक्षकांसाठी अनिवार्य आहे. येथे शिक्षक मुलांचे मित्र होऊन राहतात. हेच शिक्षणव्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे.

7. तुम्ही कधी जन्म, पात्रता वा यशावर कुणाशी ईर्षा करायची नाही
म्हणजे, आयुष्याच्या पैलूत समानता असावी. फिनलंडमध्ये आरोग्य व शिक्षणाची सुविधा सर्वांसाठी समान आहे. रोजगाराच्या संधीही समान आहेत. नेता, मंत्री, व्यापारी, नोकरदार वा बेरोजगार... सर्वांची मुले समान वातावरणात मोठी होतात. याच कारणामुळे येथील मुलांमध्ये असमानतेमुळे कधी मत्सर उत्पन्न होत नाही.

8. तुम्ही कधी, कोणत्याही कारणास्तव कुणाची खिल्ली उडवायची नाही
म्हणजे, सर्वांच्या भावनांचा आदर व्हावा. फिनलंडच्या समाजात लहानपणापासूनच यावर भर दिला जातो. लक्षात ठेवा की, मुलांनी मिळून मिसळून हसावे, मात्र, एकमेकांवर कधी हसू नये. कुणाच्या शारीरिक स्थिती, समज अथवा सामाजिक परिस्थितीवरून टवाळकी केली जात नाही. चेष्टामस्करी येथील संस्कृतीचा हिस्सा नाही.

9. तुम्हीच सर्वोत्कृष्ट असे समजू नका... सर्वांना जाणून घेण्याचा प्रयत्न करा
म्हणजे, पद वा प्रतिष्ठेशी चांगुलपणा जोडू नका. फिनलंडच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक मार्कू कनेर्व्हा येथे रोल मॉडेल आहेत. ते स्वत: विख्यात फुटबॉलपटू राहिलेले असतानाही प्राथमिक शाळेत शिक्षक झाले. प्रशिक्षक म्हणून त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे, ते टीमच्या सेवकाप्रमाणे वागतात. ते दबावाशिवाय शिकण्याच्या प्रक्रियेचा पुरस्कार करतात.

10. कुणी विशेष वा सामान्य आहे, हा विचार करू नका... समाजात सर्व समान आहेत
म्हणजे, विशेष आणि सामान्य ही मान्यता संपवली जावी.फिनलंडच्या राजधानीतही घरांच्या किमती भागानुसार नव्हे तर आकाराच्या हिशेबाने निश्चित होतात. कोणतीही गल्ली श्रीमंतांची नाही. येथे तुम्हाला प्रत्येक गल्लीत श्रीमंत आणि गरीब सोबत राहत असलेले दिसतील. प्रत्येक व्यक्ती गरजेनुसार कुठेही घर खरेदी करू शकतो.

बातम्या आणखी आहेत...