आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राउंड रिपोर्टदुमका जळीतकांड: दोन्ही रुग्णालयातील ग्राऊंड रिपोर्ट:बर्न वॉर्डात AC नव्हता, मलमही नव्हते; 28 तासांनंतर पहिली ड्रेसिंग

लेखक: वैभव पळनीटकर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

'मला सकाळी सुमारे साडेचार वाजता फोन आला की कांड झाले आहे, लवकर घरी या. मी दुचाकी काढली आणि सासुरवाडीकडे निघालो. घरी पोहोचताच बघितले की साली जळालेल्या अवस्थेत वेदनांनी विव्हळत आहे. मी लगेच ऑटो घेऊन आलो. तिला आम्ही दुमकाच्या सदर रुग्णालयात घेऊन गेलो. तिला खासगी रुग्णालयात न्यायची इच्छा होती, पण आमच्याकडे पैसे नव्हते. रुग्णालयात गेल्यानंतर आधी इमर्जन्सी वॉर्डात नेले. जिल्ह्यातील हे सर्वात मोठे रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय आहे. पण तिथे जळाल्यानंतर लावायचे मलमही नव्हते. मी बाहेर गेलो आणि मेडिकलमधून मलम घेऊन आलो. तेव्हा माझ्या सालीवर उपचार सुरू झाले. झारखंडच्या दुमकामधील पेटवून दिलेल्या 16 वर्षीय पीडितेच्या भावोजींनी आम्हाला हे सांगितले आहे. मुलगी घरात झोपलेली असताना 23 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास शाहरुख नावाच्या मुलाने पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले होते. 5 दिवसांच्या उपचारांनंतर 28 ऑगस्ट रोजी या मुलीचा मृत्यू झाला.

या 5 दिवसांत तिचे भावोजी दुमकाच्या सरकारी रुग्णालयापासून ते राँचीच्या रिम्सपर्यंत तिच्या सोबत होते. उपचाराचा खर्चही त्यांनीच केला.
सदर रुग्णालयात ड्रेसिंग केली नाही
सर्वात आधी आम्ही दुमकाच्या सदर रुग्णालयात गेल्याचे मुलीचे भावोजी म्हणाले. तिथे तिच्यावर ड्रेसिंगही करण्यात आले नाही. यानंतर तिला इमर्जन्सी वॉर्डातून बर्न वॉर्डात नेले. पण तो केवळ म्हणालया बर्न वॉर्ड होता. इथे केवळ बेड आणि पंखा होता. एसी होता पण काम करत नव्हता. बाकी सर्व साध्या वॉर्डासारखेच होते. रुग्णालयात सलाईनशिवाय काहीही देण्यात आले नाही.
भावोजींशी बोलल्यानंतर आम्ही पीडितेला अॅडमिट केले होते, त्या वॉर्डात गेलो. तेव्हा तिथे एसी ठिक होता. उपचार घेत असलेले दुसरे रुग्ण म्हणाले की, मुलीची घटना घडल्यानंतर रुग्णालय व्यवस्थापनाने एसी ठिक केला आहे. आता उपचारही नीट होत आहेत.

आम्ही बर्न वॉर्डातील रुग्णांशी बोलत असतानाच तिथे रुग्णालयाचे सुप्रिटेंडंट आले आणि एसी चेक करायला लागले. आम्ही विचारले - 'सर आधी एसी खराब होता, आता ठिक केला आहे का?' ते म्हणाले की, 'काही दिवसांनंतर एसीची सर्व्हिसिंग होत असते. एसी खराब होते, म्हणून ठिक केले आहेत.' तेव्हा आम्ही विचारले की, हे जिल्ह्यातील सर्वात मोठे रुग्णालय आहे. वैद्यकीय महाविद्यालयही आहे, पण पीडितेला इथे मलमही मिळाले नाही. यावर ते म्हणाले की, 'मलम असते, पण काही गोष्टी कमी होत्या. ज्या ठिकाणी उपचार होत होते, तिथे मलम नव्हते. पहिल्या दिवशी जखमा खुल्या ठेवण्यात आल्या होत्या, पट्टी बांधली नव्हती.' दुमकाचे सर्जन डॉ. शशी कुमार यांनी मुलीवर प्राथमिक उपचार केले होते. त्यांनी सांगितले की, जेव्हा तिला आणण्यात आले तेव्हा ती 90 टक्के भाजलेली होती. आम्ही आमच्या क्षमतेनुसार आणि प्रोटोकॉलनुसार उपचार सुरू केले. बर्न केसमध्ये सर्वात महत्वाचे असते फ्लुएड सर्क्युलेशन. आम्ही 12-13 सलाईन दिले. सकाळी सुमारे 10 वाजता कुटुंबीयांना सांगितले की पुढील उपचारांसाठी राँचीला जावे लागेल.

सकाळी 10 वाजता राँचीला रेफर केले, अँब्युलन्स रात्री 10 वाजता मिळाली
दुमकामध्ये उपचारांच्या सुविधा कमी असल्याने डॉक्टरांनी मुलीला राँचीला रेफर केले. यानंतर तिच्या कुटुंबीयांसमोर नवी अडचण निर्माण झाली. उपचारांसाठी पैसे नव्हते. अँब्युलन्ससाठी कुठून आणणार? अशा केसमध्ये रुग्णालय व्यवस्थापनाने लगेच अँब्युलन्सची व्यवस्था करायला हवी होती, मात्र असे झाले नाही.
मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, आम्ही नातेवाईक आणि मित्रांना फोन करून पैसे गोळा करायला लागलो. राँची जाण्यापूर्वी किमान 10 हजार रुपये जवळ होणे गरजेचे होते. हे करता करता सायंकाळचे 5 वाजले. तरीही गरजेपुरते पैसे गोळा झाले नाही. नंतर काही नेत्यांना फोन केले, त्यांच्या मदतीने अँब्युलन्स मिळाली आणि रात्री सुमारे 10 वाजता आम्ही दुमकाहून राँचीकडे निघू शकलो.
28 तासांनंतर पहिली ड्रेसिंग झाली
24 ऑगस्ट रोजी सकाळपर्यंत घटना होऊन 24 तासांपेक्षा जास्त काळ लोटला होता. पीडिता झारखंडमधील सर्वात मोठे रुग्णालय रिम्समध्ये होती. काही वेळ कागदोपत्री सोपस्कारानंतर तिला दाखल करून घेण्यात आले. उपचार सुरू झाले. सुमारे 28 तासांनंतर रिम्समध्ये तिची ड्रेसिंग करण्यात आली. औषधे देण्यात आली.
सोशल मीडियावर मुलीचा व्हिडिओ आहे, ज्यात ती शाहरूखलाही अशाच शिक्षेबद्दल बोलते. हा व्हिडिओ 24 ऑगस्टच्या पहिल्या ड्रेसिंगनंतरचा आहे, असे तिचे भावोजी म्हणाले. त्या दिवशी तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. दाह कमी झाला होता. त्या दिवशी तिने जेवणही केले होते. हेच ड्रेसिंग आधी झाले असते, तर तिची रिकव्हरी कदाचित चांगली झाली असती असे ते म्हणाले.
रिम्समध्येही गरजेची औषधे मिळाली नाही, बाहेरून आणावी लागली
दुमका रुग्णालयातून रिम्समध्ये आधीच सांगण्यात आले होते की, सीरियस केस येत आहे. तरिही व्यवस्थापनाने काहीही तयारी केली नाही. पीडितेच्या कुटुंबीयांनुसार, रुग्णालयाकडे उपचारासाठीची औषधेही नव्हती. बहुतांश औषधे आम्हाला स्वतःच्या खर्चावर आणावी लागली.
आम्ही रिम्सच्या बर्न वॉर्डमध्ये गेलो. तिथे अनेक रुग्ण भरती होते. वॉर्डात एसी आहे, मात्र त्यातून थंड हवा येत नाही. दीर्घकाळापासून त्यांची सर्व्हिसिंग करण्यात आलेली नाही.
मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, रिम्स वॉर्डात इतकी गरमी होती की मुलीला खूप दाह व्हायला लागला. तिथले पंखेही योग्य पद्धतीने हवा देऊ शकत नव्हते. म्हणून आम्ही बाजारातून एक हजार रुपयांचा टेबल फॅन घेऊन आलो.
यानंतर पहिल्या ड्रेसिंगनंतर मुलीच्या तब्येतीत सुधारणा दिसली. डॉक्टरांनी दर दुसऱ्या दिवशी ड्रेसिंग करायला सांगितले होते. 26 तारखेला तिची दुसरी ड्रेसिंग होणार होती. मात्र त्याच्या आधीच तिची तब्येत बिघडायला लागली.
रिम्स रुग्णालयात मुलीवर उपचार करणाऱ्या डॉ. शीतल मालुआ म्हणाल्या, बर्न केसमध्ये उपचारांचा प्रोटोकॉल असतो. जर एखादा रुग्ण 60 ते 65 टक्के भाजला असेल तर त्याला किती सलाईन आणि अँटिबायोटिक्स द्यावे याचा पूर्ण कोर्स आहे. बर्न पेशंट रुग्णालयात आल्यानंतर पहिले काम वॉशिंग आणि क्लिनिंगचे असते. त्यानंतर तत्काळ त्याची ड्रेसिंग केली पाहिजे, जेणेकरून जखम लवकर भरायला सुरूवात होते आणि दाह कमी होतो.
दुमका रुग्णालयात असे काही करण्यात आले नाही. योग्य पद्धतीने क्लिनिंग करण्यात आली नाही, प्रॉपर ड्रेसिंगही झाली नाही. रुग्णाची योग्य काळजी घेण्यात आली नाही.

बातम्या आणखी आहेत...