आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • New Year 2022 | Marathi News | 22 Major Possibilities The New Year Is About Overcoming Challenges And Making Dreams Come True

2022 च्या 22 प्रमुख शक्यता:आव्हानांवर मात करून स्वप्ने साकारण्याचे असेल हे नवे वर्ष, आव्हानांच्या पलीकडे आपल्या सोनेरी स्वप्नांचे जग

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

२०२१ मध्ये आपण अनेक अडचणींवर मात केली... २०२२ मध्ये आपल्याला आणखी अनेक आव्हानांवर मात करायची आहे. पण, या आव्हानांच्या पलीकडे आपल्या सोनेरी स्वप्नांचे जग आहे. आर्थिक आघाडीपासून ते परराष्ट्र धोरणापर्यंत प्रत्येक क्षेत्रात आपल्यासाठी शक्यतांचे आकाश खुले आहे. जाणून घ्या भास्कर एक्स्पर्ट पॅनलकडून... कसे असेल २०२२

१. महामारी
यावर्षी कोरोनापासून मुक्ती मिळेल की नाही?हा विषाणू कमकुवत होतोय आणि आपण अधिक मजबूत... यावर्षी विजय आपलाच
काय होईल : कोरोनाविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढत आहे. लसीकरण आणि कोविड टाळण्यासाठी आपण खबरदारी घेतली तर कोरोना यापुढे चिंतेचे कारण राहणार नाही.
का होईल : ओमायक्रॉनबाबत शास्त्रज्ञ म्हणतात की, आधीच्या व्हेरिएंटपेक्षा हा कमकुवत आहे. तो फुप्फुसांऐवजी श्वसनमार्गात जातोय. नवे व्हेरिएंट बहुधा आणखी कमकुवत असतील.

२. लसीचा ट्रेंड
दरवर्षी लस घ्यावी लागेल का?वारंवार लस घ्यावी लागली तर काळजी नको... हे वार्षिक फ्लू शॉटसारखे असेल
काय होईल : डब्ल्यूएचओने बुस्टर डोसचा सल्ला दिला आहे. त्याची गरज पडेल. घाबरू नये. अमेरिकेसह अनेक देशांमध्ये फ्लूचे शॉट्स दरवर्षी दिले जातात.
का होईल : काही काळाने लसीच्या प्रभाव कमी झाल्यामुळे प्रतिकारशक्ती घटते. रुग्णांमध्ये अँटिबॉडीज लवकर संपतात.'

३. जीडीपी ग्रोथ
महामारीच्या तावडीतून अर्थव्यवस्था बाहेर पडेल का?२०२२ गेल्या २ वर्षांपेक्षा चांगले असेल, हे अधिक स्थिर असेल, आर्थिक स्थिती सुधारेल
काय होईल : २०२२ मध्ये महामारी कमी होण्याची अपेक्षा आहे. देशाचा आर्थिक विकास दर ७.८% राहील. लॉकडाऊनची शक्यता नाही. यामुळे स्थैर्य येईल.
का होईल : प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर संकलनात वाढ झाल्याने सरकारची खर्चाची क्षमता वाढली आहे. गुंतवणुकीतही वाढीची अपेक्षा आहे, त्यात पीएलआय योजनांचा मोठा वाटा असेल.

४. रोजगार
महामारीमुळे संधी घटल्या... यावर्षी काय होईल?नोकऱ्यांत वाढ निश्चित, कंपन्या रोजगार देऊन लोकांना गरजेनुसार कौशल्य शिकवतील
काय होईल : आयटी-आयटीई, शिक्षण, फार्मा-हेल्थकेअर, ई-कॉमर्स, बँकिंग व फायनान्समध्ये भरपूर भरती होईल. कंत्राटी भरतीतही १५-२०% वाढ अपेक्षित आहे.
का होईल : नवीन क्षेत्रे तयार होतील. आयटी-बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंटमध्ये ३.७५ लाख संधी निर्माण होतील. नियोक्ते भरती करून तरुणांना तयार करतील.उत्पादन, सेवा क्षेत्रावर जास्त भर.

५. कुटुंब
यावर्षी जीवन आणि कुटुंबाचा ताळमेळ कसा राहील?संकटात कुटुंबच साथ देईल, हे लोकांना समजले... आता हे नेहमी लक्षात राहील
काय होईल : कोरोनाने कुटुंबाचे महत्त्व समजावून सांगितले. वाईट काळात कुटुंब हे ढाल आहे. प्रत्येक जण धोका पत्करतो. साहजिकच कुटुंबाचे महत्त्व आणखी वाढेल.
का होईल : कोरोना काळात अनेक कुटुंबे मजबुरीने एकत्र आल्याने जुने वाद मिटले. जीवन अनपेक्षित आहे हे कोरोनाने शिकवले, म्हणून कुटुंबासोबत अधिक वेळ घालवा.

६. सार्वजनिक आरोग्य
सरकार आरोग्य सुविधांची व्याप्ती वाढवणार का?आरोग्य पायाभूत सुविधांचे महत्त्व कळले, मध्यमवर्गीयांना आरोग्य कव्हरेज मिळेल
काय होईल : महामारीत आरोग्य पायाभूत सुविधांचे महत्त्व समजले. युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज मॉडेलसारखी घोषणा २०२२ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात केली जाऊ शकते.
का होईल : सरकारला मध्यमवर्गीयांसाठी उपचाराची व्यवस्था करावी लागेल, कारण हा वर्ग अर्थव्यवस्थेचे इंजिन आहे. केवळ कुटुंबेच नाही, तर अर्थव्यवस्थाही उपचाराचा खर्च मागे टाकते.

७. स्टार्टअप हब
या वर्षी स्टार्टअप्सचा कल कसा असेल?फिनटेक व हेल्थ स्टार्टअप एक शक्ती म्हणून उदयास आले... ते अधिक मजबूत होतील
काय होईल : नवीन वर्षातही फिनटेक आणि आरोग्य क्षेत्रात सर्वाधिक स्टार्टअप्स येतील. एज्युटेकची संख्याही यावर्षी वाढण्याची अपेक्षा आहे.
का होईल : स्टार्टअप्सनी २०२०-२१ मध्ये परदेशी निधी उभारला आहे. नवीन वर्षातही हा निधी वाढेल. यामुळे या स्टार्टअप्सच्या कामगिरीत आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

८. ई-वाहने
२०२२ मध्ये ईव्हीने आंतरराज्य प्रवास होईल का?इलेक्ट्रिक वाहनाने प्रवास चांगला होईल, पण... आंतरराज्य प्रवास अजूनही मर्यादित
काय होईल : ३ वर्षांत ६८ शहरांत २८७७, २५ एनएचवर १५७६ चार्जिंग स्टेशन. काही मार्गांवर ईव्ही पायाभूत सुविधा वाढतील, परंतु आंतरराज्य प्रवासासाठी दोन वर्षे लागतील.
का होईल : ५ राज्यांत १०२८ चार्जिंग स्टेशन आहेत. ३०० किमीवरील आंतरराज्य प्रवासासाठी त्यात वाढ आवश्यक आहे.

९. शेअर वि. इकाॅनाॅमी
शेअर बाजार-अर्थव्यवस्थेत सुसूत्रता येईल का?यावर्षीही चांगल्या अर्थव्यवस्थेच्या आशेने शेअर बाजार तेजीत राहील
काय होईल : चांगल्या अर्थव्यवस्थेच्या आशेने सेन्सेक्स वाढत राहील. अमेरिकन बँकांनी व्याज वाढवल्याने जागतिक गुंतवणूकदार मालमत्ता वाटप वर-खाली करू शकतात.
का होईल : आर्थिक वाढीचे चक्र, व्याजदर चक्राचा परिणाम दिसून येईल. किरकोळ गुंतवणूकदार बळकट होतील.

१०. आॅटो इनोव्हेशन
२०२२ मध्ये ऑटो सेक्टरमध्ये कोणते नवीन बदल?टेस्लासह अनेक कंपन्या ईव्ही आणतील, देशी कंपन्यांमध्येही ईव्हीसाठी स्पर्धा असेल
काय होईल : सेमीकंडक्टर टंचाईला तोंड देत असलेल्या ऑटो क्षेत्रासाठी २०२२ आशादायी आहे. टेस्लासह अनेक कंपन्या दोन डझनहून अधिक ईव्ही कार लाँच करणार आहेत.
का होईल : टेस्ला मॉडेल ३ चे अमेरिकेत तीन प्रकार आहेत व वायचे दोन प्रकार आहेत. म्हणजेच ७ पैकी ५ मॉडेल्स या दोघांचे असू शकतात. महिंद्रा व टोयोटा टाटांशी स्पर्धा करू शकतात.

११. डिप्रेशन फॅक्टर
महामारीमुळे आलेल्या नैराश्याचा काय परिणाम होईल?महामारी अजून गेलेली नाही, नैराश्यही आहे...त्याच्याशी लढू, परिस्थिती सुधारेल
काय होईल : महामारीमुळे आलेल्या नैराश्याचा प्रभाव यावर्षीही राहील. परंतु नवीन संधी निर्माण झाल्याने व मृत्यूंची संख्या कमी झाल्याने त्यातून सावरण्यास मदत होईल.
का होईल : शाळा उघडतील, आवक-जावक वाढेल. सकारात्मक वातावरण निर्माण होऊन नैराश्याची स्थिती सुधारेल. यामध्ये कुटुंबाची भूमिका महत्त्वाची असेल.

१२. अंतराळ पर्यटन
भारत अंतराळ पर्यटन केंद्र बनू शकेल का?अंतराळ तंत्रज्ञानात खासगी कंपन्याही उतरल्या... पण अंतराळ पर्यटन अजून दूर
काय होईल : खासगी क्षेत्रासाठी खुले केल्यावर अनेक कंपन्यांनी प्रयत्नांना गती दिली. अंतराळ संशोधन व्याप्ती विस्तारली. पण, भारतातील अंतराळ पर्यटन अजूनही दूरच.
का होईल : भारताला यात क्षमता सिद्ध करायची आहे. गगनयानच्या मोहिमा पूर्ण झालेल्या नाहीत. मानवयुक्त मोहिमेची अंतिम मुदत २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

१३. अंतराळात भारत
२०२१ मध्ये अंतराळ कार्यक्रम थांबले, आता काय?गगनयान प्रक्षेपणामुळे अंतराळ कार्यक्रमाला चालना मिळेल
काय होईल : २०२२ मध्ये गगनयानच्या दोन अनक्रू मिशन सर्वात प्रमुख असतील, त्यामध्ये व्योमित्र नावाचा मानवी रोबोट पाठवला जाईल.
का होईल : गगनयान हा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. याशिवाय आदित्य एल-१ चांद्रयान-३ आणि सूर्याच्या अभ्यासासाठीही प्रस्तावित आहे.

१४. उत्तम व्यवस्थापन
१००% कचरा पुनर्वापराचे उद्दिष्ट साध्य होईल का?सध्या आपण केवळ २३% कचऱ्यावर प्रक्रिया करतो, १००%चे उद्दिष्ट अजून दूरच
काय होईल : देशात २०२० मध्ये ६.२० कोटी टन कचरा निघाला, त्यापैकी २३%च कचरा म्हणून हाताळला जातोय.
का होईल : मोठ्या प्रमाणात कचरा प्लास्टिकचा असतो. २०२० मध्ये ३४ लाख टन प्लास्टिक कचरा निघाला, फक्त ५०% वर प्रक्रिया करता आली.

१५. पुढील सुटी
मी माझ्या पुढील सुटीची योजना कधी करावी?सहा महिन्यांत जगात जाता येईल
काय होईल : ६ महिन्यांत जगात कुठेही आपल्या सुटीचे नियोजन करू शकता. फक्त सुटी घालवण्यासाठी जागा शोधावी लागेल आणि व्हिसा घेऊन निघून जावे लागेल.
का होईल : प्रमुख देशांमध्ये ७०% लसीकरण केले गेले आहे. बुस्टर सुरू झाले आहेत. सहा महिन्यांत कोरोनाचे नियंत्रण अधिक चांगले होईल.

१६. तणावाची मर्यादा
चीनच्या आव्हानावर यंदा उपाय निघेल?२०२२ एलएसीवर शांतता प्रस्थापित करेल, चीनला कळले, भारताला रोखणे अशक्य
काय होईल : भारत-चीनच्या वरिष्ठ कमांडर्सच्या चर्चेच्या १४ व्या फेरीत समोरासमोर तैनाती हटवण्यावर चर्चा झाली तर पँगोंग आणि कैलास पर्वतरांगा परत येऊ शकतात.
का होईल : भारताने एका वर्षात तैनाती व संसाधने वाढवून परिस्थिती बळकट केली आहे. चीन आपल्या मनसुब्यांमध्ये कदापि यशस्वी होणार नाही याची जाणीव त्याला झाली आहे.

१७. अनुदान सुधारणा
एलपीजीनंतर वीज क्षेत्रात सुधारणा होईल का?वीज सबसिडी डीबीटीशी जोडणे हे केंद्र सरकारचे मोठे प्राधान्य असेल
काय होईल : केंद्राला अनुदानाचा लाभ थेट सर्व लक्ष्य गटांना (डीबीटी) द्यायचा आहे. एलपीजी हे त्याचे उदाहरण आहे. सरकारचे लक्ष ऊर्जा क्षेत्रातील सुधारणांवर आहे.
का होईल : वीज क्षेत्रातील सुधारणा विधेयक तयार आहे. वीज संकटाने यासाठी जागा बनवली आहे. कंपन्यांना सबसिडी देण्यापेक्षा ग्राहकाला देणे अधिक प्रभावी ठरेल.

१८. व्हर्च्युअल वि. रिअल
व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मचा हस्तक्षेप किती वाढेल?जग रिअलऐवजी व्हर्च्युअलमधून ऑगमेंटेड व्हर्च्युअल व मेटाव्हर्समध्ये प्रवेश करेल
काय होईल : आभासी जग आता वेगाने मेटाव्हर्सकडे जात आहे. कंपन्या एआय वापरून वास्तविक दिसणारी आभासी जग निर्माण करण्यात गुंतल्या आहेत.
का होईल : चेहरा ओळखणे, नैसर्गिक भाषा प्रक्रिया व जलद संगणनामुळे नवीन आभासी जग निर्माण होईल. मेटाव्हर्स व्हिडिओ कॉलिंगपासून ३डीच्या आभासी जगात नेईल.

१९. व्हर्च्युअल गेम्स
मी व्हिडिओ गेम्सचा विश्वचषक पाहू शकतो का?मेटाव्हर्सने जागतिक व्हिडिओ गेमसाठी स्टेज सेट केले, परंतु अजूनही अनेक गुंतागुंती...
काय होईल : सोशल प्लॅटफॉर्म मेटाव्हर्सच्या जगात प्रवेश करत आहेत, तिथे पात्रे ३ डी दिसतील. ऑलिम्पिकप्रमाणे व्हिडिओ गेम्सचे जागतिक कार्यक्रम होतील.
का होईल : सर्व गुंतागुंत असूनही दक्षिण कोरियाने मार्ग दाखवला. तेथे मोठ्या स्टेडियममध्ये राष्ट्रीय खेळांसारखे व्हिडिओ गेम राष्ट्रीय स्तरावर आयोजित केले जाऊ लागले आहेत.

२०. लस शक्ती
लस मुत्सद्देगिरीचा आपल्याला किती फायदा होईल?भारतीय लस गरीब देशांसाठी वरदान आहे, आपण किंमत आणि पुरवठा संतुलित करू
काय होईल : आपण ९७ देशांना १० कोटी लसी दिल्या आहेत. वर्षाला ३ अब्ज लसी बनवण्याची क्षमता. यामुळे लस कंपन्या गरीब देशांना महागड्या लसी विकू शकणार नाहीत.
का होईल : आपल्या स्वस्त लसी गरीब देशांसाठी वरदान आहेत. विकसनशील देशांव्यतिरिक्त शेजारील देशांना मोठ्या प्रमाणात लसी दिल्याने आपली मुत्सद्देगिरी बळकट होईल.

२१. मनोरंजन
यावर्षी ब्लॉकबस्टर स्क्रीनवर दिसेल की ओटीटीवर?ओटीटीवर आशय आधारित, तर चित्रपटांसाठी लोक चित्रपटगृहांत जातील
काय होईल : सिनेमा-ओटीटी एकमेकांना पूरक राहतील. लोक कंटेंटवर आधारित चित्रपट ओटीटीवर पाहतील, मोठे चित्रपट सिनेमागृहात दिसतील.
का होईल : कोविड असूनही सूर्यवंशी, ८३ व स्पायडरमॅन हिट झाले. नव्या वर्षात सिनेमाचा प्रेक्षकवर्ग आणखी वाढणार आहे.

२२. ओटीटी स्टार्स
कोणता ओटीटी तारा पडद्यावर चमकू शकतो?ओटीटी तारे मोठ्या पडद्यावर दमदार उपस्थिती लावतील, डझनभर नवे तारे मिळतील
काय होईल : डझनभर ओटीटी स्टार्स मोठ्या पडद्यावर दिसतील. त्यात झोया, अंशुमन पुष्कर, अर्जुन माथूर ही मोठी नावे आहेत.
का होईल : ओटीटी कंटेंट दरवर्षी ५०% नी वाढतोय. मोठ्या पडद्यावर ओटीटी कलाकारांची मागणी वाढत आहे.

बातम्या आणखी आहेत...