आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • No Separate Immunity Medicine For Children; Reduce Screen Time And Increase Physical Activity With A Healthy Diet

तिसऱ्या लाटेपासून मुलांचे संरक्षण:मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी वेगवेगळ्या औषधांची गरज नाही; हेल्दी डायट आणि फिजिकल अॅक्टिव्हीने वाढेल इम्युनिटी

जयपूर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पालकांनी किंवा घरातील इतर सदस्यांनी बाहेरुन घरात आल्यानंतर विशेष काळजी घेण्याची गरज

देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये संसर्ग वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. पण, या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून आपल्या मुलांना वाचवता येईल. यासाठी आपल्याला मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवावी लागेल. यात मुलांच्या पालकांचा मोठा सहभाग असायला हवा.

याबाबत आम्ही बालरोग तज्ज्ञांशी बातचीत केली. त्यांनी सांगितल्यानुसार, घरातील फक्त मोठ्या व्यक्तींचीच नाही, तर लहान मुलांची काळजी घेण्याची गरज आहे. मुले जास्त घराबाहेर पडत नाहीत, पण घरातील मोठ्या व्यक्तींकडून त्यांना संसर्त होऊ शकतो. अशा परिस्थितीत विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

‘जंक फूडऐवजी फळे खाऊ घाला’
जेके लोन हॉस्पिटलचे बालरोग तज्ज्ञ जेष्ठ प्राध्यापक डॉ. आरके गुप्ता सांगतात की- मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी वेगळी औषधे नसतात. मुलांसाठी शारीरीक हालचाली(व्यायाम किंवा खेळणे) गरजेचे आहे. याशिवाय मुलांचा स्क्रीन टाइम (टीव्ही आणि मोबाइल) एकदम कमी केला जावा. तसेच, मुलांना बाहेरील पदार्थ किंवा जंक फूडऐवजी जास्तीत-जास्त फळे द्यावीत.

त्यांनी पुढे सांगितले की, मुलांची पूर्ण झोप होणे गरजेचे आहे. यामुळे मुलांना वेळेवर झोपण्याची आणि उठण्याची सवय लावावी. आयुर्वेदिक काढ्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्याचा वैज्ञानिक पुरावा नसल्यामुळे जास्त काढे देऊ नका. लहान मुलांमध्ये काढ्यामुळे पोटदुखी किंवा संडास लागण्यासारखे आजार होऊ शकतात. पण, मुलांना हळदीचे दुध देऊ शकतात.

जीवनशैलीत बदल
डॉ. गुप्ता पुढे सांगतात की, लॉकडाउनमुळे मुलांची जीवनशैली पूर्णपणे बलली आहे. मुले उशीरा झोपतात आणि उशीरा उठतात. यामुळे त्यांची खाण्याच्या वेळाही बदलत आहेत. आपली जीवनशैली रोगप्रतिकारशक्तीवर मोठा परिणाम करते. त्यामुळेच मुलांना पूर्ण झोप, हिरव्या पालेभाज्या, फळ इत्यादी गोष्टी देण्याचा प्रयत्न करावा.

हे लक्षात ठेवा

बालरोग तज्ज्ञ डॉ. प्रिती अग्रवाल सांगतात की, ‘ज्या मुलांचे पालक किंवा घरातील इतर सदस्य बाहेर फिरुन येतात. त्यांनी घरात आल्यावर कोरोना नियमांचे योग्य पालन करावे. घरात आल्यावर कोणत्याही वस्तुला हात लावू नये, मुलांच्या जवळ जाऊ नये. मुलांना जवळ करण्यापूर्वी स्वतः आपले शरीर(हात,पाय,तोंड) स्वच्छ करुन घ्यावे.’

बातम्या आणखी आहेत...