आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Now Internet Will Shutdown, Now The Social App Will Slowdown; Action Plan Drawn Up By The Central Government

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भास्कर ब्रेकिंग:नेट शटडाऊन नव्हे, आता सोशल अॅप स्लोडाऊन; केंद्र सरकार आखतेय कार्ययोजना

मुकेश कौशिक | नवी दिल्ली21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आर्थिक नुकसान : शटडाऊनमुळे 5 वर्षांत 3 अब्ज डॉलरचे नुकसान

कायदा व सुव्यवस्था राखण्यासारख्या आपत्कालीन स्थितीत इंटरनेट बंद करण्यावरून होणारी टीका आणि अब्जावधींचे आर्थिक नुकसान लक्षात घेऊन सरकार एक बहुआयामी कार्य योजनेबाबत विचार करत आहे. यात माहिती व प्रसारण मंत्रालय, आयटी मंत्रालय, दूरसंचार मंत्रालयासारख्या महत्त्वाच्या केंद्र सरकारच्या विभागांना चर्चेचा हिस्सा केले जाईल. इंटरनेट बंद करणे टाळता यावे, कायदा व सुव्यवस्थाही कायम राहावी हा या पूर्ण पर्यायी कार्ययोजनेचा हेतू आहे.

दै. भास्करला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या व्यापक कार्य योजनेंतर्गत इंटरनेट बंद करण्यास शेवटचे शासकीय शस्त्र म्हणून वापरावे लागले तर जसे शस्त्रक्रियेच्या वेळी लोकल अॅनेस्थेसियाद्वारे शरीराचा मोजकाच भाग बधिर केला जातो तसा कमीत कमी व्यत्यय निर्माण केला जाईल. इंटरनेट बंद करण्याविरोधात केवळ जनआक्रोशच नव्हे, तर सर्वोच्च न्यायालयानेही त्याला मूलभूत अधिकाराचे उल्लंघन म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही याबाबत आवाज उठले आहेत.

टेक्नॉलॉजी हस्तक्षेप

याअंतर्गत इंटरनेट पूर्णपणे बंद करण्याऐवजी काही निवडक आयपी अॅड्रेसना स्लोडाऊन करण्याची योजना आहे. यात इंटरनेट पुरवठादारांचा सक्रिय सहभाग व मदतीची गरज भासेल.

जिओ ब्लॉकिंग टूल

जिओ ब्लॉकिंगच्या आधुनिक तंत्रज्ञानाचाही प्रयोग म्हणून वापर करण्याबाबत सरकार विचार करेल. यामुळे वापरकर्त्याच्या भौगोलिक स्थानाच्या आधारे इंटरनेट कंटेंट बाधित केले जाऊ शकते. या तंत्रज्ञानाने ब्लॅकलिस्ट किंवा व्हाइटलिस्ट अकाउंट्सचे जिओ लोकेशन शोधून एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत कंटेंटची जिओ ब्लॉकिंग होऊ शकते.

सोशल प्लॅटफॉर्मसोबत ताळमेळ ठेवला जावा

कोणत्याही संकटाच्या वेळी इंटरनेट कंपन्या आणि सोशल प्लॅटफॉर्म व मेसेजिंग सेवा देणाऱ्या कंपन्यांसोबत स्थितीचा सामना करण्यासाठी ब्लूप्रिंट तयार ठेवावी, म्हणजे या मंचांचा दुरुपयोगाऐवजी सदुपयोग निश्चित केला जावा.

काउंटर स्पीच प्लॅन

समस्यांशी संबंधित मुद्द्यांबाबत पोलिस आणि संबंधित यंत्रणा म्हणजे गृह मंत्रालयाकडे अफवा, फेक न्यूज आणि खोटा प्रचार निष्फळ ठरवणारे काउंटर स्पीच नॅरेटिव्ह तयार केले जातील. यासाठी फेक न्यूज अॅनालिसिस करणाऱ्या संस्था स्थापन केल्या जातील.

असेही शटडाऊन

> नुकतेच म्यानमारमध्ये लष्करी तख्तपालटासाठी शटडाऊन करण्यात आले

> युक्रेनमध्ये विदेशी प्रचार रोखण्यासाठी > घानामध्ये सार्वजनिक सुटीच्या वेळी गर्दी नियंत्रित करण्यासाठी

> इथिओपियात परीक्षेदरम्यान नक्कल रोखण्यासाठी

आर्थिक नुकसान : शटडाऊनमुळे ५ वर्षांत ३ अब्ज डॉलरचे नुकसान

एका अंदाजानुसार २०२५ पर्यंत भारतात एक अब्ज इंटरनेट वापरकर्ते असतील. सध्या ७० कोटी आहेत. २०१२ ते २०१७ या पाच वर्षांत १६३१५ तासांच्या इंटरनेट बंदमुळे ३.०४ अब्ज डॉलरचे आर्थिक नुकसान झाले. यात १२६१५ तास मोबाइल इंटरनेट बंद झाल्याने २.३७ अब्ज डॉलर आणि ३७०० तास फिक्स्ड लाइन इंटरनेट बंद झाल्याने सुमारे ६८ कोटी डॉलरचे नुकसान झाले. डेलॉयटच्या अहवालानुसार, प्रत्येक दहा लाख लोकांमागे एक दिवसाच्या इंटरनेट शटडाऊनमुळे सरासरी २.३ कोटी डॉलरचे नुकसान होते. या आर्थिक नुकसानीसोबत अशा शटडाऊनचा वापर व्यक्तीचे खासगी जीवन व मूलभूत अधिकारांसाठी होत आहे. यामुळे जगभरात नेटबद्दल जागरूकता वाढत आहे.

बातम्या आणखी आहेत...