आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साप्ताहिक राशिभविष्य:कसा जाईल पुढील आठवडा?, टॅरो आणि अंकशास्त्राद्वारे जाणून घ्या तुमचे राशिभविष्य

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्र राशी तसेच टॅरो कार्ड आणि अंकशास्त्रानुसार सर्व 12 राशींसाठी हा आठवडा कसा असेल ते जाणून घेऊया. पं. मनीष शर्मा, टॅरो कार्ड दिव्या चुघ आणि अंकशास्त्रज्ञ डॉ. बबिना बोहरा यांच्या साप्ताहिक कुंडलीनुसार…

आठवड्याची सुरुवात पाचव्या चंद्रापासून होईल. रविवार आणि सोमवारी मुलांकडून सुख मिळेल. नोकरी शोधणाऱ्यांना लाभ मिळेल. उत्पन्न वाढेल, सहकार्यही मिळेल. सोमवार रात्रीपासून शत्रू सक्रिय होण्याची शक्यता. मंगळवार तणावपूर्ण असेल. बुधवारी त्रासदायक काळ राहू शकतो. गुरुवारी सकाळपासून उत्पन्न वाढेल, आनंदाची प्राप्ती होईल. प्रेमसंबंधात यश मिळेल. जीवनसाथीकडूनही आनंद मिळेल. शुक्रवार देखील चांगला जाईल. शनिवारी सकाळी अपयश, भीती आणि नुकसान होण्याची शक्यता आहे.

टॅरो

शुभ रंग - नारिंगी

शुभ संख्या- 9

टॅरो कार्ड - Moon

या आठवड्यात तुमचे मन गोंधळलेल्या स्थितीत असेल. विचित्र विचार, भीती आणि संशयाची स्थिती अनिर्णय निर्माण करेल. तुमचा दृष्टीकोन पुन्हा पुन्हा बदलेल. वैवाहिक समस्या वाढतील. ज्येष्ठांची मदत लाभदायक ठरेल.

रविवार आणि सोमवारी काळ तुमच्या विरुद्ध असू शकतो.प्रवासात समस्या येण्याची शक्यता. सहकार्याची अपेक्षा व्यर्थ ठरेल,डोळ्यांशी निगडित समस्या होऊ शकतात. मंगळवारी आणि बुधवारी वेळ अनुकूल राहील. उत्पन्न वाढेल आणि कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. समस्यांचे निराकरण होईल. गुरुवारी सकाळपासून पुन्हा मन अस्वस्थ होईल, आजार डोके वर काढू शकतात. शुक्रवारी त्रासदायक वार्ता येतील. शनिवारी सकाळपासून वेळ अनुकूल राहील.

टॅरो

शुभ रंग- बदामी

शुभ संख्या - 3

टॅरो कार्ड - 3 of pentacles

प्रवास आणि खर्चाने भरलेला आठवडा आहे. सामाजिक कार्यात उत्साहाने सहभागी व्हाल. परोपकारी भावना मनावर अधिराज्य गाजवेल. लोक या प्रवृत्तीचा फायदा घेतील. त्यामुळे मनात राग निर्माण होईल. विद्यार्थ्यांना विद्यापीठ शिष्यवृत्ती इत्यादी मिळण्याची शक्यता आहे.

सोमवारी काळ सर्वच दृष्टीने अनुकूल आहे. भावंडांकडून सहकार्य मिळेल.तुमच्या कामाचा प्रभाव पडेल. परदेशात जाणाऱ्यांना यश मिळेल. मंगळवारी मन अस्वस्थ राहील. पायाला दुखापत होण्याची शक्यता. उत्पन्नाची कमी राहील. गुरुवारचा दिवस उत्पन्न वाढीचा राहील. आनंद देणारी बातमी कळेल. शुक्रवारचा दिवसही चांगला जाईल. कामात यश मिळेल. शनिवारी काळजी घ्या.

टॅरो

शुभ रंग - पांढरा

शुभ संख्या - 2

टॅरो कार्ड - Page of cups

पूर्वनियोजित प्रवासाची शक्यता राहील. तुम्ही नवीन लोकांशी भावनिक किंवा व्यावसायिक संबंध प्रस्थापित कराल. मनःस्थिती निरोगी राहील. मित्र आणि प्रियजनांना मदत करण्यासाठी वेळ जाईल आठवड्याच्या शेवटी शारीरिक थकवा जाणवेल.

रविवारचा दिवस चांगला जाईल. दौऱ्यावर जाण्याची संधी मिळेल. सोमवारी रात्री झोप कमी लागेल, हलका ताप येऊ शकतो. मंगळवार हा पराक्रम दाखवण्याचाही दिवस असेल. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. बुधवारी सर्व काही ठीक होईल. शुक्रवार चिंताजनक दिवस असू शकतो. शनिवारी सकाळपासून वेळेत अनुकूलता राहील.

टॅरो

शुभ रंग - निळा

शुभ संख्या - 5

टॅरो कार्ड- 5 of wands

हा आठवडा आनंदाने आणि उत्साहाने भरलेला असेल. हातातील कामे आत्मविश्वासाने पूर्ण कराल. नवीन आवडत्या कामांच्या जबाबदाऱ्या मिळतील. नवीन नोकरी, मित्र आणि नातेसंबंध निर्माण होतील. वरिष्ठांचे सहकार्य वाढेल. जुन्या कटू आठवणींना उजाळा मिळेल.

सोमवारी उत्पन्नात वाढ होईल, आनंदाची प्राप्ती होईल. कामात यश मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. त्यानंतर बुधवारी स्थिर मालमत्तेत वाढ होऊन पैसे मिळण्याचा योग आहे. कर्जासंबंधीची चिंता संपेल. प्रेमात यश मिळेल. गुरूवारी आणि शुक्रवारी कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवणार नाही. जोडीदारासोबत वैचारिक तणाव निर्माण होऊ शकतो. उत्पन्न वाढेल, नवीन लाभदायक संपर्क बनतील. शनिवारी सकाळपासून मन उदास राहू शकते.

टॅरो

शुभ रंग - गुलाबी

शुभ संख्या - 6

टॅरो कार्ड - 6 of wands

नवीन कल्पनांची उधळण तुम्हाला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय ठेवेल. प्रेम आणि नातेसंबंधांबद्दल आकर्षण वाढेल. मीडिया, फॅशन आणि पत्रकारितेशी संबंधित लोकांना इच्छित काम मिळेल.

सोमवारी अत्यावश्यक कामे पुढे ढकलावे लागू शकतात. खर्च जास्त आणि उत्पन्न कमी राहील. अनावश्यक कामात वेळ वाया जाईल. बुधवार रात्रीपर्यंतचा काळ यश देईल. उत्पन्न वाढेल. मित्र आणि नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. डोकेदुखी, तणावाच्या समस्या उद्भवू शकतात. वैवाहिक जीवनात आनंद राहील. गुरुवारी आणि शुक्रवारी अनुकूल काळ असेल. शनिवार सकाळपासून प्रयत्नांना यश मिळेल आणि मित्रांसोबत सहलीला जाण्याची संधी मिळेल.

टॅरो

शुभ रंग - राखाडी

शुभ संख्या - 5

टॅरो कार्ड - Temperance

तुमचा आठवडा समाधानकारक जाईल. उत्साह आणि आत्मविश्वास राहील आणि इच्छित कार्य पूर्ण होईल. मात्र, नियमित कामांमुळे काही नवीन जबाबदाऱ्यांचे ओझे वाढेल. कौटुंबिक आनंदाचा अनुभव घ्याल. धार्मिक यात्रा व गुरु दर्शनाचे योग आहेत.

रवि आणि सोमवार हा आनंदाचा काळ असेल. गुंतलेले पैसेही मिळू शकतात. मित्रांकडून सहकार्य मिळेल. नोकरी करणाऱ्यांना प्रवासाला जावे लागेल. त्यानंतर बुधवारी रात्रीची वेळ चिंताजनक राहील. उत्पन्नात घट होईल आणि अनावश्यक समस्येला सामोरे जावे लागेल. कौटुंबिक समस्या उद्भवू शकतात. गुरूवारी आणि शुक्रवारी काळ चांगला राहील. कामात यश मिळेल आणि इच्छुकांना लग्नाचे प्रस्ताव येतील. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. बोटांना दुखापत देखील होऊ शकते. शनिवारची सुरुवात आनंददायी राहील. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.

टॅरो

शुभ रंग - पिवळा

शुभ संख्या - 1

टॅरो कार्ड - Wheel of fortune

चांगला काळ आहे. तुमच्या कार्याचा गौरव होईल. कामाच्या ठिकाणी बिघडलेले काम सुरळीतपणे होतील. कला, साहित्य आणि तंत्रज्ञानाशी संबंधित लोक त्यांच्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करतील.प्रयत्न आणि समर्पणाचे परिणाम चांगले असतील.

रविवार आणि सोमवारी कामात व्यस्त राहाल आणि वडिलांचे सहकार्य मिळेल. पैशाची आवक चांगली राहील. व्यवसाय आणि नोकरीत उत्तम कामगिरी कराल. धार्मिक उत्सवात सहभागी होण्याची संधी मिळेल. मंगळवार आणि बुधवारी रात्रीपर्यंतचा काळ सर्व दृष्टीने अनुकूल राहील. राजकारण्यांना पद मिळू शकते. गुरुवार आणि शुक्रवारी खर्चात वाढ होईल, तणाव आणि उत्पन्नाची कमतरता जाणवेल. डोकेदुखी, तापाची समस्या होऊ शकते. प्रवास कठीण होऊ शकतो. शनिवार सकाळ नंतरचा काळ अनुकूल राहील. कामाला गती येईल.

टॅरो

शुभ रंग - पिस्ता

शुभ संख्या - 7

टॅरो कार्ड - Chariot

व्यवसाय आणि कामाशी संबंधित व्यस्ततेमुळे तुमचे मन काहीसे विचलित राहील. जुनी आश्वासने पूर्ण करण्याची हीच योग्य वेळ आहे. दूरच्या नातेवाईकांना भेटण्याची शक्यता आहे. कायदेशीर कार्यवाही जलद होईल. योग्य सल्ल्यानेच कृती करा.

रविवारी आणि सोमवारी भाग्याची साथ राहील. कामात यश आणि उत्पन्न वाढेल.सर्व बाजूंनी चांगली बातमी येईल. पोटदुखीची समस्या होऊ शकते. वैवाहिक जीवन आनंदी राहील. मंगळवार आणि बुधवारी कामाचा अतिरेक होऊ शकतो. एकाच वेळी अनेक कामे येण्याची शक्यता. वडिलांना तुमच्या मदतीची गरज लागेल. गुरुवार आणि शुक्रवारी आवक वाढेल. मुलांकडून आनंद मिळेल. छोट्या प्रवासाला जाण्याचीही शक्यता आहे. शनिवारी सावध राहा.

टॅरो

शुभ रंग - ग्रे

शुभ संख्या - 4

टॅरो कार्ड - 4 of swords

करिअर आणि उद्योगात वाढ करण्याच्या इच्छेने आणि गुंतवलेल्या पैशात नफा मिळवण्याच्या इच्छेने काही प्रिय व्यक्तींशी दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवस्थापन बिघडेल आणि खर्च वाढण्याची शक्यता. कामावर लक्ष केंद्रित करा. पोटाशी संबंधित समस्या राहील.

आठवड्याची सुरुवात अडचणीने होण्याची शक्यता. सोमवारी वादविवाद टाळा.खर्च वाढेल. मंगळवारी सकाळपासून विश्रांती मिळेल. कामाला गती येईल पैशाची आवकही चांगली राहील. बुधवारी सुखद बातमी मिळेल. काम सुरळीत राहील. गुरुवार आणि शुक्रवारी कामात वाढ होईल. उत्पन्नही चांगले राहील. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. शनिवारी सकाळपासून उप्पनात वाढ होईल. मोठे काम मार्गी लागण्याची शक्यता. प्रेमात यश मिळेल.

टॅरो

शुभ रंग - खाकी

शुभ संख्या - 7

टॅरो कार्ड- Tower

तणावमुक्त आठवडा असेल आणि मुलाखती आणि बैठकांमध्ये व्यस्त राहाल. कामात आत्मविश्वास वाढेल तसेच व्यवसायात नवीन काम मिळण्याची शक्यता. पैशाशी संबंधित प्रकरणांमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येतील. नवीन कामात गुंतवणूक आणि परदेश प्रवासासाठी शुभ काळ.

रविवार आणि सोमवारी मन प्रसन्न राहील. उत्पन्न चांगले राहील आणि नोकरीत प्रशंसा मिळेल. वैवाहिक जीवनात आनंद राहील. इच्छुकांना विवाहाचे प्रस्ताव प्राप्त होतील. व्यवसायात यश मिळेल. मंगळवार आणि बुधवारी वाद होण्याची शक्यता आहे. अनावश्यक कामात वेळ जाईल. शरीरात वेदना होऊ शकतात. प्रेमात अपयश येईल. शुक्रवारी गुरु आणि जोडीदाराचे सहकार्य लाभेल. कामात यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढेल आणि नवीन कामांकडे वाटचाल करू शकाल. शनिवारी मन उदास राहील. कामाची गती मंदावेल आणि योजना अयशस्वी होऊ शकतात.

टॅरो

शुभ रंग - क्रिम

शुभ संख्या - 1

टॅरो कार्ड - 10 of cups

स्वत: पेक्षा जास्त, तुम्ही हा आठवडा इतरांच्या काळजीत घालवाल. जनसंपर्क आणि सामाजिक कार्याशी संबंधित योजना कराल. वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनाचा आनंद घेण्यासही तुम्ही प्राधान्य द्याल. जुने जवळचे मित्र भेटतील. मालमत्तेशी संबंधित कामे मार्गी लागतील.

सोमवारी शत्रू वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील. उत्पन्न कमी राहील आणि चेहऱ्यावर जखम होऊ शकते. मंगळवार ते बुधवारी उत्पन्न वाढेल आणि मित्रांचे सहकार्य मिळेल. नोकरीत अधिकारी सहकार्य करतील आणि मुलांचे सहकार्यही मिळेल. गुरुवारी चिंतेचे कारण उदभवू शकेल.एखाद्या व्यक्तीकडून फसवणूक होण्याची शक्यता. खर्च वाढतील. शुक्रवार देखील संपूर्ण दिवस आणि रात्र काळ वाईट असेल. कामे वेळेवर होणार नाहीत आणि निराशेची भावना निर्माण होईल. शनिवारी वेळ अनुकूल राहील. यश मिळेल.

टॅरो

शुभ रंग - पिस्ता

शुभ संख्या - 2

टॅरो कार्ड- 2 of swords

शांततेचा हा काळ आहे. कमी कष्टातही तुमचे काम आणि व्यवसाय सुरळीत चालेल. स्त्रिया घरात रमतील. वैयक्तिक विकासाकडे लक्ष केंद्रित करा. योग्य विश्रांती घेण्याची वेळ आली आहे. या आठवड्यात विद्यार्थी त्यांच्या परीक्षेत चांगली कामगिरी करतील.

येणारा आठवडा कसा असेल हे अंकशास्त्राद्वारे डॉ. बबीना बोहरा यांच्याकडून जाणून घ्या…

आठवड्याच्या सुरुवातीला करिअर-व्यवसायात पुढे जाण्याच्या चांगल्या संधी मिळू शकतात. मित्र किंवा हितचिंतक यांच्या मदतीने दीर्घकाळ रखडलेली कामे पूर्ण होतील. आठवड्याच्या मध्यात आर्थिक लाभासोबत धार्मिक वातावरण राहील. या दरम्यान, तुमचा सामाजिक किंवा कोणत्याही धर्मादाय कार्यात पूर्ण सहभाग असेल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला काही महत्त्वाच्या कामासाठी लांब प्रवास करावा लागू शकतो. वैवाहिक जीवनात गोडवा राहील.

आठवड्याच्या सुरुवातीला कामाच्या योजनेसाठी कठोर परिश्रम करावे लागतील. या दरम्यान, तुमच्या नियोजित योजनांना यश मिळेल, परंतु आठवड्याच्या शेवटी, तुमच्या योजनांमध्ये सकारात्मक प्रगती दिसून येईल. स्नेही मित्रांसह प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने एखादी मोठी समस्या सोडवाल. कामाच्या व्यस्ततेमध्ये तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे आणि नातेसंबंधांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. जोडीदाराकडून कठीण काळात पूर्ण सहकार्य मिळेल.

जीवनाशी संबंधित सर्व लहान-मोठे निर्णय संयमाने आणि विवेकाने घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही गोंधळलेल्या स्थितीत आहात, तर निर्णय काही काळ पुढे ढकलणे योग्य ठरेल. अनावश्यक गोष्टींवर जास्त पैसा खर्च केल्याने मन दुखी राहील. आठवड्याच्या पूर्वार्धाच्या तुलनेत उत्तरार्ध काहीसा चांगला सिद्ध होईल. आर्थिक लाभाचे योग येतील. चांगल्या मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल.प्रेमप्रकरणात कोणत्याही प्रकारची घाई टाळा. वैवाहिक जीवनात गोडवा टिकवण्यासाठी जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करणे टाळा.वाहने हळू चालवा इजा होण्याचा धोका आहे.

हा आठवडा शुभ परिणाम देणारा ठरेल. करिअर-व्यवसायाच्या दिशेने केलेल्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल. अपूर्ण कामे एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या मदतीने पूर्ण होतील. आजारी लोकांच्या तब्येतीत सकारात्मक सुधारणा दिसून येईल. मात्र, आरोग्याबाबत कोणतीही निष्काळजीपणा टाळा. व्यवसायात गती येईल. आठवड्याच्या शेवटी सोयीच्या गोष्टींवर पैसा खर्च होईल. जोडीदाराकडून सरप्राईज गिफ्ट मिळू शकते. आयुष्याशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घेताना पालकांचे पूर्ण सहकार्य मिळेल.

आठवड्याच्या सुरुवातीला नोकरी किंवा व्यवसायात व्यस्तता वाढेल. जमीन आणि इमारतीशी संबंधित काही वादांना सामोरे जावे लागू शकते. व्यवसायात व्यवहार करताना सावधगिरी बाळगा, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता. या काळात संयमाने काम करा आणि जोखीम घेणे टाळा. परीक्षा-स्पर्धेत गुंतलेल्या विद्यार्थ्यांचे मन अभ्यासापासून विचलित होऊ शकते. निष्काळजीपणामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.अंमली पदार्थांपासून दूर राहा. प्रेमप्रकरण असो किंवा वैवाहिक जीवन कोणताही मोठा निर्णय घेणे टाळा.

हा आठवडा आनंद आणि यशाने भरलेला आहे. आठवड्याच्या सुरुवातीला कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. प्रिय व्यक्तीला भेटल्यावर जुन्या आठवणी ताज्या होतील. धार्मिक व सामाजिक कार्यात रस घ्याल. कार्यक्षेत्रात वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचे सहकार्य मिळेल. सत्ताधारी पक्षाकडून लाभ मिळण्याची शक्यता आहे. राजकारणाशी संबंधित लोकांना काही महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. भावनेच्या भरात कुटुंबाशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घेणे टाळा.आरोग्याशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

या आठवड्यात कामाच्या ठिकाणी विरोधक तुम्हाला तुमच्या ध्येयापासून विचलित करण्याचा प्रयत्न करू शकतात. आठवड्याच्या उत्तरार्धात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या दरम्यान तुम्ही जर जिद्दीने काम केले तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. प्रतिष्ठेत वाढ होईल. लोक तुमच्या निर्णयाचे कौतुक करतील. प्रेम संबंधात कोणत्याही प्रकारची घाई टाळा. वैवाहिक जीवनात गोडवा राहील.

या आठवड्यात करिअर असो किंवा व्यवसाय, तुम्हाला चढ-उतारांचा सामना करावा लागेल. धनलाभ आणि पदोन्नती इत्यादींची शक्यता राहील, तर आठवड्याच्या उत्तरार्धात सुख-सुविधांवर जास्त पैसा खर्च झाल्यास मन नाराज राहील. महिलांचा जास्तीत जास्त वेळ उपासनेत जाईल. अविवाहित लोकांसाठी वैवाहिक प्रस्ताव येऊ शकतात. एखाद्या उच्च प्रतिष्ठित व्यक्तीच्या मदतीने दीर्घकाळ प्रलंबित असलेले काम पूर्ण होईल. वैवाहिक जीवनात आणि प्रेमसंबंधात वाद होऊ शकतात.

ज्या संधीची वाट पाहत होतात ती या आठवड्यात तुम्हाला एखाद्या खास व्यक्तीच्या मदतीने मिळू शकते. करिअर-व्यवसायाला नवी दिशा मिळेल. बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळतील. समाजात मान-सन्मान वाढेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. प्रेम संबंधात येणारे अडथळे दूर होतील आणि जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.आरोग्याची काळजी घ्या आणि काळजीपूर्वक वाहन चालवा. दुखापत होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...