आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्जरी लाइफ:ब्राझीलचा फुटबॉल स्टार नेमार; वयाच्या 17 व्या वर्षापासून खेळतोय फुटबॉल, यावर्षीचे उत्पन्न 700 कोटी

आतिश कुमार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेमार ज्युनियर… पूर्ण नाव नेमार दा सिल्वा सँटोस ज्युनियर. सध्या ब्राझील फुटबॉल संघाचा कर्णधार आणि जगातील सर्वोत्तम फुटबॉल खेळाडूंपैकी एक आहे. याच वर्षी, फोर्ब्सने त्याला जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या क्रमवारीत चौथे स्थान दिले आहे. 2022 मध्ये नेमारची अंदाजे कमाई 95 मिलियन डॉलर म्हणजेच 700 कोटी रुपये आहे. नेमार पॅरिस सेंट-जर्मेन (PSG) आणि ब्राझील राष्ट्रीय संघासाठी फॉरवर्ड म्हणून खेळतो. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षापासून व्यावसायिक फुटबॉल खेळणारा नेमार आज त्याच्या खेळासोबतच लक्झरीसाठीही ओळखला जातो. मात्र, नेमारचा ब्राझील संघ फिफा विश्वचषकातून बाहेर पडला आहे.

आज लक्झरी लाइफमध्ये, जाणून घ्या नेमारच्या ऑफ ग्राउंड लक्झरी लाइफबद्दल…

ब्राझीलमधील रिओ येथे आलिशान घर

FC Barcelona नंतर Paris Saint-Germain FC मध्ये सामील होऊन नेमार 2017 मध्ये जगातील सर्वात महागडा खेळाडू बनला. याच्या बरोबर एक वर्ष आधी म्हणजे 2016 मध्ये नेमारने ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे हे घर विकत घेतले होते. 3 एकरात पसरलेल्या या घराची किंमत सुमारे 70 कोटी आहे. 6 बेडरुम असलेल्या या घरामध्ये हेलिपॅड ते टेनिस कोर्टचा देखील समावेश आहे. नेमारचे घर शहरातील त्याच भागात आहे जिथे सिल्वेस्टर स्टॅलोनचा चित्रपट द एक्सपेंडेबल्स शूट झाला होता.

वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी सर्वात महागडा फुटबॉलपटू बनला

नेमार ज्युनियरने वयाच्या 17 व्या वर्षी व्यावसायिक फुटबॉलमध्ये पदार्पण केले. त्याच वर्षी त्यांची कमाई 10 हजार डॉलर्स म्हणजेच सात लाख रुपयांच्या पुढे गेली होती. पण ही फक्त सुरुवात होती. ऑगस्ट 2017 मध्ये, नेमारने बार्सिलोना सोडले आणि पॅरिस सेंट-जर्मेन क्लबशी करार केला तेव्हा त्याला 222 मिलियन युरो म्हणजेच 19 हजार कोटी रुपये मिळाले. यामुळे तो जगातील सर्वात महागडा फुटबॉलपटू बनला. तेव्हा त्यांचे वय 26 वर्षे होते.

नेमारकडे दोन खासगी जेट आणि एक हेलिकॉप्टर

नेमार आणि त्याचे कस्टमाइज हेलिकॉप्टर
नेमार आणि त्याचे कस्टमाइज हेलिकॉप्टर

Phenom 100। 2011 हे नेमारचे पहिले खासगी जेट आहे. 2011 मध्ये बनवलेल्या या जेटची किंमत 33 कोटी रुपये आहे. याशिवाय नेमारने 2016 मध्ये दुसरे खासगी जेट खरेदी केले होते. Cessna Citation 680 नावाच्या या जेटची किंमत 41 कोटी रुपये आहे. याशिवाय नेमारकडे कस्टमाइज हेलिकॉप्टरही आहे. या हेलिकॉप्टरच्या टेलवर नेमारच्या नावाचा आरंभिक NJR देखील लिहिलेले आहे. 2013 मध्ये खरेदी केलेल्या या हेलिकॉप्टरची किंमत 30 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

लक्झरी कारचाही संग्रह

नेमारकडे आलिशान गाड्यांचाही मोठा संग्रह आहे. नेमारला वेगवान गाड्या इतक्या आवडतात की त्याच्या गॅरेजमध्ये 80 कोटी रुपयांपर्यंतच्या गाड्या पार्क केल्या जातात. 30 वर्षीय नेमारकडे फेरारी, ऑडी ते लॅम्बोर्गिनी यांसारख्या ब्रँडच्या कार आहेत. यापैकी नेमारला अनेकदा 5 कोटी रुपयांची फेरारी GTC4 Lusso आणि 2.50 कोटी रुपयांची Audi RS7 गाडी चालवताना दिसला आहे.

टॅटूचा शौकीन नेमार, त्याच्या शरीरावर जवळपास 80 टॅटू

नेमारच्या शरीरावर स्पायडरमॅन आणि बॅटमॅनचा टॅटू
नेमारच्या शरीरावर स्पायडरमॅन आणि बॅटमॅनचा टॅटू

नेमार हा जगातील सर्वात फॅशनेबल फुटबॉलपटूंपैकी एक आहे. तो त्याच्या स्टायलिश स्टाइलसाठीही ओळखला जातो. यासोबतचच्या इतर फुटबॉलपटूंप्रमाणे नेमारलाही टॅटूचा शौक आहे. एका रिपोर्टवर विश्वास ठेवला तर, नेमारच्या शरीरावर जवळपास 80 टॅटू आहेत, त्यापैकी 46 कायमस्वरूपी आहेत. हे टॅटू त्याच्या आईच्या चित्रापासून ते प्रेम आणि त्याच्या मुलाच्या नावावरील विचारांपर्यंतचे आहेत.

नेमारने एक यॉट देखील खरेदी केली

नेमार त्याच्या मित्रासोबत यॉटवर
नेमार त्याच्या मित्रासोबत यॉटवर

आलिशान जीवन, हवा, पाणी आणि रस्ता यांचा शौकीन नेमारला सर्वत्र महागड्या राइड्सचा शौक आहे. यामुळेच नेमारने प्रायव्हेट जेट, लक्झरी कार आणि हेलिकॉप्टर याशिवाय एक यॉटही खरेदी केली आहे. या यॉटची किंमत सुमारे 235 कोटी आहे. त्याने त्याचे नाव 'नदाइन' ठेवले आहे जे त्याच्या आईचे नाव आहे.

19 वर्षी झाला बाप, पण अजून लग्न केले नाही

नेमारने आपल्या कौशल्यामुळे लहान वयातच पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही मिळवले. यादरम्यान त्यांच्या नात्याबाबतही अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. नेमार वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी वडील झाला. त्यानंतर तो कॅरोलिना डांटासला डेट करत होता, जी त्याच्या मुलाची, डेवी लुकाची आई आहे. नेमार बाप झाला पण त्याने अजून लग्न केलेले नाही, कॅरोलिनासोबत ब्रेकअप झाल्यानंतर त्याचे नाव अनेक मुलींसोबत जोडले गेले.

बातम्या आणखी आहेत...