आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आता तुम्ही पूर्वीप्रमाणेच धामधुमीत विवाह करू शकता. ५० पेक्षा जास्त हवे तेवढे पाहुणे बोलावू शकाल. फक्त तुम्हाला दुप्पट क्षमतेचे मंगल कार्यालय शोधावे लागेल. कारण आता कोणत्याही हॉलच्या किंवा विवाह स्थळाच्या ५० टक्के क्षमतेएवढ्याच पाहुण्यांना लग्नात बोलावता येऊ शकेल. अशा प्रकारे पाच महिन्यांपासून बंद सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमही सुरू होऊ शकतील. सभागृहात ५० टक्के आसनांवर श्रोत्यांना बोलावून संगीत, नृत्य, नाटक, सभा, प्रकाशन यांसारखे कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकतील. अट एवढीच की, समारंभ स्थळ कंटेनमेंट झोनमध्ये नसावे. अनलॉकच्या पुढील दिशानिर्देशांत केंद्र सरकार या बाबींचा समावेश करू शकते. २३ मार्चपासून लॉकडाऊन लागल्यानंतर या कार्यक्रमांवर बंदी होती.
केंद्रीय पर्यटनमंत्री प्रल्हाद पटेल यांनी सांगितले की, पर्यटन व संस्कृती या क्षेत्रांना कोरोनामुळे सर्वाधिक फटका बसला. यात आता अधिक सूट देण्यासंबंधीचा प्रस्ताव गृह मंत्रालयास पाठवण्यात आला आहे.
फक्त मंगल कार्यालयांची क्षमता असावी दुप्पट, पाहुणे २००, तर समारंभ स्थळाची क्षमता ४०० ची
समजा तुम्ही लग्नात २०० पाहुण्यांना आमंत्रित करत असाल, तर समारंभ स्थळाची क्षमता ४०० पाहुण्यांची असावी. अशाच प्रकारे २०० प्रेक्षकांसाठी ४०० च्या क्षमतेचे सभागृह असावे.
चित्रपट आणि मालिका चित्रीकरण
माहिती-प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी देशात स्टुडिओत आणि बाह्य चित्रीकरणास परवानगी दिली. फक्त पात्र करणाऱ्यास कॅमेऱ्यासमोर मास्क न घालण्याची सूट असेल. ६ फुटांचे अंतर आवश्यक असेल. पीपीई किट व इतर नियम पाळावे लागतील.
मल्टिप्लेक्स : निम्मी आसन क्षमता
मल्टिप्लेक्सचे मालकही एक तृतीयांशच्या ५० टक्के क्षमतेने उघडण्याची मागणी करत आहेत. सरकार जी खबरदारी घेण्यास सांगेल त्याचे पालन करू. प्रत्येक क्षेत्र सुरू होत असल्याने मल्टिप्लेक्स सुरू करण्याची परवानगीही मिळावी, अशी त्यांची मागणी आहे.
शाळा : निर्णय स्थिती सामान्य झाल्यावरच घेतला जाणार
देशभरातील शाळा आणि पालकांना राज्य सरकारांमार्फत केंद्राला पाठवलेल्या फीडबॅकमध्ये म्हटले आहे की, शाळा उघडण्याचा निर्णय स्थिती सामान्य झाल्यानंतरच घेतला जावा. मुलांचे आरोग्य आणि जीवन याबाबत कुठल्याही प्रकारचा समझोता किंवा घाई करण्याची गरज नाही. मात्र, सूत्रांनी सांगितले की, काही राज्यांनी ऑनलाइन अभ्यास सुरू ठेवत अंशत: शाळा उघडण्याचा प्रस्तावही दिला आहे.
अनंत चतुर्दशीनंतर लॉकडाऊनचे विसर्जन
मुंबई | विघ्नहर्ता गणराया महाराष्ट्रासाठी खरोखर दु:खहर्ता ठरला आहे. बाप्पा विराजमान होताच लॉकडाऊनमधील परमिट राज संपवण्याचा आदेश केंद्राने दिला. बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत विसर्जनादिवशी राज्यात लॉकडाऊनचे पूर्ण विसर्जन करण्याचा निर्णय होऊ शकतो. प्रवासी वाहतुकीवर २३ मार्चपासून निर्बंध होते. एसटीची आंतरजिल्हा वाहतूक २० आॅगस्टला सुरू झाली. मात्र खासगी वाहनांसाठी ई-पासची अट आहे. मंत्रिमंडळ बैठकीत यातही सूट देण्याचा निर्णय होऊ शकतो.
> सिनेमागृहे, शाळा, रेस्तराँ, बागा, धार्मिक स्थळे बंद आहेत. मात्र, हे सुरू करण्याबाबतचा निर्णय इतक्यात होण्याची शक्यता दिसत नाही.
> केंद्रीय गृह मंत्रालयाच्या पत्रानुसार खासगी वाहनांवरची ई-पास सक्ती हटवण्यात येईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
> शासकीय आणि खासगी कार्यालयात सध्याच्या १० टक्केऐवजी ५० टक्के कर्मचारी उपस्थित राहू शकतील.
> मंत्रिमंडळ बैठकीत लॉकडाऊन संपवण्यावर चर्चा होईल. मात्र, निर्णयाची अंमलबजावणी १ सप्टेंबर म्हणजे गणेश विसर्जनानंतर होईल.
> मुंबईत लोकल सेवा अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी चालू आहे. इतरांना लोकल खुली केल्यास कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो अशी प्रशासनाला भीती आहे. त्यामुळे लोकलच्या फेऱ्या वाढवण्याचा सरकारचा विचार आहे.
> जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी ई-पासची सक्ती केल्यामुळे राज्यातील नागरिकांची मोठी नाराजी होती. राज्य आणि केंद्राकडे त्यासंदर्भात अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे ई-पास सक्ती उठवली जाणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.