आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांतच्या इच्छा पूर्ण करताहेत नीलोत्पल:सुशांतच्या इच्छेनुसार दोन अंध मुलांना दत्तक घेतले, एक लाख रोपेही लावली

इफत कुरेशी / अरुणिमा शुक्ला8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता सुशांत सिंह राजपूत हयात असता तर आज त्याचा 37 वा वाढदिवस असता. 14 जून 2020 रोजी जगाचा निरोप घेणाऱ्या सुशांतचा मृत्यू हे अजूनही न सुटलेले कोडे आहे. सीबीआय सुशांतने आत्महत्या केली की त्याची हत्या हे गूढ उकलण्याचा प्रयत्न करत आहे. अडीच वर्षे उलटली, पण सुशांतच्या मृत्यूचा मुद्दा अजूनही तापलेला आहे. सोशल मीडियाने या प्रकरणाची चर्चा कायम ठेवली आहे. जवळपास दररोज सुशांत सिंह राजपूतशी संबंधित एक हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करत आहे.

आज सुशांतच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही तुम्हाला त्या व्यक्तीची ओळख करून देत आहोत, ज्याने गेल्या अडीच वर्षांपासून सुशांतला लोकांच्या हृदयात जिवंत ठेवले आहे. सुशांतचा मृत्यू विसरता येणार नाही. सुशांतबाबत सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेल्या सर्व हॅशटॅगमागे एकच व्यक्ती आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

नीलोत्पल मृणाल याने सुशांतच्या मृत्यूच्या दिवसापासून त्याला न्याय मिळावा म्हणून सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यास सुरुवात केली. जसा जसा काळ लोटत गेला, या हॅशटॅगचा ट्रेंड वाढत गेला आहे. #Justice4SSR, #CBI4SSR, #Justiceforsushant हे असे डझनभर ट्रेंड आहेत, जे नीलोत्पल यांच्या प्रयत्नांचे परिणाम आहेत.

शेवटच्या प्रवासात सुशांतला खांदा देणार्‍या 5 लोकांमध्ये सुशांत सिंगच्या चुलत भावाचा मित्र नीलोत्पलचा समावेश आहे. आता नीलोत्पल सुशांतच्या स्मरणार्थ एक वेबसाइट देखील चालवतात, ज्याद्वारे जगभरातील चाहत्यांना जोडले आहे.

सुशांतच्या स्मरणार्थ रोपांची लागवड, गरिबांना खाऊचे वाटप, मुलांना शिष्यवृत्ती देणे, अशी अनेक कामे नीलोत्पल करत आहेत. सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी तो केवळ सोशल मीडियावर सक्रिय नाही तर सुशांतच्या अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यातही तो व्यस्त आहे. सुशांतची इच्छा होती की, झाडे लावावीत.

सुशांतची बहीण श्वेता आणि नीलोत्पल यांनी यासंदर्भात #Plant4SSR हॅशटॅग व्हायरल केला आणि लोकांना 1000 रोपे लावण्याचे आवाहन केले. त्यामुळे चाहत्यांनी 1 लाखाहून अधिक रोपे लावली. सुशांतच्या या वाढदिवशी तो दोन वर्षांसाठी दोन अंध मुलांची संपूर्ण जबाबदारी घेत आहे, कारण सुशांतने त्या मुलांच्या शाळेला वचन दिले होते.

दिव्य मराठी नेटवर्कने नीलोत्पलला सुशांतच्या सोशल मीडिया ट्रेंडबद्दल प्रश्न विचारला… त्याची उत्तरे वाचा…

प्रश्नः सुशांतला तुम्ही जवळून ओळखत होता का?

उत्तरः मी सुशांतचा चुलत भाऊ नीरज बबलूचा मित्र आहे. अंत्यसंस्कारात मी सुशांतला खांदाही दिला. त्याच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंब मुंबईत आले तेव्हा विमानतळावर त्यांना रिसीव्ह मीच केले. ज्या व्यक्तीला मी खांदा दिला आणि जेव्हा त्याला न्याय मिळाला नाही, तेव्हा त्याला न्याय मिळवून देणे आपले कर्तव्य आहे. त्याच्याशी माझे नाते हॅशटॅग आणि सोशल मीडियापेक्षा खूप जास्त आहे. पाटण्यातही तो आमचा शेजारी होता. बिहार पोलिस तपासासंदर्भात मुंबईत आले तेव्हा आम्हीही त्यांना खूप साथ दिली.

प्रश्‍न : सुशांतला तुम्ही लोकांच्या हृदयात कसे जिवंत ठेवले?

उत्तर : जेव्हा सुशांतला न्याय मिळत नव्हता तेव्हा आम्ही आवाज उठवण्यासाठी सोशल मीडियाला माध्यम बनवले. एक सुशांत गेला, पण आज लाखो सुशांत न्याय मागण्यासाठी उभे आहेत. तुम्ही ट्विटर ओपन केल्यास तुम्हाला अजूनही त्याच्या नावाचा हॅशटॅग दिसेल.

प्रश्नः सुशांतची ऑनलाइन मोहीम कशी सुरू झाली?

उत्तरः जेव्हा आम्ही पाहिले की, जागतिक स्तरावर सुशांतचे चाहते सोशल मीडियावर एकमेकांच्या ट्विटवर प्रतिक्रिया, रिट्विट, रिप्लाय देत होते तेव्हापासून याची सुरुवात झाली. सुशांतचे जगभरातील चाहते ट्विटर आणि फेसबुकवर जमले आणि हॅशटॅगचे समर्थन आणि ट्रेंड करून न्यायाची मागणी केली.

सुशांतला न्याय मिळावा हाच त्यांचा उद्देश आहे. सुशांत हा फक्त पाटणा किंवा बिहारचा नाही तर या देशाचा मुलगा आहे, ज्याने महिला सक्षमीकरण, केरळ पूर, आसाम पूर, गरीब मुलांना आधार दिला होता. ही सर्व कामे त्याने कधीच दाखवली नाहीत. तो न्यायास पात्र आहे.

प्रश्न: या मोहिमा नियोजनातून सुरू झाल्या की, फक्त लोक त्यात सहभागी होत राहिले?

उत्तर: immortalsushant.com या वेबसाइटवर जुलै 2020 ते एका वर्षाचा डेटा आहे, ज्यामध्ये सुशांतसाठीचे सर्व हॅशटॅग दररोज नमूद केले आहेत. #Plant4SSR मोहिमेद्वारे सुशांतच्या नावावर एक लाख झाडे लावण्यात आली, याचाही उल्लेख या साईटवर आहे.

सुशांतच्या नावावर 1 लाख झाडे लावली आहेत. त्याच्या नावाने एज्युकेशन फॉर सुशांत नावाची मोहीमही चालवण्यात आली आहे. सुशांत अर्थ डे देखील साजरा केला जातो, ज्यामध्ये जगभरातील लाखो लोकांनी त्या दिवशी दिवे बंद ठेवले.

प्रश्नः सुशांतची मोहीम कोण सांभाळते?

उत्तर: यामध्ये सांभळणारे असे काहीही नाही, फक्त जगभरातील लोक सोशल मीडियावर ट्रेंडिंग हॅशटॅग पाहतात आणि एकत्र होतात. सुशांतच्या स्मरणार्थ मी वेबसाइट तयार केली होती.

प्रश्‍न : या ऑनलाइन मोहिमेमुळे प्रकरणात काही बदल झाला आहे का?

उत्तर : बदल झाला आहे की नाही, हे मी सांगू शकत नाही, पण या माध्यमातून लोकांनी सुशांतची केस जिवंत ठेवली आहे. एजन्सीला काय वाटते ते फक्त एजन्सीच्या हातात आहे, परंतु सुशांत जिवंत आहे आणि त्याला चाहत्यांच्या माध्यमातून न्याय हवा आहे आणि तो त्याला पात्र आहे.

प्रश्न: या ऑनलाइन मोहिमांमध्ये किती लोक सामील आहेत?

उत्तर: किती लोक जोडलेले आहेत याचा अचूक डाटा मिळणे कठीण आहे, परंतु #SushantDay सुमारे 10 मिलियन म्हणजेच 1 कोटी लोकांनी ट्रेंड केला होता. याशिवाय चालवलेल्या सर्व मोहिमांमध्ये किमान 30-40 जणांचा सहभाग होता. त्यांची सरासरी 3-4 मिलियन होती. आजही 1 लाख लोक नियमितपणे ट्विट करतात.

सुशांतच्या मृत्यूनंतर हा फोटो खूप चर्चेत होता. या फोटोवर लोकांनी म्हटले की, इतका हुशार माणूस कधीच आत्महत्येसारखे पाऊल उचलू शकत नाही.
सुशांतच्या मृत्यूनंतर हा फोटो खूप चर्चेत होता. या फोटोवर लोकांनी म्हटले की, इतका हुशार माणूस कधीच आत्महत्येसारखे पाऊल उचलू शकत नाही.

प्रश्नः सुशांतच्या मृत्यूबाबत जे अपडेट्स येत आहेत त्यावर तुम्ही समाधानी आहात का?

उत्तरः सुशांतचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट अद्याप समोर आलेला नाही. तो अहवाल सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे, परंतु सीबीआयने आत्महत्या घोषित केलेली नाही. हे फक्त मीडिया चॅनेलवर किंवा छोट्या टीव्ही स्टार्सच्या तोंडून ऐकले आहे. जोपर्यंत सीबीआय याला आत्महत्या म्हणत नाही, तोपर्यंत कोणी काय बोलले याने काही फरक पडत नाही.

सीबीआयने ही आत्महत्या मानली असती तर खटला बंद झाला असता आणि तसे झाले नाही तर लोकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

सुशांतच्या मृत्यूला अडीच वर्षे झाली तरी सीबीआयने अद्याप कोणताही क्लोजर रिपोर्ट दिलेला नाही. याचा अर्थ असा की, नक्कीच काहीतरी आहे, ज्यामुळे निर्णय येण्यास विलंब होतोय.

प्रश्न : सुशांतच्या मृत्यूला षडयंत्र म्हटले जात आहे, तुम्हाला काय वाटते?

उत्तर : सुशांत त्याच्या आयुष्यातला एक यशस्वी व्यक्ती होता. हा प्रकार घडला तेव्हा त्यांच्या बँक खात्यात 4 कोटी रुपये होते. त्या पैशाने सुशांतला त्याचे आयुष्य खूप चांगले घालवता आले असते. मोठमोठे ब्रँड एंडोर्समेंट होते, त्यामुळे त्याने असे पाऊल उचलण्याचे कारण नव्हते. हे सर्व एजन्सी अधिक चांगल्या प्रकारे सांगेल, परंतु आम्ही अपेक्षा करतो की ज्या माणसाने 11 चित्रपट केले आहेत, त्याने 4 ब्लॉकबस्टर दिले आहेत. एवढ्या मोठ्या व्यक्तीमत्वाला न्याय मिळत नसेल तर या देशात सामान्य माणसाला न्याय कसा मिळणार.

प्रश्न : सुशांतने आत्महत्या केली नसल्याचे कूपर रुग्णालयातील कर्मचाऱ्याने म्हटले आहे, यावर काय म्हणायचे?

उत्तरः होय, रूपकुमार शाह यांनी वर्षभरापूर्वी दावा केला होता. त्यांना त्यावेळी सरकारची भीती वाटली असेल, किंवा सुरक्षेची भीती वाटली असेल, पण जेव्हा ते समोरून बोलत असतील तेव्हा त्यांनी सीबीआयच्या कार्यालयात जाऊन त्यांचे म्हणणे नोंदवून घ्यावे. कोणीतरी येऊन त्यांचे म्हणणे घेईल याची वाट पाहू नये. सीबीआयची कार्यालये भारतातील प्रत्येक राज्यात आहेत, त्यांनी स्वतः जाऊन जबाब नोंदवून घ्यावा, त्यामुळे या प्रकरणात मदत होईल.

प्रश्न : सुशांतला न्याय कसा मिळेल असे तुम्हाला वाटते?

उत्तर : इंडस्ट्रीने सुशांतवर अन्याय केला आहे. तो ज्या उद्योगात होता, त्या उद्योगाने त्याला साथ दिली नाही. लोक उद्योगावर बहिष्कार टाकत असल्याचे बघायला मिळते. पुन्हा कोणी सुशांत बनू नये, असे काही झाले पाहिजे. जो कोणी दोषी असेल त्याला अशी शिक्षा झाली पाहिजे की, असा अन्याय पुन्हा करण्यापूर्वी एखादा शंभर वेळा विचार करेल. तो आज ज्या इंडस्ट्रीचा भाग होता त्याची काय अवस्था आहे हे कोणापासून लपलेले नाही. सुशांतसाठी न्याय हाच असेल की सुशांत सारखे आता इतर कोणत्याही व्यक्तीसोबत घडू नये.

प्रश्नः सीबीआयनेही आत्महत्या मानली तर काय होईल?

उत्तर : लोकांची व्यवस्थेकडून निराशा होईल, नाराजी वाढेल. न्याय मागणारे सामान्य लोक आहेत, ते फार काही करू शकणार नाहीत, पण त्यांचा देश, व्यवस्था आणि सरकारवरील विश्वास उडेल. आज न्याय न मिळाल्याने उद्योगावर बहिष्कार टाकला जात आहे, न्याय मिळाला नाही तर उद्योगाचे काय होईल याची कल्पना करा, कारण या प्रकरणाशी लोकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. लोक सुशांतला त्यांच्या मुलांमध्ये पाहतात, रोज सुशांत ट्रेंडचा विचार करतात आणि जर न्याय मिळाला नाही आणि सुमारे 2 लाख लोक दररोज एखाद्या गोष्टीवर बहिष्कार टाकतात तर कसे वातावरण होईल.

3 जून 2020 रोजी सुशांतने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट केलेला हा शेवटचा फोटो आहे. या फोटोत सुशांत व्यतिरिक्त त्याची आई देखील आहे.
3 जून 2020 रोजी सुशांतने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट केलेला हा शेवटचा फोटो आहे. या फोटोत सुशांत व्यतिरिक्त त्याची आई देखील आहे.

प्रश्‍न : मोहीम राबवण्यासाठी निधी कुठून येतो?

उत्तर : या मोहिमेसाठी आजपर्यंत कोणताही मोठा निधी उपलब्ध झालेला नाही. देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक या मोहिमेचा एक भाग आहेत. सुशांतच्या आठवणीत प्रत्येक जण वेळोवेळी स्वतःच्या इच्छेनुसार काहीतरी करत असतो. कधी कोणी झाड लावतो, तर कधी सुशांतच्या चित्रपटाच्या शूटिंग लोकेशनवर कोणी वॉटर प्लांट लावतो.

प्रश्नः सुशांतच्या वाढदिवसाला तुम्ही काय करणार आहात?

उत्तरः 21 जानेवारी रोजी सुशांतच्या जयंतीदिनी, आम्ही रांचीमधील एका अंध शाळेतील दोन मुलांसाठी अन्न आणि इतर गोष्टी प्रायोजित केल्या आहेत. हे वचन सुशांतने शाळेतील मुलांना दिले होते, जे आम्ही त्यांच्या वतीने पूर्ण केले आहे. यासोबतच गरजूंना ब्लँकेटचेही वाटप करण्यात येत आहे. 21 जानेवारीला आम्ही मुंबईत प्रार्थना सभेचे आयोजनही केले आहे. प्रत्येक चांगल्या कृतीतून आम्ही सुशांतची आठवण करत असतो.

सुशांतच्या या वाढदिवसानिमित्त नीलोत्पल मृणाल दोन वर्षांसाठी दोन अंध मुलांची संपूर्ण जबाबदारी घेत आहे, कारण सुशांतने त्या मुलांच्या शाळेला तसे वचन दिले होते.
सुशांतच्या या वाढदिवसानिमित्त नीलोत्पल मृणाल दोन वर्षांसाठी दोन अंध मुलांची संपूर्ण जबाबदारी घेत आहे, कारण सुशांतने त्या मुलांच्या शाळेला तसे वचन दिले होते.

सुशांत सोशल मीडियावर सतत ट्रेंडमध्ये असतो

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अचानक त्याच्या फॉलोअर्समध्ये 40 लाखांची वाढ झाली. त्याच्या नावावर चाहत्यांनी 80 हजार फेक ट्विटर अकाऊंट तयार केले, ज्याद्वारे सुशांतला न्याय देण्याची मागणी होत होती. कधी ट्विटरवर सुशांतचे नाव ट्रेंडमध्ये राहिले तर कधी सुशांतच्या चाहत्यांनी त्याची आठवण करून सामाजिक कार्यात भाग घेतला. सुशांतचे सर्वात ट्रेंडिंग हॅशटॅग, त्याची सर्वाधिक लोकप्रिय मोहीम आणि स्वतः सुशांतचे सोशल मीडिया खाते पाहा-

हॅशटॅगद्वारे सुशांत सिंह राजपूतची विश लिस्ट पूर्ण करताहेत चाहते

#Plant4SSR

या मोहिमेशी संबंधित लोकांनी मोठ्या प्रमाणात रोपे लावली आहे. ही मोहीम 13 सप्टेंबर 2020 रोजी झाली, ज्यामध्ये सुशांतची बहीण श्वेता सिंह कीर्ती (सुशांतची बहीण) हिने चाहत्यांना 1,000 रोपे लावण्याचे आवाहन केले. या मोहिमेत लाखो लोक सामील झाले आणि 1 लाख रोपे लावण्यात आली.

सुशांतच्या मृत्यूनंतर एक डायरी सापडली ज्यामध्ये त्याने 50 इच्छा लिहिल्या होत्या. 1000 झाडे लावण्याचे त्यांचे स्वप्न होते, जे त्यांच्या निधनानंतर चाहत्यांनी पूर्ण केले. परदेशात राहणारे सुशांतचे चाहतेही या मोहिमेशी जोडले गेले होते.

#Feed4SSR

कोरोनाच्या काळात सुशांतच्या चाहत्यांनी त्याच्यासाठी फीड फॉर सुशांत नावाची एक ऑनलाइन मोहीम सुरू केली, ज्याद्वारे सुशांतच्या चाहत्यांनी देशभरात आणि जगभरात पसरलेल्या गरजूंना अन्न दिले आणि किराणा दान केला.

#Candle4Sushant

ऑनलाइन मोहीम #Candle4SSR 22 जुलै 2020 रोजी सुरू करण्यात आली. सुमारे 1 लाख लोक या मोहिमेत सामील झाले ज्यांनी घरोघरी सुशांतसाठी मेणबत्त्या पेटवल्या. सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे देखील या मोहिमेचा एक भाग बनली.

सुशांत अजूनही सोशल मीडियावर जिवंत

#SSR, #Justice4SSR, Cbi4SSR हे हॅशटॅग आहेत जे 14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूपासून कायम फिरत आहेत. सुशांतच्या मृत्यूनंतर 1 वर्षापर्यंत त्याच्या नावाचे हॅशटॅग सतत ट्रेंड करत होते.

#SushantJusticeMatters जगभरात ट्रेंड झाला

14 जानेवारी 2021. सुशांत सिंह राजपूतच्या जयंतीनिमित्त सुशांत जस्टिस मॅटर्स या हॅशटॅग आणि टॅगलाइनसह एक ट्विट करण्यात आले. हे ट्विट समोर आल्यानंतर अवघ्या 40 मिनिटांत या हॅशटॅगसह 1,29,000 ट्विट झाले, ज्यामुळे हा भारतातील टॉप ट्रेंडिंग हॅशटॅग बनला. सकाळी 1 वाजेपर्यंत ट्विटची संख्या 2,19,000 वर पोहोचली आणि दुपारी 4:45 पर्यंत या हॅशटॅगसह सुमारे 1.44 दशलक्ष ट्विट केले गेले. म्हणजे मध्यरात्री सुमारे 14 लाख लोकांनी सुशांतसाठी ट्विट केले. 14 जून 2021 रोजी सकाळी हा हॅशटॅग जगभरात ट्रेंड करत होता. या हॅशटॅगसह 89% ट्विट रिट्विट करण्यात आले.

मृत्यूपूर्वी सुशांत चर्चेत नव्हता

सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट 2019 चा ड्राईव्ह होता जो नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा करण्यात आली नव्हती आणि 14 जून 2020 पूर्वी सुशांतची फारशी चर्चा झाली नव्हती. 13 जून 2020 पर्यंत सोशल मीडियावर केवळ 1457 लोकांनी सुशांतचे नाव वापरले होते, परंतु त्याच्या मृत्यूनंतर लगेचच ट्विटची संख्या 30056 झाली.

सुशांतच्या मृत्यूनंतर 80 हजार बनावट खाती

14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर, ट्विटरवर सुमारे 80,000 बनावट खाती तयार करण्यात आली होती, ज्याद्वारे सुशांतला न्याय मिळावा यासाठी सातत्याने मागणी केली जात होती आणि त्याचवेळी मुंबई पोलिसांना लक्ष्य करण्यात आले होते. मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी सांगितले की, लोक सुशांतच्या नावाखाली मुंबई पोलिसांची बदनामी करत आहेत.

मृत्यूनंतर 4 मिलियन फॉलोअर्स वाढले

सुशांतच्या मृत्यूच्या वेळी, त्याचे इंस्टाग्रामवर 9 मिलियन म्हणजेच 90 लाख फॉलोअर्स होते, जे त्याच्या मृत्यूनंतर 13 मिलियन म्हणजेच 1 कोटी 30 लाख झाले आहेत.

रिमेम्बरिंग टॅग मिळवणारी पहिली भारतीय सेलिब्रिटी

सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर रिमेम्बरिंग टॅग जोडला गेला आहे. हे फिचर Instagram ने एप्रिल 2020 मध्ये लाँच केले होते, जे त्याच्या मृत्यूनंतर Instagram वापरकर्त्याच्या प्रोफाइलवर दिसते. यावरून इंस्टाग्राम वापरकर्त्याचा मृत्यू झाल्याचे दिसून येते. सुशांत सिंह राजपूत हा पहिला भारतीय सेलिब्रिटी आहे ज्यांच्या प्रोफाइलमध्ये हा टॅग आहे.

सुशांतच्या वडिलांपासून ते पोहोचणाऱ्या इन्स्पेक्टरपर्यंत सर्वांशी दिव्य मराठीची चर्चा

सुशांतचे वडील केके सिंह यांनी पाटणा येथील रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल केली. तिच्यावर फसवणूक आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता-

वडील केके सिंह- आम्ही केके सिंह यांना फोन केला, पण घरच्या केअरटेकरने फोन उचलला. तो म्हणाला- सुशांतचे वडील घरी नाहीत, ते काही दिवसांसाठी बाहेर गेले आहेत. असे बोलून त्याने कॉल कट केला.

बिहारचे माजी पोलिस महासंचालक (डीजीपी) गुप्तेश्वर पांडे यांनी मुंबई पोलिसांवर अनेक गंभीर आरोप केले होते आणि तत्कालीन सरकारवरही निशाणा साधला होता.

गुप्तेश्वर पांडे यांचे वक्तव्य- गुप्तेश्वर पांडे यांचे म्हणणे आहे की, 2 वर्षांनंतरही सीबीआयला कोणताही क्लोजर रिपोर्ट देता आलेला नाही कारण त्यांचे काम संपूर्ण यंत्रणेने केले आहे, त्यामुळे विलंब होणे अपरिहार्य आहे.

ते म्हणतात, 2020 मध्ये बिहारहून मुंबईत एक टीम तपासासाठी गेली होती, तेव्हा मुंबई पोलिसांनी त्यांना तपास करण्यापासून रोखले होते. आमच्या अधिकाऱ्याला विनाकारण तुरुंगात टाकले. यामुळे केवळ मलाच नाही तर संपूर्ण देशाला संशय आला की, हे लोक काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. आमचे एक आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना बळजबरीने क्वारंटाईन करण्यात आले, ज्यामुळे केसवर परिणाम होईल.

मी आधीही सांगत होतो आणि आता सांगतोय की, आमच्या पथकाला तपासादरम्यान मुंबई पोलिसांकडून पूर्ण सहकार्य मिळाले असते, तर कदाचित प्रकरणातील सत्य समोर आले असते.

सुशांतच्या कुटुंबाशी सध्या माझा कोणताही संपर्क नाही, पण या प्रकरणाचे संपूर्ण सत्य जगासमोर यावे अशी माझी इच्छा आहे. यासोबतच सुशांतलाही न्याय मिळाला हवा.

बातम्या आणखी आहेत...