आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोना, क्वॉरंटाइन, डिस्टन्सिंग, आत्मनिर्भरता यातले कोणतेच शब्द माहीत नाहीत, मात्र अनेक पिढ्यांपासून ते याच शब्दांभोवतीची जीवनशैली पाळत आहेत. ‘काेराेना से नहीं, डर ताे कुदरत से लगता हैं,' टेकडीवर शेळ्या चारणाऱ्या छगन बारेलाचे हे वाक्य.
महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांना विभागणाऱ्या सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये यावल अभयारण्याच्या पलीकडे भाेकर नदीच्या खाेऱ्यात वसलेला हा गढताल पाडा. सुमारे दाेन हजार लाेकवस्ती. राज्यांच्या नकाशातील स्थान मध्य प्रदेशात, पण एका पायवाटेनं महाराष्ट्राशी जोडलेलं. डोंगरदरीतील १५ किलाेमीटरची काटेरी पायवाट तुडवत आम्ही रूपसिंग बारेलांच्या झोपडीपाशी पोहोचलो. वडील नानासिंग यांच्याकडून रूपसिंगला या पाड्याचे मुखियापण वारशात मिळाले. औपचारिक शिक्षण घेतलेल्या मोजक्या तरुणांपैकी रूपसिंग एक. त्यांनी सांगितले, ‘काेराेनामुळे आमच्यावर परिणाम झाला, पण अामचं काहीच अडलं नाही. क्वॉरंटाइन जगणं आणि सुरक्षित अंतर हे येथील आदिवासी वस्त्यांचं मूळ सूत्र. हाेळीचा अपवाद वगळता हे लोक कधी गर्दी करीत नाहीत. दाेन भावांची घरेही सुरक्षित अंतरावर. धान्य आपल्याच शेतात पिकवायचं. त्यामुळे फक्त मीठ, तेल साेडलं तर बाकी आत्मनिर्भरच.
कोणालाच गावात प्रवेश नाही...
सध्या तरी कुणी बाहेर जाऊ नये आणि बाहेर गेलेल्यांना गावात घेऊ नये असेच सर्वानुमते ठरत होते. गावाप्रमाणे आपल्यालाही रेशन दुकान मिळावे ही त्यांची मागणी होती, पण मिळत नाही याची तक्रार नव्हती. शिक्षण आणि आरोग्य या दोन धाग्यांनी हा पाडा मुख्य प्रवाहाला जोडला गेला असता, पण मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था आश्रमशाळेत झालेली आणि शासकीय दवाखान्यांवर यांचा विश्वासच नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.