आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशाला वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक मिळवून देणारी बॉक्सर निखत झरीनसाठी खेळात धर्म महत्त्वाचा नाही. ती जेव्हाही कोणतीही स्पर्धा खेळते तेव्हा देशासाठी पदक जिंकणे हेच तिचे ध्येय असते. खुद्द निखत झरीननेच हे सांगितले आहे. निखत ही तिच बॉक्सर आहे, जीने मेरी कोम सारख्या दिग्गज बॉक्सरला अनेक गोष्टीत मात दिली आहे.
हिजाब वादाच्या प्रश्नावर ही 26 वर्षीय बॉक्सर म्हणाली की, 'खेळात माझ्यासाठी कोणताही धर्म महत्त्वाचा नाही. आम्ही येथे देशाचे प्रतिनिधित्व करतो आणि देशासाठी पदके जिंकणे हेच आमचे ध्येय असते.’
भोपाळ येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय महिला बॉक्सिंग स्पर्धेत ती सहभागी झाली आहे. निखतने पहिला सामना सहज जिंकला. रेफ्रींना सामना थांबवावा लागला यावरून निखतच्या आक्रमकतेचा अंदाज लावता येतो.
पहिल्या विजयानंतर निकतने दिव्य मराठी नेटवर्कसोबत हिजाबचा वाद, ड्रेस कोड आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेची तयारी यावर थोडक्यात संवाद साधला.
त्याचे उतारे वाचा...
प्रश्न : या स्पर्धेकडे तु कसे पाहते?
वर्ल्ड चॅम्पियनशिपची तयारी म्हणून मला ही स्पर्धा दिसते. या वर्षातील ही शेवटची स्पर्धा आहे. त्यामुळे मला आशा आहे की, येथेही सुवर्ण जिंकावे आणि या वर्षाचा शेवट सुवर्णाने होईल.
प्रश्न : पुढील वर्षी 15 मार्चपासून भारत वर्ल्ड चॅम्पियनशिपचे यजमानपद भूषवणार आहे आणि सर्वांच्या नजरा तुमच्याकडे असतील. तुमची तयारी कशी आहे?
तयारी चांगलीच असेल. मी पूर्वीपेक्षा जास्त मेहनत करेन, कारण चॅम्पियनशिप भारतात होत आहे, त्यामुळे लोकांच्या माझ्याकडून अपेक्षाही खूप वाढतील. मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेन आणि यावेळीही या स्पर्धेत मी माझ्या देशासाठी सुवर्णपदक जिंकू शकेन.
प्रश्न: आज विजयाने सुरुवात केली, त्या बाउटवर काय सांगाल?
पहिल्या फेरीत RSC (रेफरी स्टॉप्ड द कॉन्टेस्ट) दिले खूप चांगले वाटले. मी हळू हळू सुधारेन. मी अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करेन.
प्रश्नः सलमान खानची तु मोठी फॅन आहे. त्याच्या कोणत्याही भेटीची घटना आमच्याशी शेअर करता येईल का?
मी त्यांना नुकतीच भेटले आणि त्यांच्या गाण्यावर आम्ही एकत्र व्हिडिओ बनवला. सलमान माझ्याशी खूप छान बोलले आणि आगामी स्पर्धेसाठी मला शुभेच्छा दिल्या. त्यांना भेटून आनंद झाला.
प्रश्न: पॅरिस ऑलिम्पिकसाठी निखतची तयारी काय आहे?
ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे अंतिम स्वप्न आहे. मला एकामागून एक स्पर्धांवर लक्ष केंद्रित करायचे आहे. सध्या मी राष्ट्रीय खेळ करत आहे, त्यामुळे मी फक्त त्यावरच लक्ष केंद्रित केले आहे. त्यानंतर माझे लक्ष वर्ल्ड चॅम्पियनशिपवर असेल.
प्रश्न : इराणमध्ये हिजाबवरून वाद सुरू आहे. उडुपीच्या सरकारी महाविद्यालयात मुलीला हिजाब घालून वर्गात जाण्यापासूनही रोखण्यात आले होते. एक मुलगी आणि बॉक्सर म्हणून तुम्ही ड्रेस कोड सिस्टीमवर काय म्हणाल?
मी एक खेळाडू आहे आणि या सर्व राजकीय गोष्टींवर भाष्य करू इच्छित नाही. जर आपण हिजाबबद्दल बोललो तर बॉक्सिंगमध्ये आंतरराष्ट्रीय संस्था हिजाब घालून खेळण्याची परवानगी देते. त्यामुळे येथे कोणतेही बंधन नाही. येथे तुम्ही तुमच्या धर्माचे पालन करू शकता आणि नियमांनुसार खेळू शकता.
प्रश्न: धर्म वेगळा आणि खेळ वेगळा, या गोष्टींवर शंका घेणे कितपत योग्य आहे?
खेळात माझ्यासाठी कोणताही धर्म महत्त्वाचा नाही. आम्ही येथे देशाचे प्रतिनिधित्व करतो आणि देशासाठी पदके जिंकणे हेच आमचे ध्येय आहे.
प्रश्न : आत्ता फायनलपूर्वी भजे खाण्यास नकार दिला होता. तू आहाराबद्दल किती गंभीर आहेस?
मी आहाराचे काटेकोरपणे पालन करते, कारण 50 किलोग्रॅममध्ये खेळण्यासाठी मला थोडे वजन कमी करावे लागेल आणि निरोगी आहारही ठेवावा लागेल. त्यामुळे मी बाहेरचे जेवण टाळते. उदाहरणार्थ, मला बिर्याणी खायला खूप आवडते. मी घरी गेल्यावर बिर्याणी खाते, पण बाहेर खाऊ शकत नाही. ही स्पर्धा संपताच मी आधी घरी जाऊन आईने बनवलेली बिर्याणी खाईन.
शेवटी पाहा निखत जरीनची कारकीर्द आणि यश...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.