आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Dvm originals
 • Now Corona Test Can Be Done Sitting At Home, ICMR Approves Home Test Kit, Know What Benefits, What Disadvantages And Complete Way To Test

एक्सप्लेनर:घरबसल्या करा कोरोना चाचणी; ICMR ने किटला दिली मान्यता, जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे

4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • जाणून घेऊया ही टेस्टिंग किट काय आहे? त्याचे फायदे काय आहेत? आणि भारतातील त्याचा वापर कोरोना रोखण्यासाठी कसा उपयुक्त ठरू शकतो...

इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने कोरोनाच्या होम टेस्टिंग किटच्या वापराला मान्यता दिली आहे. या किटच्या मदतीने आपण घरी बसून कोरोना टेस्ट करू शकता. आयसीएमआरने 'कोविसेल्फ' नावाच्या टेस्टिंग किटला मान्यता दिली असून ती पुण्यातील मायलाब कंपनीने बनविली आहे.

अशाप्रकारच्या किट याआधीच अनेक देशांमध्ये वापरात आहेत. होम टेस्टिंग किटला यूएस औषध नियामक - अन्न व औषध प्रशासन (यूएस-एफडीए) ने नोव्हेंबर 2020 मध्ये मान्यता दिली होती. त्यावेळी कोरोना संसर्गाच्या घटनांनी हळूहळू वेग पकडायला सुरुवात केली होती. अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढू नये आणि लोकांना घरातच राहून टेस्टची सुविधा मिळावी, अशी अमेरिकन सरकारची इच्छा होती. त्यामुळे या किटच्या वापरास मान्यता देण्यात आली होती.

होम टेस्टिंग किटला मंजूरी देण्याची मागणी भारतातदेखील करण्यात आली होती. अखेरीस, आयसीएमआरने होम टेस्टिंग किटला मंजुरी दिली. चला तर मग जाणून घेऊया ही टेस्टिंग किट काय आहे? त्याचे फायदे काय आहेत? आणि भारतातील त्याचा वापर कोरोना रोखण्यासाठी कसा उपयुक्त ठरू शकतो...

 • होम टेस्टिंग किट म्हणजे काय?

कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे की नाही, हे तपासण्यासाठी आपल्याला रॅपिड अँटीजन किंवा RT-PCR या चाचण्या कराव्या लागतात. या सर्व चाचण्यांसाठी वैद्यकीय तज्ज्ञ आणि लॅब आवश्यक आहेत. कोरोनाची होम टेस्ट किट हा एक सोपा पर्याय आहे. हे प्रेग्नन्सी टेस्ट किटसारखे आहे. याच्या मदतीने, कुणीही व्यक्ती कोणत्याही लॅब किंवा वैद्यकीय तज्ज्ञांच्या मदतीशिवाय घरबसल्या कोरोना टेस्ट करु शकते. जर आपली कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली तर आपल्याला कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे लागले. आणि निगेटिव्ह आली तर आपल्याला RT-PCR टेस्ट करावी लागेल.

 • ही किट कसे कार्य करते?

ही टेस्ट किट लेटरल फ्लो टेस्टवर कार्य करते. आपण आपल्या नाकातून किंवा घशातून घेतलेले सँपल या ट्यूबमध्ये ठेवला. ही ट्युब आधीपासूनच लिक्विडने भरलेली असते. ही ट्युब किटच्या आत घातली जाते जेथे लिक्विड शोषक पॅड लावला असतो. या पॅडद्वारे, लिक्विड एका पट्टीवर जाते, जिथे आधीपासूनच कोरोना व्हायरसचे स्पाइक प्रोटिन ओळखणारे अँटीबॉडीज असतात. जर तुम्हाला कोरोना विषाणूची लागण झाली असेल तर या अँटीबॉडीज सक्रिय होतात आणि किट आपली चाचणी पॉझिटिव्ह असल्याचे दर्शवते. किटवर एक डिस्पेल आहे जिथे चाचणीचा निकाल दर्शवला जातो. रिपोर्ट तुम्हाला तुमच्या ईमेलवर किंवा टेस्ट किट बनवणार्‍या कंपनीच्या अ‍ॅपवर देखील बघता येऊ शकतो.

 • आपण ही किट कशी वापरू शकता?
 1. ICMRने ही किट केवळ अशा लोकांना वापरण्याचा सल्ला दिला आहे ज्यांना कोविडची लक्षणे आहेत किंवा कोविड संक्रमित व्यक्तीशी त्यांचा संपर्क आला आहे. आपल्याला ही टेस्टिंग किट नजीकच्या वैद्यकीय दुकानातून किंवा ऑनलाइन खरेदी करावी लागेल.
 2. ही किट खरेदी केल्यानंतर, आपल्याला आपल्या मोबाइलमध्ये किटशी संबंधित अ‍ॅप डाउनलोड करावा लागेल. ज्या कंपनीची किट आपण खरेदी केली असाल त्याचा अ‍ॅप Google प्ले स्टोअर किंवा अ‍ॅपल स्टोअरमधून डाऊन करावा लागेल.
 3. टेस्ट करण्याची संपूर्ण प्रक्रिया अ‍ॅपमध्ये किंवा टेस्टिंग किटमध्ये सांगितली जाईल. अ‍ॅपमध्ये, आपण व्हिडिओ किंवा फोटोद्वारे देखील हे समजून घेऊ शकता. टेस्ट केल्यानंतर, किटचा फोटो त्याच मोबाइलने काढावा लागेल, ज्यात तुम्ही अ‍ॅप इंस्टॉल केलंय. हे अ‍ॅपला कोरोना टेस्टिंगच्या सेंट्रल पोर्टलशी जोडलेले असेल. आपल्या टेस्टचा निकाल काहीही असो, तो पोर्टलमध्ये थेट अपडेट केला जाईल.
 4. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान, आपल्या गोपनीयतेची काळजी घेतली जाईल. आपला मोबाइल नंबर, चाचणी निकाल यासारखी माहिती कोणालाही शेअर केली जाणार नाही. जर तुमचा निकाल सकारात्मक असेल तर तुम्हाला कोविड प्रोटोकॉल पाळावा लागेल, जर तो नकारात्मक असेल तर तुम्हाला आरटी पीसीआर चाचणी घ्यावी लागेल.
 • ही किट बाजारात किट कधीपर्यंत उपलब्ध होईल?

मीडिया रिपोर्टनुसार, पुढील एक आठवड्यात ही किट बाजारात उपलब्ध होऊ शकते. एका किटची किंमत 250 रुपये आहे. किट विकत घेण्यासाठी आपल्याला डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता नाही. म्हणजेच, आपल्याला कोरोनाची लक्षणे असल्याचे वाटत असल्यास आपण स्वतः किट विकत घेऊ शकता आणि चाचणी करू शकता.

 • या किटचे परिणाम किती अचूक आहेत?

लॅबमध्ये घेण्यात आलेल्या चाचण्यांच्या तुलनेत होम टेस्ट किटच्या निकालांची अचूकता 70% ते 80% कमी असल्याचे दिसून आले आहे. चुकीच्या पद्धतीने नमुना घेतल्यास, संसर्ग झाल्यानंतर 1-2 दिवसांच्या आत टेस्ट केल्यास निगेटिव्ह रिपोर्ट देखील येऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते जर दोन्ही चाचण्या करण्याची पद्धत एकसारखी असली तरीही त्यांच्या निकालाच्या अचुकतेत फरक अधिक आहे.

 • भारतासाठी अशा प्रकारच्या किटची गरज का आहे?

संपूर्ण कोरोना संसर्गाच्या बाबतीत सध्या अमेरिकेनंतर भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहेत. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. सरकारचे लक्षही जास्तीत जास्त टेस्टिंगवर आहे, जेणेकरुन संक्रमित लोकांची नेमकी संख्या समोर येऊ शकेल. अशा होम टेस्ट किटमुळे चाचणी वाढेल तसेच टेस्ट सेंटरवरचा दबाव कमी होईल. सद्यस्थितीत, जे वैद्यकीय तज्ज्ञ कोरोना चाचणी घेण्यात गुंतले आहे त्यांची मदत इतर ठिकाणी घेतली जाऊ शकेल. ICMR चे डायरेक्टर डॉक्टर बलराम भार्गव यांनी सांगितल्यानुसार, आणखी तीन कंपन्या अशाप्रकारच्या किट लाँच करण्याच्या तयारीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...